लिहायचे होते काही

Submitted by मनोजकुमार देशमुख on 10 June, 2023 - 12:04

लिहायचे होते काही शब्द सांडून गेले
आसवे धावून आले व्यथा मांडून गेले

राहीलो मी मैफिलीत आता एकटा आहे
वाटले आपलेच होते मला भांडून गेले

नाही म्हणता कसे? होतोच असर संगतीचा
अजाणते गव्हाबरोबर किडे कांडून गेले

खळगे बुजवायला आले वाटेतील माझ्या
भरले खळगे त्यांनी आणि घर खांडून गेले

Group content visibility: 
Use group defaults