................सुत्रधार.............
गांभीर्यपूर्ण हास्य मी
अन् गहन रहस्य मी
कल्लोळपूर्ण शांती मी
अनंताप्रतची भ्रांती मी
थंड शीत ज्वाळ मी
न् सर्वनाशी काळ मी
शास्त्र मी न् शस्त्र मी
अधर्मभेदी अस्त्र मी
जहाल कडवा सर्प मी
मधुर विषारी दर्प मी
तांडवी रूद्र मी
बलिष्ठ वीरभद्र मी
भयाण,रौद्र,शांत मी
न् खल विदीर्ण अंत मी
गूढ, विषण्ण नाद मी
युगांतरीची साद मी
धैर्य मी धारिष्ट्य मी
अनंत अन् वरिष्ठ मी
हृदयप्रकांड भय मी
न् गहन गूढ लय मी
हृदयज्वाला क्रांती मी
रहस्यमय भ्रमंती मी
गहन अंधकार मी
युगंधरी प्रहार मी
तांडवी संहार मी
न् गूढ सुत्रधार मी...
नमस्कार.ही माझी मायबोलीवरील पहीली कविता आहे.
यामध्ये मी श्रीकृष्णाचे व्यक्तिमत्व डोळ्यासमोर ठेऊन काव्यरचना केली आहे.नुकतच लिहायला सुरवात केली आहे,आपल्या सर्वांच्या मार्गदर्शनाची अपेक्षा आहे.
खूप छान, आवडली!
खूप छान, आवडली!
छान, आवडली!
छान, आवडली!
छान.
छान.