चित्र खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू - विषय क्रं-२- मेहंदी डिझाईन्स(रेखाटने)

Submitted by संयोजक on 20 September, 2023 - 01:53

हा आहे आपल्या सर्वांचा आवडता खेळ प्रकाशचित्रांचा झब्बू..

आजचा विषय - मेहंदी डिझाईन्स(रेखाटने)

स्त्रीचा शृंगार हा मेहंदी शिवाय अपूर्णच..सण कोणताही असो, महिलांना मेहंदी काढण्यासाठी फक्त निमित्त हवे असते. मेहंदीचा सुंदर ओला सुगंध, मेहंदी लालचुटुक रंगल्यावर होणारा आनंद हा सगळ्यांनीच अनुभवला असेल..
मग चला..पाठवा मेहंदी डिझाईन्स (रेखाटने)ची सुंदर छायाचित्र...

खेळाचे नियम आणि अटी
१.प्रकाशचित्र एडिट केलेले किंवा कोलाज नको.
२. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
३. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०२३' ह्या ग्रूपचे सभासद असणे गरजेचे आहे.
४. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
५. झब्बूचे प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.
६. झब्बूचे प्रकाशचित्र संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दोन्ही छानच.
खालचा फोटो घरी मेंदी वर्क केलंय असं वाटत नाही. अगदी प्रोफेशनल वाटतंय काम.

वा मस्त
मेहंदीचा सुवास पोहोचला अगदी

अगदी प्रोफेशनल वाटतंय काम, >>>>> धन्यवाद, रघू आचार्य, हो मी आॅर्डर्स घेते मेहंदीच्या, ही भाचीच्या आणि बहीणीच्या हातावर काढलेली मेहंदी
इथे टीना नावाचा एक आयडी होता, तिने धागा काढला होता मेहंदीसाठी, आता दिसत नाही तीPhoto-0352.jpg
हा अजून एक फोटो, कधी काढलीये हे नाही आठवत आता

मेहंदी, ती सुकण्यापूर्वीच आणि नंतरचा वेगवेगळा रंग - सुगंध आणि अर्थातच 'मेहंदीवाले नाजूक हात' असे सगळेच आवडत असल्यामुळे धागा आवडला, इथे परत येणार बघायला Happy

अरेबिक डिझाईन नाहीत का कुणी मांडली ?

काय माहित!!
आपण फक्त फोटो काढायचे काम केले Happy

सामो थँक्स..
सगळ्यांच्या मेंदी डिझाइन्स सुंदर आहेत.
IMG_20230926_074103.JPG

Pages