Submitted by नितिन हे. वैद्य on 19 August, 2023 - 17:56
लाडके गोड किती तू परी, परी ग आलीस तू भूवरी
मनात माझ्या आज बरसल्या आनंदाच्या सरी
हसलीस तू तर हसवतेस मज
रडलीस तू तर बावरते मन
डोळ्यांतील हे भाव निरागस
स्पर्शती अंतरी, परी ग आलीस तू भूवरी
हातांवर ह्या दोन रांगशील
शब्द नवे-नवे तू शिकशील
छेडतील ही इवली बोटे
हृदयाच्या तारी, परी ग आलीस तू भूवरी
उनाड अल्लड अवखळ होशील
भातुकलीतील खेळ मांडशील
नको म्हणूनही पुढे धावशील
जाशील मग परघरी, परी ग आलीस तू भूवरी
राजासंगे घरकुल करशील
संसारी तू तुझ्याच रमशील
माझ्यासंगे खेळाया तू
आणशील दुसरी परी, लाडके आलीस तू भूवरी
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान...
छान...