कोणता झेंडा घेऊ हाती?

Submitted by kapil gholap on 7 July, 2023 - 03:49

भारतातील खास करून महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक परिस्थिती गढूळलेल्या अवस्थेत आहे, राजकीय, सामाजिक क्षितिजावर घडणाऱ्या अनेक विस्मयकारक घटनांचा सामान्य लोकांवर आणि लोकशाही वर परिणाम होतोच पण त्याचा जास्त परिणाम हा कार्यकर्त्यांवर होतोय. कार्यकर्त्यांची संभ्रमावस्था निर्माण होते, खरं सांगायचं म्हणजे कार्यकर्त्यांचे अक्षरशः बारा वाजलेत. पक्ष/संघटना निष्ठा की, विचार/समाज निष्ठा? याबद्दल त्याचा सामाजिक व राजकीय कामातील उत्साह दिवसेंदिवस क्षीण होतोय. आणि जर त्याच्यातील कार्यकर्ता मरण पावला तर हे कोणत्याही पक्षाला कधीच परवडणारं नाही.

तसं पाहायला गेलं तर यात संघटनेचा अथवा नेतृत्वाचा कोणाचाच दोष नाही. घटना घडत जातात, संघटनाहित लक्षात घेऊन, भविष्य लक्षात घेऊन आणि नेतृत्व हे स्वतः चा फायदा बघूनच निर्णय करत असते. परंतु त्यामुळे कार्यकर्त्यांचा त्यांच्या भावनांचा चुराडा झाल्याशिवाय राहत नाही यावर उपाय आहे का? कारण कार्यकर्ता द्विधा मनस्थितीत सापडतोय. कोण बरोबर? काय बरोबर? नक्की कोणाच्या बाजूने जाऊ? हे प्रश्न पडतात, ह्या प्रश्नांची उत्तरे कार्यकर्त्याला स्वत सोडवायची असतील तर त्यांन त्यासाठी स्वतःला काही प्रश्न विचारावेत....

मी संघटनेत का आलो?
माझं नेतृत्व करणारी खरच तेवढ प्रभावी आहे का?
त्यास स्वताची काही विचारधारा आहे? त्याच्याकडे निर्णय क्षमता आहे की त्याने पक्ष विचारधारा तत्त्व दुसर्‍याच्या दावणीला बांधली आहेत?
माझ्याशी संपर्क, संवाद होत आहे का?
मला काय महत्वाचे आहे? पक्ष/संघटना निष्ठा की विचार/समाज निष्ठा
या प्रश्‍नांची उकल केली की लक्षात येईल निर्णय घेणे सोप्प होईल की......कोणता झेंडा हाती घेऊ ? आणि का ? म्हणुन या प्रश्नांचा ऊहापोह महत्त्वाचा आहे.

मी संघटनेत/पक्षात का आलो?....मला अमक्या तमक्या विचारांनी, तत्त्वांनी प्रेरित केले, ज्यामुळे ह्या संघटनेत/पक्षात जोडला गेलो परंतु ते विचार आता संघटनेत/पक्षात जिवंत आहेत का किंवा त्या विचारांना धरून ती चालत आहे का? कारण आजवर मी त्याच विचारांनी जगलो आणि आता यू टर्न मारायचा आहे, मग आत्ता त्याच विचारांशी प्रतारणा करावी लागणार ज्या गोष्टीमुळे मी या संघटनेत/पक्षात जोडलो गेलोय, तो विचारच संपला असेल तर, मग मी अशा माझ्या विचारांच्या विरुद्ध काम करू शकेल का? आणि आता आपल्या विचारांच्या विरोधात आपण जर काम करत राहिलो तर मानसिक समाधान मिळतं का? किंवा खऱ्या अर्थाने समाज हित साधू शकतो का? प्रामाणिक कार्यकर्त्यांचे विचार हे आपल्या समाजाशी नाळ जोडणारे असतात, समाजहित साधणारे असतात मग इथ आपल उत्तर आपल्याला मिळत, त्यावेळेस मात्र त्यांची त्रेधातिरपीट उडणार नाही.

कारण तत्त्वांशी आपली जास्त भावनिक गुंतवणूक असते, तत्त्वांशी प्रतारणा झाल्यावर आपण जास्त अस्थिर होतो, त्याच बरोबर आपले संघटनेशी सुद्धा काही बंध असतात मग प्रश्न उभा राहतो? संघटनेत/पक्षाच्या आदेशाच्या विरोधात उभा राहू की मी माझ्या विचारांना जे मान्य आहे की करू? पण माझ्या विचारांना जे मान्य केलं तर संघटनेनं मला जे पद दिलं आदर दिला, सन्मान दिला, मानमरातब दिला मग खाल्लेल्या मिठाला जागुन की प्रतारणा करू? की माझा स्वतःचा तत्त्वांचा निर्णय स्वीकारू?

मित्रहो, संघटने/पक्षाने जरी पद दिल असलं, मान दिला असला तरी ते काय मला फुकट मिळालाय का ? मी ही तेवढेच आयुष्य वेचले, वेळ दिला आहे बहुतेक लोकांचा विरोध स्वीकारला आहे, रस्त्यावर उतरलो, माझ्या कुटुंबाची ससेहोलपट केली आहे, संघटनेसाठी वैयक्तिक नुकसान सुद्धा सहन केले. कधी ही वेळेचा पैश्याचा विचारही केला नाही, म्हणुन माझं काम बघून मग ते मला मिळालाय, हे पद कोणाचेही उपकार नाहीत तर ते मी कर्तुत्वातून deserve केलंय. खाल्लेल्या मिठाला जागायला हवं पण (इथे महाभारतातील दानशूर आठवावा) त्याच्याही ऊपर आपण समाजाचे जास्त देणे लागतो आणि त्यासाठी मी काम केले पाहिजे, माझं कर्तव्य, हे माझ्या कुटुंबाशी, समाजाशी, देशाशी आणि या मातीशी आपल्या संघटने/पक्षा पेक्षा अधिक आहे. जर संघटनेला आपल्यापेक्षा चांगले काम करणारा कार्यकर्ता कोणी भेटला तर आपली गच्छंती निश्चित आहे. तेव्हा ते आपल्या त्यागाचा विचार मांडला जात नाही, किंवा करत बसत नाहीत. म्हणून संघटने/पक्षाचा विचार स्वीकारण्यापेक्षा आपल्या स्वतःच्या तत्वांचा आणि आपल्याला समाजहित कसं साधता येईल याचा विचार निश्चितच आपण स्वीकारला पाहिजे. अस म्हणतात, ज्याचं जमीर म्हणजे (आपला आतला आवाज) जिवंत आहे त्याला स्वताच्या विचाराच्या, तत्त्वांच्या विरोधात उभं राहून मुरड घालून समाधानी, कार्यक्षम राहता येत नाही. त्यामुळे स्वतःच्या विचारांशी प्रामाणिक राहून निर्णय घेतला की सोपं होतं, बाकी पद दिले म्हणून राहणं म्हणजे आपलं स्वतःचं जगणं, समाधान यांचा चुराडा करण्यासारखा आहे.

राहिला प्रश्न नेतृत्वचा, ज्याला मी माझा नेता म्हणून मानतो, उदो उदो करतो खरच त्याला सामाजिक प्रश्नांची जाणीव आहे का? नेतृत्व ला कार्यकर्ताशी संवाद साधायला वेळ आहे का? आणि त्याउपरही इच्छा ? त्याचा सामाजिक बांधिलकीचा आजवरचा अनुभव, प्रवास, इतिहास काय आहे,? की तो अचानक गवत उगवल्या सारखा उगवला आहे. त्याने खरच समाज कामे केली आहेत का ? कारण आपण आपला वेळ त्याला देणार आहोत म्हणुन आपण त्यांच्या कडून आपल्या पेक्षा सरस कामगिरीची अपेक्षा करतो. "प्रगल्भ नेतृत्व हे समाज उत्क्रांतीचा पाया आहे". यासाठी मराठी म्हण सुद्धा लागू आहे "शहाण्याचा नोकर व्हावं पण वेड्याच मालक सुद्धा होऊ नये" कारण नेतृत्व करणारा सिंह असेल तर त्याच्या गटातील शेळ्या सुद्धा सिंहा सारख्या लढतात परंतु नेतृत्व जर शेळी सारखे असेल तर त्याच्या गटातील सिंह सुद्धा शेळी सारखे कापले जातात. त्यामुळे आपण कोणत्या गटात असाव हा आपल्या बौद्धिक क्षमतेचा विषय आहे.

आपल्याला पक्ष/संघटना निष्ठा महत्त्वाची की, विचार/समाज निष्ठा महत्त्वाची ह्याच उत्तर आपल्याला सापडल की निर्णय घेणे सोप्प आहे....म्हणुन भावनिक होऊन विचार नसावा तर आपली स्व विचारधारेला पूरक असावा, म्हणजे काम करणे सोप्प जाईल, हे सगळे सांगण्याचा उद्देश एकच की तू वापरला जाऊ नयेस कारण तू तर ह्या देशाची मौल्यवान संपत्ती आहेस, म्हणुन त्यांनी तुझ्याशी कसेही वागताना तुझ्या विचारांचा आदर नक्कीच करायला हवा. तूच तुझ्या विचारधारेशी एक निष्ठा राहिलास तरच तूझ नेतृत्व तुझ्या सारख्या उमद्या, कट्टर कार्यकर्त्याच्या मागे उभे राहत, आणि ते तुझ्याशी आणि तुझ्या असलेल्या विचारांशी एकनिष्ठ राहील, कोणत्याही तत्त्वांशी फारकत घेणारे निर्णय घेताना १००० दा तुझ्या सारख्या कार्यकर्त्यांचा विचार करतील आणि ते जर झाल तर तीच खरी तुझी किंमत आहे आणि मान सुद्धा.......

*शब्दांकन-श्री. कपिल प्रदीप घोलप.*
*९८८१८५८१८४*

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कार्यकर्त्यांच CTC काय असतं?

त्यांना पगार किंवा खर्च मिळतो की त्यांची पदावर नेमणूक केली की, त्या पदामुळे होणाऱ्या कमाई चे मार्ग शोधावे लागतात ?

कार्यकर्त्या लोकांचा दर्जा असतो .
साधा कार्यकर्ता.
निवडणूक काळात.
दारू, मटण.
जरा प्रभावी कार्यकर्ता .
ह्या दारू ,मटण ची व्यवस्था करण्याची जबाबदारी.
रोख पैसे दिले जातात.
त्या मध्ये घपला करून पैसे मिळतात.
घपला करण्याची ह्याच स्टेज वर सवय लागते.

काही कामे होतात जसे की?

तीन वर्षात साधारण किती वेळ कार्यकर्ता म्हणून दिला.

उदा. महिन्यातून 5 दिवस पूर्णवेळ.