अंमली (पुनर्लेखन) - भाग २!

Submitted by अज्ञातवासी on 3 June, 2023 - 10:29

(अंमली या कादंबरीच्या पुनर्लेखनाचा हा प्रयत्न, यात मुख्य कथानक तेच असेल, पण बाकी सगळी नावे आणि प्रसंग बदलतील.
या कादंबरीचा भाग आठवड्यातून दोनदा, म्हणजे शनिवारी आणि बुधवारी रात्री ७.३० वाजता प्रसिद्ध होईल.)

जेजे कॉलेज ऑफ इंजिनिरिंग...
"ज्युनिअर."
"येस सिनियर."
"रेडी?"
"ऑलवेज."
"परफेक्ट ब्रो. लेट्स गो."
सी नंबरच्या हॉस्टेल मधून दोघेही बाहेर पडले.
लपत छपत त्यांनी एक गेटवरून उडी मारली.
"कोण आहे रे तिकडे?" गार्डने शिट्टी फुंकली.
दोघंही दबक्या पावलांनी मागच्या बाजूला गेले. तिथून पायऱ्यांनी तिसऱ्या मजल्यावर डाव्या बाजूला गेले.
Lab (प्रयोगशाळा)...मोठ्या अक्षरात लिहीलं होतं.
"जूनियर."
"येस सिनियर."
"चावी?"
"ही घ्या." त्याने चावी त्याच्या हातात दिली.
"इतकं डोकं कसं चालत रे तुझं? आणि ही परत ठेवशील कशी?"
"वेल, ही ड्यूप्लिकेट चावी आहे. जोपर्यंत दुबेकडे ओरिजिनल चावी आहे, तोपर्यंत तो ही चावी शोधणार नाही, आणि त्याच्या मुलाला एक सिगारेटचे पाकीट गिफ्ट केलं आहे, तर आता ही चावी परत ठेवण्याची जबाबदारी त्यांचीच."
"ज्युनियर, तू कधी सिगारेट ओढत नाहीस. तू कधी दारू घेत नाहीस, पण एवढं कसं माहिती रे तुला?"
"कारण अभ्यास. अभ्यास करावा लागतो सर. अभ्यास कधीही वाया जात नाही."
"ज्युनियर. शिकायला हवं तुझ्याकडून.
"ते नंतर शिकू. आज तुम्ही मला शिकवा."
"देन लेट्स स्टार्ट द मूवीमेकिंग..."
"ऑर कुकिंग?"
दोघेही हसू लागले.
त्यापैकी जो सिनियर होता तो होता लास्ट इयर, केमिकल इंजिनीरिंग... कायम टॉप टेनमध्ये. कॉलेज न करता...
मात्र केमिकल म्हणजे चित्रपटातले कॅरेक्टर असावेत, आणि रियाक्शन या चित्रपटातील प्लॉट असावा असं मानणारा.
...आणि ज्युनियर जो होता तो सेकंड लास्ट इयर. टॉपर. अभ्यासात प्रचंड डोकं चालणारा... आणि प्रत्येक गोष्ट अभ्यास म्हणूनच बघणारा.
"त्या ब्रोंकाईड च्या गोळ्या काढ." सिनियर.
ज्युनियरने एक पाकीट काढल.
"सगळ्या काढ रे."
त्याने एक पूर्ण बॉक्स रिकामं केलं. एक्सपायरी संपल्याने मेडिकल कॉलेजने पूर्ण बॉक्स फेकलं होतं.
"तर आपल्या आजच्या चित्रपटाची निरूपा राय आहे, ही एक गोळी. कळलं. या मातेच्याच उदरातून जन्म होईल, आपल्या बच्चनचा. ज्याचं नाव आहे सुडोएफेड्रीन!!!"
ज्युनियर हसू लागला.
"हसू नको, या सगळ्या गोळ्या कुटून काढ. आपल्या निरूपाला कष्ट सहन करण्याची शक्ती आहे. कर सुरू."
त्याने गोळ्या कुटायला सुरुवात केली.
"आता ही पावडर आहे ना, तिचं वजन कर."
"चारशे ग्रॅम सर!"
"ओके. निरूपाचे कष्ट संपले, आता तिचाही निरुपाय आहे. एंट्री होईल कादर खानची, जो बच्चनला निरुपापासून वेगळं करेल. त्याचं नाव आहे, क्लोरो बेंजेन. ते मोठं फ्लास्क घे, आणि त्यात अकराशेपंचवीस मिली क्लोरोबेंजेन ओत."
ज्युनियरने निमूट तसच केलं.
"आता हे फिल्टर करून, त्या लिक्वीड नायट्रोजनच्या बॉक्समध्ये ठेव.
आता बच्चनला मोठं व्हायचय, म्हणून थोडा वेळ तर द्यावा लागेल. आणि आपला कादर खानच त्याला बच्चन बनवेल. म्हणून आपण भेटू उद्या सकाळी, ठीक सातला."
ज्युनियर त्याच्याकडे बघतच राहिला.
तो मात्र रात्रभर इथेच थांबणार होता...
...बच्चन कसा मोठा होतो ते बघत...
सकाळी सिनियर उगवला.
"इथेच आहेस?"
हो रात्रभर बघत बसलो.
"सच्चा केमिकल इंजिनियर... काढ ते फ्लास्क."
त्याने फ्लास्क काढलं.
"आता ती पांढरी पावडर दिसतेय ना ती नीट गाळून घे. आपला बच्चन तयार..."
ज्युनियरने तसंच केलं.
"आपला बच्चन तयार आहे, पण एकदम शुद्ध, निर्मळ. त्याला आपल्याला या जालीम दुनियेची सत्यता दाखवावी लागेल. म्हणून ते रेड फॉस्फरस घे, आणि त्यासोबत हायड्रोक्लोरिक ऍसिड मिसळ. आता याला अर्धा तास ठेव."
ज्युनियर भक्तिभावाने त्याला फॉलो करत होता.
"आता पुन्हा यातून रेड पोस्फरस फिल्टर कर."
इकडे तसच होत होतं.
"आता मध्यांतरानंतरची अजून एक फायट. यात आता बेकिंग पावडर आणि पाणी मिसळ, म्हणजे बच्चनची सगळी ॲसीडीटी निघून जाईल."
सिनियर हसला...
"तुझ्याकडे आता काय आहे माहिती आहे?"
ज्युनियरने नकारार्थी मान हलवली.
"लिक्वीड मेथ..."
ज्युनियर आश्चर्याने त्याच्याकडे बघतच राहिला.
"अजून सांगतो, बच्चन शुद्ध राहून चालणार नाही... म्हणून आता यावर हायड्रोजन क्लोराईड गॅस बबल कर...
...आणि याला आता फिल्टर कर... थोडावेळ कोरडे करत ठेव. चल थोडावेळ बाहेर जाऊयात."
दोघेही बाहेर आले.
सिनियरने एक सिगरेट पेटवली.
"लक्षात घे, डोक्यात प्रक्रिया पक्की असेल ना, तर समोर व्हायला वेळ लागत नाही. सगळं जगच केमिकल आहे. तू, मी, समोरची भावना... सगळं..."
तो हसतच राहिला.
"चल आत जाऊयात."
दोघेजण आत आले.
समोर एका फडक्यावर पांढरेशुभ्र खडे पसरले होते...
"ज्युनियर, चाळीस ग्रॅम हंड्रेड परसेंट प्युर मेथ...
आपला बच्चन...
...आपला अँग्री यंग मॅन...."
*****
चाळीस ग्रॅम प्युर मेथ...
सिनियरने ते विकून दोन लाख कमावले.
त्याने मात्र त्यातला एक पैसाही घेतला नाही.
तो होताच तसा, तत्वांनी चालणारा.
कॉलेजमध्ये असताना प्रचंड स्वप्ने बघणारा.
त्याचं एक स्वप्न होतं, जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस व्हावं, आणि एक दिवस सगळी संपत्ती दान करून निघून जावं...
त्याचं स्वप्न होतं, जगातला सगळ्यात महत्वाचा व्यक्ती बनण्याचं.
त्याचं स्वप्न होतं, स्वतःच जग बनवण्याचं...
एकदा स्वप्ने बघायला लागल्यावर त्याला वास्तवाचं भान राहत नसे...
...त्यामुळे बऱ्याचदा त्याचा भ्रमनिरासही व्हायचा...
पण तरीही तो स्वप्नात रमायचाच...
*****
"राहुल."
"येस सर."
"होईल ना?"
"सर काय अवस्था केली आहे स्वतःची? अहो जिम मध्ये मी तुमचं उदाहरण द्यायचो. एवढा फिट माणूस, आणि आज ही अवस्था करून घेतली..."
"होईल ना?"
"होईल पण खूप वेळ लागेल."
"वेळ नाहीये राहुल माझ्याकडे, वेळ नाहीये."
"द्यावा लागेल."
"ठीक आहे. चल स्टार्ट करू..."
त्याने वॉर्म अप केलं...
"सर जम्पिंग जॅक करा. तीस..."
त्याने सुरुवात केली.
आणि अचानक त्याचा हृदयाचे ठोके वाढले...
...अक्षरशः त्याचे पाय दुखत होते... धडधड अतिशय जास्त झाली होती...
"...नाही होणार..." तो मटकन खाली बसला..
त्याच्या शरीरातून घामाच्या धारा वाहत होत्या...
...आणि त्या धाराबरोबर काही चुकार अश्रू देखील वाहून गेले...

क्रमशः

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाकी नंतर वाचेन.
सर्वात आधी वेलकम बॅक आणि पुढील लेखनास खुप साऱ्या शुभेच्छा