कॕनडीयन पंतप्रधान यांनी त्यांच्या देशात घडलेल्या नागरिकाच्या हत्येसाठी भारताला दोषी ठरवल्या दिवसापासुन ज्या घडामोडी घडत आहेत, मला १९८५-८६ वाचनात आलेली कादंबरी रोज आठवते आहे.
कादंबरी चे नाव इन हाय प्लेसेस जी कॕनडा सरकार, त्यांच्या मध्यवर्ती निवडणुका व त्यातला बहुचर्चीत मुद्दा भोवती घोटाळते.
या कादंबरी ने एके काळी विक्रीचे रेकाॕर्ड मोडले आहे.
या कादंबरी ची कथा, बहुचर्चीत मुद्दा असतो की एक अर्धवट वयाचा, जहाजावर जन्माला आलेला मुलगा कॕनडा च्या किनाऱ्यावर उतरतो , पण ते जहाज निघुन जाते आणि तो कॕनडातच रहातो ; या भोवती घोटाळते. त्याला नागरिकत्व द्यावे असे एक राष्ट्रीय पार्टी म्हणत असते तर दुसरी त्याला नागरिकत्व देऊ नये म्हणत असते.
ही कादंबरी वाचताना मनात येई की या देशातले नागरिक आणि राजकीय पक्ष किती सजग आहेत जे एका परदेशी व्यक्ती ला नागरिकत्व द्यावे किंवा नाही याबाबतीत मध्यवर्ती निवडणुका मधे मुद्दा चर्चा करताना दिसत आहेत. याउलट भारतात अनेक बंगलादेशी नागरिक रहातात. स्लिपर सेल चालवतात, एखाद्या राज्यात निवडणुका या परदेशी नागरिकांचे सहायाने एखादा पक्ष जिंकतो ( आसाम ) आणि आसाम गणसंग्राम परिषद या विरूद्ध लढा देते पण तेव्हा स्थिती हाताबाहेर गेलेली असते.
आज असे लाखो लोक बेकायदेशीर पध्दतीने कॕनडात घुसले आहेत. हा त्या देशाचा अंतर्गत प्रश्न नाही तर ते भारताच्या विरोधी कारवाया करत आहेत. हे होत असताना तिथले नागरिक आणि सरकार चुप का राहिले ?
आज कोणीतरी भारतात तुरूंगात असलेला एक गुंड कॕनडातल्या गुन्हेगाराचा गेम करतो आणि त्याची जबाबदारी घेतो.
कॕनडाच्या नागरिकांच्या आणि राजकीय पक्षांच्या सजगतेचा, देशप्रेमाचा भावनेचा झालेला अंत आपण पाहतोय का ?
दुसऱ्या बाजुला एक सजग सरकार हजारो मैलावर असलेल्या भारत विरोधी कारवायांचा खातमा करण्यासाठी आपली राष्ट्रीय सुरक्षितता जपण्यासाठी, एका गुंडाचा वापर करत आहे का ?
एखादी कादंबरी त्या देशाची राजकीय परिस्थिती , संस्कृती आणि विचारधारा यांचे सम्यक चित्रण करते. असे असताना ती वंश व संस्कृती टिकविण्यासाठी प्रयत्नशील असणारी विचारधारा अशी दुषीत का बर झाली असेल ?
दुसऱ्या बाजुला आधीच्या खलिस्तान चळवळीने पोळल्याचा अनुभव घेऊन ही विषवल्ली परदेशातच कोणत्याही मार्गाने संपवायची राजनिती भारताने स्विकारली आहे.
भारतीय सैनिकाचे शिर कापुन नेल्यानंतर पाकिस्तान ला फक्त निषेधाचा खलिता पाठवणारा देश आज आंतरराष्ट्रीय राजकारणात एका प्रगत देशावर कुरघोडी करत आहे.
ही कादंबरी लिहली त्यावेळचा कॕनडा आणि भारत आज एका दुसऱ्या टोकाला पोहोचले आहेत.