लेखन उपक्रम-२ - यश - अज्ञानी

Submitted by अज्ञानी on 19 September, 2023 - 11:34

बाकीचे अजून आले नव्हते. गाडी यायला तसा वेळच होता. तेवढ्यात त्याचे लक्ष तिच्याकडे गेले.....

सध्या काही ठरवणे शक्यही नव्हते. खात्री होइस्तोवर संयम पाळणे नियम आणि शिस्तीच्या भागापेक्षा उपजत स्वभावातच होतं. एक एक क्षण महत्वाचा होता. घड्याळ नेहमीच्या वेगाने बिलकुल फिरत नव्हते आणि प्रत्येक ठोक्यासह इकडे धडधड वाढत चाललेली. आज काहीही करुन मिशन इंपॉसिबलला पॉसिबल करायचंच...

बाकीचेही सर्वच आले. गाडीसुद्धा वेळापत्रक काटेकोर अवलंबत आली आणि बघता बघता सुटलीसुद्धा. त्याचे लक्ष अजूनही तिच्याकडेच होतं....

गाडीने वेग पकडला तशी इकडे मनगट आणि बोटाच्या शिस्तबद्ध कवायती सुरु झाल्या. पण आज काहीच मनासारखं घडत नव्हते. आणि अचानक त्याच्या हातानी प्रथमच यश अनुभवले.... चक्क 14प्रो-मॅक्स !!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गाडी आली.. कचऱ्याची..

ती ओल्या कचऱ्याची बादली

तो सुक्या कचऱ्याचा डबा

धन्य आहे कल्पकतेची Lol Lol Lol Lol

@ऋ
मुंबई लोकल्समध्ये मोबाईल चोरांची एक वाईट जीवघेणी पद्धत ट्रेनच्या दारात असणाऱ्या व्यक्तीचे फोन्स धावत्या ट्रेन मधून बाहेरच्या बाहेरून हिस्कावणे.

@मनिम्याऊ
खिसेकापु परवडले पण असे मोबाइल धारकाला हिसका देवून अनाहूतपणे ओढुन घेणे दोन्ही साइडने जीवघेणा प्रकार आहे. बरेच अपघात सुद्धा ह्यामध्ये झालेले असल्याने त्यावर लिहिण्याचा प्रयत्न.

@सामो
त्या चोरांच्या ट्रेनिंग (!) नंतर कामाचा पहिला दिवस होता.

अज्ञानी हो,
मध्यंतरी काठी मारायचे हातावर जे हातातली बेग किंवा पिशवी खाली पडली पाहिजे.
पाकीट मारी आता होता नाही कारण पैसे हल्ली कोणी ठेवत नाही फार पाकिटात.
घड्याळ मात्र मारले जाते गर्दीत. माझे स्वतःचे एक गेलेय Happy

छान जमलीय.

अज्ञानी, करेक्ट.
पूर्वी तर छत्री ओढायचे व्हीटी-मस्जिद बंदर दरम्यान पूला खाली, तिथे लोकल ट्रेन स्लो व्हायची. पावसाळ्यात दारात एका हातात छत्री घेऊन उभे असत लोक.
तेव्हाही लोक पडण्याच्या घटना होत असत.

बरोबर मापृ
मुंबईमध्ये नव्याने प्रवास करणाऱ्याच्या हे सर्व जीवावर बेतू शकते आणि कुठेतरी दूर खेडेगावातून आलेले घरचे आर्थिक आधारस्तंभ तो किंवा ती असे विकृत मनोवृतीच्या कोणामुळे अपघातग्रस्त झाले तर फार मनास लागतात अश्या घटना पेपरात वाचताना.

सुरवातीला कळली नाही पण ऋन्मेऽऽष ची कॉमेंट वाचून कळली Happy
खूपच वेगळी आणि नवख्या मुंबईकरचा awareness वाढवणारी शशक