एकची सोयरा

Submitted by दत्तात्रय साळुंके on 14 July, 2023 - 01:39

धरा एकची सोयरा
वरा रखुमाईवरा
अन्य नाते खोटे
दैन्य येता पोबारा

वचनी तो पक्का
धावे तो रक्षाया
न मारता हाका
प्रचिती द्यावया

अनुभुती ही संतांची
खोटी कशी जाईल
विसरा मायिक सारं
विठू तुमचा होईल

रोज किती कष्टता
प्रपंची उलाढाल चाले
त्याचे स्मरण सोडून
सुखदु:खची भोगले

सुखदु:खाच्या पल्याड
वसे निर्गुणाचे गाव
व्हावे गोत्र तयाचे
द्यावा तिथेची पडाव

तिथे नांदे चिरशांती
नसे कशाचीही भ्रांत
पुसले जाता मीपण
सुखदुःखही पावे अंत

© दत्तात्रय साळुंके

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users