Submitted by हेमंत नाईक. on 23 April, 2023 - 20:46
२३ एप्रिल..आज पुस्तकं दिन...
त्या निमित्त...
झरे लेखनाचे
"वाचाल तरच वाचालं"
सांगून अनेक थोर गेले
राहिले फार कमी आता
ज्यांचे वाचनाशी वैर आहे..१
वाचता ती फक्त्त येते
लिहिण्याची कला हो,
लेखक ते निघून गेले
लेखनाने अमर झाले..२
ईश्वर आम्हास देतो
जगण्यास सर्वं काही
वाचण्याची ती भूक
संस्कार देत आहे.. ३
वाचण्या अनेकात आहे
मोहक सुंदर ते पुस्तकं
त्यासी वाचा नित्य तेथे
शारदेचा निवास आहे.. ४
रिझवता असे अनेक
हे वाचनाचे प्याले..
लेखनाचे जीवन्त झरे
लेखणीस सुरु झाले..५
✍️हेमंत नाईक
२३.०४.२३
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
कविता आवडली
कविता आवडली
छान. शेवटचे कडवे आवडले.
छान. शेवटचे कडवे आवडले.