नारळाची बर्फी

Submitted by मनीमोहोर on 27 August, 2023 - 11:17
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

नारळी पौर्णिमेला जनरली नारळीभात केला जातो पण तो ज्यांना आवडत नाही त्यांच्या साठी ही एकदम सोपी , पट्कन होणारी आणि ही चवीला अप्रतिम अशी नारळाची बर्फी ...

साहित्य

डेसिकेटेड कोकोनट पाव किलो ( तीन मेजरिंग कप )
साखर दीड कप
दूध अंदाजे पाव लिटर
साय / क्रीम छोटे दोन तीन चमचे.
सुकामेवा, केशर रंग, चांदीचा वर्ख वैगेरे ऐच्छिक

क्रमवार पाककृती: 

एका pan मध्ये दूध उकळत ठेवा. उकळल्यावर दोन तीन मिनिट ढवळत राहून थोड कमी करा. नंतर त्यात साखर घालून ढवळत रहा आणि निम्मं होय पर्यंत आटवा. नंतर त्यात डेसिकोटेड कोकोनट आणि क्रीम घालून पुन्हा ढवळत रहा. तो कीस कोरडा असल्याने दूध पटकन शोषून घेतो आणि मिश्रण पटकन आळतं. Pan पासुन सुटू लागल्यावर थोड मिश्रण हातात घेऊन त्याची गोळी वळत असेल तर गॅस बंद करा. तूप लावलेल्या थाळ्यात जाडसर थापा ( बर्फी आहे वड्या नाहीत ). वरून जो हवा तो सुकामेवा घाला, साधारण गार झाल्यावर वड्या कापा पूर्ण गार झाल्यावर खा. ( त्या आधीच काढून घेऊन खाल्ल्या जातात )

हा फोटो

20230827_171817_0.jpg

हा आणखी एक फोटो ह्यात टेक्सचर बेटर दिसतय.

20230828_092255~2.jpg

ही दुरंगी बीट रुट रस घालून.

20230913_114928~2_0.jpg

वाढणी/प्रमाण: 
बर्फी सारखी वडी असल्याने प्रत्येकी एक खुप होते.
अधिक टिपा: 

१) डेसिकेटेड कोकोनट असला तरी कोरडी होत नाही मस्त मॉईस्ट आणि क्रिमी होते. प्लस नारळ खोवण्याचा त्रास वाचतो ते वेगळच.

२) दोन रंगाचं मिश्रण केलं तर डबल डेकर बर्फी बनते आणि मस्त दिसते. नुसती पांढरी ही छानच दिसते. मी आंब्याचा आटवलेला रस घालून केली आहे.

३) ह्याची चव खरचं नारळाच्या बर्फी सारखी लागते. वड्यांसारखी लागत नाही.

४ ) कोणी चहाला येणार असेल तर गोड म्हणून हा एक चांगला ऑप्शन आहे. एक दिवस आधी ही करुन ठेवू शकतो.

बर्फी आणि वडीतला फरक स्पष्ट करायचा प्रयत्न करणारी ही ती फेसबुक लिंक

https://m.facebook.com/groups/606730686147413/permalink/2777766349043825...

माहितीचा स्रोत: 
नेट वरून
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अनया, माझे मन, वलय, स्वाती , झकासराव, ऋन्मेष, धन्यवाद.

स्वाती , सामो ला अनुमोदन, मला ही प्रतिसाद खूपच आवडला.

तेरी नारळ बर्फी मेरे नारळ बर्फी से सफेद क्यू है अशी जाहिरात बनेल यावर... >> ऋ, हाहाहा..

अगदी प्लेन कशी दिसेल असा डाउट होता पण मस्तच दिसत होती. आणि वर वेलची कुटा, पिस्ता बदामाचे काप करा हा काही व्याप ही नाही. Happy

धन्यवाद माधव...
स्वाती ची टॅग लाईन फारच छान आहे.

आधी बनवलेली बर्फी संपल्यामुळे परत दुसरी बॅच बनवली. यावेळेस साखर कमी केली आणि रोझ सिरपचे प्रमाण वाढवले कारण सिरप आधीच गोड असल्यामुळे.

IMG_4218.jpeg

वलय मस्त दिसतोय हा रंग ही ... लागोपाठ दोन बॅचेस... ग्रेट.. एक सजेशन , कधीतरी सिल्व्हर वर्ख लावून बघ , गुलाबी वर पांढरा वर्ख भारी वाटेल. अर्थात वर्ख आवडत असेल तरच.
अदिति, थँक्यू, फोटो दाखव.
नारळ खोवणे नाही आणि नारळ कीस कोरडा असल्याने ओल्या नारळा सारखं मॉईश्चर काढण्यात वेळ ही जात नाही. त्यामुळे फारच पटकन् होते ही बर्फी... आणि चव ही अप्रतिमच असते.

Pages