'सेक्स डॉल्स'- प्रत्यक्षाहूनी प्रतिमा उत्कट!

Submitted by संजय भावे on 5 June, 2023 - 06:55

'सेक्स डॉल्स'- प्रत्यक्षाहूनी प्रतिमा उत्कट!

.
लैंगिक खेळणी (Sex Toys) :

डिल्डो (Dildo), बट प्लग (Butt Plug), कॉक रिंग (Cock Ring), व्हायब्रेटर (Vibrator), सेक्स डॉल्स (Sex Dolls), बीडीएसएम (BDSM) टॉईज वगैरें सारखी अनेक 'सेक्स टॉईज' (Sex Toys) अर्थात लैंगिक खेळणी आज आपल्या परिचयाची असली तरी त्यातली काही हजारो वर्षांपासून वापरली जात आहेत.

मी अद्याप वाचला नाहीये पण अन्य वाचनातून आणि जाणकारांकडून मिळालेल्या माहितीनुसार 'वात्सायन' लिखित/संकलित 'कामसूत्र' ह्या चौथ्या(?) शतकातील प्रसिद्ध ऐतिहासिक ग्रंथात गोलाकार काठी, वक्राकार काठी आणि फुलाच्या कळीसारख्या आकाराच्या वस्तूपासून हत्तीच्या सोंडेपर्यंतच्या अनेक प्रकारच्या लैंगिक खेळण्यांच्या आकारांचे तपशील दिले आहेत. कामशास्त्राच्या औपनिषदिक विभागात (कामशास्त्राचा ७ वा विभाग) लैंगिक संभोगासाठी/समाधानासाठी वापरल्या जाणार्‍या विविध प्रकारच्या साधनांचा उल्लेख आहे.
त्याकाळी डिल्डो किंवा अन्य लैंगिक खेळणी ही लाकूड, रबर, सोने, चांदी, तांबे, हस्तिदंत तसेच प्राण्यांच्या शिंगांपासून बनविलेली असत. जेव्हा पुरुषांना लैंगिक जोडीदार नसतो तेव्हा ते "बाहुल्यांनी" स्वतःला संतुष्ट करत असल्याचेही त्यात म्हंटले आहे.
मैथुनाचे समाधान मिळवण्यासाठी 'पोकळ भोपळे' आणि 'तेल' व 'मलम' लावून प्रक्रिया केलेले 'बांबू' ह्यांचा वापर करून बनवलेल्या कृत्रिम लैंगिक अवयवांबद्दल देखील त्यात भाष्य केले असल्याचेही ऐकिवात आहे.

भारताप्रमाणेच ग्रीक आणि चिनी लोकं देखील प्राचीन काळापासून अशा लैंगिक खेळण्यांचा वापर करत होते. विविध ठिकाणी केलेल्या उत्खननांमधून त्यासंबंधीचे पुरावेही समोर आले आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या साहित्यापासून जगभरात बनवली गेलेली विविध आकारांची लैंगिक खेळणी आणि त्यांच्या बनावटीत कालानुरूप होत गेलेले बदल ह्याचा इतिहासही मोठा रंजक आहे.


वरील फोटोत डावीकडे प्राचीन ग्रीको-रोमन काळातला डिल्डो तर, उजवीकडे चीनच्या जिआंगसू प्रांतातील यिझेंग या शहरात एका उच्चकुलीन व्यक्तीच्या थडग्यात सापडलेला २००० वर्षे जुना ब्रॉन्झचा डिल्डो.

वरील फोटोत डावीकडे चीन मधील आजच्या शांघाय शहराजवळ एका राजाच्या थडग्यात सापडलेला ब्रॉन्झ पासून बनवलेला २०००+ वर्षे जुना 'बट प्लग' (Butt Plug). आणि उजवीकडे अमेरिकन फिजिशियन 'जॉर्ज टेलर' ह्यांनी १८६९ साली तयार केलेला वाफेच्या शक्तीवर चालणारा क्रॅंक व्हायब्रेटर. स्टीम इंजिनला जोडलेला असल्यामुळे कंपनांसहित मागे पुढे होणारा स्वयंचलित डिल्डो हे ह्या यंत्राचे प्रमुख वैशिष्ट्य!

असो, शेकडो-हजारो वर्षांपासून वापरात असलेल्या लैंगिक खेळण्यांचा इतिहास, त्यांच्या निर्मितीत झालेली स्थित्यंतरे हा विषय फार रोचक आणि रंजक असला तरी त्याच्या अधिक तपशिलात न जाता लेखाचा मूळ विषय 'सेक्स डॉल्स' अर्थात लैंगिक बाहुल्यांकडे वळतो.

लैंगिक बाहुल्यांचा इतिहास :

इतिहास संशोधकांच्या एका गोष्टीचे मला फार कौतुक वाटते, त्यांना कुठल्याही गोष्टीचे वावडे नसते. 'सेक्स डॉल' च्या इतिहासाचा मागोवा घेण्यातही त्यांनी कुचराई केली नाही! त्यापैकी काहीजण सेक्स डॉल्सना २००० वर्षांहून अधिक जुना इतिहास असल्याचा दावा करतात, आणि त्याच्या पुष्ट्यर्थ ते ग्रीक पुराणातील 'पिग्मॅलियन' नावाच्या एका पौराणिक पात्राचा संदर्भ देतात.
ख्रिस्तपूर्व पहिल्या शतकातील रोमन कवी 'ओव्हिड' (Ovid) ह्याच्या आठव्या शतकात प्रकाशित झालेल्या 'मेटामॉर्फोसेस' (Metamorphoses) ह्या महाकाव्यातल्या त्या संबंधित एका ग्रीक पौराणिक कथेचा मी केलेला स्वैर अनुवाद असा ...

'स्त्री नग्नतेचे' प्रतीक असणारी व्हीनस ही 'प्रेमाची' रोमन देवी. तिच्या शक्तीचा आणि महिम्याचा सर्वांद्वारे आदर केला जातो. सायप्रसच्या 'किप्रोस' (Kypros) बेटावरील 'अमाथस' शहरातील सायप्रियन मुली ह्या 'प्रोपोएटस'च्या (Propoetus) मुली असल्याने 'प्रोपोएटाइड्स' (Propoetides) म्हणून ओळखल्या जात होत्या. ह्या प्रोपोएटाइड्सनी 'व्हीनस'चे देवत्व मान्य करण्यास नकार दिला. त्यामुळे क्रोधीत झालेल्या व्हीनस देवीने त्यांना शिक्षा म्हणून वेश्या बनवल्याने त्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या पहिल्या महिला बनल्या.

स्वतः उत्तम शिल्पकार असलेल्या 'पिग्मॅलियन' ह्या सायप्रसच्या राजाने व्हीनसच्या कोपाने समाजातील आपला नावलौकिक आणि प्रेम व लज्जा अशा निसर्गदत्त स्त्रीसुलभ भावना गमावलेल्या 'प्रोपोएटस' च्या मुलींना वेश्याव्यवसाय करताना पाहिल्यावर त्याच्या मनात एकूणच स्त्री जातीबद्दल तिरस्कार निर्माण झाला. त्याने ब्रह्मचारी राहण्याचा आणि शिल्पकलेमध्ये स्वतःला गुंतवून ठेवण्याचा निर्धार केला.

पिग्मॅलियनने आपल्या मनातील आदर्श स्त्रीचे एक सुंदर हस्तिदंती शिल्प घडवले. त्याला ते शिल्प इतके परिपूर्ण वाटले की तो त्यानेच कोरलेल्या मूर्तीच्या प्रेमात पडला. 'गॅलेटीया' (Galatea) असे नाव दिलेल्या त्या शिल्परुपी स्त्री साठी पिग्मॅलियन विविध भेटवस्तू आणतो, तिच्यासाठी एक भव्य पलंग तयार करतो, तिची चुंबने घेतो.

पुढे 'ॲफ्रोडाइट' देवीच्या सणाच्या दिवशी पिग्मॅलियन देवीच्या वेदीवर भेटवस्तू अर्पण करून आपल्या हस्तिदंती मूर्तीचे जिवंत स्त्रीमध्ये रूपांतर करण्याची देवीकडे इच्छा व्यक्त करतो. जेव्हा तो घरी परतून त्याच्या हस्तिदंती मूर्तीचे चुंबन घेतो तेव्हा त्याच्या ओठांना तो स्पर्श उबदार वाटतो. तो पुन्हा मूर्तीचे चुंबन घेतो तेव्हा हस्तिदंती मूर्तीचे काठिण्य नाहीसे होऊन 'गॅलेटीया' चे जिवंत स्त्रीमध्ये रूपांतर होते. ॲफ्रोडाईट देवीच्या कृपेने इच्छापूर्ती झालेला पिग्मॅलियन गॅलेटीयाशी लग्न करतो. त्यांना एक मुलगी होते, जिच्या नावावरून सायप्रसमधील एका शहराला 'पॅफोस' (Paphos) हे नाव पडले.

तर काही इतिहास संशोधकांच्या मते सोळाव्या शतकात मैथुनासाठी वापरण्याजोग्या पहिल्या आदिम सेक्स डॉल्सच्या निर्मितीचे श्रेय फ्रेंच आणि स्पॅनिश दर्यावर्दींकडे जाते. समुद्रातील लांबलांबच्या प्रवासात येणारे एकाकीपणा घालवण्यासाठी कोणी सहचर असावा अशा भावनेतून खलाशांद्वारे जुने कपडे आणि चिंध्या वापरून निर्माण करण्यात आलेल्या ह्या आदिम लैंगिक बाहुल्यांना आजच्या आधुनिक सेक्स डॉल्सची पहिली पिढी म्हणता येईल.

पुढे रंगाकू (Rangaku) काळात डच लोकांनी अशा बाहुल्या जपानी लोकांना विकल्या होत्या आणि तेव्हापासून 'डच वाईव्ह्ज' (Dutch wives) हा शब्द अजूनही जपानमध्ये लैंगिक बाहुल्यांच्या संदर्भात वापरला जातो.

सतराव्या शतकात जपानी लोकांनी डच लोकांकडून 'डच वाईव्ह्ज' खरेदी केल्या असल्या तरी पुढे सुबक, सुंदर अशा लैंगिक बाहुल्या बनवण्यात त्यांनी चांगलेच प्राविण्य मिळवले.
सर्वाधिक खपाच्या तीन जपानी सेक्स डॉल्स अर्थात 'डच वाईव्ह्ज'...

सोळाव्या शतकात फ्रेंच आणि स्पॅनिश खलाशांनी कापड आणि चिंध्यांपासून बनवलेल्या ओबड-धोबड सेक्स डॉल्स ते आज एकविसाव्या शतकात अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या बळावर निर्माण होणाऱ्या 'सुपर रिअलिस्टिक' सेक्स डॉल्स असा झालेला लैंगिक बाहुल्यांचा प्रवासही मोठा रंजक आहे. मधल्या काळात अनेकांनी वेगवेगळे साहित्य वापरून अशा लैंगिक बाहुल्या बनवण्याचे आपापल्या परीने प्रयोग स्वान्तसुखाय केले, परंतु नव्याने उघडकीस आलेल्या माहितीनुसार १९४१ साली 'पहिल्यांदाच व्यावसायिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून' सेक्स डॉल्सची घाऊक प्रमाणावर निर्मिती करण्याचे श्रेय 'नाझी जर्मनी' कडे जाते.

सुप्रसिद्ध ऐतिहासिक लेखक 'ग्रीम डोनाल्ड' (Graeme Donald) ह्यांनी त्यांच्या 'मुसोलिनीज बार्बर: अँड अदर स्टोरीज ऑफ द अननोन प्लेअर्स हू मेड हिस्टरी हॅपन' (Mussolini's Barber: And Other Stories of the Unknown Players who Made History Happen) ह्या २०१० साली प्रकाशित झालेल्या पुस्तकासाठी अमेरिकन 'बार्बी डॉल' च्या इतिहासावर संशोधन करताना नाझी जर्मनीच्या 'सेक्स डॉल' प्रकल्पाचा शोध लावला.

'द सन' ह्या ब्रिटिश वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत ग्रीम डोनाल्ड सांगतात,
"मी बार्बी डॉलच्या इतिहासावर संशोधन करत असताना मला नाझी सेक्स डॉल्सचे संदर्भ मिळाले आणि मला असेही कळले की हिटलरने त्या बनवण्याचा आदेश दिला होता. फ्रान्स मध्ये शत्रुसैन्याच्या गोळ्यांनी जायबंदी होणाऱ्या / मृत्युमुखी पडणाऱ्यांपेक्षा जास्त संख्येने नाझी सैनिक 'सिफिलीस' (syphilis) ह्या 'लैंगिक संक्रमित रोगाने' (Sexually transmitted disease - STD) बाधित झाले होते / मृत्युमुखी पडले होते. फ्रान्स मधल्या जर्मन सैनिकांसाठी सिफिलीस ही एक भयंकर समस्या होती आणि हिटलरला त्याची जाणीव होती."

'ग्रीम डोनाल्ड' ह्यांना त्यांच्या संशोधनातून नाझी जर्मनीच्या 'सेक्स डॉल' प्रकल्पा विषयी मिळालेली माहिती...

१९४० साली एस. एस. चा एक प्रमुख नेता आणि 'ॲडॉल्फ हिटलर' चा अत्यंत विश्वासू सहकारी 'हेनरिक हिमलर' ह्याने हिटलरला पाठवलेल्या अहवालात फ्रान्स मध्ये मुसंडी मारलेल्या नाझी सैन्यातील मोठ्या प्रमाणावर सैनिक पॅरिस मधल्या वेश्यांशी असुरक्षित शारीरिक संबंध ठेवल्याने सिफिलीस ह्या रोगाने बाधित झाले असून त्यांना रोगग्रस्त वेश्यांशी शरीरसंबंध ठेवण्यापासून परावृत्त करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचे लिहिले होते. तसेच अशा उपाययोजनांचा एक भाग म्हणून आपल्या सैनिकांना लैंगिक सुख मिळवून देण्याजोग्या आकाराच्या (प्रत्यक्षापेक्षा थोड्या कमी उंचीच्या) 'लैंगिक बाहुल्या' तयार करून देण्यात याव्यात जेणेकरून ते रोगग्रस्त वेश्यांशी शरीरसंबंध ठेवण्यापासून परावृत्त होतील अशी कल्पनाही मांडली होती.

हिटलरने ह्या कल्पनेला मान्यता दिल्यानंतर अतिशय गोपनीयता पाळून 'ॲडम झिमरमन' (Adam Zimmerman) ह्यांच्या देखरेखीखाली 'जर्मन स्वच्छता संग्रहालयात' (German Hygiene Museum) नाझी जर्मनीच्या 'मोअर सिक्रेट दॅन टॉप सिक्रेट' अशा ह्या 'सेक्स डॉल' प्रकल्पाची सुरुवात झाली. हवा काढल्यावर घडी घालून सैनिकांच्या बॅकपॅकमध्ये बसतील अशा स्वरूपाच्या बाहुल्या तयार करण्यावर ह्या प्रकल्पाचा भर होता.
ह्या प्रकल्पात सहभागी असलेले मानसोपचारतज्ज्ञ 'रुडॉल्फ चार्जहेमर' (Rudolf Chargeheimer) ह्यांनी बाहुलीमध्ये स्पर्शसुखासाठी काही ठराविक अवयव (चेहरा, स्तन आणि नितंब) कृत्रिमरित्या मांसल असायला हवेत तसेच तिचे शरीर वास्तविक स्त्री सारखे लवचिक असावे असे निकष मांडले होते.
अनेक तज्ञ लोकांशी सल्लामसलत करून सर्व आवश्यक निकषांचे पालन करत हिमलरने हवा भरून फुगवता येण्यासारख्या 'लैंगिक बाहुल्यांच्या' निर्मितीची सुरुवात करण्याचा भाग म्हणून तत्कालीन सुप्रसिद्ध हंगेरियन अभिनेत्री 'केथे वॉन नागी' (Kathy von Nagy) हिला लैंगिक बाहुल्यांना तिचा चेहरा देण्याची विनंती केली, पण तिने हि विनंती अमान्य केल्याने शेवटी (वरील फोटोत डावीकडे दिसणाऱ्या) सोनेरी केसांच्या आणि निळ्या डोळ्यांच्या 'ब्लॉन्ड' सेक्स डॉल्सच्या निर्मितीला १९४१ साली सुरुवात झाली.
नाझी-व्याप्त जर्सी मधल्या सेंट हेलियर येथील जर्मन बरॅकमध्ये ह्या बाहुल्यांची चाचणी घेण्यात आली होती.

१९४२ साली अचानक हिमलरने आपला विचारबदलून हा प्रकल्प बंद करून टाकला. पुढे 'एल्ब नदीकाठचे फ्लॉरेन्स' म्हणून ओळखले जाणारे 'ड्रेस्डेन' हे जर्मनीतील महत्त्वाचे पुरातन शहर दोस्त राष्ट्रांनी केलेल्या पाशवी हवाई बॉम्बहल्ल्यात ८०% बेचिराख झाले. दुसऱ्या जागतिक महायुद्धातील काळ्या घटनांपैकी एक आणि 'द बॉम्बिंग ऑफ ड्रेस्डेन' (The bombing of Dresden) म्हणून कुप्रसिद्ध असलेल्या ह्या बॉम्बवर्षावात नाझी 'सेक्स डॉल्स' ची निर्मिती होत होती ती फॅक्टरी आणि तिच्याबरोबरच ह्या बाहुल्यांसंबंधीच्या सर्व नोंदीही बेचिराख झाल्या.

('ग्रीम डोनाल्ड' ह्यांनी वरील माहिती त्याकाळी 'रेशियल हायजीन अँड डेमोग्राफिक बायोलॉजी रिसर्च युनिट' अंतर्गत सदर लैंगिक बाहुलीची रचना करणाऱ्या टीममधील एक सदस्य असलेले जर्मन शिल्पकार 'आर्थर रिंक' ह्यांच्याकडून मिळवली आहे.)

अवांतरः नाझी सेक्स डॉल्स पासून प्रेरित होऊन जर्मनीत 'बिल्ड लिली' ह्या फॅशन डॉलची निर्मिती सुरु झाली आणि १२ ऑगस्ट १९५५ रोजी त्या विक्रीसाठी उपलब्ध झाल्या. अल्पावधीत अफाट लोकप्रियता लाभलेल्या ह्या 'बिल्ड लिली' बाहुल्यांवरून प्रेरित होऊन Mattel, Inc ह्या अमेरिकन खेळणी उत्पादक कंपनीने तयार केलेल्या 'बार्बी डॉल्स' ९ मार्च १९५९ रोजी अधिकृतपणे विक्रीसाठी बाजारात आल्या. पुढे Mattel, Inc ने 'बिल्ड लिली' चे हक्क विकत घेतल्यावर १९६४ पासून जर्मनीत 'बिल्ड लिली' बाहुल्यांचे उत्पादन बंद झाले तो पर्यंत सुमारे १,३०,००० 'बिल्ड लिली' बाहुल्यांची निर्मिती झाली होती.

असो, इतिहास फार झाला आता थोडे वर्तमानात येउयात...

वरती नमुन्यादाखल दिलेल्या ९ आधुनिक सेक्स डॉल्सच्या फोटोज मधून लैंगिक बाहुल्यांच्या निर्मितीत किती सफाई आली आहे हे जाणवल्याशिवाय राहणार नाही. तसेच सौंदर्यदृष्टी लाभलेल्या कुठल्याही कलासक्त, रसिक व्यक्तीला ह्या सुपर रिअलिस्टीक बाहुल्यांच्या सौन्दर्याची भुरळ न पडल्यास नवल! मी पण ह्याला अपवाद नाही, २०१७ साली दुबईमध्ये प्रत्यक्षात सेक्स डॉल्स बघितल्यावर मी पण हरखून गेलो होतो, जबरदस्त कलाकारीचा नमुना होत्या त्या बाहुल्या!

सेक्स टॉय म्हणून निर्माण करण्यात येणाऱ्या ह्या आधुनिक लैंगिक बाहुल्यांना त्यांची आपली नावानिशी ओळख, त्यांचे आपले एक व्यक्तिमत्व आणि त्यांची अशी काही खास वैशिष्ट्येही दिलेली असतात.

उदाहरणासाठी वरती दिलेल्या एका फोटोतील तीन जपानी सेक्स डॉल्सची ओळख, व्यक्तिमत्व आणि वैशिष्ट्ये पाहू...

बाहुली क्रमांक १.

नाव - एव्हलिन (Avalynn)
उंची - १५८ सेमी.
वजन - ३३ किलो.
फिगर : ३२-२०-३२
प्रकार - सुपर रिअलिस्टिक जपानी सेक्स डॉल.
मटेरियल - सिलिकॉनचे डोके आणि TPE पासून बनवलेले शरीर.

व्यक्तिमत्व - पारंपारिक जपानी पोशाख परिधान केलेली एव्हलिन ही सौंदर्यवती, गौरवशाली जपानी संस्कृतीचा प्रसार करण्याच्या मोहिमेवर आहे. एव्हलिन ही गोंडस, मोहक आणि जगातील सर्वात सेक्सी बाहुल्यांपैकी एक असून आपल्या जोडीदाराला संपूर्णपणे समाधानी करण्यास कटिबद्ध आहे.

वैशिष्ट्ये - सुंदर आणि सेक्सी फिगरची एव्हलिन आपल्या जोडीदाराला योनी, गुद आणि मुख अशा तीनही अवयवांद्वारे लैंगिक सुख देण्यास सक्षम आहे.

बाहुली क्रमांक २.

नाव - स्कार्लेट (Scarlette)
उंची - १६५ सेमी.
वजन - ३४ किलो.
फिगर : ३६-२०-३२
प्रकार - सुपर रिअलिस्टिक जपानी सेक्स डॉल.
मटेरियल - सिलिकॉनचे डोके आणि TPE पासून बनवलेले शरीर.

व्यक्तिमत्व - प्रत्येकाला आपल्या आयुष्यात एक सुंदर आणि आकर्षक सेक्रेटरी हवी असते, स्कार्लेट ती गरज पूर्ण करू शकते. आपल्या बॉसची सोय करण्यासाठी आणि त्याला हवे ते देऊन संतुष्ट करण्यासाठी ती प्रत्येक वेळी तत्पर असते. तिच्या बॉसला खोडकर वाटणारी स्कार्लेट लोकप्रिय पॉर्न सेलिब्रिटींच्या क्रमवारीत सर्वोच्च स्थानी आहे.

वैशिष्ट्ये - सुंदर आणि सेक्सी स्कार्लेट आपल्या जोडीदाराला योनी, गुद आणि मुख अशा तीनही अवयवांद्वारे लैंगिक सुख देण्यास सक्षम आहे.

बाहुली क्रमांक ३.

नाव - डोरोथी (Dorothy)
उंची - १५८ सेमी.
वजन - ३२ किलो.
फिगर : ३२-२३-३२
प्रकार - सुपर रिअलिस्टिक जपानी सेक्स डॉल.
मटेरियल - TPE

व्यक्तिमत्व - डोरोथी ही पॉर्न इंडस्ट्रीमध्ये सर्वाधिक मागणी असलेली आणि फॉलो केली जाणारी सेक्स आयकॉन आहे. जपानी मोलकरणीच्या भूमिकेत वावरणाऱ्या डोरोथीने अनेक पुरुषांची मने चोरली असून आता प्रत्येकालाच आपल्या घरी अशी सुंदर दासी हवीहवीशी वाटू लागली आहे.
डोरोथी उंच असून तिचा बांधा जबरदस्त आहे. आपली कामातुरता दाखवण्यासाठी ती सतत जीभ बाहेर काढते. BDSM ची आवड असलेलया डोरोथीचे व्यक्तिमत्त्व खूप आनंददायी असून ती कोणासोबतही राहण्यास तयार आहे.

वैशिष्ट्ये - BDSM साठी योग्य जोडीदार असलेली सुंदर आणि सेक्सी डोरोथी आपल्या जोडीदाराला योनी, गुद आणि मुख अशा तीनही अवयवांद्वारे लैंगिक सुख देण्यास सक्षम आहे.
---
वरील तीन प्रातिनिधिक उदाहरणांवरून एक गोष्ट लक्षात येते कि, आधुनिक सेक्स डॉल निर्मिती प्रक्रियेत दर्जेदार साहित्याचा वापर आणि उच्च तंत्रज्ञानाच्या जोडीने मानसशास्त्राचा शास्त्रशुद्ध अभ्यासही अंतर्भूत आहे. प्रत्येक व्यक्तीच्या आपल्या लैंगिक जोडीदाराकडून असलेल्या अपेक्षा, सौन्दर्य आणि मैथुन विषयक कल्पना आणि आवडी-निवडी वेगवेगळ्या असतात, काही जणांच्या बाबतीत त्या थोड्याश्या विकृतीकडे झुकणाऱ्याही असतात.

वापरकर्त्यांच्या अशा सर्व प्रकारच्या आवडी-निवडी, कल्पना आणि अपेक्षा विचारात घेऊन आधुनिक सेक्स डॉलची निर्मिती केली जाते. ज्यात 'वय', 'त्वचेचा, डोळ्यांचा आणि केसांचा रंग', 'चेहऱ्याची ठेवण, भुवया आणि ओठांचा आकार', 'केशरचना', 'स्तन, कंबर आणि नितंबांचा आकार', 'उंची आणि जाडी', 'जन्मखूण' अशा अनेक गोष्टींचा समावेश होतो.

'सेक्स डॉल्स'च्या कारखान्यातील निर्मिती प्रक्रियेतला एक विभाग...

प्रत्यक्ष जीवनातलया 'सेलिब्रेटी', 'पॉर्न स्टार्स', 'विविध कार्टून कॅरॅक्टर्स जसे कि जपानी हेंताई (Hentai), ऍनिमे (Anime) आणि मांगा (Manga) मधली पात्रे', आणि सीजीआय (CGI , Computer-Generated Imagery) चा वापर करून तयार केलेले काल्पनिक चेहरे आणि शरीरयष्टी ह्यांच्या आधारावर निर्मित सेक्स डॉल्स हजारोंच्या संख्येने उपलब्ध आहेत.
पण सध्याचा जमाना कस्टमायझेशनचा (Customization) आहे. ग्राहकाच्या मागणीबरहुकूम त्याच्या वैयक्तिक पसंतीची लैंगिक बाहुली बनवून देण्यातही काही 'सेक्स डॉल' उत्पादक आघाडीवर आहेत.

सेक्स डॉलच्या डोक्यासाठी साचा बनवण्यापूर्वी माती किंवा प्लास्टर पासून फोटोबरहुकूम साकारण्यात येत असलेले 'मॉडेल'...

'सेक्स डॉल्स' फक्त पुरुषांसाठीच नसतात त्या स्त्रियांसाठीही असतात...

सोळाव्या शतकात जुने कपडे आणि चिंध्यांपासून सुरु झालेली लैगिक बाहुल्यांची शरीर निर्मिती आता 'व्हिनाईल' (Vinyl), 'लॅटेक्स' (Latex), 'सिलिकॉन' (Silicone) आणि TPE म्हणून ओळखले जाणारे 'थर्मोप्लास्टिक इलॅस्टोमर' (Ehermoplastic Elastomer) अशा साहित्यावर येऊन स्थिरावली आहे.
स्वस्त आणि मध्यम किमतीच्या (भारतीय रुपयांत अंदाजे १०,०००/- ते १,००,०००/-) बाहुल्या व्हिनाईल आणि लॅटेक्स पासून, तर सुपर-रिअलिस्टिक, अल्ट्रा-रिअलिस्टिक प्रकारात मोडणाऱ्या उच्चं दर्जाच्या (भारतीय रुपयांत अंदाजे १,००,०००/- ते ३,००,०००/- किंवा त्यापेक्षा जास्त किमतीच्या) बाहुल्या सिलिकॉन आणि थर्मोप्लास्टिक इलॅस्टोमर पासून बनवल्या जातात. त्यांचे सांगाडे बनवण्यासाठी वापर केल्या गेलेल्या PVC, ॲल्युमिनिअम स्टील किंवा प्लॅटिनम अशा धातू आणि इतर साहित्यावर तसेच अन्य गोष्टी जसे कि विग साठी वापरलेला केसांचा प्रकार (कृत्रिम कि नैसर्गिक केस) वगैरे गोष्टींवर देखील त्यांच्या किमती अवलंबून असतात.

वैयक्तिक पसंतीनुसार वापरकर्ता आपल्या आवडी-निवडी प्रमाणे सेक्स डॉल उत्पादकाला त्याला हवे तसे बदल करण्यास सांगू शकतो.
उदा. 'डोळ्यांचा रंग', 'केसांचा प्रकार (नैसर्गिक/कृत्रिम)' 'त्वचेचा रंग', 'जन्मखूण (गालावर किंवा शरीराच्या कुठल्या भागावर तीळ / मस वगैरे)', 'गुप्तांगावरील केस' (ते हवेत कि नकोत/हवे असल्यास त्यांचे प्रमाण आणि लांबी वगैरे)','स्तन, कंबर आणि नितंबांचा आकार', 'उंची आणि जाडी' इत्यादी.
तयार पर्यायांमध्येही वरीलप्रमाणे कस्टमायझेशन करवून घेण्याची त्याला मोकळीक असते. शेकडोंच्या संख्येने निवडीसाठी उपलब्ध असलेल्या चेहऱ्यांपैकी त्याच्या आवडीप्रमाणे निवड करता येते तसेच केसांच्या 'विग' ची निवडही करता येते.

नमुन्यादाखल काही उपलब्ध चेहरे आणि विग्ज ...
चेहरे

विग्ज

बऱ्यापैकी जुना इतिहास असलेल्या सेक्स डॉलचा वापर जगभरात होत असला तरी त्या खरेदी करण्यामागे केवळ लैंगिक गरजाच कारणीभूत असतात असे नाही. पुरुष, स्त्रिया, समलिंगी व्यक्तींकडून लैंगिक सुखासाठी त्यांचा वापर होतो तर काहीजण निव्वळ शौक म्हणूनही त्या पदरी बाळगतात. काहीवेळा एखादा देश, प्रदेश किंवा ठिकाणाची बदललेली जनसांख्यिकी (Demography) देखील समाजातल्या मोठ्या वर्गाला त्यांच्या वापरासाठी प्रवृत्त करू शकते, ह्याचे ताजे उदाहरण म्हणजे चीन.

चीनमध्ये १९७९ ते २०१५ ह्या कालावधीत लोकसंख्या नियोजन उपक्रमा अंतर्गत राबवण्यात आलेल्या 'एक मूल धोरणामुळे' (One Child Policy) लोकसंख्या नियंत्रणात आली पण त्याचा एक दुष्परिणाम असा झाला कि देशाचे एकूण लिंग गुणोत्तर विस्कळीत झाले आणि स्त्रियांपेक्षा अंदाजे ३ ते ४ टक्के अधिक पुरुष अशी विषम सामाजिक परिस्थिती उद्भवली. स्त्री-पुरुषांच्या संख्येत वाढलेल्या अंतरामुळे जसजशी नव्या पिढीतली मुले वयात येऊ लागली तसतशी त्यांना लग्नासाठी उपलब्ध असलेल्या मुलींची संख्याही घटत गेली.
जगात सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या चीन मध्ये स्त्री-पुरुष लिंग गुणोत्तरात पडलेला ३ ते ४ टक्यांचा फरक काय परिस्थिती निर्माण करू शकतो ह्याची कल्पना केली तरी त्यातले गांभीर्य लक्षात येते. तर अशा विचित्र परिस्थितीत सापडलेल्या चिनी पुरुषांना लग्नासाठी स्त्रिया मिळत नसल्याने ते 'सेक्स डॉल' कडे आकर्षित झाले नसते तरच नवल! तसेही चीन मध्ये लैंगिक खेळणी वापरण्याचा प्राचीन इतिहास असल्याने कायदेशीर अडचणींचाही प्रश्न नव्हता. आज जगात सर्वात जास्त सेक्स डॉल्स चा वापर चीनमध्ये होतो तसेच त्यांच्या उत्पादनातही तो देश आघाडीवर आहे. त्यामुळे पूर्वी 'लव्ह डॉल' / 'रिअल डॉल' / 'डच वाईव्हज' किंवा नुसत्या 'सेक्स डॉल' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लैंगिक बाहुल्या आता 'चायनीज सेक्स डॉल' म्हणूनही ओळखल्या जातात.

काही कट्टरपंथी धर्मांमध्ये लैंगिक खेळण्यांद्वारे आनंद मिळवणे हे आजही पाप मानले जात असल्याने काही देशांमध्ये त्यांच्या निर्मिती, विक्री, प्रमोशन आणि आयातीवर कागदोपत्री बंदी आहे, तर अनेक समाज आता विकसित होत आहेत आणि लैंगिक खेळणी स्वीकारण्यास सुरुवात करत आहेत. भूतान आणि चीनसारख्या काही देशांमध्ये तर लैंगिक खेळण्यांना 'भाग्याकर्षक' (Good Luck Charms) मानले जाते.
अर्थात कागदोपत्री बंदी असली तरी मध्यपूर्वेतील एक-दोन आणि अपवादाने जगाच्या पाठीवरील अन्य काही देश वगळता सेक्स डॉल्सचा वापर बहुसंख्य देशांमध्ये होतो. ह्याला युएई सारखा देशही अपवाद नाही. तिथेही कागदोपत्री लैंगिक खेळण्यांवर बंदी असली तरी त्यांना प्रचंड मागणी असल्याने कायद्यातील पळवाटा शोधून तर काही प्रसंगी कायदे धाब्यावर बसवून त्यांचे प्रदर्शन आणि विक्री बिनबोभाट सुरु असते. मोठमोठया मॉल्स, सुपर/हायपर मार्केट्स मध्ये सेक्स डॉल्सच्या 'प्रमोशन' साठी स्त्रियांची बाह्य आणि अंतर्वस्त्रे विकणाऱ्या विभागात 'मॅनीकिन' (Mannequin) च्या ऐवजी ह्या सुंदर, सुबक सेक्स डॉल्सचा कल्पक वापर केला जातो (अर्थात सेक्स 'डॉल निर्मात्या कंपनीने 'फक्त प्रदर्शनासाठी ठेवण्यात येण्यासाठीच्या बाहुल्या' अशा खास उद्देशाने त्या तयार केल्या असल्याने कायद्याच्या कचाट्यात सापडायला नको म्हणून प्रत्यक्ष खरेदी केल्यावर मिळणाऱ्या 'खऱ्या' बाहुली प्रमाणे ह्या 'तोतया' बाहुल्यांना योनी, गुद्वार आणि स्तनाग्रे असे गुप्त अवयव नसतात).


तसं बघितलं तर 'सेक्स डॉल' हि खाजगी वापराची बाब आहे पण काही देशांमध्ये त्या भाडेतत्वावर सुद्धा दिल्या जातात.
ऑस्ट्रियामध्ये वेश्याव्यवसाय कायदेशीर असल्याने तिथे लैंगिक बाहुल्यांवर कोणतेही कायदेशीर निर्बंध नाहीत. तिथे १९८० पासून सेक्स डॉल्स वापरात असल्या तरी २०१७ साली एका कुंटणखान्याने ग्राहकांना सेक्स डॉल सेवा देऊ केल्यावर त्यांना प्रचंड लोकप्रियता लाभली. तेव्हापासून असंख्य कुंटणखाने ग्राहकांना सेक्स डॉल्स सेवा देऊ करण्याबरोबरच त्यांची विक्रीही करत आहेत.
व्हिएन्नामधील सर्वात मोठ्या कुंटणखान्यांपैकी एक कुंटणखाना ग्राहकांना 'थ्रीसम' (Threesome) चा अनुभव मिळवून देण्यासाठी खऱ्या वेश्येबरोबरच एका सेक्स डॉलचीही सेवा देत आहे.

सद्यस्थितीला जगभरात सेक्स डॉलच्या वापरकर्त्यांची संख्या बऱ्यापैकी मोठी असून त्यांचे ऑनलाईन फोरम, सोशल मीडिया ग्रुप्सही आहेत ज्यांवर ते आपापले अनुभव आणि अडचणी शेअर करतात, एकमेकांना मदत करतात. सेक्स डॉल संबंधीचे नवनवीन तंत्रज्ञान आणि माहितीची देवाणघेवाण करतात.

असो, लिहिण्यासारखे अजून बरेच काही आहे पण विस्तारभयास्तव आता लेख आवारता घेतो!
कुठलेही तंत्रज्ञान नवीन असताना महाग असते हे आधुनिक 'सेक्स डॉलच्या' बाबतीतही लागू पडते. भविष्यात त्यांच्या किमती आवाक्यात आल्यास पहिल्यांदा पाहताक्षणीच आवडलेला प्रत्यक्षाहूनी प्रतिमा उत्कट असा हा प्रकार 'एक मानव निर्मित सुंदर कलाकृती' किंवा 'सुंदरशी शोभेची वस्तू' म्हणून तरी पदरी बाळगायला मला नक्कीच आवडेल, तुम्हाला आवडेल का?

तळटीप : लेखात सुंदर सुंदर 'सेक्स डॉल्सचे' अनेक फोटोज दिले आहेत. पण त्यांच्या 'खऱ्या' सौन्दर्याचे फोटोज इथे देणे अशक्य असल्याने कलाप्रेमी/रसिक वाचकांच्या सोयीसाठी गुगल फोटोजवर एक 'खास' शेअर्ड अल्बम तयार केला आहे, ही त्याची लिंक,
https://photos.app.goo.gl/dLD9rH5UvnPP3Fby9

(लेखातले सर्व फोटोज जालावरून साभार.)

Group content visibility: 
Use group defaults

अभद्र मेले,
गलिच्छ गलिच्छ आहे हे सगळे.
अहो Admin, हे काय लिहू देताय तुम्ही मायबोलीवर?

बायकांकडे बघायचा हा एकच दृष्टीकोन असतो का पुरुषांचा?
ती बिचारी पोरगी कुकरात शिजून मेली, तरी याचे वासनेचे चाळे थांबेनात. सगळे पुरुष लाईन लाऊन प्रतिसाद देत आहेत इकडे.
वरवर सभ्य दिसणारी पण आतून सूचक भाषा वापरत चार चौघात काहीतरी कामुक बोलायच्या आपल्या फॅनटसी पूर्ण करायला
लाजमोडे नुसते.

म्हणजे जगभर विकत असतील या बाहुल्या, पण म्हणून अश्या कौटुंबिक साईट वर त्यांचे फोटो, त्या काय काय करू शकतात, पासून त्यांच्या किमतीपर्यंत दर पत्रक द्यायची काय गरज म्हणते मी.
उगाच पुरुषांची उत्सुकता चाळवायची, त्यात ते दिवटे आहेतच, घरच्या घरी अशी खेळणी कशी बनवावी सांगणारे,

अश्या धाग्यांवर बंदी घातली पाहिजे.

>>>अहो Admin, हे काय लिहू देताय तुम्ही मायबोलीवर?
पेशवाई १८१८ साली संपली हे कोणीतरी समजावा रे या आजींना.
लिव्ह इन मध्ये राहणारी पोरगी यांना बिचारी वाटते पण माहितीदायक लेख आणि प्रतिसाद यांना वासनेचे चाळे वाटतात.
धन्य आहेत.

उगाच पुरुषांची उत्सुकता चाळवायची, त्यात ते दिवटे आहेतच, घरच्या घरी अशी खेळणी कशी बनवावी सांगणारे,

असे काही नाही हो .
ह्या लेखाचा असा काही परिणाम झाला नाही.उस्तुक्ता कोणाची चाळवली नाही

ही अशी खेळणी असतात वगैरे सगळ्या जगाला माहिती आहे,
पण म्हणून त्यांचे फोटो, किमती, काय काय सुख देतात हे सगळे इकडे टाकले तर लोक चळणार नाहीत तर काय.

लोक बेडरूम मध्ये लोक काय करतात ते जगाला माहिती असते, म्हणून उद्या मायबोलीवर त्यातले तपशील लिहिले तर चालतील होय??

एकीकडे बायकांनी झाकपाक करायची कशी गरज आहे ते लिहायचे, आणि दुसरीकडे बायका नाही मिळत हो आजकाल , चला बाहुल्यांसोबत संग करतो म्हणायचे. त्यांच्या बद्दल उत्तेजक लिहायचे म्हणजे पुरुष माणसाने विचलित झालेच पाहिजे.

असेच उद्या कोणी खजुराहो बद्दल लिहितो म्हणून त्या कामशिल्पंचे सांगोपांग वर्णन करेल, परवा वत्सायनाच्या साहित्याचा अनुवाद म्हणून कामसूत्र मधील केवळ उत्तेजक भाग लिहिल, एकंदर पुरुषांचा अजेंडा एकच, कुठेही लाळघोटेपणा करत, जिभा बाहेर काढून फिरणे.

शी!!
मला तर या धाग्यावर येऊन लिहायला सुध्धा शिसारी वाटते. माझ्या साठी नवीन यादीत धागा दिसला तरी अमंगळ वाटते.
पुन्हा नाही यायची मी या धाग्यावर.

>>> ही अशी खेळणी असतात वगैरे सगळ्या जगाला माहिती आहे,
मग कशाला आला होतात इथे? धागा विटाळायला?
शीर्षक वाचुन कळले नव्हते का धागा कशावर आहे ते?

>>>पुन्हा नाही यायची मी या धाग्यावर.
येऊ पण नका

आकाशानंद, आयडी च मुळी विनोदनिर्मिती साठी झाली असावी. तुम्हाला अपर्णा रामतीर्थकर मॅडम आठवतात का? स्त्री मुक्ती चा रोष पत्करला होता. त्याच्याशी नामसाधर्म्य राखून आयडीची निर्मीती आहे.

लाळ घोटे ,जीभ काढून बाहेर फिरणारे,स्त्री ल फक्त भोग वस्तू समजणारे..
दिवटे.
किती विशेष ने.
हे चूक आहे .
हा येथील पुरुष आयडी च अपमान आहे.
सुशिक्षित, उच्च निती मत्ता असणारे, स्त्री च आदर करणारे, असे पुरुष आयडी इथे आहेत.
त्यांचा असा जाहीर अपमान योग्य नाही.

यात अपमानास्पद काय आहे ? हसत खेळत मान्य करण्याची गोष्ट आहे ही. खिलाडू वृत्ती दाखवा कि.
भिन्न लिंगी आकर्षण ही नैसर्गिक गोष्ट आहे. पण संधी मिळताच ताकाला जाऊन भांडे लपवल्यासारखे प्रतिसाद दिले की ते ओंगळ वाटतात इतकेच.
ज्या गावाला चाललोय त्या गावाच्याच रस्त्याने जायचं Lol
कळू न देता आडवळणाने जाऊ नये. Rofl

नोकरी करणाऱ्या, रात्री दमूनभागून घरी येणाऱ्या महिला, किंवा मध्यमवयीन महिला, यांच्यासाठी उपयुक्त प्रॉडक्ट दिसतो आहे. स्वयंपाकीण 'काकू', झाडपूस वाल्या 'मावशी', यांच्याबरोबरच या 'वहिनीं'ची नियुक्ती केल्यास रिलीफ मिळेल. रोजरोज डोकेदुखीचे नाटकही करावे लागणार नाही.

Pages