Submitted by हेमंत नाईक. on 20 April, 2023 - 08:59
ओंजळ
ओंजळीत माझ्या..गुलाबी फुले ती,
प्रेमाचा तोच रंग..हा योगायोग नाही..१
सुखद क्षणाच्या.. त्या अविस्मरणीय स्मृति,
जपा ओंजळीत तयांना ..हरवायच्या नाही .२
ओंजळीत लपला..रात्री चंद्र भुतलीचा
रात्रीचा तो दिवस..मावळला नाही..३
ओंजळीत जपल्या..फुलांच्या त्या माळा ,
मोगऱ्याचा तो सुगंध..विसरायचा नाही..४
काळाने ओंजळीला..थरकाप दिला जरी तो
धर हात घट्ट हातात..घाबरायचे नाही ..५
✍️ हेमंत नाईक
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सर्वच शेर छान आहेत.
सर्वच शेर छान आहेत.
ओंजळीत जपल्या..फुलांच्या त्या माळा ,
मोगऱ्याचा तो सुगंध..विसरायचा नाही..४
काळाने ओंजळीला..थरकाप दिला जरी तो
धर हात घट्ट हातात..घाबरायचे नाही
यांना पैकीच्या पैकी गुण दिले आहेत.
-दिलीप बिरुटे
धन्यवाद, गझल लिहिण्याचा पहिला
धन्यवाद, गझल लिहिण्याचा पहिला प्रयत्न केला.
मायबोली वरील मायबोली विशेष
मायबोली वरील मायबोली विशेष सदरात गझलकार बेफिकिर यांची गझल कार्यशाळा आहे . एकदा वाचावी.
गझल हा वृत्तबध्द प्रकार आहे त्या अनुषंगाने लिहावे. सदर रचना गझल किंवा सुटे शेर यात बसत नाही.
सुगंधी गझल.
सुगंधी गझल.
>>>सदर रचना गझल किंवा सुटे
>>>सदर रचना गझल किंवा सुटे शेर यात बसत नाही.>>>>
किरण कुमार+१
किरण कुमार+१
किरण कुमार+१
किरणकुमार,
किरणकुमार,
धन्यवाद, आपल्या मार्गदर्शनाबद्दल.पुढे नक्की काळजी घेईल..
आपणही COEP चे, माझ्याच कॉलेजचे वाचून आनंद झाला.