(अंमली या कादंबरीच्या पुनर्लेखनाचा हा प्रयत्न, यात मुख्य कथानक तेच असेल, पण बाकी सगळी नावे आणि प्रसंग बदलतील.
या कादंबरीचा भाग आठवड्यातून दोनदा, म्हणजे शनिवारी आणि बुधवारी रात्री ७.३० वाजता प्रसिद्ध होईल.)
याआधीचा भाग -
https://www.maayboli.com/node/83524
देवीच्या मंदिराजवळ भेटलेली ती...
आजारपण, वाढलेलं वजन
गेलेला जॉब.
या सगळ्या गर्तेत तो अडकला होता.
त्याची आई त्याला सतत महादेवाची भक्ती करण्यास सांगत होती.
नाईच्छेने का होईना तो करत होता.
आयुष्यात काहीतरी चांगलं व्हावं याची प्रार्थना करत...
...आणि या प्रार्थनेच्या मागणीत आता तीही जोडली गेली होती...
... तीच, देवीच्या मंदिरात बघितलेली...
आज दिवसभर तो झोपून राहिला...
शेवटी न राहवून तो संध्याकाळी उठला आणि चालायला निघाला.
*****
गंगाघाट... संध्याकाळी कायम गजबजलेला.
भक्त, हौशे, नवशे, गवशे, विक्रेते, ग्राहक, पर्यटक सगळ्यांची गर्दी असलेला भाग...
...आणि नाशकाताले झाडून सगळे नशबाज इथे सापडत...
सुरेशकुमार म्हणूनच आज तिथे आला होता.
त्याच्या हातात एक साधी पिशवी होती. त्या पिशवीत एक पुडी होती.
' ...अर्धा किलो मेथ... '
सोनाराच्या दुकानात एक छोटा वजन काटा असतो. तो बॅटरीवर चालतो.
तो वजन काटा त्याने सोबत बाळगला होता.
संध्याकाळी सातची वेळ. सुरेशकुमार त्याच्या नेहमीच्या जागी बसला.
त्याने पिशवी शेजारीच लक्षपूर्वक ठेवली, आणि फोन लावला.
"संतोष, कुठे आहे बे? आज शंभर ग्राम कसाही विकला जाईल म्हटला होता ना? आहे कुठे गिऱ्हाईक?"
"आणतो साहेब."
"आण, नाहीतर शिंदेभाऊ आपल्याला विकतील." त्याने वैतागून फोन ठेवला.
...तेवढ्यात एक बारीकसा दगड येऊन त्याच्या कपाळावर लागला...
आईग्गग, तो वेदनेने ओरडला...
...आणि दुसऱ्याच क्षणी एका सडसडीत बांध्याच्या माणसाने त्याची पिशवी पळवली...
"भेंचो*" त्याने अक्षरशः जीवाच्या आकांताने शिवी हासडली.
मात्र तो माणूस कुठे दिसेनासा झाला त्यालाही कळलं नाही.
*****
...ते दोघे.
दररोज संध्याकाळी घाटावर येत असत...
गंगेच्या घाटावर...
सावज न्याहाळत असत.
आज सुरेशकुमार तसाच तिथे आलेला होता.
त्याच्या सावध हालचाली, आणि पिशवीवर असणारी मजबूत पकड बघून दोघंही सावध झाले.
...आतला ऐवज बराच मोठा असणार होता...
दोघांनी नेत्रपल्लवी केली.
एकजण हळूहळू सुरेशकुमारच्या जवळ गेला.
आणि दुसऱ्याने नेम धरून गलोलने त्याच्या डोक्यावर दगड मारला.
तो कळवळताच एकाने पिशवी लंपास केली.
पिशवी हातात घेऊन तो धावत सुटला, धावतच तो कपालेश्वराच्या समोर आला, आणि एक क्षण त्याने पिशवीत बघितलं.
...पांढरी पावडर...
...पीठ...?
त्याने अक्षरशः डोक्याला हात मारला.
एखाद्या ब्राह्मणाला मिळालेलं शिध्याचं पीठ त्याने पळवलं होतं...
रागात त्याने ती पुडी तशीच फेकली...
व तो गर्दीत दिसेनासा झाला...
*****
विलास शिंदे खुर्चीवर बसलेला होता.
समोर अर्धमेला सुरेशकुमार उभा होता.
उभा केला गेला होता...
"सुरेशकुमार, मी काय बोललो होतो नीट आठवतंय ना?"
"हो आठवतंय... आह..." तो ओरडला.
"मला स्वतःला तुला चार चार वेळा विचारावं लागतय. प्रकरण किती सिरियस आहे याची कल्पना तुला आलीच असेल."
"दादा, देवाशपथ सांगतो. चोरी झाली पिशवी."
"गणेश." विलासने आवाज दिला.
"गणेशने नेम धरून कोपरा त्याच्या मणक्यावर मारला..."
"आईग्ग..."
एक माणूस मागून धावत आला.
"दादा." तो विलासच्या कानाजवळ खुसपुसला.
"बोल."
"हा खरं बोलतोय. भुऱ्या आणि वर्धा, काल दोघांनी याची पिशवी चोरली होती. पण पांढरी पावडर पीठ समजून त्यांनी कपालेश्वराच्या पायरीशी फेकून पळ काढला."
विलासने सुस्कारा सोडला.
...आणि पुढच्याच क्षणी एक गोळी सुरेशकुमारच्या कपाळाला आरपार भेदून गेली...
******
' महादेव सगळं नीट करेल बाळा. '
या आशेवरच तो जगत होता.
आज तो कपालेश्वराकडे आला होता.
त्याने दर्शन घेतलं, आणि मनातच तो बोलू लागला.
' माझं आयुष्य भरकटत चाललय, त्याला नाव नाही, किनारा नाही. फक्त गर्तेत बुडत चाललोय...
...प्रयत्न करतोय, वेडा म्हणतील इतके प्रयत्न करतोय... हो वेडाच आहे मी.
देवा बाकी कुणीही धोका देऊ दे... तू देऊ नकोस... जे हवय, ते मिळू दे...
मिळू दे मला पैसा, मिळू दे मला माझा आत्मविश्वास. प्रयत्नांना यश दे, तुझ्यासारखच शरीर मला मिळू दे...
मिळू दे मला ती... दिसू दे मला पुन्हा ती... जर ती पुन्हा दिसली ना, देवा वचन देतोय, आयुष्यातलं सगळं प्रेम तिच्यावर उधळून टाकेन, काहीही अपेक्षा न करता... '
आजकाल त्याच्या डोळ्यातून अचानक पाणी का येत होतं, हे त्याचं त्यालाही कळत नव्हतं.
तो तिथून उठला, आणि खाली निघाला.
खाली त्याच्या चपलेजवळ एक पुडी त्याला पडलेली दिसली...
...पांढऱ्या पावडरची पुडी...
क्षणार्धात तो कित्येक वर्षे मागे गेला...
...जेजे कॉलेजची लॅब...
...अगदी असाच पदार्थ...
त्याच्या डोक्यात विचारांचं काहूर माजलं...
...खाली वाकून त्याने ती पुडी उचलली...
...नाही...
...नाही...
....हे विष आहे...
त्याने त्याचा वास घेतला...
एक्झॅक्टली तेच...
मेथ...
तो घाईघाईत गंगेच्या किनाऱ्यावर गेला.
तो ती पुडी फेकणार, तितक्यात...
एका माणसाने त्याचा हात पकडला...
त्याने चमकून बघितले...
एक शुभ्र वस्त्र घातलेला माणूस तिथे उभा होता.
"बेटा, अरे असं भस्म नदीत का फेकतो आहेस? भोले बाबाचा आशीर्वाद आहे... स्वीकार कर... सर्वांगाला त्याचं लेपन कर, कपाळी अभिमानाने मिरव."
तो चमकला.
आशिर्वाद....
की शाप...
विचाराच्या गर्तेत तो बुडाला होता.
मात्र त्याने पुडी आता हातात घट्ट पकडून ठेवली होती...
क्रमशः
वाचतोय.....
वाचतोय.....
पूर्वीच्या कथा, प्रसंग, पात्र बरेच रुजले होते आम्हा सामान्य वाचकांच्या मनात.
पुनर्लेखन चांगलं आहे पण भाग छोटे आहेत, अजून नीट पुरेशी लिंक लागत नाहीये ....
बुधवार....शनिवार येऊ द्या पुढचे भाग
manya +१
manya +१
तसेच पुनर्लेखनात काय बदल झाले आहेत?
manya +2
manya +2
मस्तच !!
मस्तच !!
पूर्वीच्या कथा, प्रसंग, पात्र
पूर्वीच्या कथा, प्रसंग, पात्र बरेच रुजले होते आम्हा सामान्य वाचकांच्या मनात.
पुनर्लेखन चांगलं आहे पण भाग छोटे आहेत, अजून नीट पुरेशी लिंक लागत नाहीये .... >>>>+1
......
......