⚔️⚔️डेथ बाय थाऊसंड कटस्...!!!⚔️⚔️ भाग 4

Submitted by मधुरा कुलकर्णी on 21 April, 2023 - 08:57

भाग १
https://www.maayboli.com/node/83282

भाग २
https://www.maayboli.com/node/83302

भाग ३
https://www.maayboli.com/node/83312

प्रकरण ४ एस् अंडर दि स्लिव्हज्

चंबळच खोर विस्तीर्ण पसरलं होतं.. डोंगरांच्या रांगेत एकटा दिसणारा घोडेस्वार आणि त्याच्या पाठीवरून खांद्यावर लटकत असणारी बंदुकीची नळी डोकावत होती. घोड्याच्या टापांचा आवाज घुमत होता आणि त्या घोड्याच्या पळताना, होणाऱ्या वेगवान हालचालींमुळे रस्त्यावरच्या मातीचे लोट वातावरणात मिसळत होते. अचानक दिसेनासा झालेला घोडेस्वार चढणीवर स्पष्ट व्हायला लागला. पोलिस त्याच्या मागावर असावेत. मागून डोंगराची चढण उजळवत पोलीस व्हॅन येत होती. व्हॅन च्या हेडलाईट च्या प्रकाशाने सगळा पडदा उजळून निघाला होता. व्हॅन च्या खिडकी मधून, हातात रिहॉल्व्हर घेऊन एक पोलीस डोकावत होता आणि त्यांनी रिहॉल्व्हर ताणत, क्रुद्ध नजरेकडे पाहून तो आता कोणत्याही क्षणी गोळी मारणार असं वाटतं होतं....

"गंगाsss... गोली मत चलाओ, गंगाsss..."
ठो...!!!!

थेटर मध्ये बसलेल्या प्रत्येकाचा श्वास रोखला गेला होता. पडद्यावर जीवाची घालमेल करणारा प्रसंग सुरू होता. आणि सगळा जीव एकवटून फिल्म पहात असलेला तो गोळीचा आवाज होताच जोरात ओरडत म्हणाला, "श्या.... पुन्हा गोळी लागली यार याला... दर वेळी मी वॉर्न करतो तरी कधी सुधारेल हे बेंण काय माहीत"
आणि तिथे असणारी जुनी खोंड त्याच्याकडे जणू त्यानेच गोळी मारली असावी अश्या आविर्भावात त्याच्याकडे पाहू लागले...

"चूप बैठ के पिच्चर नही देख सकता क्या रे तू... कितना  ब्रेथ टेकिंग सिन चल रहा था. सगळा मुड बिघाड दिया.."
पुढच्या लाईन मध्ये बसलेला तो पन्नाशीचा गृहस्थ हिंदी, मराठी, इंग्लिश ची भेळ-मिसळ करत त्याच्यावर डाफरला.

"कहा कहा से आते हैं लोग...!!!!"

"चूप करके पिच्चर देख ना... कायको सारा मुड खराब कर रहा है?"

थेटर मध्ये बसलेला प्रत्येक जण त्याच्या नावाने शंख करू लागला..

"चल बेटा, निकल ले... नाहीतर गंगा ला गोळी मारल्याच्या गुन्ह्याखाली ही पिकली पानं मलाच फाशीची शिक्षा सुनावतील...!!" तोंडातल्या तोंडात पुटपुटत त्याने त्या थेटर मधून काढता पाय घेतला.

थेटरमधून बाहेर येत त्याने दीर्घ श्वास घेतला, आणि पँट च्या डाव्या खिशात हात घालत गोल्ड फ्लेक च पाकीट काढून त्यातली एक सिगारेट दातात दाबत लायटर साठी त्या सत्राशे साठ खिसे असलेल्या जाकीटात चाचपडू लागला. शेवटी उजव्या बाजूच्या वरच्या आतल्या खिशात लायटर हातात घेऊन, "देअर यू आर..." असं कुजबुजत त्याचा खटका दाबला. नाकासमोर लायटर ची ज्योत फरफरली. आणि सिगारेट शिलगवत, एक मजबूत कश मारला.

डावा हात खिशात खुपसत, आजूबाजूला पाहत रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या पे पार्किंग च्या दिशेने पावले टाकू लागला. "च्यायला, थेटर मध्ये जाऊन नाही ओरडायच तर की घरी बसून त्या सोळा इंची स्क्रीन वर बघत ओरडायच काय...?? या म्हातार्यांना काम ना धाम, च्यामारी बाकी थेटर जुन्या फिल्म्स लावत पण नाहीत... इथेच येऊन पाहायला लागतय.. आणि इथे येऊन ओरडता येत नाही... साला, कसली गोची आहे राव..."

"निरामयः" या जरा गावाच्या बाहेरच असणार्या वृद्धाश्रमाच्या जवळ असणारं ते "सुखान्त" चित्रपटगृह जुन्या नावजलेल्या फिल्म्स थेटर ला लावायला प्रसिद्ध होतं. टीव्ही वर पाहण्यापेक्षा मोठ्या पडद्यावर जुन्या फिल्म्स पाहायचा शौक असलेला हा वल्ली...

अविनाश राजवाडे...
"रॉबिन हुड" ची सुधारित आवृत्ती...
म्हणजे तो रॉबिन हुड श्रीमंतांना लुटून गरिबांना मदत करायचा... ही त्याची सुधारित आवृत्ती, गुन्हेगारांना त्यांच्याच खेळात त्यांना लुटून यायची...
फक्त... याची "गरीब" या शब्दाची व्याख्या वेगळी होती... त्याच्या मते जगातला सर्वात गरीब माणूस हा स्वतःच होता...

इतरांसारखाच आपलं नशीब आजमवण्यासाठी मुंबईत आलेला हा सडाफटिंग, एकटा जीव सदाशिव असलेला तरुण..

किंचित उभट चेहरा, ५'१०" वैगेरे उंची, मूळचा गोरापान पण उन्हाने थोडा रापलेला वर्ण, लक्ष वेधून घेणारे तपकीरी काळे डोळे आणि त्यातून सतत डोकावणारा मिश्किलपणा, धारदार नाक, रुंद खांदे, व्ही शेप मध्ये उठून दिसणारी छाती,
व्यवस्थित कटस् पडलेले सगळे मसल्स.. असा हा २९-३० चा तरुण...

आपल्याकडे असणार्या डिग्री च्या जोरावर जॉब साठी चप्पला झिजवून सुद्धा
'नो व्हॅकन्सि'
'विचार करून उत्तर देतो..'
असे मिळालेले टीपिकल मिळालेली उत्तर...

मग अश्या जॉब हंट ला राम राम ठोकून, वैतागून ठकास महाठक बनून, टिपिकल गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांकडून वेगवेगळ्या मार्गांनी पैसे उकळवत होता.

"एक काम सांगितलेलं धड करता येत नाही..............." (भाग ३ शेवटचा पराग्रफ)

थेटर कडून पार्किंग कडे येताना थेटर आणि वृद्धाश्रम दोन्हीकडून जवळपास मध्यावर येणार्या सतत बंद असणारं ते वेअर हाऊस...

त्या 'लियॉन को. लिमिटेड' असा रंग उडालेल्या निळ्या रंगाचा बोर्ड लटकवलेल्या त्या जवळपास निर्जन, जुनाट वेअर हाऊस मधून येणाऱ्या आवाजामुळे त्याची उत्सुकता चाळवली गेली.

अंधारात बुडालेल्या त्या वेअर हाऊस मध्ये एवढ्या रात्री कोण आरडाओरड करतंय ते पाहायला तो पार्किंग कडे जायच्या ऐवजी मार्ग बदलून तो त्या वेअर हाऊस च्या दिशेने दबक्या चालीत पण वेगात पावले टाकत जाऊ लागला. आणि त्या वेअर हाऊसच्या उजव्या बाजूला जमिनीपासून आठ-एक फूट उंचीवर असलेल्या खिडकीतून डोकावत पुढचं सगळं संभाषण ऐकलं. आणि लॉकेट चा उल्लेख ऐकून त्याच्या डोळयात चमक आली.

एका लॉकेट साठी त्या दोन जोकरांवर ओरडणारी ती व्यक्ती पाहून त्याच्या डोक्यातली चक्रे वेगाने फिरू लागली. आणि त्या व्यक्तीने मंग्या आणि शऱ्या ला ते लॉकेट पुन्हा एकदा आणण्याची ऑर्डर केली तेंव्हा तो मांजराच्या चालीने त्या दोघांचा पाठलाग करू लागला..

या दोन चंगुमंगु ला लोळवणं त्याचसाठी काही अवघड बाब नव्हती पण अजून माहिती गोळा करण्यासाठी सध्या अंधारात त्या दोघांवर लक्ष ठेवत त्याने निलयचा नंबर डायल केला.

त्याच्या समजो(?)पयोगी कार्याच्या दरम्यान त्याची आणि ह्या कर्तव्यदक्ष, पण खुशमिजास पोलिस अधिकाऱ्यासोबत ओळख झाली, आणि ती ओळख कधी मैत्री मध्ये बदलली दोघांना पण कळले नाही. हा, त्यांच्यात उंदरा - मांजराच सख्य होत... पण वेळ पडल्यास एकमेकांसाठी काहीही करायची त्या दोघांची तयारी होती.

"हॅलो.., बोला. नक्कीच स्वयंघोषित डीटेक्टिव्ह आज कोणती तरी नवीन डीटेक्टिव्हगिरी करत असणार आहेत...!!" निलय चिडवण्याच्या स्वरात म्हणाला.

"ओय इन्स. उगाच कळ काढू नकोस.. मी आता इथे 'सुखान्त'ला आलो होतो ....." अविनाश चिडचिड्या स्वरात म्हणाला..

त्याचं बोलणं अर्ध्यात तोडत निलय म्हणाला, "हो माहितीय गंगा जमना लागला आहे तिथं... तू आणि तुझं जुन्या फिल्म्सच वेड... मला न कधी कधी तुझं गणितच कळत नाही.. तुझ्या घरी टीव्ही आहे... यू ट्यूब वर कोणत्याही जुन्या फिल्म्स पाहू शकतो... पण तुला त्या "सुखान्त" ला जायची काय हौस आहे देव जाणे..."

"मला बोलू देशील का??" अविनाश ने चिडचिड्या पण थोडया गंभीर स्वरात हळू आवाजात निलयला प्रश्न केला.
अविनाश च्या स्वरातील बदल टिपत कपाळावर किंचित आठ्या पाडत निलय बोलला, "बोल, काय झालय? आणि तू अश्या हळू आवाजात का बोलतोयंस?? एनि थिंग सिरियस??"

"हो, बहुदा... तसं दर्शवणारी कोणती घटना सध्या तरी होत नाहीय पण ऑलरेडी झालीय, मी इथल्या त्या वेअर हाउस मध्ये तीन एक लोकांचं संभाषण ऐकलं." आणि अविनाश ने त्या लॉकेटचा, शूट आऊट चा आणि मंग्या ने उल्लेख केलेल्या शूट आऊट मध्ये इंवॉलव असणार्या दुसऱ्या व्यक्ती बद्दल निलय ला सांगू लागला.

इकडे अविनाश चे बोलणे ऐकून निलयच्या कपाळावरच्या आठ्या गडद होऊ लागल्या.
"अवि, त्याने उल्लेख केलेला "चिकणा" म्हणजे मीच आहे.. मला आजच दुपारी ते लॉकेट सापडलं आणि माझ्यावर हल्ला सुद्धा झाला, मी फक्त एकच शॉट ऐकला आणि एकाच व्यक्ती सोबत माझी झटापट झाली. एक काम कर.. त्या दोघांपैकी कोणाच्या मानेवर फिनिक्सचा टॅटू आहे का ते पहा जरा आणि अवि... प्लिज बी केअरफुल... हे प्रकरण खूप गंभीर आहे... डोन्ट गेट हार्म्ड ... आय'म सीरियस.."

निलयचे बोलणे ऐकून अविनाशच्या कपाळावरची शीर तडतडायला लागली. तरी आपल्या रागावर कंट्रोल करून, "डोन्ट वरी निलय, मी काळजी घेईन... तुला सुद्धा सेम सूचना आहे माझ्याकडून... डोन्ट यू डेअर गेट किल्ड ऑन मी... यू हीअर मी?? डोन्ट यू डेअर... आणि मी तो टॅटू चेक करतो." निलयने होकारार्थी उत्तर देत पुन्हा एकदा त्याला काळजी घे अशी सूचना सांगितली.

निलयला सूचना करत त्याने फोन कट केला. आणि थोडया अंतरावर गेल्यावर खिशातून फ्लास्क काढत त्यातली व्हिस्की स्वतः च्या शर्टवर शिंपडली आणि फुल्ल टल्ली झालेल्या इसमाप्रमाणे नागमोडी हालत डुलत, मधून जड जिभेने जसा आवाज येईल तश्या आवाजात जोरजोरात गाणी म्हणत त्या दोघांच्या जवळ जाऊ लागला.

आणि त्या दोघांजवळ जात त्यांच्या खांद्यावर हात टाकत भेसूर आवाज काढत रडू लागला..., " छोड गयी रे वो मेरेको... देख., देख मेरा चेहरा" मंग्याच्या खांद्यावरून गळ्यावर हात घेत स्वतःच्याच हाताने स्वतःचा चेहरा उजवी-डावी कडे करत स्वःतचा चेहरा त्याला दाखवू लागला... "दिखता हू ना मे हिरोमाफिक... तो क्यू उस छचुंदर के लिये उसने मुझे छोड दिया??" अजूनच गळा काढत अवि मंग्या ला विचारू लागला आणि ते करता करताच त्याच्या मानेवरून नजर फिरवली. आणि अचानक मंग्या चा गळा सोडून शऱ्याला स्वतःकडे ओढले आणि त्याच्या कानापाशी अजूनच बेसूर आवाजात ".... प्यार प्यार ना रहा..." करत रडक्या आवाजात त्याची नौटंकी सुरू झाली. आणि त्याच वेळी शऱ्याच्या मानेवर पण नजर टाकून घेतली.

अविनाश च्या या अचानक गळ्यात पडल्याने दोघे पण एकदम भांबावून गेले. आणि त्याच्या तावडीतून सुटका करून घेण्यासाठी प्रयत्न करू लागले...
"हा बेवडा अचानक कुठून आला रे..??"
त्याच्या बेसूर आवाजाला वैतागून त्याची गळ्याभोवतीची मिठी सोडवण्याचा प्रयत्न करीत मंग्या शऱ्याला विचारू लागला.
"मला काय माहीत बे..? मी इथ तुझ्याच सोबत होतो ना...? कायपण चू**सारखे प्रश्न करतोय??" शऱ्या त्याच्यावर खेकसत त्याच्या गळ्याभोवतीची मिठी सोडवण्याचा प्रयत्न करीत म्हणाला.

दोघांच्या ही मानेवर टॅटू न दिसल्याने अविने त्याची पकड सैल केली. ती सैलावलेली पकड जाणवतच दोघे पण लागलीच सुटका करून घेऊन पळू लागले...
" अरे कहा जा रहे हो बे... रुको ना...
मेरा दर्द सुनानेवाला कोई नही है..." तश्याच भेसूर दर्दभर्या (?) आवाजात त्यांना थांबायचा (?) प्रयत्न करत अवि बोलला.
आणि त्या दरम्यान आपला मोबाईल गायब झाल्याची खबर त्या दोघांना पण झाली नाही.

ते दोघे नजरेआड झाल्यावर अवि ने निलयला कॉल केला.
"लेट्स सॉल्व वन मिस्ट्री ऍट अ टाईम ब्रदर.... आय'व्ह गॉट देअर मोबाईलस्...."
चेहऱ्यावर निग्रही हट्टी हसू आणत त्याने निलयला निरोप दिला आणि फोन बंद केला.

*****************

[या भागातला पहिला परग्राफ हा गंगा जमाना मधल्या एका सिन च वर्णन आहे... सुहास शिवळकरांच्या अफलातून या कादंबरी मधून थोडे शब्द मी घेतले आहेत... जर तुम्हाला शक्य झालं तर ही मंदार कथा नक्की वाचा... I hope की मी ह्या सिन च वर्णन थोडं माझ्या शब्दात, थोडं सुशिं च्या शब्दात सांगितलेलं copyrigh चा भंग वैगेरे असणार नाही... जर तसं असेल तर प्लिज मला notify करा... मी त्या सिन च वर्णन मॉडीफाय करून लिहेन... पण मला हा सिन लिहायचाच आहे.. त्यामुळं सिन ठेवेन.. फक्त शब्द बदलेन]

**********

हे अविनाश राजवाडे हे पात्र मला सुहास शिरवळकरांच्या "फिरोज इराणी" या पात्रामुळे सुचलं आहे..
तुम्हाला जर सुशिं ची पुस्तक मिळाली तर नक्की वाचा...
बरेच जण आधीपासूनच सुशिंचे पंखे असतीलच...
पण तरी जाता जाता....

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

बाबुराव /झुंजारची आठवण आली.>>>>>>
अर्र...
मी बाबुराव अर्नाळकरांची तेव्हढी फॅन नाहीय...
सुशि, गुरुनाथ नाईक, हेमंत सावंत... यांची फॅन आहे मी...

प्रतिक्रियेसाठी Thanks

उद्या पोस्ट करेन मी...
@एस
माझ्या exams होत्या त्यामुळे पोस्ट करायला वेळ लागला आहे...