Submitted by विश्राम कुलकर्णी on 17 September, 2023 - 05:48
मुक्या चांदण्यांचे मुक्यानेच गाणे ,
तमा दूर लोटून प्रकाशासी देणे ,
पुऱ्या अंबरात अणुमात्र असुनी ,
महाकाय अंधार टाके पिऊनी .. !
पहा मुंगळ्यांची कशी रांग चाले ,
कशा एकरेषेत लढाया निघाले ,
घडो धरणीकंप आघात कितीही ,
उठोनि पुन्हा कार्यात मग्न झाले ,
मोडून पडली घरटी जरीही ,
भंगून गेली स्वप्ने तरीही ,
असेच वरदान आम्हा मिळावे ,
पडोनी शतदा पुन्हा उठावे ..!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
आवडली !
आवडली !
कल्पना उत्तम आहे पण
कल्पना उत्तम आहे पण तज्ञांच्या भाषेत - मीटर का काय म्हणतात ते
म्हणजे कमी जास्त होतायत शब्द.
अजुन कडवी हवी होती. फार पटकन संपली.
पहीले कडवे फार आवडले.
व्वा सुंदर सकारात्मक...
व्वा सुंदर सकारात्मक...
मुंगळ्यांपेक्षा मुंग्या मला अधिक सकारात्मक वाटतात.
नन्हीं चींटी जब दाना लेकर चलती है
चढ़ती दीवारों पर, सौ बार फिसलती है
मन का विश्वास रगों में साहस भरता है
चढ़कर गिरना, गिरकर चढ़ना न अखरता है
आख़िर उसकी मेहनत बेकार नहीं होती
कोशिश करने वालों की हार नहीं होती