Submitted by SharmilaR on 21 September, 2023 - 09:20
उपक्रम २ - एकारंभ अनंत अर्थम् – भक्त – शर्मिला र.
बाकीचे अजून आले नव्हते. गाडी यायला तसा वेळच होता. तेवढ्यात त्याचे लक्ष तिच्याकडे गेले....."
ती त्याच्या दिशेनेच येत होती.
“आकांक्षा इथे?” मनात कुठेतरी दिलासाही वाटला त्याला.
“खरच जाणार तू..” तिने विचारले.
“हो.. म्हणजे.. तसं ठरलंय नं आता?” तो जरा चाचरला.
“मनापासून..?”
त्याच्याकडे उत्तर नव्हतं.
“हे बघ.. मला आणि तुलाही महित आहे.. हे सगळं राजकारण आहे. ते मंदीर.. ती पूजा.. तिथला गोंधळ हे सगळं तुला मनापासून पटत नाहीय. केवळ सगळ्या ग्रुप पासून वेगळं पडायला नको म्हणून जातोयस तू तिथे. तुला जे पटत नाही त्यावर ठाम रहा नं..”
त्याचं दोलायमान मन आता स्थिर झालं. सगळे येण्याआधीच तिच्या बरोबर तो बाहेर पडला होता.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
>>>>>केवळ सगळ्या ग्रुप पासून
>>>>>केवळ सगळ्या ग्रुप पासून वेगळं पडायला नको म्हणून
होय करावं लागतं बहुतेक. करता आलं पाहीजे. माझे मत.
कथा मस्त. या कथेतून, मानसशास्त्राचा वेगळाच पैलू सामोरा आला.
'कन्फर्मिटी!'
तिथला गोंधळ हे सगळं तुला
तिथला गोंधळ हे सगळं तुला मनापासून पटत नाहीय. केवळ सगळ्या ग्रुप पासून वेगळं पडायला नको म्हणून जातोयस तू तिथे. तुला जे पटत नाही त्यावर ठाम रहा नं..”
त्याचं दोलायमान मन आता स्थिर झालं. सगळे येण्याआधीच तिच्या बरोबर तो बाहेर पडला होता.>>> आवडलं
छान.
छान.
होय!
होय!
>> तुला जे पटत नाही त्यावर
>> तुला जे पटत नाही त्यावर ठाम रहा
छान. उद्बोधक शशक. पटली आणि आवडलीही
छान आहे कथा
छान आहे कथा
पटली आणि आवडलीही +७८६