PS l आणि ll : काही rants

Submitted by रॉय on 4 May, 2023 - 05:31

PS l आणि ll : काही rants

मी कादंबरी वाचली नाही. त्यामुळे पुढील टिपणे फक्त चित्रपटावरच अवलंबून आहेत. कदाचित तामिळ माणसाला कल्कीकृत पोन्नीयन सेल्वनबद्दल अस्मिता असतील आणि त्यांच्यासाठी चित्रपट एक चांगला अनुभव असेल त्यामुळे मूळ कथेला मी कमी लेखू इच्छित नाही. चित्रपटातून समजलेल्या कथेपुरतेच मी मर्यादित लिहितो. हलक्यात घ्याव्यात.

१. सुंदर चोळ उठून चार पावलं तरी चालेल ही माफक अपेक्षा दुसऱ्या भागात पूर्ण होते. पहिल्या भागातल्या चिनी सुयांनी काम केलं हे पाहून मन भरून आले.
२. हिंदी संवाद लिहिणाऱ्याला सलाम. कुंदवै दुसऱ्या भागात मधुरांतकाला 'चाचाश्री' अशी हाकारते तेव्हा कान तृप्त झाले.
३. परमसुंदरी नंदिनी उर्फ ऐश्वर्या राय पापणी लवताना एक्स्पोनेन्शियली जास्त वेळ का घेते हे गूढ शेवटपर्यंत उलगडत नाही. साधी मान जरी वळवायची तरी तिला पूर्ण अंग वळवावे लागते तेही अर्धातास, हे कसले सौंदर्य जडत्व म्हणायचे? दोन्ही भागांच्या एकूण प्लॉटचे वजन नंदिनीच्याच खांद्यावर आहे हे जाणवून देणे हा अभिनयाचा कळसच म्हणायला हवे.
४. उपपरमसुंदरी कुंदवै रोमान्स करतानासुद्धा चेहऱ्यावरचे मसल्स दोन मिलीमीटरदेखील हलवत नाही. तिच्या डोक्यातले ग्राफिक्स कार्ड अपग्रेड करायची सख्त गरज आहे. चोळांनी अजून ग्राफिक्स प्रोसेसिंगचा शोध न लावल्यामुळे हे राह्यलं असावं.
५. शेवटचा सीन पाहून स्टारवार्स भाग तीनच्या शेवटच्या भागाची आठवण झाली. वंदियदेवन आणि जार जार यांच्यात तसाही फारसा फरक नाही.
६. दोन्ही परमसुंदऱ्या कमी होत्या का काय म्हणून तिसरी एक परमसुंदरी माधुरी मध्येच दाखवली जाते. परंतु तिच्याऐवजी जपानी हलती बाहुली जरी दाखवली असती तरी खपून गेले असते. निदान तिने दोन तीन हलके मुरके तरी घेतले असते. परंतु ठीकच. तसाही मधुरांतकन इकडून तिकडे चालत जाण्याऐवजी काहीच करत नाही त्याला स्टॅटिक माधुरी शोभून दिसते.
७. प्लॉट तर साधाच आहे तरीही पात्रांची एकामागोमाग जंत्री लावल्याने, आणि प्रत्येकाची पूर्ण नाव घेण्याची सक्ती असल्याने माणसांनी टोपण नावे का शोधली असावीत याचा उलगडा होतो. आयला इथे टोपणनावही डबल बॅरल - पोन्नीयन सेल्वन.
८. नंदिनीची आई मुकी आहे हे सुंदरचोळ सोडून इतरांना कसे कळते बुद्ध जाणे. परंतु ती मुकी आणि आंधळीही असावी असं तिचं एकंदरीत वागणं आहे. त्यात ते विपुल पांढरेशुभ्र केस, धवल साडी सांभाळत डीप डाइव्ह मारणे, वरूनमोळी वर्मनाला तीनदा वाचवणे हे खायचे काम नाही. त्या अवतार सारखं हत्तीच्या शेपटाला ती तिचे विपुल केस जुळवून मन की बात स्टाईल सूचना देत असते असं दाखवलं तर पटलं असतं.
९. प्रेयसीला मुद्दाम भेटून तिच्या हाताने सूरी खुपसून घेणे हे टीनएजर मंडळीही करत नाहीत. भेटायचेच आहे तर भर उजेडात नदी काठी विहार वगैरे करत भेटावे. आदित्य करिकालना, तुझ्या नावातच आदित्य आहे की रे. कशाला अंधारात धडपडून मेलास? परमसुंदरीच्या चेहऱ्यावर सुरकुती दिसेल अशी भीती होती का तुला? का आयला, टीनएजमध्ये काळे-तपकिरी डोळे असलेली परमसुंदरी घाऱ्या डोळ्यांची कशी काय झाली हा आश्चर्याचा धक्का बसू नयेस म्हणून रात्री मेणबत्त्या विझवून भेटलास, सांग खरं खरं. एवीतेवी मरणारच होतास की.
१०. स्कॅफोल्डिंगचा शोधही चोळांनी लावलाय हे कळ्ळं मणिरत्नमा. नुकताच अहिंसक बुद्धविहारातून बाहेर आलेला अरुणमौळी भर बाजारात, भर उत्सवात देखील एका माणसाला हत्तीकरवी सोंडेने भिरकावून खलास करतो तेव्हा पब्लिक - "क्या मारा, लमावो" असे करत चिल करते. आयला हे नागपट्टणमचं पब्लिक भलतंच चिल्ड होतं म्हणायचं.
११. चोळ एकंदरीतच - "आप जैसा पांड्या मेरी जिंदगी ले जाए तो बात बन जाए" - या एटीट्युडचे होते हे कळलं.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

पहिल्या भागात (हिंदी वर्जनमधे) हेर आणि ऐश्वर्या सीन मधे हेर चक्क प्लीज म्हणतो >>>> हायला!

स्वाती आंबोळेंना इथे एंट्री बॅन करा.

करिकाल चोळ हा ह्या गंडरादित्य, सुंदर इ. चोळांचा पूर्वज राजा होता. त्याचं नाव संस्कृत 'करि' अर्थात हत्तींनाही ठार मारणारा करिकाल असं आहे, असा एक मतप्रवाह आहे, तर दुसरा मतप्रवाह असा आहे, की त्याच्या शत्रूंनी त्याला बंदी बनवून तुरुंगात ठेवला आणि तुरूंगाला आग लावली. त्यातून वाचून तो पळून गेला व नंतर त्याच्या काकाच्या साहाय्याने शत्रूंचं निर्दालन केलं, मात्र ह्यात त्याचा एक पाय भाजून काळा पडला, (आणि करिकाल ह्या शब्दाचा अर्थ पाय काळा असलेला असाही आहे असं म्हणतात) म्हणून हे नाव पडलं. हा करिकाल 'ग्रेट' होता. कावेरी नदीला पूर येऊ नये म्हणून तटबांधणी करणारा पहिला राजा हाच. आदित्यला करिकालन ही पदवी ह्याच्या नावावरून मिळाली.

मराठी कळिकाळाचा अर्थ कलीच्या काळासारखा 'इव्हिल' असा आहे.

बाकी लेख वाचून दिलखुलास हसलो. Lol

चांगली माहिती, भाचा. धन्यवाद! Happy

>>> स्वाती आंबोळेंना इथे एंट्री बॅन करा.
थांबा थांबा, स्कॅफोल्डिंगचं काय ते कळू दे. Proud

सबटायटल्स वाचणार का चित्रपट बघणार? माझ्या मते हिंदी मधेच बघा... चांगला आहे डबिंग... सब स्टोरी आणि चरक्तर बिल्डिंग मधेच दम नाहीय... अत्यंत ओव्हररेटेड फुसका चित्रपट...

>>> तरूण नंदिनीचे काम कुणी केले आहे? ती मुलगी खरेच चाफ्याच्या फुलासारखी अनाघ्रात सुकुमार कलिका दिसते.
बेबी सारा ती. ‘अजीब दास्तान्स’मध्ये शेफालीच्या मुलीचं काम केलेली.

रॉय तुमच्या भाग १ बद्दल च्या प्रत्येक वाक्याशी सहमत. भाग २ सुदैवाने बघितला नाही कारण आमच्या इथे फक्त तामिळ भाषेतलाच रिलीज झाला आहे.

इथली वेगवेगळ्या धाग्यावरची चर्चा वाचून आधी भाग १ बघितला आणि मग पहिलं पुस्तक वाचलं. ते वाचल्यावर लक्षात आलं की कथानकाचा पाया म्हणजे मधुरांतक आणि नंदिनी च्या जन्माच रहस्य चित्रपटात समाविष्ट केलेले नाही. त्याचबरोबर दुसरं अत्यंत महत्त्वाच पात्र म्हणजे तो वैष्णव हेर जो व्ंद्यवेतन इतकाच किंबहुना त्याच्या पेक्षा जास्त कथानकावर प्रभाव टाकतो त्याला ही चित्रपटात फार काही स्थान नाही.
मधुरांतकाच्या दिवंगत वडिलांचा आणि आईचा त्याच्या राज्यारोहणाला असलेला विरोध कशासाठी आहे हे च न कळल्याने पुढच्या सगळ्या मारामारी च प्रयोजन काही स्पष्ट होत नाही. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मुळ कथेत सुंदर चोळ जो पक्षाघाताने अंथरुणाला खिळून असल्याने आणि राजकारण खेळण्यासाठी मेंदू ने तल्लख उरला नसल्याने सध्या विरोधकांच्या हातातील बाहुले बनला आहे. तर इथे आपल्या पायावर चालणारा आणि डावावर प्रतिडाव रचु शकणारा राजा आपल्या मुलाला बंदी बनवुन आणण्याचा आदेश देण्याऐवजी सरळ उठून मुलाकडे का निघून जात नाही हे कळत नाही.
ह्या दोन अत्यंत कच्च्या दुव्यांमुळे कथानक कमालीचं संदर्भहीन आणि विस्कळीत वाटतं. कथानकात इतक्या महत्त्वाच्या त्रुटी मणी रत्नम सारख्या दिग्दर्शकाने का राहु दिल्या ते कळत नाही. त्यात 'सोनेपे सुहागा' म्हणतात तसं पात्रांची निवड. १९ वर्षांचा अरुणमौळी वरमन ३० चा २१ वर्षांची कुंदवै ३५ ची आणि २१ वर्षांची नंदिनी चक्क ५० वर्षांची दिसते.
२१ वर्षांची अत्यंत निरागस दिसणारी मुलगी प्रत्यक्षात इतकी कपटी आणि क्रुर असेल ह्याचा कुणालाच अंदाज येत नसल्याने तिची कारस्थाने यशस्वी होत असतात. तो इनोसंस अमांनी म्हटल्याप्रमाणे त्या छोट्या नंदिनी त दिसु शकतो पण ऐश्वर्यात नाही. तीच गत इतर पात्रांची. आदित्य करिकालन प्रेमात विद्ध झालेला पण राजघराण्यातील संस्कारांमुळे धीरोदात्त पणे वागणारा न वाटता वर कुणीतरी उल्लेख केला आहे त्या प्रमाणे वेडसर आणि क्रुर वाटतो. कुंदवै नुसतीच इकडचं तिकडे ओढणीने रस्ता झाडत फिरताना दिसते जणू काय राजमहाल स्वच्छ ठेवणे एवढीच तिची जबाबदारी आणि इच्छा आहे. व्ंद्यवेतन कुठलाही प्रश्न न पडता एकामागून एक गुन्हे करणारा अट्टल चोर वाटतो आणि अरुणमौळी वरमन काहिसा मतिमंद वाटतो.
सारांश काय तर भट्टी अजीबात जमलेली वाटत नाही. पहिल्या भागात असा भ्रमनिरास झाल्याने दुसरा अर्थातच बघणार नाही पुस्तक मात्र नक्की वाचणार.

क्रिएटिव्हिटी म्हणून हेर फ्राऊ नंदिनी असे म्हणतात हे दाखवायला हरकत नाही. मध्येच औरंगजेबाशी युद्ध, गब्बरसिंगचा हल्ला, सलीम अनारकलीला पर्वतेश्वर लपायला जागा देतो, त्यामुळे माहेश्मतीचे सैन्य चालून येते अशा फोडण्या चालल्या असत्या.

पर्णीका, प्रतिसाद आवडला. मला पिक्चर (पहिला) आवडला होता, पण तेव्हा पुस्तक वाचलं नव्हतं. आता दीड पुस्तक वाचून (ऐकून) झालं आहे.

पवित्रा श्रीनिवासन यांनी इंग्रजी अनुवाद केलेले, पुस्तकाचे पहिले २ भाग Spotify वर होते. Audible वरती पाचही आहेत. अमित भार्गव यांची वाचनशैली आवडली.

Ponniyin Selvan (English) Amit Bhargav असं स्पॉटिफायवर टाकून बघा - पहिलं पुस्तक 'फ्रेश फ्लड्स' हे पॉडकास्टस मध्ये दिसतं आहे.

आपल्याच देशातल्या समृद्ध भाषेतल्या एका मोठ्या कादंबरीचा अनुवाद मराठीत मूळ भाषेतून झालेला नाही आणि ते महत्कार्य जर कुणी केलेच तर त्यालाही बिचाऱ्याला इंग्रजीमधून करावे लागेल या विचारानेच नैराश्य येते.

आजही दाक्षिणात्य पात्रे म्हणजे मूर्ख कॉमिक रिलीफ म्हणून हिंदी चित्रपटांत घातली जातात असला आपला सांस्कृतिक बुळेपणा.

कसलं वैचारिक दारिद्र्य म्हणायचे हे?

नुसतं व्हाट्सअपवर चुयीता "अभिमान किंवा गर्व आहे" छाप वगैरे गोष्टी ढकलत राहायचं, आपली संस्कृती महान वगैरे दांभिकपणा बरळत राहायचं हेच नशीबी आहे वाटतं.

Pages