सीबीएससी चे जाणवलेले फायदे

Submitted by हेमंतसुरेशवाघे on 16 May, 2023 - 01:42

हा हा माझ्या मागील सीबीएससीच्या लेखाचा उपसंहार आहे - भाग 2

जुन्या लेखाची लिंक

https://www.maayboli.com/node/78241

मागे मी लिहिले होते की सीबीएससी चे नक्कीच काही फायदे आहेत. आता कन्या सीबीएससी झाल्यामुळे - आणि ती फारसा अभ्यास करीत नसल्याने मला त्यातील काही फायदे अधिकचे दिसले . यात कुठल्याही बोर्डाची भलावण वगैरे नाही पण फायदे असतील तर ते कळणे हे आहे आणि त्याचबरोबर ज्यांची मुले जाणार आहेत किंवा ते विचार करतात त्यांना काही माहिती मिळावी आणि योग्य निर्णय घेता यावा ही इच्छा.

पुढील १०-१२ वर्षात अर्थात यात काही गोष्टी बदलतील

तर जेव्हा कन्या सीबीएससी झाली म्हणजे शेवटची परीक्षा दिली आणि रिझल्ट लागला तेव्हा काही फायदे लक्षात आले

शेवटच्या परीक्षेला फक्त दोन भाषा आणि त्यात हि हिंदी मराठी नाही!

सहावी पासुंन मुलीला मराठी सोडता , आणि आठवीपासून मराठी . सीबीसीची फायनल परीक्षा ही फक्त दोन भाषांची होती - इंग्लिश प्रथम भाषा आहे आणि मुलीने फ्रेंच घेतले होते.
तिला सहावी पासून फ्रेंच होते त्यावेळी तीन भाषा होत्या - मराठीच्या ऐवजी फ्रेंच घेतले होते . आठवी नंतर हिंदी किंवा फ्रेंच हा पर्याय . एक मोठा फायदा झाला की मराठी आणि हिंदी सारख्या निरुपयोगी भाषा सोडून थोडीफार उपयोगी होईल खास करून उच्च / विदेशी शिक्षणासाठी वगैरे अशी फ्रेंच भाषा घेऊन परीक्षा देता आली
( आताच्या बॅच ला हि सुविधा नाही असे ऐकले आहे - खात्री करून घ्यावी )

फक्त ५ विषय -

त्याच्याच बरोबर शेवटच्या वेळी सीबीएससी ला फक्त पाच विषय असतात मुख्य भाषा इंग्लिश दुसरी भाषा एक गणिताचा पेपर एकच शास्त्रांचा पेपर आणि एकच समाजशास्त्र इतिहास भूगोल नागरिकशास्त्र अर्थशास्त्र यांचा पेपर आणि आपण एसएससी महाराष्ट्र बोर्ड पाहिले तर समाजशास्त्र शास्त्र आणि गणित यांचे दोन पेपर असतात त्यामुळे हा ॲडिशनल वैताग आहे

दोन पेपर मध्ये व्यवस्थित सुट्टी

परीक्षा झाली त्यावेळेला दोन पेपर मध्ये व्यवस्थित गॅप होता ते काही वेळेला पाच आणि काही वेळात आठवण दिवसांचा गॅप मिळाला त्यामुळे झाले काही की तयारी करायला सर्वांना व्यवस्थित वेळ मिळाला इम्पॅक्ट जर तुमची तयारी झाली नसेल एक थोडेसे मार्क पाहिजे असतील तर या दिवसात सुद्धा तयारी करता आली असती एस एस सी चा टाईम टेबल पाहिलं तर त्यामध्ये फार कमी गॅप होती पेपर जास्त आणि गॅप कमी हा वैताग होता.
सीबीएससी ला किमान ४ ते कमाल १० दिवसांची गॅप होती

अंतर्गत २० मार्क

एसएससी ला नक्की माहित नाही किंवा इतर बोर्डांचे पण पण सीबीएससी मध्ये 80 मार्काचा पेपर असतो 20 मार्क शाळा देते. तुम्ही चांगले वर्तन ठेवले, अभ्यास केला, थोडाफार वह्या पूर्ण ठेवल्या फार शाळेत उचापती केल्या नाहीत - तर विसात वीस मार्क दिले जातात. अगदी १५ दिले तरी बाकीच्या पेपर मध्ये पास व्हायचे असेल तर 80 मध्ये २० मिळवण्याची जबाबदारी राहते त्यामुळे तिकडे पण फायदा आहेत
बऱ्याच मुलांना वीस मार्क दिले जातात त्यामुळे त्यांना साधारण मार्क काढायचे आहेत त्यांना फार लोड येत नाही

सोपे गणिताचा पेपर

हे परत एच एस सी ला आहे का माहित नाही पण अनेक विद्यार्थ्यांना गणित कठीण जाते आणि सायन्स आर्किटेक्चर वगैरे जायचे नसेल तर गणिताचा उपयोग नसतो. सीबीएससी एक तुलनेने सोपे असलेला लोअर मॅथ्स चा पर्याय देते .
कन्येचा कला शास्त्र , इंजिनिअरिंग कडे नाही आणि तिला गणित कठीण जाते हे हे कळले तेव्हा आम्ही बेसिक मॅथ्स घ्यायचे ठरवले तिच्या शाळेत तरी याचा वेगळा वर्ग नव्हता किंवा वेगळी ट्युशन नव्हती तसेच क्लासही नॉर्मल मॅथ्स चा होत होता तर त्यामुळे अभ्यास नॉर्मल मॅथ्स आणि पेपर लोवर मॅथ्सचा याचा तिला पेपर सोपे जाण्यात फायदा झाला.

झटपट रिझल्ट आणि त्याची फार हवा नाही

यावर्षी रिझल्ट १२ मे ला लागला आणि आम्हाला तरी फार हवा नव्हती. काही दिवस आधी काही साईट वर माहिती येत होती पण त्या अफवा वाटल्या .
१२ मे ला सीबीएससी च्या बारावी चा रिझल्ट आला आणि ऑनलाईन झटपट एक दोन तासात दहावीचा आला . एसएससी सारखे तारखेचा अंदाज , त्याला बराच वेळ , काही वेळा थोडा पुढे ढकलणे असे झाले नाही.

आयसीएसई हा बहुदा अधिक लोकप्रिय बोर्ड आहे - त्याचे फायदे कोणी लिहिले तर बरे होईल
अतिशय थोडे जे निकाल ऐकले त्यात आयसीएसई ला अधिक मार्क मिळाले असे वाटले

जाता जाता

नवी मुंबईत फार आर्ट्स ची ची चांगली कॉलेज नसल्याने आम्ही एक सीबीएससी शाळेला संलग्न असलेल्या सीबीएससी आर्ट्स कॉलेज मध्ये मुलीला टाकले .ह्यांची बारावी सीबीएससी बोर्ड ची. फार पर्याय नव्हते

मला आयसीएसई / सीबीएससी च्या अकरावी बारावी बद्दल फार माहीत नव्हते
तिकडे पण दिसले कि सीबीएससी अकरावी बारावी ला महाराष्ट्र बोर्ड विषय कमी आहेत - महाराष्ट्र बोर्ड ला ७ विषय त्यात २ भाषा तर सीबीएससी ला ५ विषय त्यात एकच इंग्लिश भाषा

कोणाचे कोणी जर सीबीएससी मधून आर्ट्स केले असेल तर ते किती सोपे / कठीण आहे - त्यात फार लोड न घेता भरपूर मार्क मिळतात का / कसे मिळवावे याच्या माहितीच्या प्रतीक्षेत आहे

अजून एक - आय जी सी एस इ या इंटरनॅशल बोर्ड चा एक प्रॉब्लेम कळलं आहे - त्यांना गणितासाठी scintific calculator चालतो - आणि अकरावी बारावी लोकल बोर्ड, इंजिनिअरिंग - आर्किटेक्चर - इतर प्रवेश परीक्षेत चालत नसल्याने त्याचा त्रास होतो . काही जणांना यासाठी क्लास लावावे लागले आहेत

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

ड्युओलिंगो वर शिका. खूप चांगलं शिकवतात ते.आमच्या घरात मी।सोडून 2 जण बऱ्यापैकी डेली युज ची शिकले आहेत गेल्या दीड वर्षात.

ऋन्मेष यांनी दिलेला सल्ला हल्ली सगळेच ऐकतात असे नाही. (मॉरल ऑफ द स्टोरी फार लोड नाही घ्यायचा बोर्डाचा. सरळ सोयीची आणि घराजवळची चांगली शाळा निवडायची. )

>> मराठी आणि हिंदी सारख्या निरुपयोगी भाषा सोडून थोडीफार उपयोगी होईल खास करून उच्च / विदेशी शिक्षणासाठी वगैरे अशी फ्रेंच भाषा घेऊन परीक्षा देता आली.
सीबीएसई बोर्डाचा हा एक महत्त्वाचा फायदा आहे हे लेखकाचे वैयक्तिक मत नसून त्याला सार्वत्रिक मान्यता मिळालेली आहे याची मला कल्पना होती. पण हा विषय जीव देण्या/ घेण्यापर्यंत जाऊन पोहोचला आहे असे मात्र अजिबात वाटले नव्हते.

१९ जून २०२४ लोकसत्तातील बातमी:

लातूर : परिस्थिती बेताची असल्याने सीबीएसई शाळेत आपल्या मुलीला प्रवेश देता येणे शक्य नसल्याने आईने मुलीसह विहिरीत उडी टाकून आत्महत्या केली. ही घटना लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील माळेगाव कल्याणी या गावात घडली आहे. भाग्यश्री व्यंकट हालसे (वय २६) व समीक्षा व्यंकट हालसे (वय ५ रा. माळेगाव ता. निलंगा) अशी दोघींची नावे आहेत.
व्यंकट हातसे यांच्या कुटुंबात पत्नी, मुलगा सार्थक व मुलगी समीक्षा असे सदस्य. त्यांना दीड एकर शेती आहे. मात्र शेती आई-वडिलांकडे आहे. शेळ्या राखून कुटुंबाची उपजीविका करीत असल्याने हातसे यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती नाजूक होती. हालसे यांच्या पत्नीची आपल्या मुलांना सीबीएसई शाळेत प्रवेश द्यावा, अशी इच्छा होती. मात्र, पती काही न बोलता, बघूया असे सांगत होता. आपल्या मुलांना सीबीएसई शाळेत प्रवेश मिळणे शक्य नसल्याने मंगळवारी भाग्यश्री हालसे हिने समीक्षासह एका विहिरीत उडी टाकली. मुलगा समर्थ हा खेळत होता. आईने त्याला बोलावूनही तो गेला नाही म्हणून तो वाचला.

ज्यांची सतत ट्रान्स्फर होणारी नोकरी असेल अशांसाठी हे बोर्ड योग्य आहे. असा दावा सीबीएसई च्या अधिकृत वेबसाईटवर देखील केला गेला आहे.

CBSE provides the best options for parents with transferable jobs/shifting from one place to another.

पूर्वी मुलांच्या (आणि त्यातही विशेषतः मुलींच्या) शिक्षणाकडे अजिबात लक्ष न देणारा ग्रामीण महाराष्ट्र आता बराच बदललेला दिसत आहे. पण मराठवाड्यातील शेतकर्‍यांच्या आत्महत्या हा विषय आधीच हाताबाहेर गेला आहे. त्याच्या गुंत्यात आता "सीबीएसई बोर्ड" हा एक नवीन विषय जोडला जाऊ नये !

सध्या rte पॉलिसी ने पण फार घोळ घातला आहे.rte ऍडमिशन ला खाजगी शाळा नाही म्हणतात कारण सरकार कडून रिफंड वेळेत येत नाही म्हणे(खरं तर चिंग्या मुलाना abcd शिकवायला लाखात पैसे घेणाऱ्या शाळांनी 10% rte मुलं चॅरिटी म्हणून स्वतः खर्च करायलाही हरकत नाही.)
Rte ची कोर्ट केस, प्रवेशाला वेळ यामुळे rte मध्ये नंबर लागणार नाही त्यांना पाव वर्षं उशिरा वेगळी शाळा बघणे किंवा 1 वर्षं घरी बसणे अशी वेळ येईल.चांगले, उच्चशिक्षित शिक्षक मोठ्या ग्लॅमर च्या शाळा नोकरी साठी निवडतात.म्हणजे शिक्षणप्रत याबाबत शंका मनपा शाळांमध्ये.
आपण परत 'ही अमकी श्रीमंत इंग्लिश शाळा, तमकी नॉर्मल मराठी शाळा' अश्या वेगळ्या जातीव्यवस्था चालू करण्याकडे चाललो आहोत हे बघून वाचून संताप येतो पण अर्थातच हातात काही नाही.

आता टेक्नॉलॉजीच्या जमान्यात मुलांना चॉईस पाहिजे. एखाद्याला युगांडाला जाऊन सेटल व्हायचे असेल तर त्याने हिंदी, मराठी, इंग्रजी शिकून काय फायदा? त्याला ल्युगांडा, स्वाहिली, अलुर इ. युगांधबोली आली कि झाले.

इथे आहे तोपर्यंत स्थानिक भाषा जुजबी आली तरी ठीक.
युगांडाला जाऊन ययाति आणि देवयानी वर चर्चा करू म्हटले तरी जमते काय?

उलट ख्रिस्तोफर मुवांगा, गोरेट्टी क्युमुहेंदो, मायकेल हिंडीज च्या कादंबर्‍या वाचाव्यात, त्यांचे इंग्रजी, मराठीत भाषांतर करावे...

मराठी/हिंदी शिकल्यामुळे आणि फ्रेंच न शिकल्यामुळे माझे फार फार नुकसान झाले हे मला आज कळले..... अगदी.

परिस्थितीनं गांजलेले म्हणूया का? खरोखरच सायकॉलॉजिकल प्रॉब्लेम असू शकेल..... +१.

“ युगांडाला जाऊन ययाति आणि देवयानी वर चर्चा करू म्हटले तरी जमते काय?” - युगांडास्थित खांडेकरप्रेमी मराठी मित्र-मैत्रिणी भेटले तर जमेल की. Wink Happy

Pages