हिंदी चित्रपटसंगीताबद्दल गप्पा -२ पार्श्वगायक ही पद्धत रुळल्यापासून १९६० पर्यंतचा काळ.

Submitted by भरत. on 29 June, 2023 - 01:21

अनिल बिस्वास, नौशाद, सी रामचंद्र, एस डी बर्मन, शंकर जयकिशन, ओ पी नय्यर, मदन मोहन, सलिल चौधरी, रोशन , इ. संगीतकार

मन्ना डे, शमशाद बेगम , मुकेश ,रफी , तलत , किशोर, लता , गीता , आशा , सुमन कल्याणपूर इ. गायक

साहिर, शैलेंद्र, हसरत , शकील बदायुनी, राजेंद्र कृष्ण , कैफी आझमी इ. गीतकार.

गायकांची नावे जन्मवर्षाप्रमाणे घेतली आहेत. इथे ज्यांनी अधिक संख्येने चित्रपट केले त्या संगीतकारांची नावे घेतली आहेत. क्रम जशी नावे आठवली तशी .यादी परिपूर्ण असू शकत नाही. इतरांबद्दल प्रतिसादांत येईलच.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वर सलिल चौधरींचं नाव घ्यायचं राहिलं होतं.

त्यांनी त्यांची अनेक बांग्ला गीते हिंदीत आणलीत किंवा उलटही असेल.
इथे फक्त लताचीच गाणी आहेत.
मला अमुक एक गाणं हिंदीत ऐकल्यासारखं वाटतंय पण ओळखता येत नाही, असं झालं.
एक गाणं मराठीतही आहे.
एवढी बंगाली गाणी सलग ऐकताना अकाराचे ओकार होतात त्याचा कंटाळा आला. गीतकारांचं विशेष कौतुक वाटलं. त्या चालींवर किती चपखल शब्द बसवले आहेत!

एवढी बंगाली गाणी सलग ऐकताना अकाराचे ओकार होतात त्याचा कंटाळा आला. >>> पुलंचे "अनेक कोबींनी कोबिता केल्या" आठवले.

गुणवत्ता असुनही बरेच कारणांनी हे मागे पडले असतील का? >>> कदाचित ते "ज्यांच्यासारखे" गात्/वाटत ते खुद्द गायकही तेव्हा जोरात असल्याने हे मागे पडले असतील. पण द्विजेन मुखर्जींबद्दल - ते हिंदीत मागे पडले असावेत, बंगालीत बरेच करीयर होते असे दिसते. पद्मभूषण मिळवण्याइतके (विकीवरून).

त्या काळात प्रत्येक जण आपापला हेमंतकुमार आणायच्या प्रयत्नात असावेत Happy हेमंतकुमार स्कूल ऑफ गायकी मधलाच वाटणारा अजून एक म्हणजे सुबीर सेन. मै रंगीला प्यार का राही हे एक त्याचे ऐकलेले गाणे. सुरूवातीला ऐकताना हेमंतकुमारच वाटतो. हा शंकर जयकिशनने आणला असावा. त्यांच्याकडेच जास्त ऐकला आहे.

खुद्द हेमंतकुमार स्वतःच्या संगीत दिग्दर्शनात व एसडी बर्मन कडे जास्त गायला (हिंदीत). तुरळक इतरांकडे आहेत त्याची गाणी - "इन्साफ की डगर पे" हे नौशाद कडचे अशा गाण्यांपैकी एक अगदी सुंदर गाणे. (अवांतरः "दीवार" ची पाळेमुळे "गंगा जमुना" मधे आहेत असे म्हणत ते या गाण्यातील चित्रीकरणातही जाणवते. त्यातील विद्यार्थ्यांमधे एक अरूणा ईराणी आहे असे नेहमी वाटते.)

नंतर १९४२ अ लव्ह स्टोरी मधे आरडी बर्मनने एक "शिवाजी चट्टोपाध्याय" या गायकाकडून एक गाणे गाउन घेतले - ये सफर बहुत है कठिन मगर - तो ही आवाज हेमंतकुमारचीच आठवण करून देतो.

रघु आचार्य प्रतिसाद आवडले. >>> +१

रफीच्या "खड्या आवाजा"वरून आठवले. ५० च्या दशकातील पंजाबी ठेक्याच्या गाण्यांत त्याचा जो आवाज आहे तो फार मस्त आहे. पुढे नंतर नंतर अनेक संगीतकारांनी खूप एकसाची गाणी बनवली रफीला घेउन. ती मला फारशी आवडत नाहीत. नया दौर ची गाणी हे आवडणार्‍या गाण्यांचे उदाहरण व बहारों फूल बरसाओ हे अजिबात न आवडणार्‍या.

रफीसारखा खडा आवाज असणारा नंतरच्या काळात जसपालसिंग हा एक गायक होऊन गेला. राजश्री production मुख्यतः गायला. सचिनला त्याचा आवाज चपखल बसला होता. गीत गाता चल, जब जब तू मेरे सामने आये ही त्याची गाजलेली गाणी.
हे जरा अवांतर झालं असावं Happy

धन्यवाद फारेण्ड.

जसपालसिंगवर सचिनचा आवाज हा शिक्का बसल्याने सचिनची कारकीर्द उतरणीला लागली तेव्हां जसपालसिंग यांचा विचार झाला नाही. रफी सारखीच रेंज शैलेंद्र सिंग याचीही होती (आवाजाची अर्थात). पण ती प्रतिभा नव्हती.

जयपूर से निकली गाडी,धीरे चले होल्ले होल्ले या गाण्यात आशाने त्याला गरागरा फिरवून स्टुडीओच्या बाहेर भिरकावून दिलेला आहे. सर्च देऊन पहा. ( त्राण नाही सर्च द्यायचे म्हणून :हाहा:)

>>>>>ओ सजना बरखा ...
छान आठवण राज. खरच एपिटोम!! हे गाणं , साधनाकरताच लिहीलं गेलं असावं, कंपोझ केलं गेलं असावं.

>>>>>तलत मेहमूद अभिनेता बनण्यासाठी आले आणि झालेही. त्यांच्या आवाजातल्या कंपनामुळे त्यांना न्युनगंड होता. बहुधा अनिल विश्वास यांनी त्याला हीच तुझी स्ट्रेंग्थ आहे , असं समजावून आत्मविश्वास दिला
पडद्यावर तलत आणि आवाजही तलतचा अशी दोन गाणी...............राही मतवाले तू छेड इक बार मन का सितार - सोबत सुरैया

भरत, वारिस सिनेमा मी गाण्याकरता फक्त कितीदा पाहीलाय. तलतचा आवाज ऐकला ना की माय नीज गो वीक.
अति सुमधुर, सुसंस्कृत, शालीन आणि मखमली आवाज. गंधर्व.

ललिताबाई देऊळकर (फडके), सुलोचना चव्हाण यांनी हिंदीत सुरूवातीच्या काळात बरेच नाव कमावले होते.
संगीतकारांत वसंत देसाईंचा उल्लेख का टाळला जातो?

जसपालसिंगचा उल्लेख झालाच आहे तर, त्याचं आणि आरती मुखर्जीचं ‘शाम तेरी बंसी पुकारें राधा नाम’ इथे नोंदवून ठेवतो.

आरती मुखर्जीचा उल्लेख (मीच केलाय) झाल्यामुळे तिची ‘दो नैना, इक कहानी’, आणि तिचं आणि अनुराधा पौडवालचं ‘ कभीं कुछ पल जीवन के, लगता हैं के चलते चलते’ ही पण लिहून ठेवतो. विषय तिथवर आला कि अजून लिहिता येईल.

शैलेंद्र सिंगचा अनुनासिक आवाज ही बॉबी साठी त्याची निवड होण्यामागे मुख्य घटक होता (मुकेश आर के चा मुख्य गायक असल्याने)… मुकेश ला शैलेंद्र च्या आवाजाबद्दल विचारले तेंव्हा तो म्हणे म्हणाला की 'गाता अच्छा है, लेकींन बदसुरा भी होता है ... मेरीही तरह'

जयपूरसे गायलं ...तेव्हा शैलेंद्र इंडस्ट्रीच्या बाहेरच फेकला गेला होता. अर्थात आर डी शिवाय त्याला कोणी गाणी दिलीही नव्हती हे खरंय

लताबाईंचं ओ सजना.. हिंदि चित्रपट संगिताची एपिटमी आहे >> या एका गाण्यावर धागा काढायची इच्छा आहे बऱ्याच महिन्यांपासून. मुहूर्त लागत नाहीये.

र च्य क ने, एपिटमी >> अचूक उच्चार.

मला 'खिलते है गुल यहां' या गाण्यावरील धागा वाचायची फार इच्छा आहे. सुडोमि पूर्वी ती पूर्ण व्हावी.

खिलते है - किशोर कुमार पळून गेलेला. एसडींनी त्याच्या घरी जाऊन स्टुडीओत बंद करून सराव करून घेतलेला.

>>>>>>खिलते है - किशोर कुमार पळून गेलेला. एसडींनी त्याच्या घरी जाऊन स्टुडीओत बंद करून सराव करून घेतलेला.
अर्रे!!! मस्त Happy

माझ्याकडे - Rare Gems लता मंगेशकर हा दोन कॅसेट्सचा संच होता. सगळा कॅसेट संग्रह भंगारात दिला. पण त्यांची खोकी ठेवलीत.
त्यातली गाणी
१. अभी तो मैं जवाँ हूं - अफसाना - -१९५१ - हुस्नलाल भगतराम . पडद्यावर नाचणारा प्राण आहे.
२. सपना बन साजन आए - शोखियाँ १९५१ - सपना बन साजन आए. पडद्यावर सुरैया दिसतेय. पण गाणं तिच्या तोंडी नाही. या गाण्यांत लताचा आवाज किती कोवळा आहे!
३. मैं अलबेली - बुझदिल -१९५१ - एस डी बर्मन. यावर एस डी चा शिक्का नाही वाटत.
४. छुन छुन बाजे पायल मोरी - हम लोग १९५१- रोशन . इथेही शिक्का नाही. पडद्यावर श्यामा आणि शर्टाची बटणं न लावलेला बलराज सहानी
५. ये कहे चाँदनी रात - निर्मोही - १९५२ - मदन मोहन
६. कारी कारी अंधियारी रात में - जलपरी -१९५२ पंडित गोविंदराम -
७. साजन तुमसे प्यार करूं - बदनाम -१९५२ - बसंत प्रकाश याही गाण्यात लताचा आवाज किती कोवळा वाटतो!
८. जाओगे ठेस लगाके बहुत पछताओगे - फरेब -१९५२ - अनिल बिस्वास
९. टूटेगी ना प्यार की डोर - अंबर १९५१ - गुलाम मोहम्मद.
पडद्यावर राज नर्गिस. डबल वापरला नसेल तर नर्गिस निष्णात जलतरणपटू होती, असं म्हणावं लागेल. फ्रीस्टाइल , बॅक स्ट्रोक आणि सुरुवातीचा सूर.
१०. साजन से पहली बार - रिश्ता - १९५३ - के दत्ता . हे गाणं सी रामचंद्रंचं म्हणून चालून जाईल.
११ नैनों से नैन हुए चार - औरत -१९५३ - शंकर जयकिशन. इंटरल्युड म्युझिक एस जेचं वाटतं. बाकी स्टाइल वेगळी.
१२ जोगन बन आयी हूं - शबाब -१९५४ नौशाद.
१३ अब के बरस बडा जुलम भया - बारादरी -१९५५ - नाशाद. पडद्यावर गीता बाली.
१४. बडी मुश्किल है - चिंगारी १९५३- मनोहर
१५ -आँखों में समा जाओ -यास्मिन -१९५५ सी रामचंद्र - जॉ निसार अख्तर - वैजयंतीमाला कृष्णधवल चित्रपटांच्या काळापासून हिंदीत होती हे माहीत नव्हतं.
१६ . तबीयत ठीक थी और दिल भी बेकरार ना था मिर्झा साहिबा - १९५७ शार्दुल क्वात्रा

सपना बन साजन आए आणि आँखों में समा जाओ ही फेवरिट.
यातल्या काही संगीतकारांबद्दल काहीच माहीत नाही.
उरलेली उद्या.

सपना बन साजन आए आधीच्या ओळी डिलिव्हरी, वाद्यसंगीत यांनी आएगा आनेवालाच्या आधीच्या ओळींची (prelude) आठवण करून देतात.

लॅपटॉप ठीक झाल्याने आता उत्साह आला आहे. Lol
पण आता गाणी येऊ लागल्याने नेमकं काय करावं हा गोंधळ उडाला आहे. एक एक गाणी म्हटली तर प्रत्येक धाग्याचे असंख्य भाग बनतील. अर्थात हे ही छान आहे आणि उपयोगी आहे. माहिती नसलेली कित्येक गाणी माहिती होताहेत. नूरजहां ऐकून आहे. पण फारशी माहिती नाही. नूरजहांबद्दल कधीच वाचलेलं नाही. इथे संदर्भ मिळतील.

येऊ द्यात. जसे चालले आहे तसेच चालू द्यात. गाणी ही येऊ द्या, आढावा ही येऊ द्या आणि अधून मधून रंजक किस्सेही येऊद्यात. म्हणजे एकसुरी होणार नाही. जे जे माहिती आहे त्याची योग्य वेळ आली कि भर टाकत राहीनच. सध्या वाचनमात्र.

रघु आचार्य, फार मस्त लिहिलं आहे तुम्ही. लिहा अजुन. (गाणी जरा निवांत ऐकणार).
लता, आशांच्या गायच्या पद्धतीवर सुरुवातीला नुरजहां, सुरैय्याची छाप होती कारण त्या दोघी सुपरस्टार होत्या. ती गाणी पण सुंदरच होती पण नंतर त्या दोघींचे खरे दैवी आपल्याला ऐकायला मिळाले हे आपले भाग्य.

१९८२-८३ मध्ये भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तानमधे गेला होता तेव्हाचा हा एक किस्सा.. (शुद्धलेखन क्रेडिट: मी नव्हे. महाराष्ट्र टाईम्सचा वार्ताहर)

लाहोरच्या खास लोकांसाठी भारताचे त्यावेळचे संघ व्यवस्थापक महाराजा बडोदा यांनी एका पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीमध्ये पाकिस्तानमधील सर्व बड्या व्यक्ती येणार होत्या. गावस्कर हे त्यावेळी संघाचे कर्णधार होते. त्यामुळे गावस्कर आणि महाराजा बडोदा हे मान्यवरांचे स्वागत करण्यासाठी मुख्य दरवाजापाशी उभे होते. त्यावेळी गळ्यात सोन्याचे भरपूर दागिने परीधान केलेल्या एक महिला आल्या. हे पाहून महाराजा बडोदा हे सतर्क झाले. या महिला जवळ आल्यावर महाराजा बडोदा यांनी त्यांची ओळख सुनील गावस्कर यांच्याशी करून दिली. महाराजा बडोदा म्हणाले त्या महिलेला म्हणाले की, " आपण यांना ओळखतच असाल, हे आहेत भारताचे कर्णधार सुनील गावस्कर." त्यावर त्या महिलेने म्हटले की, ' मी यांना ओळकत नाही. मी फक्त पाकिस्तानच्या इम्रन खान आणि झहीर अब्बास यांनाच ओळखते.' हा गावस्करांचा झालेला अपमान होता. कारण गावस्कर त्यावेळी जगप्रसिद्ध क्रिकेटपटू होते आणि जगभरात त्यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. पण अपमान होऊनही गावस्कर त्यावेळी शांत राहीले. त्यानंतर महाराजा बडोदा यांनी सांगितले की, ' सुनील, तु तर यांना ओळखतच असशील. या आहेत मल्लिका-ए-तरनुम्म नुर जहाँ.' त्यावेळी गावस्कर यांनी क्षणाचा विलंबही न लावता उत्तर दिले. गावस्कर म्हणाले की, ' जी नहीं, हम तो सिर्फ लता मंगेशकर को जानतें हैं...'

https://maharashtratimes.com/sports/cricket/cricket-news/i-know-only-lat...

महाराष्ट् भूष़ण कि कोणत्या तरी पुरस्काराच्या वेळी सुनील गावसकरच्या तोंडून ऐकला होता हा किस्सा. पण थोडा वेगळा होता. त्या वेळी सुनील गावसकर, पुल देशपांडे आणि लता मंगेशकर या तिघांना अनेक ठिकाणी बोलावून पुरस्कार दिले जायचे. त्यामुळे नेमक्या कोणत्या वेळी सुनील बोलला ते सांगणे अवघड आहे. पण प्रत्येक ठिकाणी असा काहीतरी भन्नाट किस्सा त्याच्याकडून ऐकायला मिळायचा.

एका सत्कार समारंभात सुनील म्हणाला होता कि पाकिस्तानच्या कुणीतरी त्याच्या उपस्थितीत सांगितले की " ये ट्रॉफी एशिया मे आयी है इसकी हमे खुशी है". तर सुनील गावसकर म्हणाला " अगर आप लोग जीत जाते तो क्या ये कहते कि ये ट्रॉफी एशिया मे आई है ? ये हमने जीती है इसलिए सिर्फ हिंदुस्थान कि है ".

महाराष्ट्र भूषण पुरस्कार गावस्करांना मिळाला म्हणून पाकिस्तानी लोक आनंदले? कुछ तो गडबड है दया.

हा किस्सा मीही ऐकला आहे. बहुधा गावसकरच्याच तोंडून. कोणत्यातरी मुलाखतीत. तो बहुधा १९८३ च्या वर्ल्ड कप बद्दल बोलत होता.

https://www.indiatoday.in/movies/celebrities/story/when-sunil-gavaskar-t...
पण इथे म्हटलंय गावसकर खरंच नूरजहाँला ओळखत नव्हता. लताला क्रिकेटमध्ये भरपूर रस होता.
नूरजहाँ आणि लता यांची मैत्री होती. दोघी फोनवर बोलायच्याच. वरच्या लेखात दोघी वाघा बॉर्डरवर भेटल्याचं म्हटलंय . परदेश प्रवास करताना नूर जहाँचं विमान मुंबईत स्टॉप ओव्हर करे, तेव्हा ती लताला विमानतळावर बोलवून घ्यायची असंही वाचलंय.

गावसकरने कोणत्यातरी भाषणात , ‘लताच्या आवाजात विलक्षण गोडवा आहे‘ अशा अर्थाचे वाक्य ‘विलक्षण’ ऐवजी ‘विचित्र’ हा शब्द बोलुन हहपुवा केली होती.

जरा अवांतर होत चालले आहे, पण लताच्या क्रिकेटप्रेमाबद्दल. १९७९-८० च्या पाकच्या भारत दौर्‍यात मुंबई कसोटी मधे लता साधारण इथे प्रेक्षकांत बसलेली दिसेल Happy

आचार्य, हो, ते वेगळ्या ट्रॉफी संदर्भात आहे हे लक्षात आलं होतं, पण तिथे कुठली ट्रॉफी ह्याचा उल्लेख राहिला त्यामुळे मी उगाच खेचत होतो. Happy

Pages