आज जागतिक चहा दिन म्हणून सोशल मिडिया वर बरेच पोस्ट येतायत. तस तर आजकाल रोज कुठले ना कुठले डेज होत असतात. पण चहा दिवस नक्कीच खास!
विशेष करून कॉफी प्रिय देशात काही वर्ष राहिल्यावर, मग तर चहाची आस वाढली.
इकडे यायच्या आधी एकच fancy ग्रीन टी माहीत होता.
आता jasmine tea, peach tea, chamomile tea झालाच तर matcha tea ह्यांनी पण संग्रहात भर घातली.
त्यात अजून भर पडली ती बोबा tea ने.
कधी मधी (नाईलाजास्तव) जवळ करावा लागणारा chai tea latte!
"नावात काय आहे?" असं म्हणतात, पण म्हणजे फक्त tea किंवा chai नावात लागलंय म्हणून काय चहा म्हणावं का त्यांना?
चहा म्हणजे कसा फक्कड आल्याचा, वाफाळता!
खरं सांगायचं तर चहा बनवत असताना उकळत्या आल्याचा, गवती चहाचा, मसाल्याचा, चहाचा सुगंध नाकात, मनात शिरला, आणि स्वयंपाकघरातून कपांची किणकिण ऐकली की अर्धी चहाची तल्लफ इकडेच भागायला लागते. मग मस्त biscuit वगैरे डूबवून चहाचा आस्वाद घ्यावा!
धुंद पावसाळी हवा, मित्र मैत्रिणींचा घोळका आणि कोपर्यावरच्या टपरीवरचा उकळ उकळ उकळवलेला कटिंग चाय!
नाईट आऊट मारताना डोळा लागू नये म्हणून थर्मास मध्ये भरून ठेवलेला चहा!
टळटळीत दुपारी घोट घोट घेतलेला चहा!
सकाळची गुलाबी थंडी, हवेतला गारठा, धुक्यात मिसळणारी फक्कड गुलाबी चहाची वाफ!अहाहा!
तर अशा ह्या चहा ची सर त्या मोंजिनी मधल्या four cups of tea ला कशी बर येणार?
समस्त चहा प्रेमींना शुभेच्छा!
Image by Sachin Mittal from Pixabay
पहाटे पहाटे कारने अष्ट्विनायक
पहाटे पहाटे कारने अष्ट्विनायक दर्शनाला निघालेलो लोणवळा खंडाळ्ञाला, धुक्यात , बाजूला डोंगरमाथा, दरी, चहाच्या टपरीवर आल्याचा घेतलेला चहा. निव्वळ स्वर्गसुख!!
छान धागा...
छान धागा...
अमृततुल्य चहा म्हटल्यावर तोंडाला पाणी सुटले. गरम चहा माझे सर्वात आवडते पेय. पहिला चहा चांगला मिळाला तर दिवसभर मन प्रसन्न रहाते.
लहान असतांना, स्वयंपाकघरांतला काम करण्याचा अनुभव म्हणजे दिवसभरांत घरी येणार्या पाहुणे मंडळींसाठी चहा बनविणे. तेव्हढीच आईला कामात मदत. कॉलेजमधे शिकतांना रोज चहा पिणे हा कार्यक्रम असायचा.
विद्यापीठातला पाणचट्ट चहा आजही आठवतो. सुरवातीला ५५ पैशाला अर्धा कप. बाहेर पडल्यावर किमान दोनवेळा अमृततुल्य चहा होणारच.
शिक्षणासाठी किंवा कामा निमीत्ताने मोठा प्रवास असेल तर ठराविक रेल्वे स्टेशनवर (दौंड, मनमाड... भोपाळ) चहा घेणे ठरलेले असायचे. मनमाड स्टेशनवरच्या चहाचे एक खास वैशिष्ट्य असे असायचे.... तो चहा कपड्यांवर सांडला तरी डाग पडायचा नाही. त्यानंतर खासगीकरण सुरु झाले आणि चहाला थोडी चव आली पण कप लहान असतो.
आजही कुणाकडे भेट द्यायला गेल्यावर चहा अपेक्षित आहे. खायला काही नाही दिले तरी चालेल पण चहाचे आदरतिथ्य करा. काही लोक चहा आणायला खूप वेळ लावतात आणि वर एकदम गार्रेगार चहा समोर आणतात हे न उलगडलेले कोडे आहे, अशावेळी मला मनापासून राग येतो. त्याकाळांत मायक्रोव्हेव नव्हते, आता लागलीच गरम करण्याची सोय आहे.
आम्ही खरोखरीच चहा घेतो हे दाखविण्यासाठी हा फोटो काढलेला आहे. चहा माझ्या लहान मुलीने बनविला आहे. पाणी उकळल्यावरच चहाची पावडर टाकायची, ठराविक वेळ लावून तेव्हढाच वेळ चहा पाण्यामधे उकळू द्यायचा. वेगळे गरम केलेले दूध टाकायचे, मग गरम चहा सर्वांना द्यायचा, जास्त केलेला चहा वेगळा बाजूला काढून ठेवायचा, थोड्यावेळाने संपणारच असतो.
खंडाळ्ञाला, धुक्यात , बाजूला
खंडाळ्ञाला, धुक्यात , बाजूला डोंगरमाथा, दरी, चहाच्या टपरीवर आल्याचा घेतलेला चहा. निव्वळ स्वर्गसुख!!>> +१
पहिला चहा चांगला मिळाला तर दिवसभर मन प्रसन्न रहाते.>>+१
उदय, चहाचा फोटो सुंदर!
मला लोकांकडे चहा घेण्यात थोडी रिस्क वाटते, काही जण अगदी पांचट तर काही दुधाचा, काही अति गोड तर काही कडू चहा बनवतात.
मी शक्यतो महीतीच्यांकडेच चहा घेणे पसंत करते.
एकदा एका जवळच्या नातेवैकांकडे
एकदा एका जवळच्या नातेवैकांकडे खूप वर्षांनी सकाळीच गेले होते. खाणे झाल्यावर त्यांनी चहा घेणार का विचारले.
माझा त्या बाई अति फिक्कट आणि बेचव चहा करतात हा अनुभव होता पण चहाची तर तल्लफ आलेली. शेवटी धीर करून म्हणाले, घोटभर द्या.
त्यांनी ताजा चहा फक्त आमच्या दोघींसाठीच केला.
बघते तर घोटभर म्हणजे अगदी एक घोट चहा दिलेला,
( जनरली घोटभर म्हणजे आपण अर्धा कप तरी देतो.)
इतक्या वर्षांत त्यांच्या पाक कौशल्यात बरीच सुधारणा झाली होती, त्यामुळे आल वगैरे घातलेला फर्मास चहा होता.
घोटभर चहा कुठच्या कुठे संपून गेला..
घोटभर चहाचा किस्सा.
उदय, समो प्रतिसादाबद्दल धनयवाद!
एकदा एका जवळच्या नातेवैकांकडे
.
एकदा एका जवळच्या नातेवैकांकडे
,
इथे स्टारबक्स्प्रेमी कोण आहेत
अवांतर - इथे स्टारबक्स्प्रेमी कोण आहेत. त्यांनी ही कॉफी ट्राय करा. अफलातून मस्त आहे. पण याच्यात दूध नाही तेव्हा ते अॅड करायला सांगा.
Cold brew topped with sweet cream foam and sugar-free vanilla syrup
मला मिडीअम ७ एक डॉलरपर्यंत आली. स्मॉल ५ का ६. पण फार मस्त लागते.
या रेकमंडेशनचा फोटोच काढलाय. हीच मागते आता. पण क्वचित कारण $७ कोण देणार सारखे?
सामो, इकडे अमृततुल्य म्हणजे
सामो, इकडे अमृततुल्य म्हणजे कॉफी म्हणुच शकतो..
कारण ती नाक्यानाक्यावर मिळते, अमृत प्यायल्या सारखी ( कर अमृत जरी आजपर्यंत कोणालाही प्यायला मिळाले नसले तरी एक आपली तशी समजूत म्हणून) ताजतवान करते म्हणून..
विशेषत: लाँग ड्राईव्ह करताना..
होय गं कोपर्याकोपर्यावर
होय गं कोपर्याकोपर्यावर अक्षरक्षः पावलापावलावर स्टार्बक्स आहेत पण लहान कॉफी शॉप्सचा धंदा बसवुन टाकलाय त्यांनी.
हो खरी गोष्ट आहे ..
हो खरी गोष्ट आहे ..
राहवलं नाही म्हणून सांगते.
राहवलं नाही म्हणून सांगते.
आमच्या जवळ एक छोटंसं कॉफी शॉप होत. कॉफी, हॉट चॉकलेट बरोबर चहाही मिळायचा. तसच त्यांचा कॅरट केक, बनाना Walnut केक आणि कुकीज खरंच खूप छान होत्या.
घराच्या खूप जवळ असल्याने वरती सांगितलेले केक्स मी इकडे पहिल्यांदा त्यांचेच खाल्ले, जे अतिशय आवडलेले. गर्दी पण असायची तिकडे.
पण अचानक एक दिवस ते बंद झालं...
हळू हळू बरीच छोटी दुकान बंद झाली.
नंतर कधीतरी कळलं, आधीच खूप जास्त भाडी होती. नंतर lease संपताना अजून खूप जास्त डिमांड करत सगळ्या छोट्या दुकानांना घालवलं.
आता त्या मॉल मध्ये स्टार बक्स आलय..
नंतर कळलं
कोव्हिडमुळेही लहान शॉप्सना
कोव्हिडमुळेही लहान शॉप्सना फटका बसला.
स्टार्बक्स वगैरे शार्क्स आहेत गं. ते लहान माशांना सहज गिळतात.
मी प्रयत्नपूर्वक लोकल शॉप्स्मध्ये जाते पण काहीजणांची मार्जिनच इतकी लो असते की तिथे जरा महागच मिळतं. अशा ठिकाणी मी एक रुपया टिप ठेवते अर्थात.
पाणी उकळल्यावरच चहाची पावडर
पाणी उकळल्यावरच चहाची पावडर टाकायची, ठराविक वेळ लावून तेव्हढाच वेळ चहा पाण्यामधे उकळू द्यायचा......... त्याच बरोबर दूध वेगळे गरम करायचे.तिसऱ्या भांड्यात चहा आणि गरम दूध घालून कपापासून वर फूटभर अंतरावरून चहा कपात घालायचा.चव मस्त लागते.
त्याच बरोबर दूध वेगळे गरम
त्याच बरोबर दूध वेगळे गरम करायचे.तिसऱ्या भांड्यात चहा आणि गरम दूध घालून कपापासून वर फूटभर अंतरावरून चहा कपात घालायचा.>>> हो त्याने छान फेस पण येत असेल.. सासरी अशी चहा करण्याची पद्धत होती..
पण मला स्वतःला दूध हवर घालून उकळवलेलाच चहा आवडतो..