
आपणा सर्वांना महाराष्ट्र दिन अर्थात मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
यंदाच्या २७ फेब्रुवारी रोजी आपण इथे मराठी भाषा गौरव दिन धुमधडाक्यात साजरा केला. त्या दरम्यान मराठी भाषेच्या अनेक पैलूंना आपण स्पर्श केला. आज मराठी भाषा दिनानिमित्ताने नवा लेख लिहिण्याचा मानस नाही परंतु एक वेगळी कल्पना मनात आली.
मराठी भाषकांचे मराठी वाचन किती प्रमाणात आहे आणि ते कोणकोणत्या माध्यमांमधून केले जाते याचा कानोसा घेण्याचा एक प्रयत्न करावा म्हणतो. मराठी वाचन करण्याची जी विविध माध्यमे आहेत त्यांचे खालील प्रमुख गटांमध्ये वर्गीकरण करता येईल:
* दैनिके
*नियतकालिके
* मराठी संस्थळे
* पुस्तके
या माध्यमांच्या अनुषंगाने खाली एक प्रश्नावली तयार केलेली आहे. आपल्या सवडीनुसार आपल्याला योग्य वाटेल त्या प्रश्नांची उत्तरे प्रतिसादांमधून द्यावीत ही विनंती. या प्रश्नांव्यतिरिक्तही आपणास काही अन्य टिप्पणी करायची असल्यास करू शकता. हा धागा जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोहोचावा या उद्देशाने ललित विभागात काढलेला आहे. कृपया सहकार्य करावे.
दैनिके
१ . रोज कोणती दैनिके वाचता ? छापील का आंतरजालीय ?
२. फक्त बातम्या वाचता की अन्य सदरे देखील?
३. बातम्यांखेरीज आवडणारी सदरे कोणती ?
४. अजिबात न आवडणारी सदरे कोणती ?
५. छापील दैनिके कायमस्वरूपी चालू राहावीत असे वाटते का ?
अन्य नियतकालिके
( मासिक, साप्ताहिक, वार्षिक, इ. )
१. कोणती वाचता ? छापील/ आंतरजाल ?
२. त्यातील आवडणारी सदरे
३. दैनिकांच्या जोडीने यांच्या वाचनाची आवश्यकता वाटते का?
मराठी संस्थळे
१. कोणकोणत्या संस्थळांवर वावर असतो ?
२. इथले वाचन दररोज / अधूनमधून/ क्वचित करता ?
३. आवडणारे विभाग किंवा लेखनप्रकार
४. नावडणारे विभाग / प्रकार
५. फक्त वाचक आहात की अधूनमधून स्वतंत्र लेखन सुद्धा करता ?
पुस्तके
१. वाचण्याची वारंवारिता : दरमहा/ वर्षातून काही महिने/ क्वचित
२. वाचन प्रकार: छापील / इलेक्ट्रॉनिक
३. वाचन श्रवणाचा अनुभव असल्यास : पुस्तक वाचन आणि पुस्तक श्रवण यात अधिक काय आवडते ?
४. पुस्तक वाचनाचा स्रोत : वाचनालय / विकत / मोफत प्रकारे.
५. आवडणाऱ्या आणि नावडणाऱ्या पुस्तकांचा प्रकार.
६. भविष्यात छापील पुस्तके कायमस्वरूपी राहावीत असे वाटते का ?
* वाचनाच्या इतर प्रकारांसंबंधी काही लिहावयाचे असल्यास स्वागत.
वरील प्रश्नांच्या उत्तरांची सुरुवात माझ्यापासून करत नाही. माझी उत्तरे मी चर्चा समारोपाच्या शेवटी देईन. आपल्या सवडीनुसार आपण इथल्या प्रतिसाद आणि चर्चेमध्ये सहभागी व्हावे हे आग्रहाचे आमंत्रण !
धन्यवाद !
*************************************************************************************************
मुखातून गोड वाणी बाहेर पडते
मुखातून गोड वाणी बाहेर पडते हे मान्य. पण . . .
गोड रस फक्त 'मावा'(afid) किटकांच्या शरीरातून बाहेर पडतो हे सत्य आहे. आणि गूळाला मुंगळे जमा होतातच.
हा जो गोडबाबा होता, तो
हा जो गोडबाबा होता, तो सॅकरिनच्या गोळ्यांची पूड हातावर लावायचा. मग शिताफीने हातात घेतलेलं पाणी वगैरे 'गोड' करायचा. या गोळ्या अती गोड असतात. त्यामुळे त्यातली थोडीशी जरी पूड पदार्थात मिसळली तरी तो पदार्थ गोड होत असे. डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या पुस्तकात वाचलं आहे या बाबाबद्दल.
गतिमान संतुलन मी पण घेत होते.
गतिमान संतुलन मी पण घेत होते. बंद होतंय असं कळलंय … ..
धागा आवडला.
मुखातून गोड वाणी बाहेर पडते
मुखातून गोड वाणी बाहेर पडते हे मान्य. >>> अगदी
सॅकरिनच्या गोळ्यांची पूड हातावर लावायचा. >>> +११
धागा आवडला. >>> येउद्या की तुमच्याही वाचनाबद्दल !
धन्स !
दैनिके
दैनिके
१ . रोज कोणती दैनिके वाचता ? छापील का आंतरजालीय ?
२. फक्त बातम्या वाचता की अन्य सदरे देखील?
३. बातम्यांखेरीज आवडणारी सदरे कोणती ?
४. अजिबात न आवडणारी सदरे कोणती ?
५. छापील दैनिके कायमस्वरूपी चालू राहावीत असे वाटते का ?
रोज वाचत नाही. आंतरजालीय ठळक आणि आमच्या शहरातील छोट्या मोठ्या बातम्या वाचते. अवकाशाची सगळी माहिती वाचायला आवडते. पेज ३,बीग्रेड, अनावश्यक भडक सदरे आवडत नाहीत . सध्या NMACC अंगावर येत आहे. छापील दैनिकांबाबत मत नाही.
अन्य नियतकालिके
( मासिक, साप्ताहिक, वार्षिक, इ. )
१. कोणती वाचता ? छापील/ आंतरजाल ?
२. त्यातील आवडणारी सदरे
३. दैनिकांच्या जोडीने यांच्या वाचनाची आवश्यकता वाटते का?
रीडर्स डायजेस्ट आणि नॅशनल जिओग्राफिक ही छापील मासिके घरी येतात , ती आवडतात. त्यातलं सगळं आवडतं. मला हे वाचण्याची आवश्यकता वाटते, कारण दैनिके फार वरवरची वाटतात आणि ते वाचणं होत नाही.
मराठी संस्थळे
१. कोणकोणत्या संस्थळांवर वावर असतो ?
२. इथले वाचन दररोज / अधूनमधून/ क्वचित करता ?
३. आवडणारे विभाग किंवा लेखनप्रकार
४. नावडणारे विभाग / प्रकार
५. फक्त वाचक आहात की अधूनमधून स्वतंत्र लेखन सुद्धा करता ?
मायबोली व मैत्रीण वर वावर आहे. पण मैत्रीण मुलींच्या शाळेत गेल्यासारखे वाटते. मैत्रीण आधार गट म्हणून महत्त्वाचे संस्थळ आहे. तरीही निरोगी समाजात स्त्री- पुरुष संवाद असायला हवा म्हणून इथे जास्त आवडते.
इथले वाचन अधूनमधून करते. चांगल्या भाषेत आणि मुद्देसूद लिहिलेलं सगळं आवडतं. नवरा -बायको-संसार- भांडीकुंडी- कधी कधी पालकत्व या विषयावर लिहिलेलं वाचायला अजिबात आवडत नाही. पाककृती पण रुक्ष लेखन प्रकार वाटतो. उगाच छोट्या छोट्या गोष्टींसाठी तळमळणारे व दांभिक सकारत्मकतेचा आव आणणारे लेख आवडत नाहीत. आशयघन आणि सत्याचा शोध घेणारं लेखन आवडतं , विषय कुठलाही असो.
काही तरी खरडते. बहुतेक सगळं कुठलीही तयारी न करता उत्स्फूर्त असतं. त्यामुळे जो संवाद साधल्या जातो त्यातच खरी मजा आहे.
पुस्तके
१. वाचण्याची वारंवारिता : दरमहा/ वर्षातून काही महिने/ क्वचित
२. वाचन प्रकार: छापील / इलेक्ट्रॉनिक
३. वाचन श्रवणाचा अनुभव असल्यास : पुस्तक वाचन आणि पुस्तक श्रवण यात अधिक काय आवडते ?
४. पुस्तक वाचनाचा स्रोत : वाचनालय / विकत / मोफत प्रकारे.
५. आवडणाऱ्या आणि नावडणाऱ्या पुस्तकांचा प्रकार.
६. भविष्यात छापील पुस्तके कायमस्वरूपी राहावीत असे वाटते का ?
रोज पंधरा मिनिटे छापील पुस्तके वाचण्यावर भर आहे. आंतरजालीय तर सतत वाचते, काय वाचते माहिती नाही. सारखं गुगल करत असते. तत्वज्ञानविषयक तर सगळं ऑनलाईनच वाचलेलं आहे. आम्ही पुस्तकांसाठी सगळे स्रोत वापरतो. तरीही विकत घेणं कमी केलंय, भारतवारीत अधुनमधून आणली आहेत. इलेक्ट्रॉनिक्स पुस्तक वाचत नाही इतर भारंभार गोष्टी वाचते. पॉडकास्ट ऐकते. पाल्हाळ लावणाऱ्या कादंबऱ्या व ललित आवडत नाहीत. उदा. वि.स. खांडेकरांचे अमृतवेल. अतिशय जड व वैचारिक पुस्तके वाचते. छापील पुस्तके रहावीत अशी इच्छा आहे, पुस्तकाचा स्पर्श महत्त्वाचा आहे. माझ्यासाठी ते मेडिटेटिव्ह आहे.
धागा आवडला. काही उत्तरं वाचली. संप्रति व फा यांनी छान लिहिले आहे. संप्रति यांच्या पोस्टमधल्या आवडी-नावडी जुळतात असं लक्षात आलं.
सुंदर प्रतिसाद !
सुंदर प्रतिसाद !
* पण मैत्रीण मुलींच्या शाळेत गेल्यासारखे वाटते... तरीही निरोगी समाजात स्त्री- पुरुष संवाद असायला हवा म्हणून इथे जास्त आवडते
>>>
या वाक्यांवर जोरदार टाळ्या ! आपल्या इथे चर्चेत सहभागी होणाऱ्या स्त्री-पुरुषांचे साधारण समान प्रमाण ही खरंच कौतुकाची गोष्ट आहे.
माझे वाचन:१. दैनिके
माझे वाचन:
१.
दैनिके
१ . रोज: छापील सकाळ.
आंतरजालीय : लोकसत्ता, मटा, लोकमत.
२. बातम्या नजर टाकतो व आवडती सदरे वाचतो.
३. आवडणारी सदरे : संपादकीय पानावरील निवडक लेख, व्यक्तिवेध (सकाळ), माणसं (मटा), विचारमंच (लोकसत्ता), रेल्वे घडामोडी (लोकमत) आणि या सर्वांच्या रविवार पुरवण्यांमधले निवडक लेख.
४. अजिबात न आवडणारी सदरे : ज्योतिष, नटनट्यांची फाजील कौतुके, सौंदर्यप्रसाधने आणि इनोदी प्रकारची.
५. छापील दैनिके कायमस्वरूपी चालू राहावीत असे वाटते, पण कमीतकमी पृष्ठसंख्येची असावीत (कोविड19 च्या टाळेबंदीत होती तेवढी). पृष्ठसंख्येच्या बाबतीत छापील वृत्तपत्रांचे अर्थकारण आणि वाचकांची आवड यांचे समीकरण जुळणार नाही याची कल्पना आहे, तरीही हे वै.म.
घरी जे एकमेव छापील मराठी दैनिक येते ते अजून तरी चालू ठेवलेले आहे. पहिल्या संपूर्ण पानावर असलेली जाहिरात आणि वृत्तपत्र हातात घेऊन उघडताक्षणी त्यातून खाली सांडणारा गुळगुळीत कागदावरचा व्यापारी कचरा बघितला की खरंतर तिडीक येते. तरीसुद्धा, विधायक बातम्या/माहिती पटकन नजरेत भरणे आणि त्यातले शब्दकोडे पेनाने सोडवता येणे या दोन गोष्टींसाठी ते चालू ठेवेन असे दिसते. आयुष्याच्या एका टप्प्यावर रद्दी साठवणे आणि त्याची विल्हेवाट लावणे याचा जेव्हा कंटाळा येईल तेव्हा वेगळा विचार करता येईल, अर्थात कौटुंबिक मत बघावे लागेल.
अन्य नियतकालिके
१,२. आंतरजालावरील अक्षरनामा हे वेबपोर्टल; त्यातील ग्रंथनामा व कला-संस्कृती ही सदरे आवडतात.
३. दैनिकांच्या जोडीने काही प्रमाणात वरील वाचनाची आवश्यकता वाटते. छापील दिवाळी अंक आता वाचत नाही. मला आवडणारी मासिके(अंतर्नाद, अमृत) बंद पडली आहेत. साप्ताहिकांची गरज वाटत नाही.
पुढे चालू ..
२. मराठी संस्थळे
२.
मराठी संस्थळे
१. माबो व मिपा या संस्थळावर वावर असतो.
२. इथले वाचन दररोज करतो.
३. आवडणारे विभाग : ललित लेख, आरोग्य, संगीत व अन्य माहितीपर लेख व भाषाविषयक. सविस्तर वर्णनापेक्षा संकलन स्वरूप अधिक आवडते.
४. नावडणारे विभाग : राजकीय काथ्याकूट/दळण व धार्मिक. जे आवडत नाही त्या विभागावर टिचकी मारायची नाही हे धोरण. ‘ग्रुप’ सुविधेचा वापर..
वरील ३ व ४ या दोघांच्या दरम्यान जे अनेक विषय/प्रकार आहेत ते कधीतरी पाहायला चालून जातात.
५. वाचक आहे आणि नियमित लेखनसुद्धा करतो.
पुस्तके
१. वर्षातून ३ छापील पुस्तके विकत घेतो आणि वर्षभर त्यांचे पुनर्वाचन करीत राहतो. वाचनालय या संस्थेशी असलेला पन्नास वर्षांचा संबंध 2019 मध्ये संपवला. स्व-संग्रहातील छापील पुस्तके एकूण दहाच्या वर जाणार नाहीत याची काळजी घेतो. दर दोन-तीन वर्षांनी काही पुस्तके काढून टाकतो.
३. पुस्तक श्रवणाचा अनुभव नाही. जोपर्यंत डोळ्यांची काही तक्रार नाही तोपर्यंत वाचनच आवडेल. पुस्तक श्रवणात एकाग्रता कितपत होईल याबद्दल शंका वाटते. (पुस्तक वाचावे, गाणे ऐकावे आणि चित्रपट पहावा).
५. आता फक्त लेखसंग्रहच वाचतो.
रोज रात्री साडेनऊ वाजता इ-वाचनाची सर्व प्रकारची साधने बंद करून टाकतो. हा स्वतःवर घातलेला कठोर निर्बंध. त्यानंतर संग्रहातले (अनेक वेळा वाचलेले असले तरीही) एखादे छापील पुस्तक उघडतो आणि त्यातले एखादे प्रकरण वाचतो. हे लवकर व चांगली झोप येण्यासाठी फारच उपयुक्त ठरले आहे !
पुस्तकांचे छापील व इलेक्ट्रॉनिक असे दोन्ही प्रकार कायमस्वरूपी असावेत; प्रत्येकाचे महत्त्व वेगवेगळे आहे. वाचक त्याच्या गरजेनुसार पर्याय निवडू शकेल.
.....
आजचे आघाडीचे कलावंत आणि
आजचे आघाडीचे कलावंत आणि अभ्यासू नट गायक अजय पुरकर यांनी स्टोरीटेलच्या माध्यमातून महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व आणि प्रख्यात लेखक पु.ल. देशपांडे यांच्या कथांचे ‘ऑडीओ बुक्स’ रेकॉर्ड करून त्यांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे.
https://www.berartimes.com/featured-news/172100/?amp
पुलंच्या कोणत्या लिखाणाला
पुलंच्या कोणत्या लिखाणाला कथा म्हटलं असावं असा प्रश्न पडला.
भरत, सही पकडे है !
वरची मुलाखत विचित्र भाषेत लिहिलेली आहे.
(स्टोरीटेलचं आमच्यावर प्रेम आहे, महत्त्वाचा आनंद आहे इत्यादी)
१ . रोज कोणती दैनिके वाचता ?
१ . रोज कोणती दैनिके वाचता ? छापील का आंतरजालीय ?
उत्तर: हो रोज वाचते आंतरजालीय.करोनाकाळापासून छापील बंद केलेय.
२. फक्त बातम्या वाचता की अन्य सदरे देखील?
बातम्या वरवर चाळते. संपादकीय वाचते राजकारणावर नसेल तर व अन्य सदरेही
३. बातम्यांखेरीज आवडणारी सदरे कोणती ?
लोकसत्ताच्या पुरवण्या वाचते.
४. अजिबात न आवडणारी सदरे कोणती ?
राजकारणावरची.
५. छापील दैनिके कायमस्वरूपी चालू राहावीत असे वाटते का ?
अन्य नियतकालिके
( मासिक, साप्ताहिक, वार्षिक, इ. )
हो. पूर्वी रसरंग, सकाळ, धर्मयुग व वडिलांची आवडती ब्लिट्झ व डेबोनायर यायची.
१. कोणती वाचता ? छापील/ आंतरजाल ?
दिवाळी अंक दोन तीन वाचते. एकूण छापील वाचणं अत्यल्प!
२. त्यातील आवडणारी सदरे
कथा , लेख व मुलाखती
३. दैनिकांच्या जोडीने यांच्या वाचनाची आवश्यकता वाटते का?
हो
मराठी संस्थळे
मनोगत पूर्वी आता माबो, मैत्रीण व कधीमधी मिपा
१. कोणकोणत्या संस्थळांवर वावर असतो ?
वरचे
२. इथले वाचन दररोज / अधूनमधून/ क्वचित करता ?
रोज
३. आवडणारे विभाग किंवा लेखनप्रकार
गप्पांची पाने, सिनेमा, अनुभवकथन
४. नावडणारे विभाग / प्रकार
राजकारण
५. फक्त वाचक आहात की अधूनमधून स्वतंत्र लेखन सुद्धा करता ?
सध्या वाचनमात्र
पुस्तके
१. वाचण्याची वारंवारिता : दरमहा/ वर्षातून काही महिने/ क्वचित
क्वचित पण दृष्टीबाधितांकरिता ॲडिओबुक्स करते त्यामुळे जे पुस्तक (अभ्यासक्रमाची) मिळेल त्याच रोज अरधा तास तरी रोजचं वाचन होतच.
२. वाचन प्रकार: छापील / इलेक्ट्रॉनिक
इलेक्टाॅनिक
३. वाचन श्रवणाचा अनुभव असल्यास : पुस्तक वाचन आणि पुस्तक श्रवण यात अधिक काय आवडते ?
पुस्तक वाचन व दृकश्राव्य
४. पुस्तक वाचनाचा स्रोत : वाचनालय / विकत / मोफत प्रकारे.
यशोवाणीकडून जे येईल ते
५. आवडणाऱ्या आणि नावडणाऱ्या पुस्तकांचा प्रकार.
आत्मचरित्र व ललित
६. भविष्यात छापील पुस्तके कायमस्वरूपी राहावीत असे वाटते
हो. दोन्ही राहावीत.
१.
१.
* भरत, सही पकडे है !>>> अगदी. +११
..
२.
*दृष्टीबाधितांकरिता ॲडिओबुक्स करते>>
वा ! सुरेख उपक्रम आहे, ताई.
इंग्रजीतील 'reddit' संस्थळ
इंग्रजीतील 'reddit' संस्थळ कसं सांभाळायचं,नवीन पोस्ट(इंग्रजी किंवा मराठी) नवीन कॉम्युनिटिज सुरू करून कशा टाकायच्या? नवीन पोस्ट कुठे शोधायच्या याबद्दल कुणी सांगेल का?
अकाऊंट उघडून दोन वर्षे झाली पण अजून चाचपडत आहे.
मुख्य म्हणजे मायबोलीकरांसाठी काय सुचवाल?
छान धागा आणि प्रतिसाद.
छान धागा आणि प्रतिसाद.
1.छापील दैनिके - लोकसत्ता आणि मटा
ऑनलाइन असे ठराविक नाही. ज्या बातम्या मोबाईलवर दिसतात त्यांच्यानुसार ठरवतो.
2.अन्य नियतकालिके - एखाद दुसरा दिवाळी अंक.
3.मराठी संस्थळे - फक्त मायबोली
कथा, कविता लेख व चित्रकला ही आवडती सदरे.
4.पुस्तके- छापील पुस्तकेच आवडतात.
कथा, अनुवादित पुस्तके आणि चांगले विनोदी लेखन आवडते
ऐतिहासिक व चरित्र आवडत नाहीत.
छापील पुस्तके चालू राहावीत.
"वाचन : छापील की डिजिटल" या
छान. आभार!
.....
"वाचन : छापील की डिजिटल" या विषयावरील एक अभ्यासपूर्ण लेख:
https://www.aksharnama.com/client/article_detail/6704
लेख अनुवादित असल्यामुळे वाचायला जरा क्लिष्ट वाटतो पण त्यातले मुद्दे चांगले आहेत.
सारांश असा आहे:
माहिती मिळवण्यासाठी डिजिटल माध्यमांवर वाचन आणि साहित्यिक अनुभवासाठी, व बोधात्मक विकासासाठी पारंपरिक माध्यम, म्हणजे पुस्तकं हळूहळू लक्षपूर्वक वाचणं, हे दोन्ही गरजेचं आहे.
दैनिके
दैनिके
शनिवार व रविवार चा लोकसत्ता
online news , Office English दैनिके चाळतो.
मराठी संस्थळे
मायबोली, मिपा
offline वाचन वाढवून Online कमी करण्याचा प्रयत्न सुरु...
offline वाचन वाढवून Online
offline वाचन वाढवून Online कमी करण्याचा प्रयत्न सुरु...
चांगला प्रयत्न
शुभेच्छा !
रेल्वे स्टेशनवर असणारी
रेल्वे स्टेशनवर असणारी व्हीलर दुकाने बंद झाली का ? नियतकालिके जवळ्जवळ सर्व भेटायची तिथे.....
दादरला नही दिसले....
होय, सुमारे २५० मोठ्या
होय, सुमारे २५० मोठ्या स्थानकांवर त्यांच्यातील पुस्तक विक्री बंद झालेली आहे. आता त्यांचे बहुउद्देशीय दुकानांत रूपांतर झाले आहे.
https://www.linkedin.com/pulse/end-era-ah-wheeler-bookstalls-closed-250-...
छान धागा आणि प्रतिसाद. उशिरा
छान धागा आणि प्रतिसाद. उशिरा लिहितो आहे.
माझे मराठी वाचन अगदीच “हे” आहे हे आधीच कबूल करतो. ईंग्रजी हिंदी त्यापेक्षा थोडे बरे. तरीही दररोज तीनही भाषांमधे काही ना काही वाचण्याचा प्रयत्न मात्र असतो.
दैनिके -
घरी मराठी-२ , इंग्रजी-१ आणि अर्थविषयक-१ अशी वृत्तपत्रे येतात, आता एकही वाचत नाही. त्यामुळे १ ते ४ प्रश्न बाद. छापील दैनिके टिकावीत, त्यांची गुणवत्ता वाढावी अशी इच्छा आहे, अपेक्षा नाही.
नियतकालिके -
वाढत्या वयात नित्यनेमाने वाचत असे. आता नाही. जर्मन न्यूज, इंडिया टुडे, काही रशियन प्रकाशने अनेक वर्षे येत. मराठीत चित्रलेखा, अनेक दिवाळी अंक, हिंदीत धर्मयुग, सरिता, वामा वगैरे.
आता डिजिटल नियतकालिके वाचतो काही, वाचनात सातत्य नाही परंतु वैविध्य भरपूर आहे
मराठी संस्थळे -
मायबोली, अक्षरनामा, मिसळपाव. ३-४ दिवसात एकदा चक्कर टाकतो, आवडते विषय असले तेच धागे उघडतो. राजकारण, कर्कश्य चर्चा असलेले किंवा अगदीच मिळमिळीत विषयांचे धागे नावडते, ते सराईतपणे ओलांडतो
विनोदी, अर्थपूर्ण, विवेचनात्मक, फोटो -प्रवासासंबंधी किंवा अन्य वेगळे विषय असलेले लेख वाचतो. कथा-कविता नाही वाचत.
थोडेफार लिहितो मूड लागला तर, शक्य झाल्यास वाचकांच्या प्रश्नांची उत्तरे देतो. संवादी असल्यामुळे मराठी संस्थळे वर्धिष्णू व्हावीत असे वाटते.
पुस्तके -
वाचतो. त्याबद्दल चर्चा फार करीत नाही. मला पुस्तके वाचणाऱ्या, त्यावर चर्चा करणाऱ्या, स्वतः लिहिणाऱ्या, पुस्तकसंचय करणाऱ्या आणि त्यांचे प्रदर्शन मांडून स्वतःच्या संग्रहाबद्दल फुशारक्या मारणाऱ्या लोकांची भरपूर संगत घडली आहे. आता सर्वांचा कंटाळा आला.
सध्या छापिल पुस्तकांच्या अपरिग्रहाचे धोरण आहे, तस्मात भेट मिळालेल्या / मित्रांच्या छापील पुस्तकांचे वाचन, आणि आठवणीनी त्यांचे त्यांना परत.
ऑडिओ बुक्स -
आवडत नाहीत. सो, नेव्हर.
डिजिटल वाचन -
भरपूर करतो. हजारो दुर्मिळ पुस्तके एका टिचकीसरशी समोर हा मला अलादिनचा चिराग वाटतो. विषयाचे बंधन नाही - का ही ही वाचतो
सुंदर !
सुंदर !
त्यांचे प्रदर्शन मांडून स्वतःच्या संग्रहाबद्दल फुशारक्या मारणाऱ्या लोकांची ..
अलादिनचा चिराग
>>> सुंदर व चपखल उपमा !
काही प्रसिद्ध लोक,लेखकांच्या
काही प्रसिद्ध लोक,लेखकांच्या मुलाखतीत मागे पुस्तकांनी भरलेली कपाटं असतात. आता ते फार आटापिटा करत असतील असं वाटतं नाही. मुळात त्यांचं एक बजेट असावं. दरवर्षी इतकी पुस्तकं घेण्याचं. आणि त्यांच्याकडे ब्रिटिश काळापासूनच तीन पिढ्यांनी जमवलेली पुस्तकंही असतील. त्यात भर. तो साठा टिकवण्यासाठी मोठी घरं ही असतील. काही एक दोन नग प्रदर्शन मांडत असतील ते सोडून देऊ.
वकील, डॉ., विचारवंत,राजकारणी यांच्याकडे भरपूर पुस्तके असणार.
दुसरं असं की हे लोक पुस्तकं पूर्ण वाचतात आणि त्यातले संदर्भही देऊ शकतात. आताच ' राजश्री शाहू छत्रपती' पुस्तकं वाचून संपवलं. के.सी.ठाकरे (प्रबोधनकार) शाहूंकडे पुस्तकं लेखन चर्चा आणि आर्थिक मदतीसाठी गेले तेव्हा शाहुमहाराजांनी त्यांना लेखक,ग्रंथ यांची उपयोगी यादीच दिली नाही तर पुस्तकातले उतारे तोंडपाठ म्हणून दाखवले होते हा उल्लेख आहे. संग्रह अफाट,वाचन आणि स्मृतीही अफाट.
सहमत.
सहमत.
दोन्ही प्रकारच्या टोकाच्या भूमिका असणारे ग्रंथसंग्राहक असतात. हा एक किस्सा :
सुप्रसिद्ध इतिहास लेखक जदुनाथ सरकार यांची अशी ख्याती होती की त्यांच्या घरातील व्यक्तिगत ग्रंथालयात त्यांच्या कुटुंबीयांनाही प्रवेश नसायचा. सरकार यांची रियासतकार गो. स. सरदेसाई यांच्याशी मैत्री होती. पण त्यांनाही सरकारांनी आपल्या ग्रंथालयातील पुस्तके कधी पाहू दिली नाहीत.
राजश्री शाहू, प्रबोधनकार,
राजश्री शाहू, प्रबोधनकार, जदुनाथ सरकार, रियासतकार सरदेसाई ही जुन्या जमान्यातली मोठी माणसं. माझा शेरा त्यांच्याबद्दल किंवा त्यांच्या सारख्या लोकोत्तर विद्वानांबद्दल नव्हता.
अगदी बरोबर.
अगदी बरोबर.
दोन्ही प्रकारचे लोक समाजात आहेत.
तुम्ही म्हणता तसे देखील मी काही अनुभवले आहेत.
एकेकाळी घरी पाहुणा आला की त्याच्यासमोर कौटुंबिक फोटोंनी भरलेली संग्रहांची बाडे आदळणारे लोकही होते. माझ्या आठवणीनुसार पुलंनी त्या प्रवृत्तीवर मार्मिक शब्दात तेव्हा टीका केली होती.
.
.
दैनिके
१ . रोज कोणती दैनिके वाचता ? छापील का आंतरजालीय ?
२. फक्त बातम्या वाचता की अन्य सदरे देखील?
३. बातम्यांखेरीज आवडणारी सदरे कोणती ?
४. अजिबात न आवडणारी सदरे कोणती ?
५. छापील दैनिके कायमस्वरूपी चालू राहावीत असे वाटते का ?
पूर्वी मटा, लोकसत्ता आणि TOI
Aata google news
Loksatta ची चतुरंग पुरवणी विशेष आठवते. अर्थ vishayak vacanhi आवडते.
कॉलेज मध्ये असताना Bombay times, पेज ३ वाचायचे.
हो
अन्य नियतकालिके
( मासिक, साप्ताहिक, वार्षिक, इ. )
१. कोणती वाचता ? छापील/ आंतरजाल ?
२. त्यातील आवडणारी सदरे
३. दैनिकांच्या जोडीने यांच्या वाचनाची आवश्यकता वाटते का?
Reader's digest बऱ्यापैकी नियमित वाचायचे.
दिवाळी अंक घरी मिळतील ते... स्वतः हुन शोधले नाहीत. काही आवडत्या लेखिकांचे लेख शोधून वाचायचे.
हो अवांतर वाचन / विरंगुळा म्हणून चांगले आहे.
मराठी संस्थळे
१. कोणकोणत्या संस्थळांवर वावर असतो ?
२. इथले वाचन दररोज / अधूनमधून/ क्वचित करता ?
३. आवडणारे विभाग किंवा लेखनप्रकार
४. नावडणारे विभाग / प्रकार
५. फक्त वाचक आहात की अधूनमधून स्वतंत्र लेखन सुद्धा करता ?
माबो , फेस बुक वरील काही groups आठवड्यातून दोन तीन वेळा. Medium.com
काही लेखकांचं क्लिक होत त्यांचं वाचायला आवडतं.
चांगला विनोद, ललित, वैचारिक, कथा वाचायला आवडते.
उगाच अलंकारिक, अस्पष्ट, ट ला ट जोडून केलेल्या कविता, भयकथा नाही आवडत.
दोन एक वर्षां पूर्वी पासून म्हणजे नुकताच लिहायलचा प्रयत्न करायला सुरुवात केली.
पुस्तके
१. वाचण्याची वारंवारिता : दरमहा/ वर्षातून काही महिने/ क्वचित
२. वाचन प्रकार: छापील / इलेक्ट्रॉनिक
३. वाचन श्रवणाचा अनुभव असल्यास : पुस्तक वाचन आणि पुस्तक श्रवण यात अधिक काय आवडते ?
४. पुस्तक वाचनाचा स्रोत : वाचनालय / विकत / मोफत प्रकारे.
५. आवडणाऱ्या आणि नावडणाऱ्या पुस्तकांचा प्रकार.
६. भविष्यात छापील पुस्तके कायमस्वरूपी राहावीत असे वाटते का ?
नियमित असे नाही कधी लागोपाठ वरच काही वाचून होत तर कधी खूप काळ काही वाचन होत नाही.
छापिल, श्राव्य, ebook काहीही सोयीचं असेल तस..
पण छापिल जास्त आवडतं.
सध्या तरी वाचनालये
Humor आवडतो वाचायला, वेगवेगळ्या प्रदेशातील लेखकांचे वाचून तिकडक्या पद्धती लोक कळतात, टेक्निकल, माहितीपूर्ण, विविध विचार पद्धती / आचार पद्धती, क्वचित तत्वज्ञान मूड प्रमाणे काहीही.
हो छापिल पुस्तके रहावीत आणि राहतील!
छान.
छान.
हो, छापिल पुस्तके रहावीत आणि राहतील!
>>> आतापर्यंत इथे या मुद्द्यावर बहुमत दिसते आहे !
या विषयावर पूर्वी आलेला एक लेख :
छापील पुस्तके विरुद्ध किंडल : जुना रोमान्स विरुद्ध नवा रोमान्स!
https://www.aksharnama.com/client/article_detail/4774
दैनिके
दैनिके
१ . रोज कोणती दैनिके वाचता ? छापील का आंतरजालीय ? > दैनिके पूर्ण पणे बंद आहेत. विश्वासार्ह नाहीत.
२. फक्त बातम्या वाचता की अन्य सदरे देखील? >>> फिड मधे काही विशेष वाटले तर.
३. बातम्यांखेरीज आवडणारी सदरे कोणती ? >>> लागू नाही.
४. अजिबात न आवडणारी सदरे कोणती ? >>> लागू नाही.
५. छापील दैनिके कायमस्वरूपी चालू राहावीत असे वाटते का ? >> असे काही मत सांगता येत नाही.
अन्य नियतकालिके
( मासिक, साप्ताहिक, वार्षिक, इ. )
१. कोणती वाचता ? छापील/ आंतरजाल ? >>> आंतरजाल. लागेल तसे सर्च देऊन वाचतो. अगदीच अडलं तर पैसे द्यावे लागतात. नाहीतर फ्रीच शक्यतो.
२. त्यातील आवडणारी सदरे >>> माहिती पूर्ण कोणत्याही विषयांची. तसेच नेहमी लागणारे म्हणजे करप्रणाली, सरकारी नियम इत्यादी. जे मॅण्डेटरी आहे त्याच्या अपडेटसाठी.
३. दैनिकांच्या जोडीने यांच्या वाचनाची आवश्यकता वाटते का? >>> मूळ सोर्सेस कडून माहिती घेतली तर दैनिकांची गरज वाटत नाही. अनेकदा चुकीच्या वार्तांकनामुळे गैरसमज होतात तो मनस्ताप टळतो.
मराठी संस्थळे
१. कोणकोणत्या संस्थळांवर वावर असतो ? >> फक्त मायबोली.
२. इथले वाचन दररोज / अधूनमधून/ क्वचित करता ? >>> सीझनल. महिनाभर रोज, मग दोन दोन महीने अजिबात नाही.
३. आवडणारे विभाग किंवा लेखनप्रकार >>> माहिती मिळेलसे.
४. नावडणारे विभाग / प्रकार >>> असे काही नाही. पण साहीत्य, फिक्शन हे कमी झाले आहे वाचणे.
५. फक्त वाचक आहात की अधूनमधून स्वतंत्र लेखन सुद्धा करता ? >>> लिखाणाला लागणारा वेळ पाहता अधून मधून करणे सुद्धा अवघड आहे.
पुस्तके
१. वाचण्याची वारंवारिता : दरमहा/ वर्षातून काही महिने/ क्वचित >>> पूर्वीसारखी पुस्तके वाचून होत नाहीत. नवीन मराठी फिक्शन आवडत नाही.
२. वाचन प्रकार: छापील / इलेक्ट्रॉनिक >> इलेक्ट्रॉनिक
३. वाचन श्रवणाचा अनुभव असल्यास : पुस्तक वाचन आणि पुस्तक श्रवण यात अधिक काय आवडते ? >>> ऑनलाईन वाचन करायला अवघड वाटत नाही. श्रवणासाठी कानात काहीतरी खुपसून घ्यायची भावना इरीटेट करते.
४. पुस्तक वाचनाचा स्रोत : वाचनालय / विकत / मोफत प्रकारे. >>> गुगल बुक्स, विकत.
५. आवडणाऱ्या आणि नावडणाऱ्या पुस्तकांचा प्रकार. >>> न आवडणारे असे काही नाही. पण फिक्शन मागे पडले आहे. त्यात जास्त रमणे होत नाही. हल्ली लोकांची आत्मचरीत्रेच एव्हढी थरारक असतात कि फिक्शन काहीच वाटत नाही.
६. भविष्यात छापील पुस्तके कायमस्वरूपी राहावीत असे वाटते का ?>>>> मत देता येत नाही.
* वाचनाच्या इतर प्रकारांसंबंधी काही लिहावयाचे असल्यास स्वागत. --- नंतर वेळ मिळाल्यास लिहीन.
छान. हल्ली लोकांची
छान.
हल्ली लोकांची आत्मचरीत्रेच एव्हढी थरारक असतात कि फिक्शन काहीच वाटत नाही.
>>>> वैशिष्ट्यपूर्ण आणि विचार करण्याजोगा मुद्दा.
Pages