पालकाची खमंग भाजी
साहित्य -
पालक , तेल, चणाडाळ, शेंगदाणे, कडीपत्ता, लाल मिरच्या, गोडा मसाला, गूळ, चिंच, बेसन, हिंग, सुक्या खोबऱ्याचे काप, काजू. मोहोरी, पाणी, मीठ.
कृती -
१. पालक धुवून, बारीक चिरून घ्यायचा
२. १ चमचा बेसन अर्धा वाटी पाण्यात कालवून त्याची पडते बनवायची .
३. चणा डाळ आणि दाणे गरम पाण्यात भिजवून ठेवायचे
४. थोडी( अर्ध्या लिंबाएवढी) चिंच भिजत टाकायची
५. कढईत तेल गरम करायला घ्यायचं.
६. तेल चांगलं तापलं की त्यात मोहोरी, कडीपत्ता, हिंग , आणि लाल मिरच्या घालयच्या.
७. भिजत घातलेले शेंगदाणे, चणा डाळ, काजू , खोबऱ्याचे काप फोडणीत टाकायचे.
८. परतायचं, डाळ आणि दाणे शिजतील १-२ मिनिटात
९. त्यात बारीक चिरलेला पालक टाकायचा
१०. ते थोड परतायचं. पालक लगेच शिजतो
११. बेसनाची पेस्ट टाकायची आणि लगेच ढवळायचे. जरूरी प्रमाणे पाणी टाकायचे. ढवळत राहायचे
१२. आता त्यात तिखट, गोड मसाला, चिंचेचा कोळ, गूळ, मीठ चवीप्रमाणे टाकायचे
१३. झाकण ठेवून उकळ काढली की गरमा गरम भाजी तयार.
१४. पोळी, भाकरी आणि विशेष करून भाताबरोबर खुप छान लागते.
टीप.
खोबरे, काजू ऐच्छीक आहेत..
अशीच भाजी अळू क्या पानाचीही करतात. मात्र अळू कुकर मध्ये शिजवून घ्यायचा.
चित्रे:
तयारी (४ फोटोंच कोलाज केलंय)
कृती आणि तयार भाजी ( ४ फोटाँच कोलाज केलंय)
पातळ भाजी आहे ना ही? ही महा
पातळ भाजी आहे ना ही? ही महा मस्त लागते.
पातळ भाजी आहे ना ही? >>> हो
पातळ भाजी आहे ना ही? >>> हो
ही महा मस्त लागते>> माझी पण आवडती आहे
चिंच कधी टाकायची ते लिहायला
चिंच कधी टाकायची ते लिहायला विसरलीस चिंच हवीच. तू साहित्यात दिलीयेस.
चिंच कधी टाकायची ते लिहायला
चिंच कधी टाकायची ते लिहायला विसरलीस Happy चिंच हवीच. तू साहित्यात दिलीयेस>>>> मनानी टाकली, लिहायचं राहिलं.
केलं करेक्शन. मी बेसन टाकून झाल्यावर, मग टाकते.
आह्ह्ह्ह!!! ओके. मी बेसन पातळ
ओके. मी बेसन पातळ करताना त्यात कोळ घालते.
छान. पण डाळ भाजी एवढी घट्ट
छान. पण डाळ भाजी एवढी घट्ट सुद्धा करतात?
घट्ट असण्यास काही हरकत नाही,डाळ भाजी म्हणुन जेव्हा जेव्हा खाल्ली पळीतुन वाढावी लागेल एवढी पातळ होती.
छन्दिफन्दि ,
छन्दिफन्दि ,
कृपया पाककृती लेखन प्रकार वापरून ही पुन्हा लिहाल का? म्हणजे स्पर्धेननंतरही शब्दखुणांमुळे वाचकांना शोधायला सोपी पडेल. मी प्रतिसाद हलवेल त्या धाग्यावर.
मस्त रेसीपी. बक्षिसासाठी
मस्त रेसीपी. बक्षिसासाठी शुभेच्छा. मी या सारखी मुद्दा भाजी करते. भाता बरोबर जबरदस्त. सध्या पालक निवडायचा कंटाळा आल्या ने बरेच दिवसात केलेली नाही. व खोबरे काजू हे महाग पदार्थ वापरत नाही. आपले दाणे बरे.
>>>>बक्षिसाकरता शुभेच्छा.
>>>>बक्षिसाकरता शुभेच्छा.
असेच म्हणते.
अमा, सामो, धन्यवाद!
अमा, सामो, धन्यवाद!
कृपया पाककृती लेखन प्रकार
कृपया पाककृती लेखन प्रकार वापरून ही पुन्हा लिहाल का? म्हणजे स्पर्धेननंतरही शब्दखुणांमुळे वाचकांना शोधायला सोपी पडेल. मी प्रतिसाद हलवेल त्या धाग्यावर.
Submitted by admin on 20 September, 2023 - 22:14>>>
मी पाककला विषय निवडला.
पाककृती लेखन प्रकार कुठे शोधू?? थोडी अजून माहिती द्याल का? मी हलवते .
https://www.maayboli.com
https://www.maayboli.com/hitguj/marathi-recipes हा ग्रूप आहे.
पण २ ग्रूप्स कुठे निवडता येतात?
एक तर हा पाककृती ग्रूप निवडा नाही तर गणेशोत्सव निवडा
आय मे बी राँग.
याच पानावर उजवीकडे सर्वात वर
याच पानावर उजवीकडे सर्वात वर "या ग्रूपमधे नवीन लेखन करा" खाली पाककृती पर्याय दिसला पाहिजे.
याच पानावर उजवीकडे सर्वात वर
याच पानावर उजवीकडे सर्वात वर "या ग्रूपमधे नवीन लेखन करा" खाली पाककृती पर्याय दिसला पाहिजे. >>>
नाही दिसत आहे.
या ग्रूपमधे नवीन लेखन करा
त्याच्या खाली
कार्यक्रम, प्रश्न, लेखनाचा धागा आहे. पाक क्रुती दिसली नाही.
वर सामो यांनी लिंक दिलीय ना,
वर सामो यांनी लिंक दिलीय ना, त्या पेज वर. तिथे दिसेल पाककृती पर्याय .
पण मग ते गणपती उत्सव धाग्यात
पण मग ते गणपती उत्सव धाग्यात कसा टाकणार.
उपक्रम की पाककृती
की उपक्रमातली पाककृती?
Admin चा reply सामो नंतर होता..
आणि त्यानी सांगितल्याप्रमाणे गणेश उत्सवाच्या धाग्यात पाककृती टाकायची अस वाटल.
उप्स.
उप्स.
मला ते सामो यांच्या प्रतिसादावार अडमिन प्रतिसाद असे वाटले.
हे वाचल्यावर इथेच खाली स्क्रोल करा.
तिथे दिसतोय बघा पाककृती पर्याय.
नसेल दिसत तर तुम्ही पाककृती ग्रुप चे सदस्यत्व घेतले नसेल? ते घ्या, सामोनी दिलेल्या पेजवर जाऊन.
कृपया आता पहा, याच ग्रुपात
कृपया आता पहा, याच ग्रुपात पर्याय दिसेल. दुसरी पाककॄतीही तो लेखन प्रकार वापरून लिहा.
तुमची ही पाकृ सुद्धा मस्त!
तुमची ही पाकृ सुद्धा मस्त!
अर्थात मी फक्त फोटोच बघतो..
ग्रुपात पर्याय दिसेल. दुसरी
ग्रुपात पर्याय दिसेल. दुसरी पाककॄतीही तो लेखन प्रकार वापरून लिहा.
Submitted by admin on 21 September, 2023 - 23:08>>> दिसतोय आता
तुमची ही पाकृ सुद्धा मस्त!
तुमची ही पाकृ सुद्धा मस्त!
अर्थात मी फक्त फोटोच बघतो..
Submitted by ऋन्मेऽऽष on 22 September, 2023 - 00:>> recipe दिलीये.
पाककृती प्रकारात स्थलांतरीत
पाककृती प्रकारात स्थलांतरीत करेपर्यंत प्रतिसाद देण्याची सोय थांबवत आहोत.