Submitted by हेमंत नाईक. on 20 April, 2023 - 07:24
काहिली..
खान्देशी आता पेटला,
वैशाखाचा तप्त वणवा..
अंगाला लागती चटके,
आसमंत झाला आवा..
घरट्यात सारे पक्षी
माणसे घरात दडली ..
दुपारी तो शुकशुकाट
रस्त्यावर नाही कुणी ..
दुपारीही तो शेतामंधी ,
राबतो पिकासाठी ..
डोईवर रुमाल, कांदा,
नित्य आहे साथी..
मेघ काळे येता नभी
काळजाचा ठोका चुके..
ग्रहण लागले भाग्याला,
जोरात पाणी कोसळले..
आला पाऊस अवकाळी,
कुठे गारांचा भडीमार..
आकंठ तो कर्जबाजारी ,
शेतमालाची लागली वाट..
काट्याचीच त्याची वाट
चाले उन्हात जीवनभर..
अविरत त्याच्या कष्टाने
मिळता सर्वा दोन घास..
स्वभाव पावसाचा लहरी
बेरका व्यापारी अडती..
दोन्ही बाजूस बसे मार,
अडकीत्त्यात तो सुपारी..
मरणाची त्याला कधी,
भिती नाही ती वाटली..
जीवन हे जीवंत मरण,
आयुष्यभराची काहिली..
✍️हेमंत नाईक.
१६.०४.२०२३
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान कसे म्हणू? पण व्यथा उत्तम
छान कसे म्हणू? पण व्यथा उत्तम मांडलीत __/\__
धन्यवाद.
धन्यवाद.
खुप छान मांडणी..
खुप छान मांडणी..
त्याला लहरी बनवणारे सगळे आपणच..