याआधीचा भाग - https://www.maayboli.com/node/83688
काही लोक वेडे असतात...
...आणि काही लोकांचं वेडेपण जग बदलतं.
नाशिक. मुंबई पुण्याच्या तुलनेने छोटं शहर.
...मात्र या छोट्याश्या शहरात तो वेगाने वाढत होता.
प्रचंड वेगाने.
इकडे मेथचं प्रोडक्शन बिनबोभाट चालू होतं.
आणि तिकडे पूर्ण कंपनी तेजीत चालली होती. केमिकल बरोबर आता आयटी क्षेत्रामध्येही त्याची कंपनी उतरली होती.
नाशिकच्या क्षितिजावर त्याचा उदय होत होता...
...मात्र तो अजूनही समाधानी नव्हता.
त्याला हवं होतं जग. पूर्ण जग.
मेथ, फक्त मेथ बनवून तो गप्प बसणार नव्हता.
त्यासाठीच आज त्याने मीटिंग बोलावली होती...
...मीटिंगला गौडा, शिंदे, आणि त्याचे नेहमीचे काही डीलर हजर होते.
बंद दाराआड ही मीटिंग सुरू झाली. दारासमोर लोकांचा सशस्त्र पहारा होता.
अतिशय मोजके लोक या मीटिंग साठी होते.
गौडा हेड टेबलवर बसला. तो त्याच्या उजव्या बाजूला बसला. बाकी सगळे लोकही स्थानापन्न झाले.
"तमा. तू बोलायला सुरू कर. सर्वजण इतका वेळ एकत्र असणं धोक्याचं." गौडा म्हणाला.
त्याने दीर्घ श्वास घेतला. आणि तो उठून उभा राहिला.
"आपण सगळे नाशकात आहोत. पण लक्षात घ्या, नाशिकच्या बाहेरचं जग खूप मोठं आहे. प्रचंड मोठं. आणि माझ्यासाठी ते जग आहे कमीत कमी ५०० बिलियन डॉलरचं. त्यातला एक टक्का जरी मी उचलला ना, मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बदलू शकतो."
सगळ्यांनी अक्षरशः आ वासला.
"फक्त मेथचा धंदा करून उपयोग नाही. आता वेळ आलीय सगळे ड्रग तयार करण्याची. कोकेन, मरियुएना, एल एस डी, सगळं सगळं.
तुला वाटतं तेवढं सोपं नाही ते तमा.
अशक्य आहे. पण आजपर्यंत माझं आयुष्यच अशक्य ते शक्य करण्यात गेलं आहे. माझं आयुष्यच या अचाट आणि अशक्य गोष्टींनी भरलं आहे. माझा अभ्यास झालाय. गरज आहे तुमच्या साथीची... पुढच्या सहा महिन्यात मी कोलंबियाला चाललो आहे. गेले सहा महिने मी तिथल्या कार्टेलशी बोलतोय. कोलंबिया, ब्राझील, चीली, अर्जेंटिना आणि मेक्सिको, ह्या सगळ्या कंट्रीज आपलं मुख्य लक्ष्य असतील, आणि हेडक्वार्टर नाशिक.
कुणी स्वप्नात विचार केला नसेल, की भारतात जगातलं सगळ्यात मोठं ड्रग रॅकेट उभारलं जातंय..."
"... व्हॉट अबाऊट शेलार." एकाने प्रश्न विचारला.
"माझं सगळ्यात पहिलं प्रेम आहे प्राजक्ता, आणि दुसरं प्रेम आहे बंदुका. शेलारांची ताकद आहे त्यांच्या माणसांमध्ये, आणि त्यांच्या प्रत्येक माणसाकडे गन आहे. आपली माणसे जास्तीत जास्त चाकू मिरवतात. गरज आहे एका आर्मीची...
...रशियातून पुढच्या महिन्यात पहिलं कंटेनर येईल. एके ५६, उझी, M2 ब्राऊनिंग सगळ्या बंदुका. काही तोफा सुद्धा.
...वी विल क्रिएट अवर ओन आर्मी." तो म्हणाला.
"तू नाशिकला युद्धात ढकलायचा प्लॅन करतोय..."
"नाही, मी नाशिकला लंका बनवतोय, सोन्याची लंका. आणि लंकेत फक्त एक सर्वशक्तिमान, सर्वसत्ताधीश होता, रावण. प्राजक्ता इंटरप्रायजेस च्या नावाखाली मी दोन हजार बेड्सचं हॉस्पिटल उभारलं, पाच हजार मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली, एक हजार मुले राहतील इतक्या क्षमतेचा अनाथाश्रम उभारला, अनेक अपंग लोकांना रोजगार दिला. कशासाठी? कारण मला नाशिक जगात बेस्ट हवय. जितकं प्रेम मी प्राजक्तावर करतो, तितकं मी या नाशिकवरसुद्धा करतो. आफ्टर ऑल, हे सगळं जग जिंकून मला तिच्या पायाशी ठेवायचं आहे.
युद्ध होईल अण्णा, तयारीत रहा. युद्ध नाही, महायुद्ध होईल. तयारीत रहा."
कुणी बराच वेळ काहीही बोललं नाही.
गौडाने शांततेचा भंग केला.
"चला, कामाला लागू." तो म्हणाला.
सर्वजण उठले,.आणि तिथून निघून गेले...
गौडा आणि तो सोडून...
तो काहीतरी विचारात होता.
"तमा." गौडाच्या शब्दांनी त्याची तंद्री भंगली.
"बोला अण्णा."
"काय विचार करतोय?"
"मी खूप वेगात पुढे जातोय का? जर काहीही अडथळा आला तर एकतर मी संपेन, नाहीतर तो अडथळा."
"असं नसतं तमा. हे टोक ते ते टोक नसतं. कधीही भविष्याचा जास्त विचार करायचा नाही. जगायचं ते वर्तमानात... आता हातात काय आहे, त्याचा विचार कर. स्वप्ने जरूर बघावी, पण वर्तमानाची जाणिव ठेवून.
किती वेडा झालाय तू प्राजक्तासाठी, कळतय का? एक ना एक दिवस तुला ती नक्की भेटेन, तुम्ही दोघे एकत्र असालच. पण तिच्या आठवणीत चोवीस तास राहण्यात काय हशील?"
"जीव आहे माझा ती अण्णा..."
"...मग ती तुझा जीव आहे, तर स्वतःच्या जीवाला जप. तमा, तू थकतोय. सतत काम करून करून विचार करून तू थकतोय. आधी विचार कमी कर, हळूहळू तुलाच मार्ग मिळेल."
तो काहीही बोलला नाही.
"चल मी निघतो. आणि भेटेल तुला प्राजक्ता. आशीर्वाद आहे महादेवाचा."
तो निखळ हसला...
गौडा तिथून निघून गेला.
******
"ताई."
शरा तिच्या रूममध्ये बसलेली होती.
"बोला सीईओ मॅडम."
"ताई, माझा बॉस ना, खरच."
"काय केलं त्याने आता?"
"तो काय आहे, कसा आहे, तेच कळत नाही. हँडसम, डॅशिंग, डीमांडींग तर आहेच. पण त्याचबरोबर कधीकधी अगदी केविलवाणा दिसतो. कधीकधी तो इतका हट्टी असतो, की त्याला समजावणं मुश्किल. आणि कधीकधी अगदी शांत स्वरात स्वतःच समजावतो. वेडा आहे का संत, माहिती नाही. आज तर हाईट झाली. त्याची लव स्टोरी सांगत होता. ताई तूही जेजेला होतीस ना, सांग ना, इतका फेमस होता हा माणूस?"
"फेमस? कॉलेजची एक व्यक्ती अशी नसेल की त्याला ओळखत नसेल. एक टॉपर आणि बॅकबेंचर, दोघांचं अद्भुत मिश्रण होता तो. आपण म्हणतो ना, हे रसायनच वेगळं आहे, तसं. जेजे कॉलेजच्या इतिहासात पहिल्यांदा रेस्टिकेट होऊन बेस्ट आउटगोइंग स्टुडंट अवॉर्ड मिळवणारा... विचार कर साक्षी, काय असेल तो..."
"...असं बोलू नकोस ताई, मी प्रेमात पडायला लागलीय त्याच्या..."
"गप्प बस." शरा ओरडली. "काहीही वेड्यासारखा विचार करू नकोस."
"अगं रिलॅक्स. मी जोक करत होते."
"माझी शपथ घे साक्षी, तू कधीही त्याच्या प्रेमात पडणार नाहीस."
"...ताई? हे काय अचानक."
"शपथ घे म्हटलं ना."
"ओके, मी घेईन शपथ. पण..."
"... पण काय?"
"तुला आता माझी शपथ. खरं सांग. का तू इतका फोर्स करतेय?"
"कारण त्याची प्रेयसी, त्याची राणी, त्याचं जग, त्याची शरा मी होते..."
....साक्षी अक्षरशः शॉक लागल्यासारखी जागीच थिजून राहिली.
*****
सकाळीच त्याने गोदावरीत अंघोळ केली.
सोबत काही पुरोहित होते.
एक श्वेत वस्त्र गुंडाळून तो कपालेश्वर महादेवाकडे गेला.
महादेवाची त्याने मनोभावे प्रार्थना केली.
कपालेश्वराचं दर्शन घेऊन तो काळारामाला निघाला...
...आज त्याच्या हस्ते रामाची पुजा होणार होती.
रावणाच्या हस्ते रामाची पुजा. त्यालाच स्वतःचं हसू येत होतं.
मात्र त्याचा मुखवटा त्याला सहजासहजी सोडायचा नव्हता.
त्याला पैसा अपार मिळाला होता. आता हवी होती ती प्रसिद्धी. प्रतिष्ठा...
...त्यासाठी त्याने कर्णाचा मार्ग अवलंबला होता.
दानवीर...
त्याने पुजा सुरू केली. कितीतरी वेळ तो मनोभावे पुजा करत होता.
...त्यानंतर त्याने आरती संपवली...
...त्याने रामाला हात जोडले.
' मी स्वतःला तुझा सगळ्यात मोठा शत्रू समजतो. आणि त्यात काही गौण नाही. पण तूही रावणाचा आदरच करत होतास, आणि रावणही तुझा.
तुझ्या कडून मी एकच गुण घेणार आहे, तुझ्या सीतेसोबतच्या एकनिष्ठतेचा. माझ्या प्राजक्ताशी मी असाच एकनिष्ठ राहीन. या बाबतीत तिचा राम बनून राहीन.
...पण ती कायम राहीन सोन्याचा लंकेत, सगळ्या सुखात. तुझ्यासारखं वनवासात नाही. '
छान झाली आरती... पुजारी म्हणाला...
तो मागे वळायला गेला...
...आणि त्याच क्षणी त्याला ती दिसली...
इतके दिवस जो तिला शोधत होता...
इतके दिवस जो तिच्या नावाचा जप करत होता...
इतके दिवस जी त्याच्या अक्षरशः श्वासात होती...
प्राजक्ता...
...आणि ती आज त्याच्या समोर होती...
क्रमशः
वाह क्या बात है!!!!
वाह क्या बात है!!!!
मस्त!
मस्त!
एकदम भारी! यु आर द बेस्ट!
एकदम भारी! यु आर द बेस्ट!
छान ... दिसली त्याला
छान ... दिसली त्याला प्राजक्ता एकदाची.
आता पाहू पुढे काय होत ते.
छान चालली आहे कथा
छान चालली आहे कथा