Submitted by श्रीराम_देशपांडे on 4 August, 2023 - 21:23
मूल जेथे हसू शकत नाही
ते कुटुंब असू शकत नाही
पुण्य हे एक कर्मफळ आहे
पुण्य हेतू असू शकत नाही
कार्यशक्ती वेडेपणामधली
शाहण्याला दिसू शकत नाही
राहिला जर कृतीत रावण तर
राम हृदयी वसू शकत नाही
आसवांना तरी पुसा, कारण
आठवण तर पुसू शकत नाही
खूप ठरवून शेवटी कळलें
मी तुझ्यावर रुसू शकत नाही
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा