Submitted by द्वैत on 4 September, 2023 - 14:14
कोण जाणे वेस ओलांडून गेले
शृंखला पायांतल्या तोडून गेले
पाखराला जाग आली मध्यरात्री
रान सारे पार थरकापून गेले
सावल्यांना फूस होती चांदण्याची
पायवाटेला दिवे सांगून गेले
पाहिले मागे वळोनी त्या क्षणाला
वाटले काहीतरी राहून गेले
ज्या फुलाला गंध होता आठवांचा
नेमके का तेच कोमेजून गेले??
द्वैत
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
फारच सुंदर..! शेवटच्या ओळींनी
फारच सुंदर..! शेवटच्या ओळींनी गलबलून आलं.
आवडली.
आवडली.
छान, ४ आणि ५ शेर मस्त
छान, ४ आणि ५ शेर मस्त
मस्तच!!
मस्तच!!