(व)वि-चित्र

Submitted by धाग्या on 13 August, 2023 - 09:50

सुरुवातीला "आम्ही कशाला, आम्ही कशाला - " इथून सुरवात होऊन “आम्हीसुद्धा दिडक्याच मोजल्या आहेत ना ? - मग ज्युनिअर ऋन्मेश चा बाप पहिल्या रांगेत आणि आम्ही मागे, हे का? त्याला पावणेदोनशे चाहते, म्हणून?" असा पारा चढत गेला.

"अरे जा !! - टीपापाकराच्या पायाशी त्या वाडेकराच्या बच्याला बसायला सांगतोस काय- "

"अतुलकाका, तोंड आवरून बोला. तुमची विद्वत्ता घरात. मानाचा प्रश्न आहे हा- रूनम्याचा बाबा काय गांधी समजतोय काय स्वतःला ? तो खुर्चीवर आणि आम्ही त्याच्या मागे उभे-- काय भालदार चोपदार काय आम्ही ? अरे, ऑफिसच्या फोटोतसुद्धा जनरल मॅनेजरच्या मागे उभा आहे मी; इथे या परीच्या बापामागे राहू काय?"

"तर तर ! फोटोतसुद्धा गळ्यात मोती काही खरे दिसायचे नाहीत- टीपापाकाकू त्या टिपापाकाकू ! अमेरिकेची ऐट आणली म्हणून कोकणी पाणी लपत नाही!"

"धाग्यांवरून मोठेपणा का म्हणून ठरवायचा? आणि हर्पेन काकांनी खरंच आयर्नमॅन पूर्ण केली हे खरं कशावरून?"

"जा ग जा, तुझ्यासारख्या डझनावारी आयड्या उडवायला लावल्या आहेत! भाऊ अडमिनच आहे माझा !”

"हे बघा - हा फोटो आहे - त्याला परमनंटनेसपणा आहे. उद्या लोक शेण घालतील डू आयड्यांना पुढे बसवून आम्ही मागे उभे राहिलो तर ! "

"सटवे, सदस्य क्रमांक काढतेस?"

"हडळ मेली!"

"शट अप!"

"तुझा बाप..."

"तुझी आई..."

"ओय ओय..."

"ठो..."

"मेलो..."

"अरे या विव्हळत पडलेल्यांना फ्रेम बाहेर ओढून टाका रे कोणीतरी"

"हं.. स्माईल प्लीज!!"

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान !
इथे काय प्रतिसाद अपेक्षित आहे कल्पना नाही म्हणून
हा आयडी माझा नाही एवढे बोलून मी पुन्हा खाली बसतो Happy

Duplicate प्रतिसाद

काय आहे नक्की कळले नाही (म्हणजे फॉरमॅट नाही कळला) पण वाचताना मजेशीर वाटले Lol

>> इथे काय प्रतिसाद अपेक्षित आहे कल्पना नाही
+१

अच्छा. तो फॉर्म असेल तर मग मला वाटते सुरवातीला ("असा पारा चढत गेला" च्या आधी) अजून थोडे वर्णन/भर हवी होती.
असो. मस्त!
ok-hand_medium-light-skin-tone_1f44c-1f3fc_1f3fc (1).png

" आणि मी तर फ्रेममधूनच गायब "
" हो काका... सॉरी, आजोबा.. तुम्ही होते तरी का व.विला "
" अरे, नसलो म्हणून काय झालं. पण फ्रेममध्ये यायचा पहिला क्लेम तर आहेच ना माझा !!! ". Wink

सुरूवात करताना बटाट्याच्या चाळीतलं फोटोसेशन आणि शेवटाकडे येताना (बहुतेक) 'अघळपघळ' मधली 'काही (बे)ताल चित्रे' असं आहे ते.

काही आरोपांचे खंडन करतो

1) ज्युनिअर ऋन्मेश चा बाप पहिल्या रांगेत...
>>>>>
जरी सुरुवातीला मी पहिल्या रांगेत बसलो असलो तरी ऐन वेळी अतुल मध्ये घुसले आणि माझ्या समोर फतकल मारून बसले. त्यामुळे माझा रांचो होण्याचा चान्स हुकला Sad

2) रूनम्याचा बाबा काय गांधी समजतोय काय स्वतःला..
>>>>>
शाहरूख समजतो Happy

3) तो खुर्चीवर आणि आम्ही त्याच्या मागे उभे--
>>>>>
मी खुर्चीवर बसलो नव्हतो. पायरीवर बसलो होतो. सारेच पायरीवर बसले होते. किंबहुना माझीच पायरी सर्वात खालची होती Wink

4) त्याला पावणेदोनशे चाहते, म्हणून...
,>>>>>
199
पावणेदोनशे न बोलता दोनशे बोलायची सवय करा आता Happy

5) इथे या परीच्या बापामागे राहू काय?"
>>>>>
रिश्तेमे मैं उसका बाप लगता हू लेकिन असल में है वोह मेरी मा Wink

---------------

तळटीप - चार-पाच वेळा माझा उल्लेख झाला तरी हा धागावेताळ मी नव्हेच !

>> जरी सुरुवातीला मी पहिल्या रांगेत बसलो असलो तरी ऐन वेळी अतुल मध्ये घुसले आणि माझ्या समोर फतकल मारून बसले. त्यामुळे माझा रांचो होण्याचा चान्स हुकला

Lol
"परंतु नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होतं" असं काहीसं वाटलं हे वाचून. वेळच अशी होती की वेळीच आलो आणि "समोरच फतकल डॉट कॉम" शिवाय दुसरा पर्यायच नव्हता Sad

अतुल काही हरकत नाही.
त्या आधी देखील एक फोटो क्लिक झाला होता. चमकोगिरी करायचा चानस मी कधी सोडत नाही
ज्यांच्याकडे माबो टी शर्ट नाही त्यांना मी दुसरे कुठलेतरी काळे टी शर्ट घाला अशी आयडीया दिली आणि स्वतः पांढरे घालून आलो Proud

13_0.jpg

धागावेताळ मस्त!
या संदर्भाने वाचायला मजा आली आता..