Submitted by अभिषेक_ on 20 July, 2023 - 08:27
प्रेमाच्या मोहात ठेविले, हसू तुजकडे तारण होते
दुर्भाग्यास माझ्या तेव्हा, मीच केले पाचारण होते!
विलगू कैसा आठवांतूनी मी, दरवळ तुझिया क्षणांचा?
मोहरले होते तुझ्यासवे ते, क्षण का साधारण होते?
विस्मरणाची तुलाच कैसी, इतक्यात मिळाली मुभा अशी
काय ते आसवांचे सारे, सोहळे विनाकारण होते?
युग-युगांच्या घेऊन शपथा, स्वप्नांनी डोळे भरलेले
सांगना तू केलेस तेव्हा, रूप कोणते धारण होते?
भोगला होता आजन्म सखये, सुखाचाच बंदिवास मी
तूझे दिले दुखणेच माझ्या, स्वातंत्र्याचे कारण होते!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जय हिंद
जय हिंद
बोलकत, आधीचे शीर्षक बहुधा
बोकलत, आधीचे शीर्षक बहुधा दिशाभूल करणारे होते, बदलले
सुंदर.
सुंदर.
>>>>भोगला होता आजन्म सखये, सुखाचाच बंदिवास मी
तूझे दिले दुखणेच माझ्या, स्वातंत्र्याचे कारण होते!
वा! पॅरॅडॉक्स
धन्यवाद सामो!
धन्यवाद सामो!
दुःख-जखमा-ठेचा यांनीच प्रगल्भता आणि परिपक्वता येते असं म्हणतात, त्या अर्थाने 'स्वातंत्र्य'.
छानच.
छानच.