मानदुखी आणि खांदेदुखी

Submitted by Ashwini_९९९ on 11 September, 2023 - 10:52

नमस्कार ...माझी मुलगी १७ वर्षाची आहे.
गेल्या काही महिन्यांपासून तिला खांदेदुखी आणि मानदुखी चा त्रास होतोय. मी जवळपास ४ ते ५ डॉक्टरांना कन्सल्ट केलंय.
त्यांनी सांगितलेले गोळ्यांचे कोर्स पण तिने पूर्ण केलेत. Xray काढून झालंय. सगळ्या डॉक्टरांचं म्हणणं आहे सिरीयस काही नाही...तीच पोश्चर चुकतंय बसण्याच...म्हणून सिटिंग arrangment पण बदलून पहिली..पण काहीच फरक पडत नाहीये...
खांदे स्पेशली मानेचे जॉइंट, मानेची मागची बाजू खूप दुखते तिची..कधी कधी डोक्याची मागची बाजू पण दुखते.
काय उपाय आहे का यावर?
कुणाला याबद्दल काही माहिती असेल किंवा माहितीत कोणी डॉक्टर असतील तर कृपया सांगा .

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

चांगल्या फिजिओथेरपिस्टला दाखवा.
बसण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे हा त्रास नक्कीच होतो. माझ्या नवऱ्याला झाला होता. फिजिओथेरपी आणि फिजिओथेरपिस्टने सांगितलेले व्यायाम न कंटाळता केले की नक्की फरक पडतो.

पुण्यात असाल तर एकदा डॉ. हिमांशु वझे (ऑर्थोपेडीक, स्पोर्ट्स मेडीसीन) दाखवुन बघा असे सुचवेन. त्यांच्या कडे मी दोनदा गेलोय , गेल्या वर्षी गेलो ते मानेच्या दोन्ही बाजुने खांद्यापर्यंत दुखणे आणि लोअर बॅक यासाठी. त्यांनी संगतिलेल्या व्यायामांनी पोस्चर नीट ठेवण्यास सांगितलेल्या युक्त्यांनी पूर्ण बरे वाटले. चुकीच्या पोस्चर्स मुळे उद्भवणाऱ्या दुखण्यावर त्यांचे व्यायामाचे इलाज मला फार उपयोगी वाटले.

धन्यवाद वावे..... आता तेच करावं असं वाटतं आहे...आत्तापर्यंत एकाही डॉक्टर ने फिजिओथेरपिस्ट कडे जा अस सांगितलं नाहीये..
फक्त काही व्यायाम दिले होते जे ती दररोज करतीये

आई ग्ग!!! लेकीला लवकर बरे वाटू देत. वरती उपाय सुचविलेले आहेतच, नक्की बरे वाटेल. आराम पडेल.

गोळ्या कशासाठी दिल्यात? पेन मॅनेजमेन्टसाठी की मसल रिलॅक्सन्ट? दिवसभर कम्प्युटरवर असते की दुसरं कुठलं डिव्हाइस, अभ्यासाची पुस्तकं वेडंवाकडं बसून हाताळते?

पुण्यात शारंगपाणी होते, आता आहेत की नाही माहिती नाही. त्यांच्या ‘ट्रीटमेन्ट’नं एका नातेवाईकांना खूप फायदा झाला. ऑर्थोकडे जा पण तिला ट्रिगर मॉनिटर करायला सांगा म्हणजे त्यांना नीट माहिती देता येइल.

@ सिंड्रेला...पेन mangement साठी आणि कॅल्शिअम suppliments आहेत. १२वीत आहे ती .त्यामुळे लिहिण दिवसभर चालू असतं.. क्लास मध्ये आणि घरी सुद्धा... assignments , practical books, etc

काही ठराविक व्यायाम आहेत.भुजंगासन, शलभासान यासारखे व्यायाम यासाठी मदत करतात.पाठीच्या मणक्याचे व्यायाम आहेत.
उभे राहून दोन्ही हात पाठी,सरळ नेऊन परत पुढे पायाला टेकवायचे,झोपून बट lifting करणे यांनी फरक पडतो.
पण फिजिओथेरपिस्ट कडे जा.

सतत मोबाईल वापरते का? त्यानेही खूप दुखते.मानेच्या खाली आणि खांदयाच्या खाली खूप दुखते.हा जूनमधील स्वानुभव.

पुण्यात असाल तर दीनानाथ मध्ये बिल्ड क्लिनिक मध्ये दाखवा. व्यायामाने दुखणी बरी करण्याची पद्धती आहे . डॉक्टर पाटील.

मला स्वतःला हा त्रास होता. चुकीचे posture मुख्य कारण होते. झोपताना डोक्याखाली जाड उशी घेतल्यावर त्रास वाढतो असे लक्षात आले. मग पातळ उशी घेतल्यावर बराच आराम पडला. So तिच्या बसण्याच्या/ झोपण्याच्या Posture कडे लक्ष द्या. कदाचीत तेच कारण असेल

अगदी असाच त्रास मला ३ महिन्यांपूर्वी झाला होता. ३ आठवडे मान दुःखी, डोक्याच्या मागच्या बाजुला दुखणे. २ ऑर्थोपेडीक ना दाखवले. दोघांनी मानेचा व्यायाम, physiotherepy आणि calcium , D सप्लिमेंट्स दिल्या तरी काही फरक पडला नाही. थोड्या दिवसांनी डोक्यात आणि चेहऱ्यावर ( तोंडाच्या बाजूला) मुंग्या आल्यासारखे वाटायला लागले. घाबरून Neurologist ला दाखवले. त्यांनी ही वरचेच diagnosis केले आणि त्याच गोळ्या घ्यायला सांगितल्या. माझ्या आग्रहाखातर मेंदू आणि मणक्याचा MRI करायची चिठ्ठी दिली. सगळे रिपोर्ट्स नॉर्मल. काही दिवस व्यायाम आणि physiotherepy सुरू ठेवली आणि एक दिवस अचानक सगळा त्रास थांबला.
माझ्या physiotherepist नी सांगितले की मान खाली वाकून जास्त वेळ केलेल्या कामामुळे (लिखाण, वाचन, laptop स्क्रीन नजरेच्या बराच खाली) बहुतांश लोकांना असा त्रास होतो. त्यांच्या मते neuron activity stimulate झाल्या मुळे पण होऊ शकतो . अशा वेळेस रुग्णाला Gabapentin औषध दिले जाते. माझ्या बाबतीत हे driving करतानाचे चुकीच्या posture मुळे झाले असण्याची शक्यता जास्त होती. Driving करताना मी सीट खूप जास्त अंशात मागे कलते ठेवायचो. आता सीट जास्त upright ठेवता.

खांदे स्पेशली मानेचे जॉइंट, मानेची मागची बाजू खूप दुखते तिची..कधी कधी डोक्याची मागची बाजू पण दुखते.>>मला असा त्रास चुकीची किंवा अगदी पातळ उशी घेतली की होतो. झोपताना मला थोडी उंच उशी लागते, जरा उंची कमी जास्त झाली की मान आणि डोकं भयानक दुखतं. अगदी वापरात असलेली उशी जरी पातळ झाली तरी दुसर्‍या दिवशी मानदुखी सुरू. आता मला सवयीने माहित झालंय.
तुमच्या लेकीला लवकर आराम पडो.

मोबाईल/चुकीचे पोस्चर वगैरे ऑबव्हिअस गोष्टी रुल आऊट केल्या असतील व ॲलोपथी/ फिजीओथेरपीचे उपचार ट्राय करून झाले असतील तर तिला काही मेंटल स्ट्रेस आहे का चेक करा.
माझा खांदा आणि मान दुखायची, ईसीजी वगैरे काढून झाला. एका कोर्समधे स्ट्रेस व खांदेदुखीचा संबंध समजला. आता कधी खांदा किंवा मान दुखली की मी आधी स्ट्रेस ट्रिगर चेक करते. खूप फरक पडला.

@ झंपू दामलू...तुम्ही सांगितलेला त्रासच होतो तिला..
तुमचा, tulip आणि मनिम्याऊ यांचा प्रतिसाद पाहून वाटतंय की तिची बसण्याची आणि झोपण्याची पद्धत काहीतरी चुकतीये ...आता शोधून काढलं पाहिजे परत..
सगळ्यांनाच प्रतिसादाबद्दल धन्यवाद..

@माझे मन ..१२ वी च टेन्शन आहेच तिला...आणि ती introvert आहे...बोलून मोकळी होत नाही...तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे...तेव्हा ते पण चेक करून घेते..

पोश्चर मध्ये हाताची पोझिशन (कोपर रेस्ट होतं तो कोन) माझ्या बाबत बदलल्यावर एकदम फरक पडला. पाठ/ लोअर बॅक नीट ठेवायचा प्रयत्न करायचो पण हात अधांतरी/ चुकीच्या कोनात टेकवला जायचा त्याने मानेत दुखायचं. डॉक्टरने डायरेक्ट एमआरआय काढायला सांगितला. त्याला वर्षभर लाईन आहे. तर फिजिओ मित्राशी बोललो तर त्याने ऑक्युपेशनल आहे सांगितल्यावर त्या दृष्टीने बदल केला. त्रास गेला.

@ झंपू दामलू...तुम्ही सांगितलेला त्रासच होतो तिला>>
Pinched Nerve हे गुगलून पहा.
IFT Physiotherapy आणि ट्रॅकशन चा फार उपयोग होतो.

झम्पू दामलू. सेम तुमच्यासारखा त्रास मला होतोय. इन फॅक्ट त्यापेक्षाही ही सिरियस होता सुरवात झाली तेव्हा. गॅबा पेन्टिन घेतली महिनाभर आणि असच एम आर आय वगैरे काढले. त्यांनी मोठ्या गोष्टी रुल आउट केल्यामुळे मग मलाच रिसर्च करावा लागला आणि पार ३ महिने लागले मला थोडे उपाय शोधायला. मानेचे व्यायाम, झोपतानाचे पोस्चर आणि सर्वात मोठं म्हणजे मानेला बर्फ (आईस पॅक) लावणे. त्यानी खुप फरक पडला.
सर्विकल स्पॉण्डायलोसिसचा प्रकार आहे बहुतेक माझ्याबाबतीत जो व्यायाम करताना आणखिन वाढला. अजूनही त्रास सुरु आहे पण पहिल्या पेक्षा खुप बरं आहे. आता थोडा आणखिन रिसर्च करुन, ट्रायल अ‍ॅन्ड एररनी नेमका इश्यु सापडला की मग तो नीट करायच्या कामाला लागेन.
फार जीवाचा धोका वगैरे नसलेला पण खुप भितीदायक सिंप्टटम्स देणारी कंडिशन आहे ही.

४ वर्षांपूर्वी कुबड्या घेउन चालत होते. फिझिकल थेरपी करुन पाहीली. गुडघ्यात आर्थ्रायटिस आहे.
चायनिज अ‍ॅक्युपंक्चर पद्धत करुन पाहीली. बाप रे काय रिलीफ मिळाला. ३ सिटिंग्ज्मध्ये कुबड्या गेल्या. आमच्या इन्श्युरन्स्मध्ये होती इन्क्लुडेड.

फॅन झाले आहे. वेदनेवरती अ‍ॅक्युपंक्चर पद्धत उपयोगाची आहे. बाकी पीएम्स, पेरिमेनापॉझ वगैरे करता काहीही उपयोग होत नाही (= मला झाला नाही). पण वेदना होत असतील तर तत्काळ परिणाम दिसून येतो.

तुमच्या मुलीचं निदान लवकर होऊन लवकर आराम मिळो.

मला आता वयपरत्वे चष्मा लागला आहे, प्रोग्रेसिव लेन्सेस वापरते. तो चष्मा लावून मी मोठ्या मॉनिटरवर काम केलं की हमखास माझी मान दुखत असे, कारण ते रीडिंग डिस्टन्सच असल्यामुळे लेन्सच्या तळाच्या बाजूने स्क्रीनकडे बघावं लागतं/ बघितलं जातं आणि मान विचित्र कोनात तिरकी राहाते. मग मी काम करताना रीडिंग ग्लासेस वापरायला सुरुवात केली आणि दुखणं पूर्ण थांबलं.

तसंच बसताना पाठ सरळ ठेवा असा सल्ला सहसा दिला जातो. पण तेवढंच पुरेसं नाही. दीर्घकाळ एका जागी बसून काम करायचं असेल तर माकडहाड खुर्चीवर शक्य तितकं मागे 'खोचून', पाय किंचित विलग करून बसावं. आपोआप पाठीचा कणा ताठ राहातो, स्लाउच केलं जात नाही आणि बैठक कम्फर्टेबल होते. हे गणित साधल्यावर माझा चुकीच्या पोस्चरमुळे जडलेला लोअर बॅक पेनही साफ गेला होता.

ही टिप टाइम मॅगझीनमध्ये एका लेखात वाचल्याचं आठवतं. गंमत म्हणजे त्यांनी भारतीय विणकरांची बसण्याची पद्धत पाहून त्याबद्दल लिहिलं होतं. दिवसभर हातमागावर काम करूनही त्यांना अशा पोस्चरमुळे लोअर बॅक पेन होत नाही म्हणे.

पोस्चरसाठी kneeling chairचाही उपयोग होतो असं मैत्रिणीकडून ऐकून आहे, मी स्वतः वापरलेली नाही.

खांदा दुखणे हा ऑक्युपेशनल हझार्ड आता सगळ्या वयाच्या लोकांना आहे आता. माझा पण खांदा दुखतो ऑन अँड ऑफ. पण मुख्य कारण सतत हातात फोन असणे हे आहे. आपल्याला जाणवत नाही पण स्मार्ट फोन्स भरपूर जड असतात. आणि दिवसाचे ८ -१० तास सतत हातात असेल तर नक्कीच खांदे दुखीला आमंत्रण असते. ते कारण आहे का ते एक बघून घ्या.

सॉरी, मगाशी लिहायचं राहून गेलं.

Ashwini_९९९ वर लोकांनी लिहिलय आणि तुम्हाला पण साधारण अंदाज आहे की हे कदाचित मसल स्ट्रेनचे सिंप्टम्स असावेत. मी वर मला झालेल्या त्रासाबद्दल लिहिलं त्याची सुरवात ही मसल स्ट्रेननीच झाली. मी जे काही व्यायाम करत होतो त्यामुळे ट्रॅप्स आणि मानेच्या मसल्सचा ओवरयुज होत होता. पुढे आधीपासूनच असलेली कंडिशन ह्या स्ट्रेनमुळे आणखिन वर्स झाली.

सांगायचा मुद्दा असा की, जर पोस्चर्मुळे तुमच्या मुलीला कदाचित हा त्रास होत असेल तर त्याचे कारण पोस्चर्मुळे आलेला मसल स्ट्रेन हा आहे आणि त्या करता ताबडतोब व्यायाम सुरु केला तरी त्याचा गुण यायला वेळ लागतो. ताबडतोब इलाज म्हणजे मसल रिलॅक्संट. गोळ्या घ्यायला आपण कधी कधी कचरतो त्यामुळे अजून एक जालीम उपाय जो मला माहित नाही की भारतात का करत नाहीत, तो म्हणजे बर्फ लावणे.
मला आधी ह्याचा सुगावा लागे पर्यंत रिलॅक्संट ची गोळी घेतली पण जेव्हा सुगावा लागला आणि बर्फ लावला मान आणि मानेच्या भोवती तेव्हा, ऑलमोस्ट तेवढाच रिलिफ मिळाला जितका रिलॅक्संटनी मिळाला.
शॉर्ट टर्म मध्ये पेन मॅनेजमेंट आणि त्याच बरोबरीनी लाँग टर्म करता पोस्चर चेंज, नियमीत व्यायाम हे करता येइल. I hope she feels better soon! एन अभ्यास वगैरे करायच्या काळात फारच नॅगिंग त्रास आहे हा. अनॉईंग सुद्धा.

सर्वानी उपयुक्त सल्ले दिले आहेतच.
एकदा ज्या उशीवर झोपले जाते ती खूप उंच, किंवा गाठी आलेली आहे का, बेड ची गादी सूट होतेय का तेही बघा.

हो बर्फ लावणे हा परिणामकारक उपाय आहे. आमचा फिजिओथेरपिस्ट काही विशिष्ट वेळी बर्फ सांगतो आणि काही विशिष्ट वेळी गरम पाण्याने शेकवणे.

<<<<>मला असा त्रास चुकीची किंवा अगदी पातळ उशी घेतली की होतो. झोपताना मला थोडी उंच उशी लागते, जरा उंची कमी जास्त झाली की मान आणि डोकं भयानक दुखतं. अगदी वापरात असलेली उशी जरी पातळ झाली तरी दुसर्‍या दिवशी मानदुखी सुरू. आता मला सवयीने माहित झालंय.
तुमच्या लेकीला लवकर आराम पडो.

Submitted by टयुलिप >>>>

Same with me...

छान पोस्ट येतं आहेत. इथली चर्चा सर्वानाच उपयुक्त आहे.
तुमच्या मुलीला लवकर बरे वाटावे अशी सदिच्छा..

विषय सर्वांसाठी महत्वाचा आहे. तुमच्या मुलीला लवकर आराम मिळावा, तिच्या चांगल्या आरोग्यासाठी माझ्या शुभेच्छा.

फोन/ संगणकाचा अतिवापर आणि कुठलिही हालचाल न करता अनेक तास एकाच body posture मधे रहाण्याचे दुष्परिणाम पुढे कधितरी जाणवतात. कामाचा/ अभ्यासाचा ताण एव्हढा असतो कि या गोष्टीचा विचार होत नाही.... time dead lines समोर असतात.

फोन / संगणाकाचा वापर कमी करणे शक्य आहे का? वापर टाळणे अगदीच अशक्य असेल तर दर एक तासाला छोटासा १ मिनिटांचा व्यायाम करायचा
( १) एक छोटा वॉक घ्यायचा
(२) खांदे ३६० डिग्रीमधे मागे-वर-पुढे-खाली असे वर्तुळाकार x ५ आणि याच्या विरुद्ध दिशेनी वर्तुळाकार रोल करायचे
(३) मान सरळ ताठ ठेवत - खांदे अगदी वर, नंतर अगदी खाली x ५
(४) मान डावीकडे, मागे, उजवीकडे आणि विरुद्ध x ५ ( पुढे नेहेमीच असते म्हणून नाही.... :स्मित:)
(५) मान सरळ ठेवत फोन डोळ्याच्या रेषेत आणायचा, आणि मग वाचायचे / टंकायचे, थोडे विचित्र दिसते पण सहज शक्य आहे. संगणकावर असे करता येणार नाही, पण फोनवर सहज शक्य आहे. तेव्हढीच मदत होते.
(६) अधून मधून standing desk वापर करायचा

मानवी डोक्याचे वजन १० पौंड मानू. डोके जेव्हढे ( ०, १५, ३०, ४५, ६० डिग्री) झुकेल तेव्हढे ( अनुक्रमे १०१७२७, ४०, ४९, ६० पौंड) मानेच्या स्नायूंना जास्त काम करावे लागेल आणि या स्नायूंवरचा ताण वाढेल. दिवसाचे सहजपणे ६ - ते १० तास, हे स्नायू त्यांच्या क्षमतेपेक्षा ३० ते ६० % जास्त वजन पेलण्याचे काम करत आहेत. तक्रार तर करणारच.

https://scholar.google.com/scholar_lookup?title=Text+Neck+Syndrome—Systematic+Review&author=Neupane,+S.&author=Ali,+U.&author=Mathew,+A.&publication_year=2017&journal=Imp.+J.+Interdiscip.+Res.&volume=3&pages=141–148

मलाही मानेचा त्रास व्हायचा / होतो. अनेक तास सलग ड्रायव्हिंग करावे लागायचे (१२० -१३० कि मी / तास वेग, कधी रस्त्यावर बर्फ /अनेक इंच स्नो.... जनावरे रस्त्यावर नाही याची काळजी घ्यायची - पण या सर्वांचा एक ताण असायचा. मान - खांद्याचे व्यायाम आणि आराम यांची मदत व्हायची.

मलाही मानेच्या दुखण्याचा त्रास आहे. एवढ्या सगळ्यांना हा त्रास आहे म्हणजे हा बदलत्या जीवनशैलीचा परिणाम असावा.

अनेकदा सकाळी जाग येताना किंवा कधी कधी तर रात्रीच मानेचे स्नायू कडक - स्टिफ होतात, हाताला जाणवण्याइतके - आणि डोकं दुखू लागतं.
बहुतेक वेळा स्ट्रेचिंग केल्यावर आराम मिळे. बसून करायचे स्ट्रेचेस तर माहीत असतीलच. सोबत खांद्यांचं (फक्त खांद्यांचं - हातांचं नाही) रोटेशन करायचं. याशिवाय मी झोपून स्ट्रेचिंग करतो. बेडवर उशी न घेता पाठीवर झोपायचं. मग डोकं थोडं बेडच्या बाहेर येईल असं वर सरकून मान खाली जाऊ द्यायची . हे अंतर दोन तीन पायर्‍यांत वाढवायचं. उलट म्हणजे हनुवटी गळ्याशी आणूनही स्ट्रेचिंग करायचं.

कॉम्प्युटरशी जास्त वेळ बसलं कीही मान दुखू लागते व डोक्याला मुंग्या आल्यासारख्या वाटतात. त्यामुळे मी कॉम्प्युटरशी बसताना नेक कॉलर घालतोय. सकाळी मान स्टिफ + डोकेदुखी असेल तेव्हाही कॉलर वापरल्यावर थोड्या वेळात आराम मिळतो.

याशिवाय मी मेमरी पिलो वापरायला सुरुवात केली आहे.

मान+ डोके दुखीचं एक कारण स्ट्रेस आहे हेही लक्षात आलं आहे.

वर अनेकांनी लिहिलंय तसं फोनचा अतिवापर हेही कारण आहे. फोनवरून फार लिहिणे वाचणे टाळतो.

सगळ्यांचे प्रतिसाद बद्दल मनापासून आभार...
सगळ्यांचे प्रतिसाद वाचून एक लक्षात आलं की हा कॉमन त्रास दिसतोय...

सगळ्यांचेच छान सल्ले... आता हा वरील चर्चेवरून कॉमन आहे लक्षात येतंय. माझेही चार आणे ....
पालथं झोपायचं दोन्ही हात कोपऱ्यातून व पाय गुडघ्यात दुमडायचे दोन्ही तळव्यांमध्ये गाल ठेवायचे. दोन्ही हात पुढे पुढे सरकवत जायचे... कोपरं जुळलेली ठेवायची .. श्वास दिर्घ सोडताना ट्र्याक्शन कुठे मिळतं ते कळतं त्याप्रमाणे हात अडजस्ट करायचे... पाच मि. करावे...

तळव्यांमध्ये गाल ठेवायचे. दोन्ही हात पुढे पुढे सरकवत जायचे... >>>
कल्पनाशक्तीला ताण देऊन पण हे नक्की कसं हे लक्षात नाही येत आहे.

मला स्वतःला लहानपणी पालथे झोपून वाचायची सवय होती, सलग ६/७ तास पण तसेच वाचायचो , तेंव्हा मला पण मानदुखी आणि डोक्याचा मागील भाग दुखायचा. मानदुखी समजून बरेच उपचार केले, पण उपयोग झाला नाही, खूप नंतर ते दुखणे / वेदना हे पित्त / ऍसिडिटी मुळे होत आहे हे लक्षात आले . अजूनही मला दिवसभर कॉम्प्युटर आणि संध्याकाळी टीव्ही / मोबाईल मुळे मानदुखी सोबत डोक्याचा मागील भाग दुखण्याचा त्रास होतो पण पित्तशामक घेतले जसे अविपत्तिकर चूर्ण / कोकम सरबत इ. घेतल्यानंतर वेदना थांबतात .
आपली ऑर्थोपेडिक / फिजिओथेरपी उपचारा सोबत तिला पित्त / ऍसिडिटीचा त्रास आहे का बघून घ्या . कारण चुकीच्या पोश्चर मुळे डोक्याचा मागील भाग दुखत नाही , मान खांदे दुखू शकतात
हा एक बालिश सल्ला.

मंजुताईचे बहुतेक मकरासन आहे, पण गुडघे दुमडून.

मकरासन, भुजंगासन (हात मागे ठेवून), धनुरासन, मेरुदंड शिथिलीकरणं इत्यादि साधारणपणे मान पुढे झुकुन राहिल्याने, डोक्याखाली उंच उशी, आधार घेऊन वाचन (पुस्तक/स्क्रीन) करत राहिल्याने होणाऱ्या दुखण्यावर आराम देतात, पण नक्की कशाने आणि कसा त्रास होतो आहे ते पाहुन कोणता व्यायाम करायचा हे ठरवायला पाहिजे.
मला त्या डॉक्टरांनी एक चार्ट दिला आणि त्यात अनेक प्रकारचे व्यायाम (२०-२५) (त्यात काही वर उल्लेखलेली आसने पण आहेत) आहेत, त्यातील काही करवून घेतले (४-५) व तेवढेच करायला सांगितले. काही स्नायुंवर अतिरिक्त ताण येऊन ते कडक झालेले तर काही स्नायु वापरात न आल्याने अति अशक्त झालेले असतात. त्यामुळे स्नायु हव्या त्या सांध्यांना/मणक्यांना नीट आधार देत नाहीत व त्यांच्यावर ताण येऊन तेही दुखू लागतात. अतिताण आलेल्या स्नायूंना आराम आणि अशक्त झालेल्यांना नीट काम करता येईल एवढे सशक्त करणे हा अशा व्यायामांचा उद्देश असतो. तेव्हा फोरममध्ये जनरल फिट राहण्यास आणि थोडाफार त्रास सुरू झालेला असताना स्पेसिफिक व्यायाम सुचवणे ठीक आहे.
पण त्रास वाढला असताना नीट तपासणी (फिजिकल चेक अप) करवून घेऊन त्यांच्या सल्ल्यानुसार योग्य ते व्यायाम करणे इष्ट. आणि ते अगदी हळुवारपणे थोडाच वेळ करून हळुहळु लागणारा जोर आणि वेळ अगदी सावकाश वाढवत न्यावा.
अन्यथा स्नायूंवर अतिरिक्त ताण आलाय त्यावर अजून ताण, जे अशक्त झालेय त्यावरही अचानक ताण येणे असे होऊन दुखणे वाढणे, करणे सोडून देणे असे होते.

(अगदी गरज असल्या शिवाय पेन किलर्स घेऊ नयेत. स्प्लिमेंट्स बाबतही आधी जेवढ्या प्रमाणात द्यायचे त्याची गरज नाही आणि पाण्यात विद्राव्य स्प्लिमेंट्ससुद्धा आवश्यक नसताना घेतल्यास दुष्परिणाम होतात असे आता बरेच डॉक्टर्स सांगतात.)

उपयुक्त धागा.
मला उजव्या हाताच्या कोपरा जवळ भागात पेन असायचा माऊस पकडत असल्याने.
हाताचे व्यायाम केल्याने नियंत्रणात आहे

पेन किलरचा सहन न होणारे दुखणे तात्पुरते सुसह्य करणे या ऑ्ब्ह्सियस फायद्या व्यतिरिक्त, ज्या हालचाली, व्यायाम दुखणे कमी करण्यास आवश्यक आहेत पण दुखतेय म्हणुन आपण करत नाही/करता येत नाही, ते करता येणे हा सुद्धा फायदा आहे. या उलट दुखत नाही म्हणुन परत त्याच चुकीच्या हालचाली करणे, चुकीचे पोस्चर्स घेणे असेही होते. तेव्हा त्यांचा वापर दुखणे आणि त्यावर सांगितलेले उपाय समजावून घेऊन योग्य रीतीने करायला हवा.

डॉक्टरला विचारून आवश्यक वाटल्यास एकदा मॅमो ग्रफी करून घ्या. जस्ट टू रूल आउट. वय लहान आहे पेशंटचे म्हणून लिहिले राग मानू नका.

मानव् , वरच्या प्रतिसादातली माहिती उपयुक्त वाटली.
वज्रासनात बसून हात कंबरेशी मागे एकमेकांत गुंफून मान मागे नेणं असं एक आसन मानदुखीसाठी पाहिलं होतं. गोमुखासन सुद्धा.
मी त्याची सोपी पद्धत करतो - एक जाड नॅपकिन एका हातात नॅपकिनच्या पिळ्याचं एक टोक धरून तो हात खांद्यावरून मागे न्यायचा व दुसर्‍या हाताने खालून पकडायचं. दोन्ही हातांनी धरलेल्या भागांतलं अंतर कमी करत जायचं. हाच प्रकार हात बदलून करायचा. मी उभ्याने करतो.

गोमुखासन मी करतो मी, घरी वज्रसनात, ऑफिस मध्ये उभा राहून. उजवा हात वरून मागे आणि डावा खालुन मागे असताना बोटं एकमेकांत नीट अडकवता येतात, पण उलट करताना फक्त दोन बोटं जेमतेम अडकवता येतात. मला खांदे मानेच्या खालपासून दंडापर्यंत दुखणे यासाठी याचा खूप फायदा झाला.

तुमची नॅपकिन धरून अंतर कमी करत जाण्याची क्लृप्ती छान आहे.