बस्स करा आता ...

Submitted by छन्दिफन्दि on 21 July, 2023 - 15:25

बस्स करा आता ...
मी लक्ष्मी, अन्नपूर्णा, किंवा इतरही कोणती देवी नाही
मला देव्हाऱ्यात बसवू नका
मी हरायला, लुटायला, पणाला लावायला एखादी वस्तू नाही
उपभोग करून फेकू नका
माझं स्त्रीत्व म्हणजे ना कुणा एकाची मक्तेदारी कि कुटुंबाची मानमर्यादा
काचेचं भांड समजून फोडायला जाऊ नका
मी आहे हाडामासाची, धडकणाऱ्या हृदयाची, तळपत्या बुद्धीची एक जिवंत माणूस
मला माणसा सारख जगू द्या!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गेल्या वर्षी घडलेल्या एका दुर्दैवी अत्याचाराच्या घटनेनंतर उद्विग्न मनातून आल्या होत्या ह्या काही ओळी..

जेमतेम एक वर्ष होतंय तोच अजून एक भयंकर घटना, ( म्हणा मधल्या काळात सगळं आलबेल होत असं ही नाही पण ) ज्याने परत मीडिया , देश खवळून उठलाय..

आता ह्या बातम्या वाचाव्या, बघाव्या, त्यावर व्यक्त व्हावं ह्या सगळ्याच्या पलीकडे कुठेतरी जातोयसं वाटतं... चीड, अस्वस्थता , असहायता, निष्क्रियता, ह्याच चक्रात अडकलोयं.. .. वर्षांनु वर्ष, दशकानु दशकं...