पाककृती स्पर्धा क्र १ - नैसर्गिक घटक (साहित्य) वापरून गोड पदार्थ - maple syrup- छंदीफंदी

Submitted by छन्दिफन्दि on 23 September, 2023 - 13:22
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

ओव्हर नाईट ओट्स with अल्मड बटर, आक्रोड,
आणि maple syrup
साहित्य:
ओटमिल, दूध, almond butter, जयफळ पावडर,
व्हॅनिला इसेन्स, इन्स्टंट कॉफी, आक्रोड, बेदाणे.

क्रमवार पाककृती: 

१. दूध आणि दीड चमचा almond butter microwave मध्ये गरम करून घ्या
२. ते चमच्याने ढवळून एकजीव करा
३. पाव कप पाण्यात एक चमचा इन्स्टंट कॉफी विरघळवून घ्या.
४. आता ती कॉफी, जायफळ पूड , थोडा vanilla essence घाला
५. आता ह्यात oatmeal घाला आणि मिश्रण एकजीव करा.
६. झाकण ठेवून रात्रभर फ्रीज मध्ये ठेवा.
७. सकाळी थोडे अक्रोड १ मिनिट microwave माध्ये भाजा.
८. अक्रोड, बेदाणे त्या oatmeal chia मिश्रणावर टाका.
९. वरून चमचाभर Maple syrup घाला
१०. सकाळची न्याहारी( कॅल्शियम, प्रोटीन, carbs, fiber सगळं आहे त्यात.) एकदम तयार.

PXL_20230923_062205486.jpg

तळटीप - ही रेसिपी माझ्या मुलाची आहे.

PXL_20230923_061842583.jpg
---
PXL_20230923_063819358.MP__0.jpg
---
PXL_20230923_160012185~2.jpg

वाढणी/प्रमाण: 
२ कप
अधिक टिपा: 

अक्रोड ऐवजी बदाम, पिस्ते, काजू हेही घेऊ शकता.
बेदाणा ऐवजी काळया मनुका, सुके जरदाळू, अंजीर यांचे बारीक तुकडेही घेऊ शकता
तुम्ही थोड दूध जास्त घालून थोड सैलसर करू शकता.

एखाद केळ किंवा strawberry che tukde hi घालू शकता

माहितीचा स्रोत: 
मुलाची कल्पकता
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users