नुकतीच महापालिका प्रभाग आरक्षण सोडत निघाली. जवळजवळ अर्ध्यापेक्षाही अधिक दिग्गज नैराश्याच्या गर्तेत गेले. काहीजण आपला मतदारसंघ शाबूत असल्याने सुखावले. यावेळी महिला महापालिका सभागृहात ५०% हून अधिक असणार, हे निश्चित झाले. त्या सर्वसाधारण जेथे पुरुषांना संधी आहे तेथे विद्यमान नगरसेविका म्हणून तिकीट स्वीकारणार आणि निवडून देखील येतील. त्यामुळे सभागृहात मात्र पुरूषांचे मताधिक्य घटणार आहे.
विशेष म्हणजे मुंबई प्रभागात सोशल मिडियावर या घटनेचे पडसाद इतक्या तीव्रतेने उमटले की, ज्यांचे त्यांचे समर्थक हट्टाला पेटलेले दिसले.आमच्याच नेत्याला तिकीट मिळणार आणि आमचाच विजय होणार या समर्थकांच्या पोष्टने पक्षनिष्ठा या प्रक्रियेला हरताळ फासला गेला. जेथे तेथे प्रस्थापित राजकीय प्रणालीला दे धक्का देण्याचे चिंतन सुरू झाले आहे. विविध पैलूंचा अभ्यास म्हणजे राजकारण शाखा. पूर्वी चाळी होत्या. मराठी माणसं दिसत होती. टॉवर झाले आणि मराठी माणूस घरबंद तरी झाला किंवा भाऊबंदाच्या वाटणीचा शिकार होऊन परगांवी निघून गेला. मुंबईची सध्या लोकसंख्या २.०८ कोटी आहे तीच २०११ साली १.२५ कोटी होती.
जगात लोकसंख्येने गणले गेलेले महानगर म्हणून मुंबईची ओळख आहे. या मुंबई शहरात लवकरच महापालिका निवडणुका होणार असून मुंबई महानगरपालिका क्षेत्रफळ आहे तेच आहे. परंतु लोकसंख्या वाढत गेली आणि विभागात फेरबदल होत गेले. मूलभूत नागरी गरजा व्याप्तीदेखील वाढीस लागली. गटार रस्ते आरोग्य यामध्ये सुधारणा होत गेल्या किंबहुना लोकसंख्या वाढीमुळे त्या दिसून आल्या नाहीत. मुंबईची पावसाळ्यात तुंबई होत राहिली. नव्याने झालेली प्रभाग रचना अत्यंत गुंतगुंतीची झाल्यामुळे गेली पांच वर्षे स्वप्न पाहणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला आहे. यशवंत होण्यासाठी उतावीळ असणाऱ्या आणि गुडघ्याला मुंडावळ्या बांधून तयार असलेल्या कार्यकर्त्यांच्या नशिबी नियतीने थट्टा मांडली, अशी चर्चा सर्वत्र ऐकायला मिळेल.
या वेळेची निवडणूक सर्वसामान्यांसाठी नाही. कारण या निवडणुकीत पैश्यांचा पाऊस नक्कीच पडणार आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे स्वरूप आले तर काठावर असणाऱ्या कार्यकर्त्यांची चंगळ होणार, या खुशीत आजच अनेकजण इच्छुकांना दादा तुम्हीच.. असे बोलून बोहल्यावर चढवायला प्रारंभ झाला आहे. यशवंत कोण होणार ? हे त्यावेळेस ठरेल प्रथम पक्षांची तिकिटे तर मिळायला हवीत.
करोना काळात समाजाला मदतीची गरज असताना अनेकांनी आपले हात आखूडते घेतले होते. त्यांचे खिशे खुळखुळणार असून आता ते आपूलकीने मदत करायला सरसावणार आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीत यशवंत होण्यासाठी त्यांचे प्रयत्न कामी येऊ दे, ही प्रार्थना करायला हरकत नाही.
सामाजिक संस्थाशी सलोखा आणि विकासाची विभिन्न साधने यांच्या भविष्यातील तरतुदींचा आलेख किंवा आराखडा, समाजउन्नतीसाठी, समाजहित लक्षात घेऊन आराखड्यातील तरतुदींची विशिष्ट उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेऊन समाजाची खऱ्या अर्थाने सेवा घडविणारे यशवंत निवडणुकीत आपले भाग्य उजळविण्यासाठी यापूढे दिवस रात्र एक करणार आहेत. त्यात महिला देखील आणि पुरुषवर्ग देखील आपल्या नशिबाला साद घालणार आहेत. जर पक्षाकडून तिकीट नाकारले गेले तर पर्याय काय असावा, याचा अदमास देखील मनोमन भ्रमणध्वनीवरुन घेतला जात असेल. महिला प्रभाग झाल्याने आता माझ्याऐवजी माझ्या पत्नीला तिकीट मिळविण्यासाठी राजकीय मनसुबे रचले जात असणार.ज्याचे आर्थिक नियोजन जबरदस्त आहे त्याच्या गळ्यात तिकीटाची पूष्पमाला घातली जाईल. सर्वच पक्षात असे घडेल असे नव्हे तर अनेक पक्ष त्यांचे अस्तित्व राखण्यासाठी थोडीफार दया माया दाखवितील.
राजकीय विश्लेषक यांच्या दृष्टीतून आगामी महापालिका निवडणूक ही चुरशीची होईल की नाही हे युती आघाडी धर्म पाळला गेला तरच होईल. कोणता पक्ष कुणाच्या सोबत घर बसवितो यावर सारे काही निर्भर आहे.
तरीही यशवंत होण्यासाठी तन मन धन खर्च करून आपली मनीषा पूर्ण व्हावी या हेतूने निवडणुकीत जनसेवेला वाहून घेणाऱ्या इच्छुकांना शुभेच्छा द्यायला हरकत नाही. आपण मात्र नव्या यशवंतांची वाट पाहू या.. मनापासून शुभेच्छा.
अशोक भेके
मला वाटलं नवीन यशवंत जाधव कोण
मला वाटलं नवीन यशवंत जाधव कोण असेल ह्याबाबत पोस्ट आहे