Submitted by धाग्या on 19 September, 2023 - 11:22
स्त्री असणं म्हणजे... आपल्याच मालकीच्या घरात आपल्याला काडीची प्रायव्हसी नसणं
स्त्री असणं म्हणजे... आपण एक बारीक भांडं आणि एक चमचा एवढंच वापरून जेवण बनवलं तरी 'किती पसारा केलाय' अशी टेप ऐकणं
स्त्री असणं म्हणजे... ती गाडी घेऊन बाहेर गेली म्हणजे आपण काळजीने व्याकूळ होणं.......गाडीच्या
स्त्री असणं म्हणजे... सहा वाजताच्या फंक्शनसाठी आपण साडेपाचला तयार होऊनसुद्धा फायनली साडेआठला निघणं
स्त्री असणं म्हणजे... आपल्या बेडरूममधले यच्चयावत डिटेल्स आपल्या सासूला माहित असणं
स्त्री असणं म्हणजे... सिंगल तरुणाहून जास्त 'ब्रह्मचर्य' भोगणं
स्त्री असणं म्हणजे... आपलं स्वातंत्र्य, आशा, आकांक्षा बलिवेदीवर चढवणं
.
.
तरीही मी म्हणेन प्रत्येक पुरुषाला एक तरी स्त्री असावीच.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
>>>>>>आपल्या बेडरूममधले
>>>>>>आपल्या बेडरूममधले यच्चयावत डिटेल्स आपल्या सासूला माहित असणं
हाहाहा!! प्रचंड हसले.
>>>>>>>सहा वाजताच्या फंक्शनसाठी आपण साडेपाचला तयार होऊनसुद्धा फायनली साडेआठला निघणं
छान लिहीले आहे.
स्त्री असणं म्हणजे... आपल्याच
स्त्री असणं म्हणजे... आपल्याच मालकीच्या घरात आपल्याला काडीची प्रायव्हसी नसणं
स्त्री असणं म्हणजे... आपण एक बारीक भांडं आणि एक चमचा एवढंच वापरून जेवण बनवलं तरी 'किती पसारा केलाय' अशी टेप ऐकणं
स्त्री असणं म्हणजे... ती गाडी घेऊन बाहेर गेली म्हणजे आपण काळजीने व्याकूळ होणं.......गाडीच्या >>
सत्य परिस्थिती लिहिलीय. स्त्री बरोबरीने हप्ते भरत असली तरी मालकी हक्क, दारावर नाव वगैरे काही तिचं नसणं. तिला देखील घरात काडीची प्रायव्हसी नसणं
तिची स्वतःची, तिने घेतलेली गाडी असली आणि ती कितीही नीट चालवत असली तरी तिच्या चालवण्याची आणि गाडीची चिंता करणं, तिला आणि इतरांना चिंता करतोय हे जाणवून देणं….
असणं म्हणजे... आपलं स्वातंत्र्य, आशा, आकांक्षा बलिवेदीवर चढवणं >> हे तर सार आहे विवाहित स्त्रीच्या आयुष्याचं
थॅंक्स सामो.
थॅंक्स सामो.
हाहाहा!! प्रचंड हसले.>> नाऊ यु नो दॅट वी नो दॅट सासू नोज
समहाऊ नाही हो माझं आईबरोबर
समहाऊ नाही हो माझं आईबरोबर तसं शेअर करण्याचं नातं नव्हतं पण खूप मुलींचं असतं ( बहुतेक)
थॅंक्स मेधा.
थॅंक्स मेधा.
स्त्री बरोबरीने हप्ते भरत असली तरी मालकी हक्क, दारावर नाव वगैरे काही तिचं नसणं>>> बाकी सगळं ठीक, पण हे सिरियस आहे. मग ती हप्ते भरत असो वा नसो.
कटूसत्य
कटूसत्य
याबाबत शतकांपूर्वी तर अंधारयुग होते.
दशकांपूर्वी थोडी पहाट होऊ लागली, पण प्रचंड घुसमट होतीच.
आता आता बराच फरक पडला आहे व पडत आहे.