बालपणीचा दिनक्रम

Submitted by ढंपस टंपू on 25 June, 2023 - 23:59

लहानपणीचा काळ त्या वेळी जरा सुद्धा सुखाचा वाटत नाही. पण आता ते दिवस आठवले की पुन्हा एकदा नव्याने बालपण यावे असे वाटते.

ट्विटर वर एका सहा वर्ष वयाच्या मुलाचे टाईम टेबल प्रचंड व्हायरल झाले आहे. ते वाचून लोकांना हसू आवरत नसले तरी त्या मुलाने ते सिरीयसली बनवले आहे.
FzPe0XAaMAEKog-.jpeg

तुम्ही असे टाईम टेबल बनवले होते का? त्या वेळी कुणी बनवले असेल तर अभिनंदन!!

पण जर नसेल बनवले तर त्या वेळी तुमचा दिनक्रम ( अलिखित टाईम टेबल) काय असायचा हे आठवते का?

आठवून पहा.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लहानपण आठवू वाटत नाही, सकाळी ४ ला उठून गोठे झाडा, परत वडलांनी जनावरांची धार काढून झाली का रेडकं अन् वासरं बांधून घाला इथून सुरुवात, दिवसभर शाळा अन् सगळे सोपस्कार आटपून रात्री कधी एकदा वाकळ धरतो अन् मढे होतो असे वाटते, त्यात दुसऱ्या दिवशीच्या हर्राशीत माळवं न्यायची असली का संपलाच विषय परत अडीच वाजता रात्री उठून बैल जुंपून मालाची पोती हारून भाईच्या हर्रस मध्ये न्या म्हणजे एकंदरीत जाच वाटत असे नुसता त्याकाळी.