Submitted by ढंपस टंपू on 12 August, 2023 - 22:31
श्रीदेवी यांच्या साठाव्या वाढदिवसानिमित्त गुगलने डुडल बनवून त्यांचा वाढदिवस साजरा केला आहे. गुगलने डुडल बनवण्याचा बहुमान थोड्याच व्यक्तींना मिळतो. त्यात श्रीदेवीचा समावेश व्हावा ही भारतीय चित्रपट रसिकांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला नसता तर त्यांची सेकंड इनिंग अजूनही चालू असती. अनेक दमदार भूमिका आपल्याला पहायला मिळाल्या असत्या.
श्रीदेवी यांना आदरांजली !
त्यांच्यामागे एक पती श्री बोनी कपूर, कन्या जानवी कपूर आणि दोन दीर अनु. अनिल कपूर आणि संजय कपूर आहेत.
तुम्हाला श्रीदेवी आवडतात का ? त्यांच्या अभिनयाबद्दल काय सांगाल ?
त्यांच्या तुम्हाला आवडणार्या भूमिका कोणत्या आहेत ?
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
श्री देवी मला खूप आवडते.
श्री देवी मला खूप आवडते. माझे आवडते रोल्स सद्मा ऑफ कोर्स. लम्हे. ह्याचा अर्धा भाग फक्त तिच्यासाठी बघा. फार क्युट दिसते. चांदनी ऑफ कोर्स. त्यातला तिचा डान्स व्हाइट ड्रेस मधला व यलो शिफॉन्स. तिने फार लहान पणा पासून काम केले आहे. व अगदी एन्टी रामा राव ह्यांच्या बरोबर रोमांटिक काम केले आहे. एक बं जारन नावाचा पिक्चर पण लै भारी आहे. श्रीदेवी व जयाप्रदा एकदमच हिंदीत आल्या. मी जयप्रदा ची फॅन आहे. आमच्या गुंटूर ची सुंदरी. हिची जादू वेगळीच आहे.
तिने मोना कपूरचा संसार तोडला हे मला कधीही पटणार नाही. शक्यच नाही. मोना सफर्ड अ लॉट. तिचा मृत्यू पण संश यास्पदच आहे. केस दाबली गेलेली आहे. मी सिंगापूर मध्ये भल्या मोठ्या टब मध्ये झोपून पाणी सोडून बघितले. स्मार्ट हॉटेल मध्ये तर तिथे पाणी एक लेव्हलला आल्यावर थांबतेच आटो माटिक. तिच्या रक्ता त खूपच अल्को होल असले पाहिजे. पण आपण काय बोलु शकतो. श्रद्धांजली. एक गोड स्त्री ची इमेज. आता डूडल बघते.
अरेच्चा ! हा दिनविशेष
अरेच्चा ! हा दिनविशेष माहिती नसतानाही आज नेमकं हे गाणं ऐकतोय / पाहतोय.
https://www.youtube.com/watch?v=X5_0v5BgYYI
सलमान खान किरकोळ वाटतोय श्रीदेवी पुढे. हा चित्रपट बघायचा राहून गेला आहे.
चालबाज मधे सनी देओल आणि रजनीकांत हे सुद्धा श्रीदेवीपुढे दुय्यम वाटले होते. पडद्यावरचा तिचा करीष्मा अमिताभच्या बरोबरीचा होता. काही वेळा जास्तच.
मला तर उगाच आपलं काहीही
मला तर उगाच आपलं काहीही कोणाचं डूडल असं वाटलं. डूडल कशाला हवंय श्रीदेवीचं?
आणि त्याचा रीच भारत, ऑस्ट्रेलिआ, न्यूझिलंड, सौदी अरेबिआ, फ्रांस आणि कॅनडा. काय संबंध कोण जाणे. https://www.google.com/doodles/sridevis-60th-birthday
श्रिदेवी मला आवडते..अभिनय
श्रिदेवी मला आवडते..अभिनय अगदी डोळ्यांतून बोलतो तिच्या. चालबाझ मधून तिने दखवून दिले की कॉमेडी फक्त पुरुषांची मक्तेदारी नाही. ईंग्लिश विंग्लिश मधे पण अगदी आपलीशी वाटून गेली.(आई सारखी)
तिने मोना कपूरचा संसार तोडला हे मला कधीही पटणार नाही.>>> का? हे नाही पटलं. संसार तर मोडलाच ना. हेमा ने, हिने. कुणाला पटो वा न पटो.
रिक्शाचालक लोल
रिक्शाचालक लोल