
मी पाहिलेला हिंदी चित्रपट संगीताचा प्रवास
Part 2
( प्रथम भाग इथे पोस्ट केला असल्याने दुसरा भागही इथेच पोस्ट केला आहे. आणि वाचकांच्या सोयीसाठी शीर्षकात आवश्यक तो बदल केला आहे. )
७० चे दशक. किशोरकुमार बहरू बहरू लागले होते. आधी राजेश खन्ना आणि पुढे अमिताभ बच्चन यांच्या सोबत त्यांची जोडी जमली. दोघांसाठी त्यांनी अनेक उत्तमोत्तम, दर्जेदार गाणी गायली. १९६९ च्या आराधना चित्रपटापासून किशोरकुमार पुरूष गायकांमध्ये एकदम आघाडीवर आले. त्यामुळे आपल्या हळूवार गायन शैलीने, कर्णमधुर आवाजाने लोकप्रियतेच्या मोठ्या उंचीवर पोहोचलेले रफी साहेब ही काही काळ पासून दूर गेले ; पण रफी साहेब काय ? किशोरकुमार काय ? किंवा मन्ना डे, मुकेश जी लतादीदी काय ? हे सर्वच प्रतिभावंत व्यक्तीमत्वे आहेत. आणि प्रसिद्धी फार काळ प्रतिभेपासून दूर राहू शकत नाही. रफी साहेबांनी काही काळाने कमबॅक केलंच.
शंकर - जयकिशन या सुप्रसिद्ध संगीतकार जोडीतील जयकिशन पांचाळ यांचे १९७१ साली फार कमी वयात दु:खद निधन झाले. पुढे शंकरजी यांनी एकट्याने आपला संगीत दिग्दर्शनाचा प्रवास सुरू ठेवला.
१९७४ साली राजेश रोशन नामक केवळ १९ वर्षीय नव्या उमेदीच्या, तरूण संगीतकाराने चित्रपटसृष्टीत पाऊल टाकलं. आणि अगदी लवकरच आपल्या लक्षणीय कामगिरीने मोठे यश संपादन केले.
दरम्यान दोन गुणवंत गायक पुढे येत होते. एक होत्या अत्यंत सात्विक, मधाळ आवाजाच्या गायिका ' अनुराधा पौडवाल. '१९७३ सालच्या ' अभिमान ' या चित्रपटात त्यांनी एक संस्कृत श्लोक गायला. पुढेही त्यांनी काही दर्जेदार गीते गायिली. ज्यांना संगीतकार आणि प्रेक्षकांकडून प्रशंसा मिळाली. मात्र त्यांना खरी लोकप्रियता मिळायला बराच काळ जावा लागला.
दुसरे होते ' येसूदास. ' दक्षिण भारतीय असलेल्या येसुदास यांनी हिंदी चित्रपटात गायनाची सुरूवात १९७१-७२ मध्येच झाली होती. मात्र त्यांना खरी ओळख मिळाली ती १९७६ च्या सुरूवातीस रिलीज झालेल्या ' छोटी सी बात ' चित्रपटातील गाण्याने. आणि याच वर्षीच्या ' चितचोर ' या चित्रपटातील त्यांच्या ' गोरी तेरा गांव बडा प्यारा ' आणि ' जब दीप जले आना ' या गाण्यांनी तर अफाट लोकप्रियता मिळवली.
एकीकडे मन्ना डे, मुकेश जी, लतादीदी, आशाताई इ. गायक देखील आपल्या गायनाने रसिकांची मने मोहवून टाकत होतीच ; पण २७ ऑगस्ट १९७६ रोजी मुकेशजींचे हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या अवघ्या त्रेपन्नाव्या वर्षी आकस्मिक निधन झाले.
एकूण हे दशक हिंदी चित्रपट संगीतासाठी संमिश्र स्वरूपाचे गेले.
@ प्रथमेश काटे
आर डी बर्मन बॉस चा
आर डी बर्मन बॉस चा अनुल्लेख!!! हम किसीसे कम नही मधली काँपिटिशन व ये लडका हाये अल्ला?! आशा.
शोले चे संगीत व पार्श्वसंगीत.
अमर अकबर अँथ नी चे संगीत. कव्वाली, माय नेम इज अॅन्थनी ,अगदी शिर्डीवाले साई बाबा!! हे ही माझे फेवरिट आहे.
अजून किती तरी आहेत. आज घरी आराम करत आहे हपिसातून लिहीन.
@आश्विनीमामी - मुख्यतः गायक,
@आश्विनीमामी - मुख्यतः गायक, गीतकार, संगीतकार यांच्या कारकीर्दीच्या सुरूवातीबद्दल हा लेख आहे. आर डी बर्मन यांनी ६० च्या दशकात पदार्पण केलं. त्यांचा उल्लेख मागच्या भागात केला आहे. किशोरकुमार आणि मोहम्मद रफी या आघाडीच्या पुरुष गायकांच्या चढाओढी बाबत यासाठी लिहिले कारण शतकाच्या सुरुवातीची ती ठळक घटना होती. थेट १९७३ मध्ये अनुराधा पौडवाल यांच्या पदार्पणापासून सुरूवात करणं मला योग्य वाटलं नाही म्हणून.
आर डी ने चोरलेली गाणी असा एक
आर डी ने चोरलेली गाणी असा एक धागा हवा... भरपूर कन्टेन्ट आहे...
सॉरी मामी- तुमचा आवडता संगीतकार.. आय नो
@च्रप्स - आर डी सारख्या
@च्रप्स - आर डी सारख्या ब्रिलीयंट आणि क्रिएटिव्ह संगीतकारावर तुम्ही संगीत चौर्याचा आरोप करताय ? कमाल आहे ?
“ आर डी ने चोरलेली गाणी असा
“ आर डी ने चोरलेली गाणी असा एक धागा हवा” - वडिलांपासून सुरूवात करून अनेक पाश्चात्त्य संगीतकारांपर्यंत तो धागा खेचता येईल.
मला त्याच्या चोरलेल्या चालींसाठी रचले गेलेले किस्से वाचायला जास्त मजा येईल.
आला धागा. आता वाचते काय काय
आला धागा. आता वाचते काय काय लिहितात ते. मी काही इथे वाचून प्लेलिस्ट बनवत नाही.