लेखन उपक्रम २ : ललाटरारा - स्वाती आंबोळे

Submitted by स्वाती_आंबोळे on 23 September, 2023 - 11:33

बाकीचे अजून आले नव्हते. गाडी यायला तसा वेळच होता. तेवढ्यात त्याचं लक्ष तिच्याकडं गेलं.

ती तिथेच दिसली ‘दो नंबर पर’ त्याच घड्याळाखाली
चोरट्या अधाशी भेटी जेथे घडल्या कोण्याकाळी
आणाभाकांना साक्षी ‘मनहर कहानियाँ’चा ठेला
दोघांमध्ये शेअर झालेला ‘चाय गरम’चा पेला

आठवले सारे तिचे तगादे ‘लग्न करूया’वाले
थोपवताना नाकी नऊच का, अठराही आलेले
स्लो लोकल स्लोअर होत होत मग पार बॅकला गेली
अन् ‘दो नंबर पर आनेवाली’ फास्ट ट्रॅकला गेली

तो अनाउन्समेन्टच्या आवाजाने भानावरती आला
पडलेला उचलुन चेहरा पुन्हा जागेवर लावला
‘बारिश की वजह से यातायात के आज बजेंगे बारा
यात्रियों से यही निवेदन है, वे… ललाटरारापारा…’

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त छंदबद्ध आहे. नऊ काय अठरा.. हे आवडलंच.

ते मलाही कळलं नाही. अनाऊन्समेंटमध्ये कधीकधी शब्द नीट कळत नाहीत तसं असावं असं वाटलं.

ललाट रारा फारा चा अर्थ सांगणार्‍यास मायबोलीवर बक्षीसे जाहीर करणार्‍यांकडून वरळी सी फेस ला पेंट हाऊस !
असेल ललाटी तर अरारा फरारा रारा

आचार्य Lol
(मी सं.स्प. द्यायला आले, पण आता बक्षिस लावलंय तर विजेत्याची वाट बघते.) Proud

मस्त.

ललाटरारापारा = कपाळ हवे तसे बडवुन घ्या.

त्याचा चेहरा पडतोय. तो इंजिन आहे का? की पाऊस आहे?
का ती छत्री आहे?
काही कळत नाहीये.
-----------------
ल ची भाषा येते का कोणाला? Proud
------------------------------------------
'लग्न करु या' व 'दोन नंबर' यातही मेख आहे.

झक्कास!

ललाटावर दोन नंबरची फास्ट लोकल असेल तर तीच मिळेल Wink

धन्यवाद Happy

संयोजकांनी कवितांना गाळा न दिल्यामुळे मी इथेच दुकान थाटलं. Proud

हल्ली कवींना लोक त्यांच्या कविता वाचायचे प्रतिशब्द पैसे मागतात त्यामुळे संयोजकांचा नाईलाज असेल. Proud
अशाच कवींच्या जिवावर माझे अंधाराचे जाळे फिटले.

करेल की शेअर.
>> कुणाकडून मिळणार पेंट हाउस?>> व्हर्च्युअल गणेशोत्सवासारखं पेंटहाऊस पण व्हर्च्युअल आहे.

Lol
संयोजकांनी कवितांना गाळा न दिल्यामुळे मी इथेच दुकान थाटलं. >> Lol कविता करायचीच ठरवली की कोण अडवणार कवीला! डोकं गरगरलं हे वाचुन. द्या हो यांना एक गाळा! Proud

जबरी आहे! ललाटरारापारा झेपलं नव्हतं. प्रतिसाद बघून मग आठवलं. वाचलं होतं, पण तेवढा एक शब्द लक्षात ठेवणं ही कमाल आहे स्वाती आणि ते ओळखणे ही त्याहून जास्त कमाल वावे! दंडवत.

संयोजकांनी कवितांना गाळा न दिल्यामुळे मी इथेच दुकान थाटलं. >> Lol हो, पण कविता गाळीव नाही.

छान!

वाचलं होतं, पण तेवढा एक शब्द लक्षात ठेवणं ही कमाल आहे स्वाती आणि ते ओळखणे ही त्याहून जास्त कमाल वावे! दंडवत... .+१.

Pages