Submitted by स्वाती_आंबोळे on 23 September, 2023 - 11:33
बाकीचे अजून आले नव्हते. गाडी यायला तसा वेळच होता. तेवढ्यात त्याचं लक्ष तिच्याकडं गेलं.
ती तिथेच दिसली ‘दो नंबर पर’ त्याच घड्याळाखाली
चोरट्या अधाशी भेटी जेथे घडल्या कोण्याकाळी
आणाभाकांना साक्षी ‘मनहर कहानियाँ’चा ठेला
दोघांमध्ये शेअर झालेला ‘चाय गरम’चा पेला
आठवले सारे तिचे तगादे ‘लग्न करूया’वाले
थोपवताना नाकी नऊच का, अठराही आलेले
स्लो लोकल स्लोअर होत होत मग पार बॅकला गेली
अन् ‘दो नंबर पर आनेवाली’ फास्ट ट्रॅकला गेली
तो अनाउन्समेन्टच्या आवाजाने भानावरती आला
पडलेला उचलुन चेहरा पुन्हा जागेवर लावला
‘बारिश की वजह से यातायात के आज बजेंगे बारा
यात्रियों से यही निवेदन है, वे… ललाटरारापारा…’
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खासच कि
खासच कि
मस्त.
मस्त छंदबद्ध आहे. नऊ काय अठरा.. हे आवडलंच.
कोणी संत्रे सोलेल का?
कोणी संत्रे सोलेल का? ललाटरारापारा म्हणजे?
ते मलाही कळलं नाही.
ते मलाही कळलं नाही. अनाऊन्समेंटमध्ये कधीकधी शब्द नीट कळत नाहीत तसं असावं असं वाटलं.
मस्त
मस्त
ललाट रारा फारा चा अर्थ
ललाट रारा फारा चा अर्थ सांगणार्यास मायबोलीवर बक्षीसे जाहीर करणार्यांकडून वरळी सी फेस ला पेंट हाऊस !
असेल ललाटी तर अरारा फरारा रारा
आचार्य
आचार्य
(मी सं.स्प. द्यायला आले, पण आता बक्षिस लावलंय तर विजेत्याची वाट बघते.)
मस्त.
मस्त.
ललाटरारापारा = कपाळ हवे तसे बडवुन घ्या.
जबराट कळत नाहीये
जबराट कळत नाहीये
मलाही सायो सारखंच वाटलं. :-
मलाही सायो सारखंच वाटलं. :-
त्याचा चेहरा पडतोय. तो इंजिन
त्याचा चेहरा पडतोय. तो इंजिन आहे का? की पाऊस आहे?
का ती छत्री आहे?
काही कळत नाहीये.
-----------------
ल ची भाषा येते का कोणाला?
------------------------------------------
'लग्न करु या' व 'दोन नंबर' यातही मेख आहे.
कळलं नाही पण मीटर मध्ये
कळलं नाही पण मीटर मध्ये असल्याने वाचायला छान वाटले
झक्कास!
झक्कास!
ललाटावर दोन नंबरची फास्ट लोकल असेल तर तीच मिळेल
ललाटरारापारा- पुलं ( काही अप
ललाटरारापारा- पुलं ( काही अप काही डाऊन) का?
काहीतरी संदर्भ आहे हे १००%.
काहीतरी संदर्भ आहे हे १००%. पुलं वगैरे असेल तर मला नाही येणार. किंवा सिनेमातला.
वावे, वरळीला शिफ्ट व्हायच्या
वावे, वरळीला शिफ्ट व्हायच्या तयारीला लागा.
‘काही अप, काही डाऊन’ - ‘हसवणूक’ - पुलं.
कुणाकडून मिळणार पेंट हाउस?
कुणाकडून मिळणार पेंट हाउस?
माझ्याकरता आऊट ऑफ सिलॅबस
माझ्याकरता आऊट ऑफ सिलॅबस निघाला
पण कळलं आता.
गोष्ट मस्त आहे!
गोष्ट मस्त आहे!
धन्यवाद
धन्यवाद
संयोजकांनी कवितांना गाळा न दिल्यामुळे मी इथेच दुकान थाटलं.
हल्ली कवींना लोक त्यांच्या
हल्ली कवींना लोक त्यांच्या कविता वाचायचे प्रतिशब्द पैसे मागतात त्यामुळे संयोजकांचा नाईलाज असेल.
अशाच कवींच्या जिवावर माझे अंधाराचे जाळे फिटले.
(No subject)
मला मिळतंय का पेंटहाऊस?
मला मिळतंय का पेंटहाऊस?
हो, तू अर्धा क्लू दिला होतास
हो, तू अर्धा क्लू दिला होतास हे खरं आहे.
विचार वेकाला, शेअर करते का.
करेल की शेअर.
करेल की शेअर.
>> कुणाकडून मिळणार पेंट हाउस?>> व्हर्च्युअल गणेशोत्सवासारखं पेंटहाऊस पण व्हर्च्युअल आहे.
संयोजकांनी कवितांना गाळा न
संयोजकांनी कवितांना गाळा न दिल्यामुळे मी इथेच दुकान थाटलं. >> कविता करायचीच ठरवली की कोण अडवणार कवीला! डोकं गरगरलं हे वाचुन. द्या हो यांना एक गाळा!
जबरी आहे! ललाटरारापारा झेपलं
जबरी आहे! ललाटरारापारा झेपलं नव्हतं. प्रतिसाद बघून मग आठवलं. वाचलं होतं, पण तेवढा एक शब्द लक्षात ठेवणं ही कमाल आहे स्वाती आणि ते ओळखणे ही त्याहून जास्त कमाल वावे! दंडवत.
संयोजकांनी कवितांना गाळा न दिल्यामुळे मी इथेच दुकान थाटलं. >> हो, पण कविता गाळीव नाही.
वाचलं होतं, पण तेवढा एक शब्द
छान!
वाचलं होतं, पण तेवढा एक शब्द लक्षात ठेवणं ही कमाल आहे स्वाती आणि ते ओळखणे ही त्याहून जास्त कमाल वावे! दंडवत... .+१.
सायो, व्हर्च्युअली शेअर करते.
सायो, व्हर्च्युअली शेअर करते..
ह. पा., देवकी
छानच! जे न देखे रवी 'ते देखे'
छानच! जे न देखे रवी 'ते देखे' कवी हे पटले आणि कवितेबद्दलचा आदर दुणावला..
Pages