जिंदगी माझी मला बोलावते

Submitted by द्वैत on 9 June, 2023 - 09:49

जिंदगी

सांज झाली की पुन्हा शृंगारते
जिंदगी माझी मला बोलावते

लाभला कोठे जरा एकांत की
मी तिला अन ती मला समजावते

ढील देते लागता थोडी हवा
एरव्ही हातावरी गुंडाळते

ओढता दारे मनाची घट्ट मी
कवडसा होते मनी तेजाळते

राबते कोठे मुक्या बापापरी
अन कधी होऊन आई रांधते

द्वैत

Group content visibility: 
Public - accessible to all site users