The Wedding Anniversary - भाग १
आरती , एक पास्तिशीतली टिपिकल इंडियन हाऊस वाईफ. आज जरा ती लवकरच उठली.नेहमी प्रमाणे अंघोळ करून देवपूजा करून तिने स्वयंपाक करायला सुरवात केली. थोड्या वेळाने तिचे सासू सासरे पण उठून नेहमीच्या सवयीप्रमाणे मॉर्निंग वोक ला निघून गेले. नाही मनले तरी आज तीच सौंदर्य जरा जास्तच खुलले होते. अंगावर फेंट कलरची गुलाबी साडी आणि आतून पांढऱ्या कलरचा स्लीव्ह लेस ब्लॉऊज .केस टॉवेल ने बांदलेले आणि हलकासा मेकअप. तस तिला कधी मेकअप आवडत नव्हता कारण जन्मताच तिला नैसर्गिक सौंदर्य लाभलेले होत. पण आजचा दिवस वर्ज्य होता. ब्रेकफास्टची तयारी करून आरतीने गौरी आणि गौरव ला जरा घाहीतच झोपेतून उठवलं आणि त्यांची रवानगी वॉश बेसिन ला केली. गौरी आणि गौरव दोघे जुळे भावंडं , जेमतेम दिसायला एकसारखी. अकरा वर्षाची.नुकतीच कॉन्व्हेंट ची चौथी संपवून पाचवीला आलेली. गौरव ने जर केस वाढवून मुलींचे ड्रेस घातले तर तो गौरी वाटावी आणि गौरीने जर केस कापून बॉय कट केला तर ती गौरव वाटावा इतकी जुळी.अर्ध्या झोपेत का होईना पण तिने त्या दोघांना तयार करून ब्रेकफास्ट ला टेबल वर बसवलं. दोघांनाही दूध आवडत नसलं तरी आईच्या भीतीने का होईना दोघांनी नाक दाबून ते प्यायलं. स्कूल बस चा हॉर्न वाजतो ना वाजतो तोच दोघेही नाश्ता अपुरा ठेऊन घाई गडबडीत आपली स्कूल बॅग सावरत जिन्यातून पळत सुटले. हे रोजचे पाहून आरतीला थोडे वाईट वाटायचे पण इलाज नव्हता त्या मुळे ती नेहमीच त्यांच्या डब्यात एक्सट्राच जेवण देत असायची. एव्हाना मुले जिना उतरून स्कूल बस मध्ये चढत होती आणि आरती हे सर्व आपल्या बाल्कनीतून पाहत होती. मुले स्कूल बस मध्ये बसल्यावर तिने बाल्कनीतूनच त्यांना बाय केले.का कुणास ठाऊक पण आज तिला खूपच वाईट वाटत होत. बाल्कनीत विचार करत असताना कधी तिच्या डोळ्यात पाणी आले तिलाहि कळले नाही. स्वतःला सावरून तिने परत आपला मोर्चा कीचेन कडे वळवला.थोड्या वेळाने तिचे सासू सासरे आल्यानंतर तिने त्यांना नमस्कार केला. त्या दोघांना हि वाईट वाटत होत पण तेही तिला आशिर्वादाशिवाय दुसरे काहीही देऊ शकत नव्हते. आरतीच्या हिरमुसलेल्या चेहऱ्या कडे बगून तिच्या सासूला पण स्वतःचे अश्रू रोखता आले नाहीत. दोघीही अगदी आई आणि मुलीच्या नात्याने खूप वेळ रडल्या. हे पाहून सत्तरी ओलांडलेल्या आरतीच्या सासर्याच्या डोळ्यात पण पाणी आले. साठलेल्या भावनांना मोकळी वाट करून दिल्या नंतर दोघींनीही घर आवरायला घेतलं.साधारणता ११ च्या सुमारास सकाळची जेवणे उरकून सासरे आपल्या बेडरूम मध्ये निघून गेले. सासूने सर्व आवरा आवर आपल्या हातात घेऊन थोडेसे दर्डाउनच आरतीला तिच्या बेडरूम मध्ये पाठवले. नाखुशीने का होईना पण ती तिच्या बेडरूम मध्ये आली. आपल्या वॉडरोब मधून तिने एक बॉक्स बाहेर काढला त्यातुन एक सुंदर असा रेड कलर चा वन पीस बाहेर काढला . त्यावर एक नजर टाकून आणि हाथ फिरवून तो तिने आपल्या अंगावर चढवला आणि जेमतेम १० मिनिटातच ती तयार होऊन पार्किंग मध्ये आली. तिने आपली पर्स खांद्याला अडकवली आपली स्कुटी काढून मुख्य रस्त्या ला आली. ११ च्या आसपास ची वेळ असल्यामुळे रस्त्यावर ट्रॅफिक नव्हते परंतु नुसत्याच पडून गेलेल्या पावसामुळे रस्त्याची अवस्था कुठे शोधिसी अशी झाली होती. आरती थोडी पुढे आली कि मागूनच एका व्यक्तीने तिला इशाऱ्या ने टायर पंचर झालय म्हणून सांगितले. पहिल्यांदा तिला वाटले कदाचित कोणीतरी मस्करी करत असेंन कारण मागचे दोन वर्षे झाली ह्याच दिवशी ह्याच वेळी हीच स्कुटी याच ठिकाणी पंचर होयची. तिने गाडी थांबवली टायर खरंच पंचर झालं होत. दररोज गाडी चालवायची सवय आणि एरिया माहित असल्यामुळे तिने गाडी तशीच चालवत पंचर च्या दुकानात आणली. नेहमी प्रमाणे आजही पंचर मालक पंचर च दुकान आपल्या मुलाच्या हातात सोडून पंचर काढायला बाहेर गेला होता. तिने आपली गाडी तिथे लावून आत येऊन बसली. नुकताच पाऊस पडून गेल्यामुळे त्या लहान मुलाने अतिथं देवो भव: मानून तिला एक चहा आणून दिला. त्या चहा कडे आणि मुलाकडे बगुन तिने तो घेतला तोच समोरच्या शाळेची ११. ३० ची घंटा वाजली अन पंचर वाल्याच्या मुलाने आपले दप्तर उचलल आणि पळत त्याने एका दमात रास्ता क्रॉस केला आणि शाळेच्या गेट मधून आत गेला. चहाचे चसके घेत घेत अन शाळेकडे बघत बघत आरती कधी विचारत गुंग होऊन गेली तिला कळलंच नाही…!
आरतीने नुकतीच १० वी संपऊन ११ वी ला प्रवेश घेतला होता. नेहमीप्रमाणे तिचे वडील तिला रोज शाळेला सोडायला यायचे तसे ते आजही कॉलेज ला सोडायला आले होते. त्यांचा हा रोजचाच दिनक्रम असायचा कारण आरतीचे वडील सर्कल इन्पेक्टर होते.जवळ एक जीप असल्यामुळे त्याचा त्यांना फायदा होता आणि एक पोलीस ऑफिसर आपल्या मुलीला कॉलेज मध्ये सोडायला येतोय त्यामुळे तिच्या कडे कोणी वाकड्या नजरेने बघायची कोणाची हिम्मत होत नव्हती. त्यात आरती एक कब्बडी प्लेअर. कॉलेजे मध्ये ऍडमिशन घेतल्यानंतर तिने पुढच्या २ आठवड्यातच मुलींची एक कब्बडी टीम उभी केली. दररोज सकाळी ८.३० ते दुपारी १२.३० परेंत कॉलेज आणि दुपारी १२.३० ते संद्याकाळी ६ परेंत कब्बडी प्रॅक्टिस असा रोजचा दिनक्रम. मुलींच्या कब्बडी टीम बरोबर मुलांची हि टीम प्रॅक्टिस करायची. मुलींची टीम उभी राहिलीय हे जरा मुलांना जरा रुचलं नाही त्यामुळे काही ना काही कारण काढून पोरं आरतीला सोडून बाकी सर्व पोरींना कंमेंट पास करायची. आरती या सगळ्या गोष्टींना इग्नोर करून आपल्या खेळाकडे आणि आपल्या टीम कडे लक्ष्य द्यायला पोरींना सांगायची.
आज मात्र विवेक ने हिम्मत केली आणि आरती वर कंमेंट पास केली तशी सर्व मुले फिदी फिदी हसायला लागली.आरतीने तरीही इग्नोर केलं.हे बगुन विवेक ची आजून हिम्मत वाढली परत पोर फिदी फिदी हसायला लागली.विवेक आणि आरती तसे एकाच पोलीस क्वार्टर मधले होते. विवेकचेहि वडील हि आरतीच्या रँक चे पोलीस ऑफिसर होते परंतु त्यांची बदली झाल्यामुळे आरतीचे वडील त्या जागी आले होते.पोराच्या शिक्षणावर बदलीचा परिमाण होऊ नये म्हणून त्याच्या वडिलांनि वरिष्ठांचे उंबरे झिजवून पोलीस क्वार्टर वाचवले होते.त्यामुळे या गोष्टीचा विवेक च्या मनामध्ये राग होता.त्याचा वचपा असा काढायचा हे त्याने ठरवले होते. विवेक तिसऱ्या वेळा कंमेंट पास करणार तशी आरती त्याचा समोर उभी राहिली.१० सेकंद विवेकलाही काय बोलायचं ते सुचले नाही परंतु पुढच्याच क्षणी दोघानांमध्ये असा कलगीतुरा रंगला कि त्याच पर्यवसान मुलं आणि मुलींमध्ये कब्बडी खेळून करायचं असे ठरलं.
खेळाचे सातपुते सर अजून आले नव्हते त्यामुळे मुलांना तर मुलींना छेडायची आयती संधी मिळणार होती. पुढच्याच क्षणी कब्बडी मॅच सुरु झाली आणि हा हा म्हणता हि बातमी सगळ्या कॉलेज मध्ये पसरली आणि एकच तुडुंब गर्दी मैदानाच्या बाजूला जमली. मॅच सुरु झाली आणि बगता बगता पोरांनी साम दाम दंड भेद वापरत सगळ्या पोरींना अगदी निर्दयी पणे ग्राउंड च्या बाहेर टाकलं. कित्तेक पोरींना उठता सुद्धा येत नव्हतं. कोणाच्या हाताला खरचटलं होत तर कोणाच्या पायाला तर कोणाच्या डोक्याला. हे पाहून आरतीला आपला निर्णय चुकला असे वाटले परंतु पुढच्याच क्षणी तिने निर्धार केला आणि चढाई करायची आपली वेळ आहे हे पाहून तिने पांढऱ्या फक्कीला स्पर्श करून आणि पाया पडून पुढे गेली. कारण आता ती एकच या खेळामध्ये राहिली होती. हिमतीने तिने चढाई केली आणि पुढचे १० सेकंड तिने हिम्मतीने पोरांचा सामना केला परंतु पुढच्याच क्षणी विवेक ने तिला घेरले आणि अश्या प्रकारे तिला बाहेर फेकले कि परत ती कब्बडी खेळणार नाही. विवेक ने जसे तिला बाहेर फेकले तशी सर्व पोरे जोरात जल्लोष करायला लागली पण पुढच्याच क्षणी ती मावळली कारण आरतीला साधं खरचटले हि नव्हते कारण जेंव्हा विवेक ने तिला बाहेर फेकले त्याच वेळेस एका मुलाने तिला वाचवले होते.
हे पाहून विवेक चा पारा चढला. तो त्या मुलापाशी आला आणि आहे नाही तेवढी सगळी ताकद वापरून त्याला खाली पाडणार तोच त्या मुलाने गिरकी घेऊन विवेक ला खाली पाडले आणि पुढच्याच क्षणी कब्बडीच्या ग्राउंड मध्ये आला. हे पाहून जमलेलं सगळं कॉलेज पोट धरून हसायला लागलं.विवेक ला आपली झालेली हि फजिती सहन झाली नाही.हे असं त्याला खाली पाडून त्या मुलाने विवेक ला खुललं चॅलेंज दिलं होत. पुढच्याच क्षणी विवेक ते स्वीकारलं आणि स्वतःला सावरत त्याने आपल्या टीम सहित मैदानात प्रवेश केला. जसा त्याने प्रवेश केला तसं कॉलेज च्या मंडळींचा आवाज आणखी वाढला. आवाज वाढलेला पाहून काय झालाय हे पाहण्या साठी सातपुते सर मैदानाकडे निघाले. विवेक ने पहिल्यांदा आपला हुकमी एक्का सुदेशला चढाई ला पाठवले पण विवेक चा पुढच्याच क्षणी भ्रमनिरास झाला जेव्हा त्या पोराने सुदेशला अश्या प्रकारे घोट्याला पकडले कि तो धाड करून खाली आपटला आणि तो बाहेर पडला तसं त्याने आरतीला ग्राउंड मध्ये बोलावले. हे पाहून सगळ्या पोरींना पण एक हुरूप आला आणि त्या आपले खरचटलेल्या अंगाकडे नं बगता खेळाकडे लक्ष्य देऊ लागल्या. एव्हाना आरतीला एवढे कळाले कि हा कोणी साधा सुद्धा प्लेअर नाही नक्कीच कोणीतरी अनुभवी प्लेअर आहे. चढाई ची बारी मुलींची असल्या मुले त्याने आरतीला फक्त दोन बोटांनी तबला कसा वाजवतात तसा इशारा केला आणि चढाई करायला सांगितले. हा इशारा आरतीला कळला आणि पुढच्याच क्षणी तिने जोरात मुसंडी मारून अक्षरशा शंकर चा पाय तुडवला आणि वापस आली. जशी ती वापस आली तशी लक्ष्मी आतमध्ये आली आणि कॉलेज च्या मंडळींनी एकच जल्लोष करायला सुरवात केली. हे पाहून विवेक ची आग तळपायातून मस्तकात गेली आणि त्याने स्वतःतच चढाई करायची ठरवली. पुढच्याच क्षणी त्यांने कब्बडी कब्बडी बोलत चढाईला सुरवात केली आणि एक जोरात उसळी घेत त्याने चीटिंग करत लक्ष्मीला कानात मारली त्यामुळे लक्ष्मीला खूप वाईट वाटले कारण अक्ख्या कॉलेज समोर त्याने हे असे केले होते. लक्ष्मी बाहेर जाणार हे पाहता त्या मुलाने लक्ष्मी ला ग्राउंड मधेच थांबायचा इशारा केला आणि उलट विवेक वर धावा बोलायला सागितलॆ होत कारण नियमाप्रमाणे विवेक त्याच्या जागेवर वापस गेलेला नव्हता आणि तो आता आरती वर धावा बोलणार होता. लक्ष्मी वजनाने थोडी हट्टी कट्टी असल्याने त्या मुलाने लक्ष्मीला इशाऱ्याने विवेक ला कसे उचलून फेकायचे हे सांगितल. आपल्या झालेल्या बेइज्जतीचा तिला बदला तर घ्यायचाच होता त्यामुळे ती लगेच तयार झाली. जसा विवेक ओव्हरकॉन्फिडेन्स मध्ये डाव्या बाजूने बोनस लाईन च्या जवळ आला तस लक्ष्मीने अगदी स्पीड ने आणि आपल्या चपळाईने त्याला वरच्या वर उचलले आणि जमलेल्या पोरात फेकून दिले तसं पोरं आणि पोरी चेकाळळया आणि त्यांच्या आवाजाने सगळं जुनिअर कॉलेज दणाणून गेलं. स्वतः प्रिंसिपल सर सुद्धा आपल्या मददनीसाह ग्राउंड कडे धावत आले. विवेक ची तर पाचावर धारण बसलेली होती. एव्हाना सर्व पोरांनीं आणि पोरींनीं त्या पोराला वरती उचलले होत. सातपुते सर आणि प्रिन्सिपल सर येताच त्यांनी त्या मुलाला खाली उतरवलं.
सातपुते सर ग्राउंड वर पोहोचताच त्यांना सगळ्या परसस्थितीचा अंदाज आला होता. या जल्लोश्याच्या माघे आपल्याला दिसणारा मुलगा केंद्र स्थानी आहे हे पाहून त्यांना हायसं वाटलं.कारण त्यांचा पासा बरोबर आणि अचूक ठिकाणी पडला होता. सातपुते सरांनी सर्व मुलं आणि मुलींना शांत केलं. सर्व मुले आणि मुली शांत झाली. आरतीने पुढे येऊन त्या मुलाला कोण आहेस हे विचारलं कारण याआधी तिने त्याला कधीच पाहिलं नव्हतं. मग सातपुते सर पुढे आले आणि त्यांनी त्या मुलाची ओळख सर्व कॉलेज आणि प्रिंसिपल ला करून दिली. हा दीपक ,दीपक जाधव. कब्बडीच्या डिस्ट्रिक्ट लेवल चॅम्पियन टीम चा कॅप्टन. आजच त्याने आपलं कॉलेज जॉईन केलं आहे. सरांच्या तोंडून हे आईखल्यावर मात्र विवेक चक्रावला त्याला आपली चूक लक्षात आली. आरतीही थोडीशी आश्चर्यचकित झाली पण तिला अगोदरच कळाले होते कि हा कोणी तरी एक्सपेरियन्सड खेळाडू आहे पण हे माहित नव्हतं कि हा डिस्ट्रिक्ट चॅम्पियन टीम चा कॅप्टन होता.
विवेक अजूनही शॉक मध्ये खाली बसलेला होता. खेळभावना जपत दीपक ने आपणहुन पुढे होऊन आपला हात पुढे केला आणि विवेक ला उठवलं. दीपक ने हात पुढे केल्यावर तर त्याला अजून मेल्यागत झालं. त्याला आपली चूक कळाली होती त्यामुळे त्यानेहि पुढे होऊन दीपक ची माफी मागितली. दीपक त्याला आरती आणि मुलींच्या टीम कडे घेऊन गेला. विवेक ने त्यांचीही माफी मागितली. त्या दिवसापासून मात्र एक झालं आरती दीपमय झाली. कधी दोघांचा सहवास वाढला हे त्या दोघांनाही कळाले नाही. दीपक च्या टीम मध्ये सामील झाल्या मुले पहिल्यांदाच जुनिअर कॉलेज ने पहिले तालुका लेवल आणि नंतर डिस्ट्रिक्ट लेवल कब्बड्डी चॅम्पनशिप जिंकली आणि याचा परिणाम असा झाला कि दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडली. आधीच कोवळे वय आणि पहिले प्रेम कोणाला नको असतं.भेटीगाठी वाढल्या. कॅफेच्या चकरा वाढल्या. मित्रांबरोबरच्या छोट्याश्या का होईना लॉन्ग ड्राईव्ह वाढल्या. आणि एक कोमल, सालस,निरागस प्रेम फुललं.
एव्हाना टायर पंचर काढून झालं होत.मॅडम मॅडम ! म्हणून जेंव्हा पंचर वाल्याने आरतीला दोन वेळा आवाज दिला तेंव्हा कुठे आरती भानावर आली.तिच्या चेहऱ्यावर एक आठवणीतलं गोड हसू होत.आरती जेव्हा आपल्या आठवणीत रमली होती तेंव्हा पंचर वाल्याने टायर पंचर काढून ठेवलं होत. आरतीने त्याला पंचर चे पैसे चुकते केले आणि काही वेळातच ती सिटी मॉल मध्ये आली. नेहमीप्रमाणे तीने आपल्या व्हीएल - फॉर लव्ह स्टोर मधून एक ग्रीटिंग आणि एक गुलाब घेतला आणि बिलिंग साठी बिलिंग काउंटर पाशी आली तशी लक्ष्मी ची नजर बिलिंग काउंटर पाशी उभी असलेल्या आरती पाशी गेली. आरतीला ला पाहून लक्ष्मी थेट आपल्या ऑफिस मधून बाह्येर आली. तिने तिला जवळ जवळ ओढूनच बिलिंग लाईन मधून बाहेर काढले. दोघींनचीहि नजरा नजर झाली. लक्ष्मी ने तिला आपल्या ऑफिस मध्ये नेले आणि जो तिने आरतीवर प्रश्नांचा भडीमार सुरु केला कि ती थांबेच ना. खूप दिवसानंतर म्हणजे जवळ जवळ ती १० वर्षा नंतर लक्ष्मी ला भेटत होती. शेवटची भेट हि त्यांची कॉलेज संपल्यानंतर आरतीच्या लग्नात झाली होती त्यानंतर ती आत्ताच भेटत होती तीही अशी बिलिंग लाईन मध्ये. आरतीने तिला लक्ष्मीच्याच टेबल वरचा पाण्याचा ग्लास दिला आणि तिला खाली शांत बसायला सांगितले. मग लक्ष्मीहि शांत झाली. खूप दिवसानंतर लक्ष्मीला हि आनंद झाला होता कोणीतरी हक्काचं आपल्या जिवाभावाचा माणूस भेटलं होत नाहितर दररोज च काम आहेच. आज लक्ष्मीला आरतीबरोबर खूप गप्पा मारायच्या होत्या मागच्या १० वर्ष्याचा गॅप भरून काढायचा होता. तिने तिला न विचारता ना तिची राय मागता तिने डिरेक्ट एक कॅब बुक केली आणि तिला घेऊन कॅफे दोस्ताना ला घेऊन गेली. कॅफे दोस्तानाला पोहचताच आरतीला तिचा भूतकाळ आठवायला लागला. तीच लक्ष्मी कडे कमी आणि कॅफे मध्येच जास्त लक्ष्य होत. नंतर जस जशी लक्ष्मीची बडबड वाढत गेली तस तशी ती आणखीच आठवणीत रमत गेली….
१२ वी झाल्यानंतर खास सातपुते सरांनी आग्रह केला म्हणून दीपक ने त्याच कॉलेज मध्ये आर्ट्स साठी ग्रॅड्युएशन ला ऍडमिशन घेतले. त्याच्या जवळ राहता येईल म्हणून आरतीने चांगले मार्क्स पडले असले तरी दुसऱ्या कॉलेज मध्ये न जाता तिथेच बीएसची ला ऍडमिशन घेतले मग आरतीला पाहून लक्ष्मीनेपण त्याच कॉलेज मध्ये ऍडमिशन घेतले. असाहा तीन तिघाडा. दीपक च फिक्स होत आर्ट्स करायचं सोबत कब्बड्डी मग नंतर खेळाच्या कोठ्यातून पोलीस भरती. त्यामुळे त्याने आपलं पूर्ण लक्ष हे कब्बड्डी कडे केंद्रित केलं होत. आरतीला पण दीपक च प्याशन आणि डेडिकेशन खूप आवडायचं. बगता बगता दीपक च्या अंडर कॉलेज ने पहिले युनिव्हर्सिटी नंतर स्टेट चॅम्पियन शिप जिंकली. जिकडे तिकडे दीपक चा बोलबाला. कॉलेजे मध्ये दीपक च वाढत वजन पाहून आरतीला आकाश ठेंगणे झाल्यासारखं वाटायचं. एवढे सगळे झाले तरी या तिघांची कधी भेट होयची नाही अस होयचंच नाही. प्रॅक्टिस चालू असताना पाणी आणून देणे प्रॅक्टिस संपल्या नंतर जबरदस्तीने नाश्त्याला नेने. आटवड्यातून एकदा निवांत गप्पा मारण्या साठी मग दोस्ताना कॅफे.आरती स्वतःला पूर्ण विसरून गेली होती. जिथे तिने ११ वी आणि १२ वी मध्ये कब्बड्डी ची टीम उभा केली होती तीच आज कब्बड्डी पासून दूर जात होती. दीपक सतत तिला या गोष्टीसाठी रागवत होता पण ती फक्त एकच उत्तर द्यायची तू खेळाला काय किंवा मी खेळले काय एकच आहे. मला शंभर ऑपशन्स अवायलेबल कॅरिअर करायाचे पण तुला एकच. तू जे कमावतोयेस त्यातच मला आनंद आहे. असे उत्तर मिळाल्यावर दीपक ला खूप वाईट वाटायचं पण तेवढाचआनंद हि वाटायचा कि या जगात आई वडिलांनंतर असे कोणीतरी आहे जे माझ्या बद्दल आणि माझ्या भविष्या बद्दल चांगला विचार करतय. या सगळ्या गोष्टीवरून लक्ष्मीला खूप काही समजत होत. दोघांचं निःस्वार्थ प्रेम. दोघेही एकमेकांबद्दल खूप पोजेसीव्ह होते पण प्रॉब्लेम असा होता कि अजून दोघांपैकी एकानेही एकमेकांजवळ आपल्या प्रेमाची कबुली दिली नव्हती. आख्या कॉलेज ला कळत होतं पण यां दोघांना कळत नव्हतं.
बघत बघत शेवटचं वर्ष आलं आणि कॉलेज च्या कब्बडी टीमच सिलेक्शन नॅशनल साठी झालं. दीपक हि आता स्पोर्ट्स सेक्रेटरी झाला होता. कॉलेज च्या खेळाचं बजेट खेळाडूचं खान पान आणि सर्व मॅनेजमेंट त्याच्या हातात होत. दीपकची या गोष्टीमुळे फरपड होऊ नये आणि प्रॅक्टिस कडे दुर्लक्ष्य होऊ नये म्हणून आरतीने सर्व मॅनेजमेंट आपल्या हातात घेतल होत आणि सोबत लक्ष्मीची होतीच. कॉलेज मध्ये नॅशनल च जोरदार वार फिरायला लागलं. जो तो नॅशनलचंच बोलत होता. सातपुते सर जीव लावून प्रॅक्टिस घेत होते. नवे डावपेच आखत होते. मुले हि कसून मेहनत घेत होती. दीपक हि कसून मेहनत करत होता कारण त्याला माहित होत कि हा एकच चान्स आपल्याकडे आहे. आपलं स्वप्न आपलं भविष्य हे याच खेळांवर निर्भर आहे. बघत बघत दिवस निघून गेले. नॅशनल साठी दिल्ली ला जायचं होत. सर्व कॉलेज नि आपल्या लाडक्या टीम ला सेंड ऑफ दिला. दीपक आपल्या पासून दूर जातोय हे पाहून आरतीच्या डोळ्यात पाणी आल. ते पाणी दीपक न अचूक टिपलं. त्यालाही वाटत होत आरती आपल्या सोबत असावी आपली खंबीर साथ. पण ते पोसिबल नव्हतं. दोघांनीही हॅन्डशेक केला आणि पुढच्याच क्षणी दिपकने आपलं मन घट्ट केलं आणि बस मध्ये जाऊन बसला. कारण त्याच स्वप्न मोठ होत.त्याला या मोहपाशात अडकायचं नव्हतं. त्याला आरतीचं प्रेम दिसत होत पचत होत, नकळत तोही तिच्या प्रेमात होता. पण कॅरिअर सेट झाल्याशिवाय तो या गोष्टींकडे फक्त बघ्याची भूमिका म्हुणुन बघणार होता.या विचारत बस कधी मार्गस्त झाली त्याला सुद्धा कळालं नव्हतं. जिल्ह्यांपरेंत बस आणि नंतर ट्रेनचा प्रवास असं करत त्यांना दिल्ली ला पोहचायचं होत. इकडे बस निघाली आणि आरतीच्या अश्रूंचा बांध फुटला. जवळ जवळ ४ वर्ष्या नंतर तो तिच्यापासून इतक्या लांब जात होता. मागच्या ४ वर्ष्यात ते दोघे सुट्ट्यात सुद्धा भेटत होते. आरती काही ना काही कारण काढून लक्ष्मी सोबत दीपक ला दोस्ताना मध्ये भेटत होती. मन मोकळे करत होती. पुढचा एक महिना तिला ह्याच्या शिवाय काढायचा होता. दीपक ला जाऊन फक्त ५ मिनिटं झाली होती तरी तिला ती ५ वर्षा सारखी वाटत होती पुढचा एक महिना तिला त्याच्या शिवाय काढायचे होते हे तिला पचत नव्हतं. लक्ष्मींनी तिची समजूत काढल्यावर मात्र ती शांत झाली आणि पुढच्या कामाला लागली.
पहिली मॅच हरल्यानंतर पुढच्या ३ मॅचेस कॉलेज ने जिंकल्या आणि दणदणीत फायनल्स मध्ये प्रवेश केला. सातपुते सरांना तर आभाळच ठेंगणं झाल्यासारखं वाटलं.डिस्ट्रिक्ट लेवल ला सुद्धा क्वालिफाय नं होणारी टीम आज दीपक च्या अंडर नॅशनल फायनलस ला आली होती. आरतीने तर खुश होऊन आख्या वर्गाला आज कॉलेज कॅन्टीन मध्ये पार्टी दिली होती. फायनल्स आत्ता हरियाणा टीम बरोबर होणार होती जी या वेळेस आपल्या विजयाची हॅट्रिक करणार होती. मॅच च्या अगोदर दोन्ही टीम च्या कॅप्टन आणि त्याच्या कोचेस ची एक स्वतंत्र पत्रकार परिषद झाली.उद्या फायनल्स. बघायला स्वतः देशाचे खेळमंत्री येणार होते. नाही मनले तरी महाराष्ट्रातल्या बऱ्याच वृत्तपत्त्रांनी दीपक ची दखल घेतली होती. छोटा का होईना पण दीपक चा फोटो पेपरात छापून आला होता. आरतीने ते कात्रण काढून आपल्याला वहीत चिटकवलं होत. दीपक च्या आई वडिलांना पण अभिमान वाटत होता. आरतीचे वडील मात्र या सगळ्यातून अलिप्त होते.
फायनल सुरु झाली तशी सगळ्यांची धाकधूक वाढली. नॅशनल असल्या मुले याच धारावाहिक डीडी स्पोर्ट्स वर चालू होत. याच डिरेक्ट प्रसारण कॉलेज मध्ये पण लावलं होत. सगळं कॉलेज आज ग्राउंड वर जमलं होत. प्रत्येक वर्ग नि वर्ग रिकामा होता. ना लेक्चर ची गडबड ना प्रॅक्टिकल्स चा ताण .प्रत्येकजण आज श्वास रोखून हि कब्बडी मॅच पाहत होत. आरती आणि लक्ष्मी तर फिंगर क्रॉस करून बसल्या होत्या. जसा शंकर ने पहिला पॉईंट घेतला तस सगळं कॉलेज वरातीत नाचल्यागत नाचायला लागलं. शंकर हाही दीपक बरोबर १२ वी नंतर ह्याच कॉलेज मध्ये राहिला होता आणि पुढे टीम मध्ये हि त्याने आपलं वेगळं स्थान निर्माण केलं होत. प्रत्येक पॉईंट ला कॉलेज च एक वेगळंच रूप पाहायला मिळत होत. ना सिनिअर ना जुनिअर ना शिक्षक ना विद्यार्थी सगळे आज एक होऊन एकच जल्लोष करत होते आणि पॉईंट ऑफ सेलीब्रेशन होत कब्बडी टीम आणि दीपक. बगता बगता खेळ शेवटच्या मिनिटाला आला आणि एकच धाकधूक सगळ्या कॉलेज च्या पोरा आणि पोरींमध्ये वाढली. कारण हरियाना आणि महाराष्ट्र दोनी टीम चा स्कॉर बरोबर होता. दोनी बाजूला जेमतेम खेळाडू रिंगणात होते. म्हणजे दोन्ही बाजूला अशीही परिस्तिथी नव्हती कि खेळाडू कमी आहेत. एकदम कांटे कि टक्कर मुकाबला होत होता. हरियाणा साईड वरून एक मुलगा चढाईला आला पण दीपक ने खूप चांगल्या रित्या खेळाडूंची मांडणी केल्या मुले त्याला हात हलवत वापस जावं लागलं. एक शेवटची रेड, तीस सेकंद, स्कॉर बरोबरीवर त्यामुळे कोणीच रिस्क घ्यायला तयार नव्हते त्यामुळे दीपक ने रेड टाकली. परंतु तो फक्त अँपॉसिट साईडला पुढे येऊन थांबला. सर्वच आश्चर्यचकित झाले कारण दीपक पुढे होऊन रेड ला गेला परंतु प्रतिस्स्पर्धीला शिवत नव्हता. सर्व जण ओरडू लागले अगदी सातपुते सर सुद्धा. पण दीपक हा फक्त कब्बड्डी कब्बडी मनत टाइमर कडे लक्ष देत होता. हरियाणा टीम सुद्धा आश्चर्यचकित होऊन हे पाहत होती कि हा असा का करतोय. कुणालाच काही उमगत नव्हतं. आरती सुद्धा गर्भगळीत झाली होती. शेवटचे १० सेकंद राहिले. आत्ता मात्र सगळं स्टेडियम ओरडायला लागलं. कॉमेंटेटर्स सुद्धा ओरडायला लागले आणि हेच दीपक ला पाहिजे होत. जस सगळं स्टेडियम ओरडायला लागलं तस सगळ्या हरियाणा टीमच लक्ष तिकड गेलं आणि हीच संधी साधून दीपक ने पॉईंट मारला आणि झटकरून आपल्या साईड ला आला.हरियाणाच्या टीम ला हे लक्षात यायच्या आत टाइमर शून्य ला आला होता आणि दीपक ने पॉईंट चोरला होता. रेफ्री ने शिट्टी मारली आणि एकच जल्लोष सुरु झाला. ना भूतो ना भविष्यती असा विजय झाला होता. हरियाणा टीम च कब्बड्डीच्या विजयाचं ह्याट्रिकच स्वप्न भंगलं होत. सातपुते सर तर अक्षरशः गुढग्यावर बसून रडू लागले. कॉलेजचा तर विषयच वेगळा होता त्यांनी तर प्रिंसिपल सरांनाच उचलून घेतलं. अक्षरशा पुढचा एक तास पोर आणि पोरी बेफाम होऊन ग्राउंड वर नाचत होती. दामू शिपायाने पळत जाऊन ऑफिस मधून फटाके आणले आणि पुढच्याच मिनिटाला सगळा कॉलेज चा परिसर फटाक्यांच्या आवाजाने दणाणून गेला. आरती तर बिचारी मटकन खाली बसली आणि तिचे आनंद अश्रू तिलासुद्धा रोखता आले नाहीत. लक्ष्मी ची सुद्धा तीच हालत होती.
एक वेळेस सगळ्यांना असे वाटत होते कि दीपक कब्बड्डी ची मॅच हातातली घालवणार परंतु त्याचा गेम प्लान हा फक्त त्यालाच माहीत होता. असे म्हणतात ना सरप्राईझ एव्हरी वन विथ युअर नेक्स्ट मूव्ह. असच काहीतरी दीपकने आपल्या हजर जवाबी पनाने दाखवलं होत. यासाठी त्याने आसपास च्या क्राउड चा बरोबर उपयोग करून अपोनंट टीम वर प्रेशर तयार केला आणि त्यांच लक्ष भंग केलं होत. कारण त्याने एवढे ओळखलं होत कि आपण जर रेड मारायला गेलो तर नक्कीच पकडले जाऊ कारण तेवढी संख्याबळ आणि अनुभव प्रतिस्स्पर्धी संघा कडे होता त्याच बरोबर टाईम संपत आल्यामुळे काहीजरी झालं तरी हरियाणा टीम रिस्क घेऊन आपल्याला धरणारच होती आणि याचा परिणाम पॉईंट वर झाला असता आणि आपोआप हरियाणा टीम जिंकली असती. एव्हाना हा गॅम प्लॅन सगळ्या स्टेडियम ला कळाला होता. कंमेंटेटर, पर्यवेक्षक,प्रेक्षक सगळेच दीपक ची तारीफ करू लागले. पोरांनी दीपकला अक्षरशः डोक्यावर घेऊन नाचू लागले. सातपुते सरांना सुद्धा दीपकची कुवत किती पुढच्या लेवल ची आहे हे एव्हाना त्यांच्या लक्षात आले होत. त्यांनी सुद्धा दीपक ला खांदयावर उचललं आणि सगळ्या ग्राउंड भर फिरवलं. .थोड्या वेळानी टीम ने ट्रॉफी स्वीकारली आणि एक एक करून क्रीडा मंत्र्यांनी सगळ्यांना शुभेच्या देवून मेडल परिधान केली. ट्रॉफी स्वीकारताना सुद्धा क्रीडा मंत्र्यांनी दीपक ची तारीफ केली. आणि टीम जल्लोष करत संद्याकाळी परतीच्या प्रवास साठी ट्रेन मध्ये बसली. त्या रात्री कोणी सुद्धा झोपलं नाही ना टीम ना दीपक ना आरती. अपेक्षित फळ मिळाल्यामुळे दीपक ला कधी एकदाच आपण आपल्या आई वडिलांच्या पायावर डोखं ठेवतोय असं झालं होत. त्याच बरोबर त्याला आरतीची सुद्धा खूप आठवण येत होती तिला तो खुपचं मीस करत होता. कधी तिला एकदा भेटु अस झालं होत .नाही म्हणलं तरी आपल्या यशामाघे जेवढा आई-वडील आणि सातपुते सर यांचा वाटा आहे तेवढाच किंवा त्यापेक्षा अधिक वाटा कदाचित आरतीचा आहे असे त्याला वाटत होत.
आरतीची तीच हालत होती. तीही या कुशीवरून त्या कुशीवर करत होती. तिलाही कधी उद्याचा दिवस उजडेल अस झालं होत. आज लक्ष्मी सुद्धा तिच्या बरोबर तिच्या घरी थांबली होती. मध्यरात्री पॅरेंत दीपक च्या गप्पा मारून झालयावर लक्ष्मीला झोप आली आणि ती झोपली पण आरतीला मात्र डोळ्याला डोळा लागत नव्हता सारखी उठून बसायची कारण होत दीपक. एक महिन्या नंतरची भेट. त्याच्या सामोरं कसं जायचं ? त्याच स्वागत कस करायचं ? मी त्याला कसं अभिनंदन करू? त्याला काय खायला घेहून जाऊ ? त्याला काय गिफ्ट देवू ? या विचारताच सकाळ कधी झाली तिलाही कळलं नाही. जशी सकाळ झाली तशी ती उठली. लक्ष्मीला हि उठवलं. आळोखे पिळोखे देत लक्ष्मी पण उठली. दोघी पुढच्या एका तासात तयार झाल्या आणि काहीतरी गोड करायच्या नादात लागल्या. खमंग असा वेलची,काजू-बदाम आणि तूप केळीटाकून गोड शिरा तयार केला. तो डब्यात पॅक केला आणि दोघी सकाळी सकाळीच कॉलेज मध्ये पोहोचल्या. एका रात्रीत कॉलेज च रुपडं पालटलं होत. जिकडे बघावं तिकडं तोरणं आणि फुल माळा अडकवल्या होत्या. एन्ट्री गेट वर च्या फळ्यावर अगदी सुंदर हस्ताक्षरात स्वागत मजकूर लिहला होता.आरतीला खूप कामे होती. आधी रांगोळी काढायची होती. मग शहरात जाऊन दीपक साठी गिफ्ट पण आणायचं होत आणि कॉलेज मध्ये वेलकम फंक्शन बरोबर रेफ्रेशमेंट पण अरेन्ज करायची होती. तिला आज काय करू आणि काय नाही अस झालं होत.
अठरा तासाचा प्रवास करून फायनली दीपक आणि त्याची टीम कॉलेज मध्ये पोहोचली. गेट वर येताच दामू शिपायाने फटाक्यांची एक रांग लावली त्यासरशी सगळी विंनिंग टीम विंनिंग कप घेऊन बस च्या टपावर गेली. कॉलेज च्या गेट पासून दोन्ही बाजूला सगळी पोरं-पोरी हातात फुल घेऊन थांबली होती. जसं जशी बस पुढं पुढं सरकायला लागली तसं तशी पोर आणि पोरी फुलांचा वर्षाव कब्बड्डी टीम वर करू लागली. उत्साही पोरं कॉलेज च्या नावाने घोषणा देत होती. पोरीही त्यामाघे होत्याच. बाहेरची येणारी जाणारी मंडळी हि थोडी वेळ थांबत होती,आतमध्ये डोकावत होती. बस गर्दी तुन सरकत सरकत कॉलेजच्या पोर्च पाशी आली तश्या पुन्हा एकदा घोषणा झाल्या. दीपक सह कब्बडी टीम बस च्या टपावरून खाली उतरली. पोर्च च्या पायऱ्यांवर कॉलेज चा सगळा टीचिंग,नॉन टीचिंग स्टाफ थांबला होता. नेहमी गंभीर दिसणारे प्रिंसिपल सर तर आज खूपच कृतज्ञ दिसत होते. कॉलेज च्या लेडीज स्टाफ ने दीपक आणि सगळ्या विंनिंग टीम औक्षण केलं. पुढं होऊन दीपक नं विंनिंग कप प्रिंसिपल सर च्या हातात दिला तसं प्रिंसिपल सरांनी त्याकडे एकदा पाहिलं आणि दोन्ही हातानी तो कप खालून वर उचलला तसं कॉलेज ने परत घोषणा द्यायला सुरवात केली. दीपक परत भाराहून गेला. पण मघा पासून त्याची नजर चलबिचल होती. कोणाला तरी शोधत होती. पण ती वेक्ति त्याला काही दिसत नव्हती. कधी एकदा त्या वेक्तीला पाहीन असं झालं होत. खूप किस्से सांगायचे होते, खूप काही बोलायचं होत पण दीपक चा भ्रमनिरास झाला. त्याला आरती कुटच दिसत नव्हती. दीपक ची शोध मोहीम चालू असतानाच प्रिंसिपल सरांनी पोर्च मध्ये सजहून ठेवलेल्या टेबल वर तो कब्बड्डी चा विंनिंग कप ठेवला आणि बरोबर एक तासांनी कॉलेज च्या असेम्बली हॉल मध्ये जमायचा सूचना दिल्या. कारण टीम प्रवास करून थकली होती. त्यांना हि थोडं फ्रेश होयच होत. आराम करायचा होता. सरांनी घोषणा करताच सगळं कॉलेज असेम्ब्ली हॉल कडे पांगल.आज सेकंड हाफ चे सगळे लेक्चर्स आणि प्रॅक्टिकल आधीच सस्पेंड केले होते. मग पाच दहा मिनिटं इकडच्या तिकडच्या गप्पा मारून सगळी कब्बडी टीम सातपुते सरांबरोबर रेश्ट रूम गेली. दीपक मात्र शांत होता. त्याच मन जड झालं होत. कधी एकदाच घरी जाईल अस झालं होत. कारण त्याचा भ्रमनिरास झाला होता. एवढी सपोर्टिव्ह आरती आज आपलया स्वागताला उभी राहीन असं त्याला वाटलं होत. आपण जिंकलोय याचा भाव त्याला आरतीच्या चेहर्या वर पाहायचा होता.पण तस काहीच झालं नाही. जड अंतःकरणानं तो फ्रेश होऊन टीम सहित सातपुते सरांबरोबर असेम्बली हॉल च्या गेस्ट रूम मध्ये आला.
कॉलेज चा असेम्ब्ली हॉल आज तुडुंब भरला होता. अगदी स्टेज च्या साईड ला पण कॉलेज ची मंडळी दाटीवाटीने बसली होती. प्रिंसिपल सरांनी माईकवर घोषणा केली तशी सगळी कब्बड्डी टीम सातपुते सर सह स्टेज वर आली आणि पुन्हा एकदा सगळ्या कॉलेज नि आपल्या कब्बड्डी टीम ला जवळ जवळ ७ मिनिट्स स्टँडिंग ओव्हेशन दिलं. हे सर्व पाहून सातपुते सर आणि दीपक खूप भारावून गेले. थोड्या वेळा पुरतं दीपक ही आरतीला विसरून गेला. पण जसा हॉल शांत झाला आणि सगळी टीम समोर ठेवलेल्या खुर्च्यांनवर विराजमान झाली तशी दीपक ची नजर कासावीस झाली. ती आरतीला या गर्दीत शोधू लागली. पण आरती काही दिसेना. पुढे चाललेल्या रटाळ भाषण पाहून तर दीपक ला अजून कंटाळा येऊ लागला. त्याला कधी हे सर्व संपेन आणि कधी एकदाचा घरी जाईन असे झालं होत. कारण आरतीविना हा कौतुक सोहळा त्याला अधुरा वाटत होता. त्याने मग विचार करायला सुरवात केली. कदाचित आपलच काहीतरी चुकलं असेन.कारण आपण कधीच तिला प्रायोरिटी दिली नाही. फक्त खेळ खेळ आणि खेळ. तिच्या मनाचं काय. बिचारीने माझ्या साठी काय काय नाही केलं आणि मी स्वार्थी फक्त माझ्या कॅरिअर कडे लक्ष देत होत. तीच काय ? पण मी तरी काय करणार होतो. आयुष्यभर वडिलांना सायकल चालून तर देणार नव्हतो. दररोज पोष्टात जा पाकिटं उचल आणि सायकल मारत ती पोहोचव. मागचे २५ वर्षे होत आली अविरत सायकल चालवतायेत. कारण हि एकच संधी माझं कॅरिअर आणि माझं घर सावरणार होती. पण आतातर पोलीस भरतीचा मार्ग हे मोकळा झालाय मग आतातरी आपण तीच मन समजून घ्यायला हवं. गेली चार वर्षे ती माझी वाट पाहतीय .चार वर्षे !!! बापरे केवढा मोठा अन्याय केला मी तिच्यावर. केवढं निस्वार्थ प्रेम. तेही असल्या स्वार्थी जगात. नाही नाही काही जरी झालं तरी आज मी तिला बोलणारच. रागावली असेन तर कान धरून माफी मागेन पण आज मी तिला आपल्या प्रेमाची कबुली देणार. दीपक या विचारात असताना प्रिंसिपल सरांनी त्याला डायस वर येण्याची विंनती केली तसा तो भानावर आला आणि डायस वर आला आणि एकच टाळ्यांचा कडकडाट हॉल मध्ये सुरु झाला. असं वाटत होत हॉल मध्ये फटाके फुटतायेत. आधीच लांबचा प्रवास , त्यात आल्या आल्या हा कार्यक्रम ,आरतीहि समोर नव्हती ,घरचीही ओढ लागलेली, त्यामुळे त्यानं भाषण जरा आटोपतच घेतलं आणि कार्यक्रम संपताच सातपुते सरांबरोबर घराकडे निघाला.
दीपकच्या वडिलांनी आज सुट्टी घेतली होती आणि का नाही घेणार आज त्यांचा कब्बड्डी नॅशनल चॅम्पियन मुलगा घरी येणार होता. सकाळी लवकर उठून त्यांनी आज एक्सट्राच दूध आणलं होत. कारण आज ते सगळ्या गल्लीला चहा पाजणार होते. कालच जवळच्या नुक्कड वर जाऊन त्यांनी बंगलोर अयंगार वाल्याला मोतीचूर लाडू आणि पेढ्याची ऑर्डर दिली होती.दीपक आल्यानंतर सगळ्यांच तोंड गुळमट करून सोडायचं हा त्यांचा प्लान. सकाळ पासून घरी जवळच्या शहरातल्या पाहुण्यांची वर्दळ होती. काही येत होते काही जात होते. दीपक ची आई हि सकाळ पासून कीचेन मध्ये झटत होती. सगळ्यांची उट बस पाहत होती.आपला मुलगा एक महिन्यानंतर घरी येतोय तोही जिंकून ती भावना आईसाठी वेगळी होती. पाहुण्यांची उठबस आणि दीपक च्या आवडीचं जेवण बनवण्यातच तिचा वेळ कधी निघून गेला तिला सुद्धा कळलं नाही तरी मेहेरबान सोबत दोन मुली होत्या म्हणून बरं झालं. काम उरकत होत. काही वेळातच दीपक घरी येईन म्हणून आईने ओवाळायचं ताट तयार करून ठेवलं . सोबत अर्धी भाकरी आणि पाण्याचा तांब्या ठेवला आणि त्या दोन पोरींसह पाहुण्याची उठबस पाहायला लागली.
सातपुते सरांची स्कुटी वाजली तशी आई ओवाळणीच ताट-तांब्या अन भाकरी घेऊन लगबगीने बाहेर आली. सोबत पाहुणे-राहुळे पण बाहेर आले. सातपुते सरांचं सततचं घरी येणं जाणं असायचं त्यामुळ स्कुटी चा आवाज त्यांना काही नवीन नव्हता. दीपक स्कुटी वरून खाली उतरला तशी सगळी गल्ली त्याच्या घरापाशी जमली. त्या सगळ्यांच्या तोंडावर एक वेगळाच आनंद दिसत होता. जो-तो त्याला मनातून आशीर्वाद देत होता,अभिनंदन करत होता. दीपक दारापाशी आला तस आईने त्याला तिथंच थांबवून त्याच्या आणि सातपुते सरांच्या पायावर पाणी ओतलं, भाकरी ओवाळून कोपऱ्यात भेकली आणि 'आरती ओवाळायचं ताट दे ! ' म्हणून शेजारीच उभ्या असलेल्या आरतीला हाक दिली तसा दीपक चपकलाच. पाहिलं तर त्याला असं वाटलं कि आपण काहीतरी वेगळं ऐकलं असावं किंवा आपल्याला भास तरी झाला असावा कारण रात्रीपासून तो तिचाच विचार करत होता. पण पुढच्याच क्षणी त्याला धक्काच बसला कारण खुद्द आरती आईला ओवाळणीच ताट देत होती. शेजारी लक्ष्मी उभी होती आणि तिच्या साईड ला विवेक ! सातपुते सर सुद्धा अवाक झाले त्यांना सुद्धा हे अपेक्षित नव्हतं. दीपक ने जेव्हा आरतीकडे पाहिलं तेंव्हा स्वतः आई बोलली "सकाळी आलेत तिघेही. खूप गोड आहेत. खास करून हि आरती. सकाळ पासून बिचारी मला सगळ्या कामात मदत करतीय. लक्ष्मी पण सगळं पाहुण्या रावळ्यांना पाहत होती. आणि तो दीपक बाबांना तर सोडतच नव्हता.बाहेरच सगळं सामान हाच आणून देत होता. खूप चांगले मित्र आहेत तुझे" असे बोलून त्याला आई ओवाळायला लागली. दीपकला खूप ओशाळल्या सारखं वाटत होत पण तेवढाच तो आनंदी होता. त्याला वाटत होत आपण किती विचार करत होतो कि ती रागावलीय का ? का ती कॉलजे मध्ये आली नाही ? पण असं काहीही नव्हतं उलट तिनेच आपल्याला सुख:त धक्का दिला तेही असं घरी येऊन. सोबत लक्ष्मी आणि विवेक पण !
ओवाळून झाल्याबरोबर दीपक पहिलं आईच्या , नंतर बाबाच्या आणि मग सर्व थोरा-मोठ्यांच्या पाया पडून घरात आला. देव्हाऱ्याला नमस्कार केला आणि आपलं सुवर्ण पदक देवापुढं ठेवलं पुढच्याच क्षणी बाहेरच्या खोलीत आला. घर तरी केवढं म्हणायचं त्याच जेमतेम वन आरके हुन थोडं मोठ्ठ ! वडिलांनी मग सातपुते सरांना बसायला विनंती केली परंतु ते जायला निघाले. दीपक आणि वडिलांनी त्यांना जेवून जायची विनंती केली पण त्यांनाहि घरी जायचं होत मग त्यांनी फक्त चहा घेतला आणि ते निघून गेले. आसपास च्या शहरातले पाहुणे राहुळे पण मग त्याच कौतुक करून आपल्या वाटला लागले. घरात उरले फक्त आई-वडील आरती , लक्ष्मी आणि विवेक.सगळ्यांनी मग भरपूर गप्पा मारल्या.जेवणे केली पण या सगळ्यात दीपक मात्र वेगळ्याच विश्वात होता. तो फक्त आणि फक्त आरतीकडे पाहत होता. तिचाच विचार करत होता. आज त्याला काहीका होईना पण आपल्या भावना तिच्या परेंत पोहोचवायचा होत्या एव्हाना व्यक्त करायच्या होत्या. पण अशी वेळच येत नव्हती. सगळ्यांची जेवणे झालयावर लक्ष्मी निघाली तशी आरती आणि विवेक पण निघाला. तसा दीपक ला वेळ मिळाला . आरती ,लक्ष्मी ,विवेक दीपकच्या आई वडिल्यांच्या पाय पडून निघाली तसा दीपक पण त्यांच्या बरोबर निघाला कारण या निमित्तानं त्याला आरतीबरोबर वेळ घालवता येणार होता. भावना व्यक्त करता येणार होत्या म्हणून लागलीच तोहि कपडे बदलून तयार झाल़.
क्रमश :
मस्त दमदार सुरुवात झालीय ..
मस्त दमदार सुरुवात झालीय .. पुढील भाग सुद्धा लवकर येऊ द्या.
_________________
खूप गोड आहेत. खास करून हि आरती. सकाळ पासून बिचारी मला सगळ्या कामात मदत करतीय. लक्ष्मी पण सगळं पाहुण्या रावळ्यांना पाहत होती. आणि तो दीपक बाबाना तर सोडतच नव्हता (इकडे विवेक बाबाना तर सोडतच नव्हता हवे ना ) बाहेरच सगळं सामान हाच आणून देत होता. खूप चांगले मित्र आहेत तुझे"
पु भा प्र
पु भा प्र
@अज्ञानी. तुमचा मुद्दा बरोबर
@अज्ञानी. तुमचा मुद्दा बरोबर आहे तिथे विवेकच आहे. टायपिंग करत असताना मिस्टेक झालीय.
@मनिम्याऊ पु. भा. प्र अर्थ
@मनिम्याऊ पु. भा. प्र अर्थ कळवावा ???
पुढील भागाच्या प्रतिक्षेत
पुढील भागाच्या प्रतिक्षेत
पु. भा. प्र.
पु. भा. प्र.
स्टोरी छान आहे पण ग्रामर
स्टोरी छान आहे पण ग्रामर मिस्टेक भरपूर आहेत .
शुद्धलेखनाकडे जरा लक्ष दिले
शुद्धलेखनाकडे जरा लक्ष दिले तर बर होईल
कथाबीज चांगले आहे. पुलेशु!
कथाबीज चांगले आहे. पुलेशु!
लग्नाला १० वर्षे झाली आणि मुलं मात्र ११ ची आहेत. प्लिज पोष्टायच्या आधी एकदा वाचुन बघा आणि शक्य असेल तर शुद्धलेखनाकडे जरा लक्ष द्या. कथा छान आहे.
पुढील भागाची वाट पहात आहे.