नोट बन्दी पुन्हा

Submitted by हस्तर on 19 May, 2023 - 12:03

२००० च्या नोटा बन्द करन्यात आल्या आहेत
तसे पाह्ता ह्या चलनातुन गायब झाल्या होत्या , ये टी म. मशिन मधुन पण गायब झाल्या होत्याच
पण आता मागच्या चुका पुन्हा होतिल का ?

Group content visibility: 
Use group defaults

थापा पचातात म्हणून सत्ताधारी थापा मारतात.
अंध लोकांना काही ही पटते.
समाजाचा अभ्यास करून असे किती टक्के लोक अंध आहेत ज्यांना काही ही पटू शकते.
ह्याचा अभ्यास केला जातो आणि त्या नुसार च नेते थापा मारतात.

तुमच्या थापा मायबोलीवर पचत नाहीत म्हणजे सरासरी भारतीय लोकसंख्येपेक्षा मायबोलीवर हुशार लोक आहेत असं अनुमान काढता येईल का? याचा अभ्यास करा की तुम्ही.

नोटाबंदीमुळे काश्मीरमधली दगडफेक थांबली हे ऑर्ग्युमेंट वृत्तवाहिन्या /वृत्तपत्रांच्या फेस बुक पेजेसच्या कमेंटीतही अनेकदा दिसतं आहे.
आता चलन लागतच नाही, सगळं सगळं ऑनलाइन होतं हेही तिथे अनेक जण सांगताहेत.
पहिल्या नोटाबंदीने काळा पैसा बाहेर आला नव्हता हे विसरून त्या वेळचा काळा पैसा २००० च्या नोटांत बदलला , आता बाहेर येईल हेही.
एकंदर लोकांनी विचार करू नये, जे वरून येईल ते आपल्या डोक्यात भरवून घ्यावं हे मिशन यशस्वी होताना दिसतं आहे.

मला खात्री आहे RBI ३० सप्टेंबर पूर्वी जाहीर करणार की २००० च्या ९९.९९ टक्के नोटा परत आल्या आहेत तर सबब आता कोणीही नोटा बदलण्याचे भानगडीत पडू नये.

आता चलन लागतच नाही, सगळं सगळं ऑनलाइन होतं हेही तिथे अनेक जण सांगताहेत.
पहिल्या नोटाबंदीने काळा पैसा बाहेर आला नव्हता हे विसरून त्या वेळचा काळा पैसा २००० च्या नोटांत बदलला , आता बाहेर येईल हेही.>> हे
एक्सॅक्ट सेम नॅरेटिव्ह आज भाउ तोरसे कर व्हिडीओत ऐकले. तिथे कमेंट बंद ठेवल्या आहेत. हे सर्व व ह्यांचा ऐकणा रा वर्ग प्रिव्हि लेज्ड क्लास मध्ये मो डतो. ते बोलताना फार गफलती करतात. ज्यांनी खोके खोके घेतलेत त्यांना प्रॉब्लेम येइल सामान्य लोकांना येणार नाही. खोक्यांची जी कुजबुज चालू आहे त्यातील सत्य बाहेर येइल हे ही बोलुन गेले. पण ते बाहेर येणार नाही. आता त्या पैशांचे अ‍ॅसेट्स मध्ये रुपांतर झाले ही असेल किंवा चार महिन्यात होईल. अश्या झटके बाज निर्णयांचा तोटा गरीब व अन प्रिव्हिलेज ड लोकांना होतो. लायनीत उभे राहुन लोक्स मेलेले आहेत हे सोयिस्कर पणे विसरले जाते. हातावर पोट असलेले मजूर व कामगार सर्वात जास्त सफर झाले.

पण तुम्ही म्हणता तसे वरुन आलेली चकाचक प्रति मा आहे तशी १००% स्वीकारणे हे सोपे आहे. प्रश्न विचारायचे कश्याला भेळवाला सुद्धा जी पे करतो तर.

<< ज्यांनी खोके खोके घेतलेत त्यांना प्रॉब्लेम येइल सामान्य लोकांना येणार नाही. खोक्यांची जी कुजबुज चालू आहे त्यातील सत्य बाहेर येइल हे ही बोलुन गेले. पण ते बाहेर येणार नाही. आता त्या पैशांचे अ‍ॅसेट्स मध्ये रुपांतर झाले ही असेल किंवा चार महिन्यात होईल. अश्या झटके बाज निर्णयांचा तोटा गरीब व अन प्रिव्हिलेज ड लोकांना होतो. लायनीत उभे राहुन लोक्स मेलेले आहेत हे सोयिस्कर पणे विसरले जाते. हातावर पोट असलेले मजूर व कामगार सर्वात जास्त सफर झाले. >>

----- एक वेळा " आपले " म्हटल्यावर भाजपाने कधी कुणाला वार्‍यावर सोडले आहे का? स्वकियांचा (राणे, बिसवा सरमा, राणा... ) भ्रष्टाचार हा भ्रष्टाचार वाटत नाही.

२०१६ प्रमाणेच या वेळी पण स्वकियांना अगोदर माहिती पुरविण्याचे कार्य पार पडले नसेल असे खात्रीने म्हणता येणार नाही.

आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज मुंबईत दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पहिल्यांदाच विधान केले आणि देशातील सर्वात मोठी नोट चलनातून वगळण्याच्या निर्णयामागील कारणांची सविस्तर माहिती दिली. याशिवाय आरबीआय भविष्यात १००० रुपयांची नोट आणणार आहे का? याचे उत्तर आरबीआय गव्हर्नर यांनी दिले. शक्तिकांत दास यांनी सांगितले की, सध्या अशी कोणतीही योजना नाही.

नोटा बदलण्याची घाई करू नका
३० सप्टेंबरनंतरही २००० रुपयांच्या नोटा कायदेशीर
दोन हजार रुपयांची नोट बदलण्यासाठी चार महिन्यांची मुदत
क्लीन नोट पॉलिसीअंतर्गत २,००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला.
इतर मूल्यांच्या पुरेशा नोटा बाजारात आहेत
२००० रुपयांची नोट कायदेशीर निविदा राहील

मला यातील ठळक मुद्दयांचा अर्थच लागत नाही. अरे मग ३० सप्टेंबर २०२३ ची मुदत कशाकरता आहे? फक्त नोट बदलून घेण्याकरता?

अठरा भार वनस्पतींची लेखणी
समुद्र भरला मषी करुनी
नोटबंदीचे फायदे लिहिता धरणी
तरी लिहिले न जाती.

ही नोटबंदीची न्यूज आली त्या दिवशी एक रील पाहिलेली, नाव व आकडे नीट लक्षात नाहीये पण रीलमधला माणूस बोलत होता की मोदीवर आरोप करण्याआधी हे लक्षात घ्या की 2016 ला जेव्हा नोटाबंदी केल्या होत्या त्याच्या दोन दिवसांनी पाकिस्तानात एका इसमाने (त्याने नाव सांगितले पण माझ्या लक्षात नाही) आत्महत्या केली कारण त्याच्याजवळ वीस हजार करोड काळा पैसा होता. तसेच त्या आधीही पाकिस्तानात 30000 करोड 40 हजार करोड (असे मोठमोठे आकडे त्याने सांगितलेले) काळा पैसा पाकिस्तानात जात होता. मोदी ने नोटाबंदी केली त्यामुळे काळा पैसा त्यांना नष्ट करावा लागला आणि म्हणून म्हणून आज सात-आठ वर्षानंतर पाकिस्तानची भिकारी अवस्था झाली आहे.

निल्सन यांनी ऐकलेली माहिती सरकार किंवा रिझर्व बँक सांगेल का?
भारतीय चलन पाकिस्तानात चालेले का?

२०१६ मध्ये रद्द केलेल्या नोटांचे एकूण मूल्य -१५.४१ लाख करोड रुपये.
यातील परत आलेल्या नोटांचे मूल्य १५.३१ लाख करोड (हे दोन्ही आकडे रिझर्व बँकेने सांगितलेले आहेत)
राहिले ०.१० लाख करोड = दहा हजार करोड. आता पाकिस्तानात ३० ते ४० हजार करोड भारतीय चलनात असतील तर त्यातलेही पैसे परत आले असा अर्थ काढावा का?

दुसर्‍या नोटाबंदीच्या घोषणेनंतर बँकांत गर्दी झाली आहे. पेट्रोल पंप, किराणा दुकाने इ. ठिकाणी लोक २००० ची नोट देत आहेत. मग त्यांना उरलेले पैसे देताना मारामार. थेट २०१६ नोव्हेंबरचं दृश्य.
बातमी गुजरातची आहे.

उरलेले ते दहा हजार कोटी अदानी समूहातील मोदींची गुंतवणूक असेल त्यामुळे ते परत आले नाही .
तरी अजून दहा हजार शोधले पाहिजेत , रागांची वणी सत्य ठरविण्यासाठी !
त्यांनी वीस हजार कोटींचा आरोप केलाय ना ?

<< Complete nonsense >>

-------- अशा बातम्यांवरही विश्वास ठेवणारे असतील तर भाजपाचे खरोखरच अच्छे दिन आलेले आहेत. पुढची किमान ४० वर्षे सत्ते वर रहातील.

अशा बातम्यांवरही विश्वास ठेवणारे असतील तर भाजपाचे खरोखरच अच्छे दिन आलेले आहेत. पुढची किमान ४० वर्षे सत्ते वर रहातील. >>> हो ना. तिथे कमेंट मध्ये बहुतेक लोक मोदीवर स्तुतिसुमने उधळत होते. एखादा विरुद्ध लिहत होता त्याला भक्त लोक शिव्या घालत होते.
माझी मजल कुणाच्या सत्तेत सिलेंडर, भाजी, पेट्रोल, सोना यांचे भाव किती वाढले इतपर्यंत. इथे माबोवर दोन्ही बाजूने चर्चा होईल म्हणून इथे त्याबद्दल लिहले. पुन्हा फिरुन ती रील माझ्याकडे आली तर त्याला रीप्लाय देता आला पाहिजे. Wink

अरे बाबा, तुमच्यापैकी कोणीच किराणा दुकानदाराकडे जात नाही का? त्याच्याशी एखाद मिनिट खुशाली विचारण्यासाठी उभे राहात नाही का? त्यांच्यासारख्या लोकांनी दोन हजारांच्या नोटा कधीच्याच dispose off केल्या आहेत. ती नोट मागे घेणार ही माहिती बाजाराला कधीपासून आहे. आणि कोणी काळा बिळा पैसा साठवत नाहीय ह्या नोटांमध्ये. In fact मी स्वतः २०१७ मध्ये ही माहिती ऐकली होती. इस सरकार पर भरोसा नहीं, कभी भी कुछ भी कर देंगे. बडे लोग नोटों में काला पैसा रखते ही नहीं। बूढ़े का भेजा खिसक गया है वगैरे. पण असे उपजत शहाणपण वाले लोक फार बोलत नाहीत आणि संख्येनेही कमी असतात. आपण बरे की आपले काम बरे असे असतात.

पूर्वीच्या हिंदी सिनेमात दाखवत तसे किंवा माला सिन्हाच्या बाथरूममध्ये मिळाले त्याप्रमाणे नोटांच्या थप्प्या काळाबाजार करणारे साठवून ठेवतात असा विचार करणारांचा भेजा नक्कीच खिसकलेला असू शकतो

नोट बंदी जाहीर करण्यात नक्की काय फायदा आहे ?
वर वर तर हे फायदे दिसतात.
१) ज्याच्या कडे कॅश स्वरूपात २००० रुपयाची चलनी not आहे.
मग गैर मार्गाने आलेली असेल किंवा कायदेशीर मार्गाने.
त्याला ती बँकेत च जमा करावी लागेल.
.
२) बँकेत गैर मार्गाने आलेले पैसे ठेवणे महागात पडते.
एक तर टॅक्स लागतो आणि दुसरे income चा source विचारला जातो.
म्हणून लोक कॅश मध्ये घरात लपवून ठेवतात.
३) त्या मुळे पूर्व सूचना असू किंवा नसू .
बँकेत जमा करणे हाच एकमेव पर्याय असतो.
मग तोटे काय असतात.
१) ब्लॅक चे पैसे अनेक उद्योगात लागलेले असतात.
बांधकाम उद्योग पासून cinema, इत्यादी इत्यादी
त्यांचेकडे येणार पैशाचा ओघ आटतो. आणि ते उद्योग बुडतात.

पूर्वीच्या हिंदी सिनेमात दाखवत तसे किंवा माला सिन्हाच्या बाथरूममध्ये मिळाले त्याप्रमाणे नोटांच्या थप्प्या काळाबाजार करणारे साठवून ठेवतात असा विचार करणारांचा भेजा नक्कीच खिसकलेला असू शकतो
>>
https://www.indianarrative.com/economy-news/perfume-manufacturer-arreste...

नोट बदलण्यासाठी फक्त "ऑफिशियली" १० नोटा प्रति व्यक्ति प्रतिदिन लिमिट आहे.
याला कोणताही कागद्/चलन भरायची गरज नाहिये.

अर्थात, खोके, पेट्या, कपाटे ब्यांक म्यानेजरच्या चिरिमिरीवर घरपोच बदलून मिळतील. कुठून आले हे सांगायची गरज नाही. बेसिक सिंपल आहे.

सामान्य पब्लिकला चू.. बनवण्यासाठी काळा पैसा वगैरे थोतांडं ही भक्तांडी पसरवत असतात. पब्लिकलाही ते पटते.

*
सर्व व्यवहार जीपे ने होतात वाल्या मेट्रोसिटी भगतीण्/भगतांसाठी. : जरा उर्वरित महाराष्ट्रात या. रस्त्यावर तुमच्या फोनची इंटरनेट मिळेल याची खात्री नसते. नेटपॅक साठी पैसे असतील याचीही खात्री नसते. खूप लोक फीचर फोन वापरतात. सगळ्यात जास्त व्यवहार रोकडा होतात. पण ते तुम्हाला सांगून उपयोग नाही. तुम्ही फॉरेन एक्स्पेंडीचरवर २०% टीसीएस बद्दल विचार करा. ७ लाख लिमिट ही धूळफेक आहे, बँकेला लिमिट कळण्याची काहीच सुविधा नाही. तुमच्या खर्चावर २०% लागणारच आहेत.

नक्की नोट बंदी च फायदा मित्र ,आणि bjp सरकार ह्यांना कसा मिळतो हे लोकांना सांगणे गरजेचे आहे.
सामान्य लोकांना सांगता येणार नाही
कारण ते कारण किचकट असणार.

रघुराम न सारख्या हुशार व्यक्ती नी ते सांगितले पाहिजे.
नोट बंदी मुळे सामान्य लोकांचे काय नुकसान होते?
हे सांगा .
असा प्रश्न विचारल्यावर काय सांगणार
दोन हजाराची नोट बंद केल्या मुळे माझे तरी काही नुकसान नाही.
कारण २, हजाराची एक पण माझ्या कडे नाही
सरकार नी ती अगोदर च बाजारातून काढून घेतली आहे.
त्या मुळे सामान्य लोकांकडे ती नोट बिलकुल नसणार

>>>>>>नक्की नोट बंदी च फायदा मित्र ,आणि bjp सरकार ह्यांना कसा मिळतो हे लोकांना सांगणे गरजेचे आहे.
काळा पैसा बाहेर काढायला नक्की आहे आमचे काही गडगंज, गुज्जू बिझनेस्वाल, मित्रमैत्रिण फेसबुक वरती 'नोटबंदी' मुळे मोदींच्या नावाने, जो विलाप आणि थयथयाट करतात तो बघता काहीतरी तथ्य आहे.

२०२४ च्या फायनल सोल्यूशनसाठी काँग्रेसची इथली राखीव टीमही पूर्ण शक्तीनिशी उतरलेली दिसते! जितनी आबादी उतना हक! शेवटचा उपाय!
सर्क्युलेशनमधून जवळपास बाद असंलेली नोट बंद करणार तर इतका थयथयाट का ते कळलं नाही. यावेळी तर भक्त पण मास्टरस्ट्रोक म्हणत नाहीयेत.
असो. यावेळी या गटारात उतरण्याची इच्छा नाही. एकदाच काय ते होऊन जाऊ दे छावण्या वगैरे!

आता ज्यांना खोके दिले त्यांच्याकडून टॅक्स वसूल केला जाणार तर! किंवा आपल्याकडच्या गुलाबी नोटा खपवायला त्याच नोटांनी खोके भरले गेले असतील तर? Wink

या हिंदुत्ववाद्यांनी देशभर घाण करून देशाचं गटार करून ठेवलं आहे, आता विदेशातही तेच करताहेत. ती घाण साफ करण्यासाठी अधिका धिक संख्येने लोकांना गटारात उतरावं लागेल आणि तसे ते उतरताहेत.

आपण घाण करायची आणि दुसर्‍याला स्वच्छ करायला लावायची आणि वर त्यालाच तुच्छ लेखायचं हेही हिंदुत्ववाद्यांचं व्यवच्छेदक लक्षण.

Pages