उपक्रम २ - एकारंभ अनंत अर्थम् -पिकप - अमितव

Submitted by अमितव on 19 September, 2023 - 10:54

बाकीचे अजून आले नव्हते. गाडी यायला तसा वेळच होता. तेवढ्यात त्याचे लक्ष तिच्याकडे गेले.....
तेच गुबगुबीत गाल, खळ्या पडणारा हसरा चेहेरा. पाणीदार डोळे, हसली की तिच्या डोळ्यातून दोन थेंब तरी पाणी यायचंच. आज हवेत गारवा होता म्हणून तिने बंद गळ्याचं ज्याकेट घातलं होतं, पण आत त्याच्या आवडत्या केशरी रंगाच्या ड्रेसची बॉर्डर त्याला दिसली आणि तो आनंदीत झाला. हसू लपवलं त्याने, पण तिला कळलंच. आज तिच्याच शेजारी बसायचं असं त्याने ठरवून टाकलं.
इतक्यात बस आली, सगळे धावले. आपण तिच्या साठी जागा अडवून ठेवू म्हणून हा लगबगीने चढला. खिडकीशी बसला तोच आवाज ऐकू आला. सगळा डबा संपव! ओह्ह! बाबा नाही येणारे बसमध्ये???

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ती लहान मुलगी आहे आणि तिला तिची आई सांगते आहे की "डबा संपव."
पण नक्की कळली नाही. कोणीतरी संत्रे सोलायची वाट पहाते आहे.

साधी आहे हो. >> ओके.
मी पण यात काय ट्विस्ट असेल याचा विचार करत प्रतिसाद पाहिले. अन्यथा काहीतरी ट्विस्ट शोधुन काढली असती. Proud
सरळ शशकातून ट्विस्टेड अर्थ शोधा असा सुद्धा उपक्रम हवा. Wink