गंध हळवे भावनांमध्ये

Submitted by अभिषेक_ on 3 August, 2023 - 11:39

वीज नाचावी ढगांमध्ये
तीच शांतता दोघांमध्ये

हसणे माझे कर्ज तुझेच
नको वसुलू आसवांमध्ये

‘मीच नाही का हाक दिली?’
सल ही कित्येक मनांमध्ये

आले मनी तर घे नाचुनि
वजन कसले पावलांमध्ये?

टाळलीस तू मैफिल जरी
वावर तुझाच गीतांमध्ये

अश्रू होते ओले जरी
भिजले न ते यातनांमध्ये

घाव तिचे जगाच्या ओठी
मजला रस ना अफवांमध्ये

जगलो तर हासतच होतो
दुःख कसले आठवांमध्ये?

नभ बरसता कुणी मिसळले
गंध हळवे भावनांमध्ये

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान ,
एक खटकलं अश्रु ओलेच असतात, कदाचि त्या एवजी
डोळे होते ओले जरी
भिजले न ते यातनांमध्ये
किंवा
पापण्या होत्या ओल्या जरी
भिजल्या न त्या यातनांमध्ये

बरोबर वाटलं असतं से वाटते