Submitted by श्रीराम_देशपांडे on 3 August, 2023 - 00:20
सर्वच इथे सुशिक्षित कोणी हुशार नाही
सामील इथे होण्याचा माझा विचार नाही
जो तो करू पहातो वर्षाव चौकशींचा
पर्वा करायला पण कोणी तयार नाही
असली घरास माझ्या जरी कुंपणे रूढींची
माझ्या मनास मात्र कुठली किनार नाही
इथल्या वयस्करांना ही बाब ठाव नाही
चूकण्यास सारखे ते आता कुमार नाही
सौदा या जीवनाचा आहे जरा निराळा
कुठलीही स्वाक्षरी अन कुठला करार नाही
मी काय वाट पाहू दुसऱ्या भल्या क्षणाची
घालावयास इकडे दुसरी विजार नाही
असुदे सुखातला अन माझ्यातला दुरावा
हा तर विलंब आहे ही माझी हार नाही
हे मानतो मी माझे शिक्षण सुमार आहे
पण वागणूक आणि वर्तन सुमार नाही
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
> असली घरास माझ्या जरी कुंपणे
> असली घरास माझ्या जरी कुंपणे रूढींची
> माझ्या मनास मात्र कुठली किनार नाही
सुंदर!
आशय आवडला, छान आहे.
फक्त नम्रपणे एवढेच सुचवू इच्छितो की गझलेमध्ये तंत्रानुसार प्रत्येक शेरात एकच वृत्त पाळले जाते.
संदर्भासाठी मायबोलीवरीलच हा एक सुंदर लेख पाहू शकता ज्यात गझलेचं तंत्र फार सुंदररीत्या आणि अगदी सोप्या भाषेत मांडलं आहे: https://www.maayboli.com/node/21889
आपल्या प्रतिसादासाठी खूप खूप
आपल्या प्रतिसादासाठी खूप खूप धन्यवाद