लेखन उपक्रम -२ : कितना बदल गया इन्सान - रूपाली विशे- पाटील

Submitted by रूपाली विशे - पाटील on 25 September, 2023 - 01:14

कितना बदल गया इन्सान..!!

बाकीचे अजून आले नव्हते. गाडी यायला तसा वेळच होता. तेवढ्यात त्याचे लक्ष तिच्याकडे गेले.....

साक्षात देवी लक्ष्मी...??

___तीसुद्धा या फलाटावर ..??

तो चमकला ...

बहुरूपी असला म्हणून काय झालं रूप तर देवी
लक्ष्मीचेचं ना ..?

तो खाली वाकला .. बहुरुप्यातला देवीचा आशिर्वाद घेण्यासाठी... मुळातच श्रद्धाळू तो...!

धनवंत हो..!!

देवीचा आशिर्वाद..!

कृतकृत्य होत तो उठला.

समोर पाहिलं..

देवी गायब..

" टिकीट प्लीज..! " तिकीट तपासनीसचा खर्जातला स्वर...

त्याने तिकीटासाठी खिशात हात घातला.

अरेच्चा...!!

पाकीट गायब..!

तो सुन्न..!

नजर ब्रिजवर जाताच...

देवीचा मुखवटा काढून फेकून देत गर्दीत पळणाऱ्या बहुरुप्याकडे हतबुद्धपणे पाहत त्याच्या मनात आलं ...

" देख तेरे संसार की हालत.... क्या हो गई भगवान... कितना बदल गया इन्सान..!!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Lol जमलीय.

मस्त Lol
इतके होऊनही देवावरचा विश्वास अढळ आहे त्याचा. "देख तेरे संसार की हालत.... क्या हो गई भगवान" म्हणत आहे. Proud
छान कल्पना. मस्त जमली शशक.

भारी!