Submitted by अभिषेक_ on 5 September, 2023 - 03:14
घातल्या शपथा किती मी या मनाला
सांज ढळता शुष्क डोळे राखण्याला
आठवांचा पूर येऊ दे तिथेही
पाहिले सांगून हळव्या पावसाला
भूक मिटते ना मनाची माणसांनी
का कळेना आतमधल्या श्वापदाला!
आज का ताऱ्यांत मजला तू दिसावी
भावनांशी चांदणे खेळी कशाला!
कोणते हे रंग आले आसमंती
चुंबले का तू नभाच्या कुंचल्याला?
भावनांचे खेळ खेळावे किती मी
हारणारा मीच रे हे उमगण्याला!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खूपच आवडली.
खूपच आवडली.
कोणते हे रंग आले आसमंती
चुंबले का तू नभाच्या कुंचल्याला?
अहाहा !
छान.
छान.
छान लिहिली आहे
छान लिहिली आहे
अमित, सामो, हपा, खूप खूप
अमित, सामो, हपा, खूप खूप धन्यवाद!
व्वा!! एक न एक शेर भारी!!
व्वा!! एक न एक शेर भारी!!
धन्यवाद स्वरूप!
धन्यवाद स्वरूप!