राकेश रोशनने पुत्रप्रेमापोटी कोई मिल गया हा चित्रपट बनवला. हा चित्रपट साय फाय आहे असा दावा त्याने ठोकल्याने आणि अन्य कुणी तसा प्रयत्नही केलेला नसल्याने तसेच कुणाला त्यात इंटरेस्ट नसल्याने आणि त्याच्या दाव्यावर कुणालाही आक्षेप नसल्याने दोन गोष्टी झाल्या.
१. कोई मिल गया हा साय फाय चित्रपट आहे हा दावा बिनविरोध निवडून आला.
२. हा चित्रपट भारतातला पहिलाच साय फाय चित्रपट आहे आणि तो बनवल्याचा बहुमान राकेश रोशनला मिळाला.
रेखा तिचा पती राकेश रोशन सह कॅनडा मधे राहत असते. त्याला सगळे मिस्टर मेहरा म्हणत असतात. म्हणून तिलाही मिसेस मेहरा म्हणू लागतात. रा़केश रोशन कॅनडामधे स्पेस एजन्सी मधे काम करत असतो.
भारतातली इस्त्रो, अमेरिकेतली नासा या ऐवजी कॅनडातल्या स्पेस एजन्सी मधे काम करण्याचे कारण समजत नाही. बहुतेक मेहरा पंजाबी असतात आणि पंजाबातून हजारो लोक टॅक्सी चालवण्यासाठी कॅनडात जात असल्याने कामावरून काढलेच तर कुणाच्या तरी टॅक्सीवर रात्रपाळी करू असा बी प्लान तयार असावा.
त्याच्याकडे एक एक़्स टी च्या जनरेशनच्या आधीचा कॉम्प्युटर असतो. मेहराच्या गॅझेटला मोजून आठ भली मोठी बटणे असतात. त्यातून लाल रंगाचा प्रकाश येत असतो. टिव्ही सारखा हिरव्या रंगाचा स्क्रीन ज्या कॅबिनेट मधे आहे त्याच कॅबिनेटमधे कि बोर्ड पण आहे. या कि बोर्ड उपयोग शून्य आहे. त्यामुळे त्याला एक गॅझेट जोडलेले असते. कोणत्याही इलेक्ट्रॉनिक उपकरणाला गॅझेट असे नाव दिले कि ते वैज्ञानिक बनते. मिस्टर इंडीया मधे असेच एक गॅझेट भारतीय शास्त्रज्ञाने शोधून काढलेले असते जे हातात बांधून बटण दाबले कि माणूस गायब होतो. पण हा चित्रपट साय फाय असल्याचा दावा शेखर कपूरने केला नाही. मुळात आपला सिनेमा साय फाय आहे हे समजण्याइतके बॉलिवूड तेव्हां विकसित झाले नव्हते.
या बटणांना ए बी सी डी अक्षरे चिकटवली आहेत. राकेश रोशनचे वडील आणि भाऊ संगीतकार असल्याने सात सूर + एक राखीव पांडव अशा हिशेबाने या गॅझेटमधून ट्यून बनवता येत असते. त्याच्यावर बी ई बी सी दाबलं कि पॉं पॉं पॉं पॉं असे सूर येत असतात. एखाद्याला वाटेल कि बी ई सी मधे काय फरक मग ? कुठलं ही दाबलं तरी पॉं च वाजतंय. पण हीच कमाल आहे संगीतकार राजेश रोशनची.
पहिला पॉं म्हणजे इन, दुसरा पॉं म्हणजे पं, तिसरा पॉं म्हणजे छि आणि चौथा म्हणजे यों.
पहिल्या बी ला पॉं आणि दुसया वेळी बी दाबले कि छि ! दोनदा दाबले कि बंगाली होत असते.
हे गॅझेट त्या लॅपटॉप सदृश्य संगणकाला जोडलेले असते. तो एक्सटीच्या काळातला संगणक त्यावर प्रोसेस करून ती धुन अवकाशात पाठवत असतो. त्यावर स्प्लिट स्क्रीन व्यवस्था असते.
अंतराळात पाठवण्यासाठी डी टू एच च्या डीशेस लावलेल्या असतात.
भारताने खोडद इथल्या दुर्बिणीत किती पैसा बरबाद केला हे या अविष्काराने लक्षात येते. आता कळ्ळं का कॅनडाने मेहरांना त्यांच्या स्पेस एजन्सीत का घेतलं ते ? इतक्या वर्षात त्यांना फक्त स्पेस मधून दगड आणता आले आहेत. शेजारी देश अमेरिका सौरमंडलाच्या पलिकडे गेला. चंद्रावर माणूस उतरवला आणि हे फक्त दगड घेऊन आलेत. भारताच्या प्रगतीने पाकिस्तानने अस्वस्थ व्हावं तसं कॅनडाला अमेरिकेच्या शेजारी राहून वाटत असतं. भारत रशिया चांगले संबंध आहेत. रशियन तंत्रज्ञान भारतीय संशोधकाच्या कडून मिळालं कि आपण नासाला टक्कर देऊ असा कॅनडाचा विचार असतो.
मेहरा ही डीटूएचची डिश आणि एक्सटी संगणक याच्या सहाय्याने अंतराळात संदेश पाठवत असतो. मायबोलीकर विचारतील कि रेडीओ दुर्बिणीला पण आजवर एलियन पर्यंत मेसेज पाठवता आला नाही आणि मेहरा तर थेट संदेश कसा पाठवतो ?
हीच तर गंमत आहे. म्हणून तर मेहराने एक्सटीच्या आधीचा संगणक घेतलाय. त्यात इफ एलियन देन सेन्ड ही कमांडच असते !!
हा मेसेज पाठवेपर्यंत ब्लॅडर फुल्ल झाल्याने मेहरा बाथरूमला जायला निघतात, पण नेमकेच अंतराळातले पाहुणे तिकडून ओम ओम ओम ओम - इन पंछियों चे वेगवेगळे व्हेरिएशन पाठवू लागतात. मेहरा म्हणतात कि प्रेशर दाबता येईल पण हा क्षण सोडला नाही पाहिजे. मग तो रेखाला बोलावतो. तिलाही दाखवतो.
दुसया दिवशी स्पेस एजन्सी मधे तो या संशोधनाबद्दल सांगतो.
तर ते म्हणतात कि आम्ही काय मग च्यु... स्त आहोत का एव्हढे महागडे रेडीओ दुर्बीण उभारायला ?
आता जर या एलियन्सला बिग बजेट आदिपुरूष च्या ऐवजी लो बजेट सत्यकाम की कथाच आवडला तर कोण काय करू शकतं ? पण हे कॅनेडिअन्स समजून घेतील तर ना !
मिस्टर मेहरा आणि मिसेस मेहरा जे एकमेकांचे नवरा बायको असतात ते कॅनडात कुठून तरी कुठे तरी चाललेले असतात. हा भूभाग कच्छच्या रण सारखा दिसतो.
इथे कारमधे संगणक डीटूएच नसतानाही नेमकी कारच्या पुढून उडती तबकडी जाते.
काही लोक राक्षस गणाचे असतात त्यांना भूत दिसतं.
काही लोक पायाळू असतात, त्यांनाच पाणी दिसतं. तसा राकेश रोशन स्पाटाळू असतो. स्पा टाळू म्हणजे स्पा मधे जाउन चकचकीत केलेला टाळू असे खांडबावली शब्दकोशात म्हटलेले असले तरी वाई शब्दकोशात स्पा टाळू म्हणजे स्पेसशी ज्याची टाळू कनेक्ट होते असा तो असा अर्थ दिलेला आहे.
त्यामुळेच कॅनडातल्या कच्छच्या रणमधे नेमकी यांच्याच समोर उडती तबकडी येते.
ती बघताना स्टिअरिंगवरचं नियंत्रण सुटून अपघात होतो. साधा जेसीबी आला तरी लोक काम सोडून बघत बसतात, इथे उडती तबकडी दिसल्यावर काय होणार ?
अपघातात मेहराचा मृत्यू होतो. रेखा पोटाला हात लावते म्हणजे ती प्रेग्नंट होती तर !
मेहरांचं सगळीकडे लक्ष होतं. फक्त पॉं पॉं पॉं पॉं नव्हते करत बसले ते.
आता रेखा थेट भारतात. डॉक्टरने एका बोर्डवर एक्स रे टांगलेत. त्यात तो मेंदूला कुठे इजा झालीय हे सांगतोय.
साध्या एक्स रे ने जर मेंदूला झालेली इजा समजत असेल तर सीटी स्कॅन सारखे तंत्रज्ञान उपलब्ध असेल तरी का वापरावे ?
ते म्हणतात ना, चींटी को मारने के लिए टॅंक की क्या जरूरत है ? चप्पल ही काफी है.
आपले चांद्रयान सुद्धा म्हणूनच स्वस्तात चंद्रावर गेले.
म्हणूनच अपघात झाल्यावर कॅनडात ती थांबली नाही. थेट भारतातला डॉक्टर गाठला.
इथून पुढे मग राकेश रोशन आणि रेखाचा मुलगा रोहित मतीमंद असल्याचे सांगणारे अनेक प्रसंग येतात. गाणी होतात. हिरॉईन डान्स करते.
म्युझिकल साय फाय सुरू होतो.
एव्ह्ढ्यासाठीच नोलानचे सिनेमे कंटाळवाणे वाटतात.
इंटरस्टेलार मधे नवीन ग्रहावर गेल्यावर त्याला अॅंजेलिना जोली भेटते.
मग दोघांना मिळून तिथे एखाद्या पक्षाला बघून इन पंछियो च्या चालीवर
लुकिंग अॅट दीज बर्डस इन द स्काय
अवेकन्ड दिस डिजाय...र
हे गाणे उदीत नारायण अलका याज्ञिकच्या आवाजात म्हणता आले असते. इमोशनल ड्रामा टाकता आला असता. मतीमंद हिरोला हिरॉईन आवडते पण व्हिलन नॉर्मल असल्याने ती त्याच्या सोबत असते असा ट्विस्ट टाकता आला असता.
बाकी एलियन म्हणून एक निळा बाहुला भारी आहे.
त्याच्या शक्तींचा उपयोग मुलांना मॅच जिंकून देण्यासाठी करतो. हेच ते साय फाय.
त्यांच्या सोबत गाणी म्हणतो. सावली फिक्स करतो, स्वतंत्र करतो. थोडक्यात लक्ष्मीकांत बेर्डे + महेश कोठारेच्या मराठी पिक्चर मधे जी पावर कॉमेडी हिरोच्या अंगात यायची ती पावर एलियनच्या अंगात असते. तिकडे लक्षाला धोका असतो, इथे एलियनला. फक्त हा महेश महेश च्या धर्तीवर रोहित रोहित ओरडत नाही.
एलियनच्या नावाखाली फक्त जादूची पावर घेतली आणि नावही दिमाखात जादू दिलेले आहे.
अशा करामती आणि इमोशनल मसाले एकत्र करून रगडापुरी वाढली आहे. शोले च्या वेळी सलीम जावेद ने छोले खाता खाता दुनियेभरचे मसाले ढवळून पटकथा लिहीली होती. यातली फ्लाईंग सॉसर अनेक हॉलिवूडच्या सिनेमांचा अभ्यास करून दाखवली आहे.
कोई मिल गया पार्ट टू मधे एलियन मुलगी पृथ्वीवर येते. अग तिला लव होतं. पुढे ती हिरो ला सांगते कि मै तेरे बच्चे की मां बननेवाली हूं...
त्यावरून गोंधळ होतो. आपल्या खानदानात एलियनशी लग्न करत नाहीत असं हिरोचा बाप ठाकूर रुद्रप्रतापसिंग सांगतो.
मग हा विषय एक लेडी पत्रकार जी प्रिती झिंटा असते ती पेपरात छापते.
त्यावर मायबोलीवर धागा निघतो.
पुष्कळ रणकंदन होते. काही आयडी शहीद होतात.
धागा वाचून एकनाथ शिंदे त्या एलियन मुलीचे लग्न लावून देतात. ठाकूर ला अजितदादा जेल मधे टाकतात.
देवेन्द्रजी त्यामुलीच्या आयबी चौकशीची मागणी करतात.
शेवट गोड होतो. यात तिसया भागाची नांदी होते.
एलियन मुलगी बाळाला जन्म देते......
(समाप्त)
(टंकनाचा कंटाळा आला. उरकतं घेतलं. बरेच दिवस पडून होतं. बास्केटबॉल मॅच वर त्या वेळी मुक्तपीठ कम्युनिटीतून मराठी जोक्स व्हायरल झाले होते. प्रतिसादात आठवतील तसे वाचक भर टाकतील ही अपेक्षा)
मजा आली.सगळेच पंचेस आवडले.पण
मजा आली.सगळेच पंचेस आवडले.पण स्पाटाळू ला पहिला नंबर.
अनु जी, धन्यवाद.
अनु जी, धन्यवाद.
कंटाळा आला म्हणून आवरतं घेतलं.
मस्त पंचेस. चित्रपट पाहिला
मस्त पंचेस. चित्रपट पाहिला नाही, नाहीतर अजुन मजा आली असती मला वाचताना. डीपी पण भारी लावलाय.
https://youtu.be/3mmk3ty5q5Q
https://youtu.be/3mmk3ty5q5Q?si=Z1yww7k3lGg18NOb
पिक्चर खूप पूर्वी पाहिलाय आणि
पिक्चर खूप पूर्वी पाहिलाय आणि आता आठवत नाहीये. त्यामुळे प्रश्न- रेखा कॅनडात पण भारी कांजिवरम नेसून दागिन्यांनी मढून रहात असते का?
अंतराळात पाठवण्यासाठी डी टू
अंतराळात पाठवण्यासाठी डी टू एच च्या डीशेस लावलेल्या असतात. भारताने खोडद इथल्या दुर्बिणीत किती पैसा बरबाद केला हे या अविष्काराने लक्षात येते. आता कळ्ळं का कॅनडाने मेहरांना त्यांच्या स्पेस एजन्सीत का घेतलं ते ?
साधा जेसीबी आला तरी लोक काम सोडून बघत बसतात, इथे उडती तबकडी दिसल्यावर काय होणार ?
म्युझिकल साय फाय सुरू होतो. एव्ह्ढ्यासाठीच नोलानचे सिनेमे कंटाळवाणे वाटतात.
>>>>
पंजाबातून हजारो लोक टॅक्सी
पंजाबातून हजारो लोक टॅक्सी चालवण्यासाठी कॅनडात जात असल्याने कामावरून काढलेच तर कुणाच्या तरी टॅक्सीवर रात्रपाळी करू असा बी प्लान तयार असावा. >>>LOL
स्टोरी बिल्डअप स्टार्टींग
स्टोरी बिल्डअप स्टार्टींग पुरतीच होती बाकी बारगळली
कुठलं ही दाबलं तरी पॉं च
कुठलं ही दाबलं तरी पॉं च वाजतंय. पण हीच कमाल आहे संगीतकार राजेश रोशनची.
इफ एलियन देन सेन्ड
स्पाटाळू
मेहरांचं सगळीकडे लक्ष होतं. फक्त पॉं पॉं पॉं पॉं नव्हते करत बसले ते.
>>>
आवरतं का घेतलंत... पॉ पॉ पॉ पॉ करायचंत ना शेवटपर्यंत
>> कामावरून काढलेच तर
>> कामावरून काढलेच तर कुणाच्या तरी टॅक्सीवर रात्रपाळी करू असा बी प्लान तयार असावा.
>> भूभाग कच्छच्या रण सारखा दिसतो.
एकेक पंचेस भारीच
पाहिलेला नाही, पण हे वाचून पाहिल्याचाच अनुभव आला.
रेखा कॅनडात पण भारी कांजिवरम
रेखा कॅनडात पण भारी कांजिवरम नेसून दागिन्यांनी मढून रहात असते का? >> कांजीवरम ओळखता येत नाही. पण राकेश रोशनने जुन्या आठवणी काढून तिला छान ठेवली आहे
मानव, माझे मन अजनबी धन्यवाद.
स्टोरी बिल्डअप स्टार्टींग पुरतीच होती बाकी बारगळली
आवरतं का घेतलंत... पॉ पॉ पॉ पॉ करायचंत ना शेवटपर्यंत >>
खूप महीने पूर्ण होत नव्हतं हे. एकीकडे थोडा पिक्चर बघायचा एकीकडे रिअॅक्शन. नंतर कंटाळा आल्यामुळे आणि इतर कामे आल्याने उरकतं घेतलं.
अतुल थँक्स
सॉक्स, लिंक बद्दल धन्यवाद.
सॉक्स, लिंक बद्दल धन्यवाद.
पण तुम्हाला माहिती आहे का ? ऑर्कुट वर मुक्तपीठ कम्युनिटी वर योगेश जोशीने पिसं काढणारा धागा काढला होता. २००३ / ०४ साली.
त्यात प्रतिसादात सुद्धा अनेकांनी भर घातली होती. त्यातले बहुतेक सर्व प्रतिसाद या व्हिडीओत आले आहेत. तलवार अमराठी आडनाव आहे. त्यामुळं ऑर्कुट वरून त्यांना सुचलं हे म्हणणं धाडसाचं आहे.
भारी... सिनेमा पाहिला नाहीये
भारी... सिनेमा पाहिला नाहीये.
उडती तबकडी आणि रेखाची प्रेग्नंन्सी यांचा संबंध असेल तर त्या तबकडीला 'फ्लाईंग सासर' म्हणायला हवं.
खूप महीने पूर्ण होत नव्हतं हे
खूप महीने पूर्ण होत नव्हतं हे. एकीकडे थोडा पिक्चर बघायचा एकीकडे रिअॅक्शन. नंतर कंटाळा आल्यामुळे आणि इतर कामे आल्याने उरकतं घेतलं
>>> समजू शकतो.. माझेही असेच होते...
धमाल लिहिले आहे.
धमाल लिहिले आहे.
स्पाटाळू आणि पॉंपॉ विशेष.
कॅनडातल्या शेतात यांचं घर असतं आणि कांजीवरम वर शाल पांघरून, सैलसा अंबाडा पाडून, मोजकेच दागिने घालून- पोरगं नापास होत असताना रेखा शाळेच्या मिटींग्जला जाते.
ऑ, तो बाकी भाग मला वाटलं की
ऑ, तो बाकी भाग मला वाटलं की भारतात आहे, कोणत्या तरी हिल स्टेशन ला.
अनु,
फ्लाईंग सासर >>>
अनु,
ते भारतातलं कॅनडा आहे. चोप्राजचं भारतीय हिल स्टेशन युरोपमध्ये असतं आणि रोशनांचं भारतीय हिल स्टेशन कॅनडात असतं, हे मी आधी या लेखात लिहिले होते.
मुझसे दोस्ती करोगे
अरे हो खरंच की
अरे हो खरंच की
फारच थोडक्यात आवरतं घेतलं की!
फारच थोडक्यात आवरतं घेतलं की! ते नाकडोळे काढलेलं मडकं, ह्रितिकची ॲक्सेंट, धूप वगैरे राहिलं की वो
आणि सबसे कठीण सवाल
आणि सबसे कठीण सवाल
मेनू के बिना एक फाईल को दुसरी फोल्डर मे कॉपी कैसे करते है
तर त्या तबकडीला 'फ्लाईंग सासर
तर त्या तबकडीला 'फ्लाईंग सासर' म्हणायला हवं. >>> जबराट कमेण्ट आहे ही.
कांजीवरम वर शाल पांघरून, सैलसा अंबाडा पाडून, मोजकेच दागिने घालून >> भारी आहे निरीक्षण
कांजीवरम साडी बाप्ये लोकांनी कशी ओळखायची ?
ते नाकडोळे काढलेलं मडकं, ह्रितिकची ॲक्सेंट, धूप वगैरे राहिलं की वो >>> लांबण लागली असती मग
मेनू के बिना एक फाईल को दुसरी फोल्डर मे कॉपी कैसे करते है >> और ये लगा सिक्सर
फ्लाईंग सासर
फ्लाईंग सासर
कसं काय मिसलं हे
कसं काय मिसलं हे
महान रत्न आहे..फ्लाईंग सासर Proud
मेहरा ही डीटूएचची डिश आणि
मेहरा ही डीटूएचची डिश आणि एक्सटी संगणक याच्या सहाय्याने अंतराळात संदेश पाठवत असतो.
इफ एलियन देन सेन्ड
कॅनडात कुठून तरी कुठे तरी चाललेले असतात. हा भूभाग कच्छच्या रण सारखा दिसतो.
स्पाटाळू
मेहरांचं सगळीकडे लक्ष होतं. फक्त पॉं पॉं पॉं पॉं नव्हते करत बसले ते.
>>>>>
धमाल आहे हे!! आधी वाचलं होतं
धमाल आहे हे!! आधी वाचलं होतं पण पुनःप्रत्ययानीमित्त प्रतिसाद.
वा, मजा आली ! छानच
वा, मजा आली !
छानच