नारळाची बर्फी

Submitted by मनीमोहोर on 27 August, 2023 - 11:17
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

नारळी पौर्णिमेला जनरली नारळीभात केला जातो पण तो ज्यांना आवडत नाही त्यांच्या साठी ही एकदम सोपी , पट्कन होणारी आणि ही चवीला अप्रतिम अशी नारळाची बर्फी ...

साहित्य

डेसिकेटेड कोकोनट पाव किलो ( तीन मेजरिंग कप )
साखर दीड कप
दूध अंदाजे पाव लिटर
साय / क्रीम छोटे दोन तीन चमचे.
सुकामेवा, केशर रंग, चांदीचा वर्ख वैगेरे ऐच्छिक

क्रमवार पाककृती: 

एका pan मध्ये दूध उकळत ठेवा. उकळल्यावर दोन तीन मिनिट ढवळत राहून थोड कमी करा. नंतर त्यात साखर घालून ढवळत रहा आणि निम्मं होय पर्यंत आटवा. नंतर त्यात डेसिकोटेड कोकोनट आणि क्रीम घालून पुन्हा ढवळत रहा. तो कीस कोरडा असल्याने दूध पटकन शोषून घेतो आणि मिश्रण पटकन आळतं. Pan पासुन सुटू लागल्यावर थोड मिश्रण हातात घेऊन त्याची गोळी वळत असेल तर गॅस बंद करा. तूप लावलेल्या थाळ्यात जाडसर थापा ( बर्फी आहे वड्या नाहीत ). वरून जो हवा तो सुकामेवा घाला, साधारण गार झाल्यावर वड्या कापा पूर्ण गार झाल्यावर खा. ( त्या आधीच काढून घेऊन खाल्ल्या जातात )

हा फोटो

20230827_171817_0.jpg

हा आणखी एक फोटो ह्यात टेक्सचर बेटर दिसतय.

20230828_092255~2.jpg

ही दुरंगी बीट रुट रस घालून.

20230913_114928~2_0.jpg

वाढणी/प्रमाण: 
बर्फी सारखी वडी असल्याने प्रत्येकी एक खुप होते.
अधिक टिपा: 

१) डेसिकेटेड कोकोनट असला तरी कोरडी होत नाही मस्त मॉईस्ट आणि क्रिमी होते. प्लस नारळ खोवण्याचा त्रास वाचतो ते वेगळच.

२) दोन रंगाचं मिश्रण केलं तर डबल डेकर बर्फी बनते आणि मस्त दिसते. नुसती पांढरी ही छानच दिसते. मी आंब्याचा आटवलेला रस घालून केली आहे.

३) ह्याची चव खरचं नारळाच्या बर्फी सारखी लागते. वड्यांसारखी लागत नाही.

४ ) कोणी चहाला येणार असेल तर गोड म्हणून हा एक चांगला ऑप्शन आहे. एक दिवस आधी ही करुन ठेवू शकतो.

बर्फी आणि वडीतला फरक स्पष्ट करायचा प्रयत्न करणारी ही ती फेसबुक लिंक

https://m.facebook.com/groups/606730686147413/permalink/2777766349043825...

माहितीचा स्रोत: 
नेट वरून
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान दिसते आहे.
आणि मिलकमेड ऐवजी दूध वापरल्यामुळे अजून चांगलं.

वडी छान दिसते आहे.
_________
आमच्याकडे ओल्या नारळाची वडी होते बरीच वर्षे. पण हल्ली पूर्वीसारखी चव येत नाही. याचं कारण आता मिळणारे नारळ वाळकूट (माडावरून दहा महिन्यांनी खाली पडतात ते)मिळतात. गोडवा आणि ओलावा खोबऱ्यात नसतो. म्हणजे डेसिकेटेड कोकोनट झाले. झाडावरून आठ महिन्यांनी मुद्दामहून उतरवलेले नारळ बाजारात येत नाहीत.

आता बाजारातून नारळ बर्फी,नारळाची वडी घेतल्यास ती डेसिकेटेड कोकोनटचीच असते. ओल्या नारळाची विक्रीला टिकत नाही. शिवाय दक्षिणेतून तेल काढलेला चोथा उर्फ डेसिकेटेड कोकोनट स्वस्तात मिळतो. गुजराथी लोकांचा 'कोपरा पाक' लाडूंची चव थोडीशी अशीच असते.

>>>>आमच्याकडे ओल्या नारळाची वडी होते बरीच वर्षे. पण हल्ली पूर्वीसारखी चव येत नाही.>>>
एक काकू बनवायच्या शेजारच्या...प्रचंड आवडायची नारळवडी . आता ते गाव सुटले. त्या काकू आहेत की नाहीत माहित नाही. पण त्या नारळवडी खाताना जरुर आठवतात. खूप गोड स्वभाव. आदिवासी आश्रमशाळेला दिवाळीला मदत करायच्या. खूप व्रतस्त जगणं होतं...
या लेखाने आठवणीं जागल्या...
नारळवडी आजही प्रचंड आवडते.

ही पाककृती सोपी वाटते. नारळबर्फी करायला हवी.

धन्यवाद सर्वांना.

अज्ञानी, पाहिली तुमची रेसिपी पण त्या पेक्षा मला ही ही रेसिपी अधिक सोपी वाटली. चव आणि टेक्क्षर ही सेम बर्फी सारखं आहे.

हल्लीच्या नारळाला खरचं चव नसते खोबर ही बिन चवीच आणि चरचरीतच लागत , त्यात ह्यामध्ये विकतचं खोबर वापरलेलं त्यामुळे ते तर अधिकच बेचव आणि चोथा चोथा लागेल अस वाटत होत पण तसं न होता एंड प्रॉडक्ट एकदम क्रीमी, सॉफ्ट झालं होतं. म्हणूनच इथे शेअर केली आहे रेसिपी. ह्यात मावा नाही त्यामुळे हेवी ही होत नाही खाताना.

बेसिक पांढरी करून बघा एकदा , ती आवडली तर डबल डेकर वैगरे करता येईल.

द सा छान आठवण , मस्त वाटल वाचून.

बर्फी सारखी वडी असल्याने प्रत्येकी एक खुप होते.>>>हा अन्याय आहे खरंतर, पण रेसिपी छान आहे त्यामुळे चालवून घेणार Wink

सोपी रेसीपी. मला पण नारळ वडी फार आव्डते पण ती गुड क्वालिटी ओल्या नारळाचीच. ही सुक्या खोबर्‍या ची बर्फी आहे. टेस्टीच बनत असेल.

प्रज्ञा, योकु, झकासराव, अमा, जाई धन्यवाद.

>हा अन्याय आहे खरंतर, पण रेसिपी छान आहे त्यामुळे चालवून घेणार Wink >> प्रज्ञा Happy

योकू हो आंब्यामुळे रंग आणि स्वाद दोन्ही खुलून आले. आटवलेला रस असल्याने काम सो आणि पट्कन झाल.

अमा सुक्या नारळाची कशी होईल अस मला ही वाटत होत पण मस्त झाली.

जाई, डेसिकेटेड कोकोनट म्हणजे पांढरा शुभ्र दिसणारा सुकवलेला नारळाचा चव किंवा बारीक कीस. हा कोणत्याही दुकानात सहज विकत मिळतो.

मस्त दिसतायत वड्या, नक्की करून बघणार.
दूध अर्ध्यात आटवायच्या स्टेपचा शॉर्टकट म्हणून इव्हॅपोरेटेड मिल्कच वापरावं की काय असा ऑलरेडी मोह होतो आहे. Happy

मस्त दिसतेय.
@सुनिती.
मी नेहमी फ्रोजन ओलं नारळ आणि क्रीम घालून करते. अप्रतिम होते. पण नारळ अजिबात करपू द्यायचा नाही, घात होतो.

झाडावरून आठ महिन्यांनी मुद्दामहून उतरवलेले नारळ बाजारात येत नाहीत.>>>>>

एक काकू बनवायच्या शेजारच्या...प्रचंड आवडायची नारळवडी . आता ते गाव सुटले. त्या काकू आहेत की नाहीत माहित नाही. पण त्या नारळवडी खाताना जरुर आठवतात.>>>>>

तुमच्या कॉमेंट मुळे मलाही खोबऱ्याची खास वडी आठवली आणि आजीही..

माझी आजी गावाहून येताना ( घरच्या नारळाच्या) वड्या घेऊन यायची. आम्ही नातवंडं, तिचे भाचे - भाच्या ( जे कर तर खूप मोठे होते)
सगळ्यांसाठी, दुधाच्या पिशव्यान मधून पुड्या करून आणायची. प्रत्येक पुडीला दोरा गुंडाळून बंद केलेली वड्यांची पुडी.

आम्हाला तर खूप आवडायची पण ते सगळे सुध्धा " मावशी, आत्या वड्या आणल्या का म्हणून चौकशी करायचे.

तशी वडी अजून कोणालाही जमली नाही. जरी आई तिचीच recipe वापरते.

डेसिकेटेड कोकोनट - नारळातून तेल काढून घेतल्यावरच्या खोबर्‍याचा कीस, रीड - भुगा. सॉर्ट ऑफ बायप्रॉडक्ट. हा फार इझिली अव्हेलेबल असतो शक्यतो सगळीकडेच.
सुक्या खोबर्‍याचा कीसही विकत मिळतो (लांब लांब श्रेड्स असतात पाकिटात) तुलनेने महाग कारण प्रॉपर सुकं खोबरं आहे.

खूप छान दिसतेय बर्फी.
नक्की करून बघणार.

<<< डेसिकेटेड कोकोनट - नारळातून तेल काढून घेतल्यावरच्या खोबर्‍याचा कीस>>> मार्केट मध्ये सहज मिळणाऱ्या डेसिकेटेड कोकोनट बद्दल हे बरोबर आहे. मात्र माझ्याकडे असं तेल काढून ना घेतलेलं डेसिकेटेड कोकोनट उपलब्ध आहे. (माझा स्वतःचा ब्रँड NaturZest) हे ओल्या खोबऱ्यतून फक्त मोईश्चर ( पाणी) सुकवून तयार केलेलं असतं. त्यामुळे ते चोथा चोथा लागत नाही. त्यांची चटणी , वाटण इत्यादी केलं तर सुक्या खोबर्‍याच आहे असं लक्षात येतं नाही.

ऋ, चना, सुनिती, स्वाती, अमितव, अस्मिता, प्राजक्ता, छंदिफंदी, योकु सावली धन्यवाद.

छंदिफंदी, मस्त आठवण . पूर्वी विकतचा खाऊ परवडत नसे म्हणून अश्या कसल्या तरी वड्या न्यायची पद्धत होती .

मला वाटतय फ्रोजन ओल्या नारळाने होईल पण ती करायला वेळ लागेल. इथे डेसी कोकोनट घेतल्यामुळे पटकन आळल मिश्रण.

स्वाती इव्हॅपोरेटेड दूध घेऊ शकतेस . केलीस तशी तर इथे सांग रिझल्ट.

योकु डेसिकेटेड कोकोनट बद्दल मला ही असच वाटत. मी एकदा नारळाची पाठ काढून मग त्याचे बारीक तुकडे मिक्सर मध्ये फिरवून मग ते वाळवून घरी केला होता डेसिकेटेड कोकोनट घरी .पण त्याचा खूपच व्याप होतो. वर्थ नाहीयेत एवढे कष्ट. परवा मी आणलेला बरी होती क्वालिटी ( ८० ₹ पाव ). त्याच्या सोळा वड्या झाल्या व्यवस्थित साईजच्या. आता लागला कधी तर सावली कडूनच घेईन. थँक्यू सावली इथे लिहिलंस म्हणून कळल तुझ्याकडे आहे ते.

Pages