Submitted by Chaitanya Rode on 5 August, 2023 - 01:18
इथे मृत्यच रेंगाळे तुला मी पाहण्यासाठी
जीवाचे दान देतो तो तुला मी साहण्यासाठी..
तुझ्यासाठी कधीकाळी जिथे मी राहुनी गेलो
घरे बोलावती मला पुन्हा तिथे मी राहण्यासाठी...
आठवांची कुपी होती तिला मी लावला धक्का...
कुपीतून सांडले अत्तर जरा गंधाळण्यासाठी....
तारणासाठी कुठे काही आता उरले न मजपाशी...
का बरे तिथे गेलो उधारी मागण्यासाठी...?
कुणाचे कोण ना उरले अशा दुनियेत पाषाणी..
जवळ येती इथे सारे हिते जोपासण्यासाठी...
जगाची रीत आहे ही गुन्हे काळासवे विरती...
तूर्तास घातला बुरखा चेहरा झाकण्यासाठी...
मोजून चार खांद्यांनी मला सरणावरी नेले..
जरा येते स्मशानी का चितेवर जाळण्यासाठी
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
"सारणा"गत कुणी लपले जेव्हा
दुरूस्ती बद्दल धन्यवाद.